Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बर्‍याच गोष्टी प्रथमच कळल्या. वॄत्तपत्रांतली एखादी (आदेशवजा) बातमी मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रसिद्ध झाल्याने पुण्यासारख्या मतदारसंघात निर्णायक बदल घडत असेल यावर विश्वास ठेवणे अवघड वाटत आहे. पुढल्या निवडणूकीत काय होते याची उत्सुकता आहे.

वॄत्तपत्रांतली एखादी (आदेशवजा) बातमी मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रसिद्ध झाल्याने आदेश कोण देतो त्याला महत्त्व आहे. इथे पाठिंबा देणार्‍या पक्षाचा पक्षप्रमुख आदेश देतो आहे.

एकूण पवार साहेब बाहेरच्यांशी न लढता घरातल्यांशीच लढत बसतात म्हणा की. हे पवार साहेब पुढे आले ते आमच्या निप्पाणीच्या तंबाखु आंदोलनातुनच ना? आम्च्या गावातुन दिवस उगवायला गाडीभर भाकर्‍या गेल्या आंदोलकांसाठी. गोळीबार झाला तेंव्हा उसाच्या सरीतून दोन तीन दिवसांनंतर लहान बाळ रांगत बाहेर आली. मेलेल्या आईबरोबर राह्यली होती ती आत. हा माणूस मात्र आज शेतकर्‍यांचीच वाट लावायला निघालाय. आम्हालाच भाकर्‍या महाग करुन ठेवल्या याने.