Welcome to misalpav.com
लेखक: फारएन्ड | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती. शाळेत जर आम्ही 'खारे वारे व मतलई वारे एकाच वेळी वाहतात' लिहीले असते तर चालले असते का? एकवेळ मिशी वाढवून किंवा डावीकडच्या ऐवजी उजवीकडून भांग पाडून आला असता तर समजू शकलो असतो. त्याने एवढे हिंदी पिक्चर पाहिलेले व स्वत: अनुभवलेले असल्याने साहजिकच त्याला माहीत असते की 'गायब' झालेला हीरो नंतर कधीतरी उपटतोच इतका वेळ हाय फाय असलेल्या किम ला फक्त पाण्यात पडल्यावर एकदम आपली मर्यादा वगैरेचा साक्षात्कार होतो येऊन तिचे कुंकू पुसतो आणि लगेच ही एकदम खुषीत नाचायला आणि गायला निघून जाते पण त्याची चूक ही असते की तो हीरो नसतो. इतर चित्रपटांत कलाकार फुटेज खातात तसे यातील काही जोड्या वारा खातात
किती किती पंचेस शोधायचे? फार फार दिवसांनी फारएण्ड....

मोहब्बते- जन्म: १९९९/२००० (जे काय असेल ते) कारणः (के हेच्च ए ए जे ज्यांची असेल त्यांची) मृत्यू: २०/०६/२०१३ कारणः फारएन्ड नावाच्या मूव्हीज-सीरियल किलर ने थंड डोक्याने केलेला निर्घृण खून. खुन्याला राजाश्रय असल्याने दबक्या आवाजात खुसपूस सुरु आहे. (अहो हापिसात खदाखदा कसं काय हसता येईल? ;) )

पंचेस हायलाईट करायचे म्हणजे लेखच चोप्य पस्ते करुन हायलाईट करायचा असं होईल. तरीही खास कौतुक.. कारण मला आठवतं त्यानुसार हा सिनेमा चार तासांपेक्षा जास्त लांब आहे. इतका अवाढव्य पिच्चर पाहून त्यातल्या तपशिलांसकट हे लिहीणं हेच एक वंदनीय कार्य आहे. त्याउपर खदखदून हसायला लावणं हे तर एकदम लाजवाब.. सिनेमातला वार्‍याचा प्रभाव, सर्व नवनायकांचं "तुझं झालं की माझी पाळी" अशा रितीने एकामागून एक होणारं प्रेम इत्यादि, राज आर्यन मल्होत्राऐवजी राज मल्होत्रा बनून येताच ओळख न लागणं.. आणि अशा असंख्य गोष्टी फारेण्डरावांच्या तीक्ष्ण नजरेने पकडल्या आहेत.

हा हा हा... हसुन हसुन वाट लागली माझी... अजिबात आवडला नव्हता हा मुव्ही... मी अजुनही एकदा पण हा पुर्ण मुव्ही बघितला नाहिये. तो शाहरुख आणि ती ऐश्वर्या डोक्यात जातात अगदी माझ्या.

Mohabbatein असे स्पेलिंग असल्याने आम्ही तेव्हा या चित्रपटाच्या नावाचा उच्चार 'मोहब्बतेंइन' असा करायचो ;-). हे परिक्षण त्या चित्रपटाशी संबंधीत कलाकारांना पाठवायला हवे :-). या भन्नाट परिक्षणाकरिता दंडवत स्विकारावा...!

मात्र उदय चोप्रा दिग्दर्शकाचा खास आदमी असल्याने उत्तर रेल्वे इंजिनापासून तिसर्‍या डब्याच्या जागे एक उघडी वॅगन लावते, व हा त्यातून बॅग फेकून मग उतरतो. हे भारीच हा.. सॉरी उदय चोप्रा, पण काही लोक आपल्याला बघायला नाही आवडत, भले त्यांच्यात तसे काही वाईट का नसेना... माझ्यासाठी तू त्यापैकीच एक.. लेख फारएण्ड स्पेशलच.. :) अवांतर - लॉजिक कुछ भी रेहनो दो, तो चित्रपट मी बघतो कधी अधूनमधून लागला की.. पण फक्त अमिताभ आणि शाहरुख असेल तरच सीन बघायला मजा येते, बाकीच्यांना जरा आणखी कमी मध्ये निपटवले असते त्यात तर आणखी बरे झाले असते... पण मग तुमच्या लेखाचीही लांबी कमी झाली असती.

आवडेश !! मला एकाने विचारले होते एश्वर्या कोण आहे पिक्चर मध्ये मी : हडळ ;)

च्यायला! शिण्माबद्दल लिहायचं म्हणलं की ह्या फारएन्डबुवांच्या अंगात काय मुरारबाजी संचारतो की बाजी प्रभू देशपांडे? निस्ता दांडपट्टा! सपासप सप्पासप... :D बाकी, त्या अनुपम खेर आणि आणि 'तो' अर्चना पूरण'सिंग' ह्यांच्या फ्लर्टिंगची काहीच दखल न घेतल्याबद्दल निषेध! ;) आम्ही आपलं हा शिणुमा पहायला गेलो ते एका बिनडोक मित्राच्या सांगण्यावरुन. काय तर म्हणे, 'नव्या हिरव्हिनी लै फटाका हैत' झालं..गेले सगळे आंबटशौकीन पदराला खार लाऊन. मग काय, आख्खा टैम त्या किम शर्माचे चिमखडे बोल, अन हिंदकेसरी शमिता शेट्टी ह्यांची पंजाबकेसरी उदय चोप्रा (ह्याला आम्ही बेडूक म्हणायचो.) सोबतची निकाली कुस्ती नशिबी आली. शेवटी आंबटशौकीनपणा लिमलेटच्या गोळ्यांवर भागवला. :D त्यात आणि ते खुळ्या डोस्क्याचं शारुक. व्हायलीन असं पकडून फरफटत नेत असतंय जणू मेलेली कुत्री ओढून न्यायच्या मुन्शिपाल्टीच्या कामावरुन नुकताच इकडं जॉईन झालाय. तर ते असोच. नशीबाचे भोग असतात एकेक, ते भोगूनच संपवावे लागतात. अवांतरः आता पुढचं टार्गेट - 'कभी खुशी कभी गम' घ्या फाडायला. लै दणकेबाज पोट्यान्शियल आहे ;)

हा हा हा. भारी हो फ़ारेण्डराव ! धम्या म्हणतोय तो कभी खुशी …. शिणेमाही फ़ाडायला घ्यावा ही विनंती . . तो सिनेमा बघून घरी येईपर्यंत मला ताप भरला होता.

हा हा हा... खुप मस्त चिरफाड..!!! च्यायला आता हा पिक्चर बघावा लागणार....!!! आधी न पहायचा ठरवला होता. हा लेख वाचून चित्रपट पहायला खुपच मजा येईल..!! हा चित्रपट (ह्या परिक्षणाबरोबर) परत release केला तर पहिल्यापेक्षा जास्त गल्ला जमा करेल. बाकी चकदे, स्वदेस, वेन्स्डे अशा बहूतांशी चांगल्या चित्रपटांची चिरफाड करता येईल का? (म्हणजे अशी किंवा थोडीफार चिरफाड करायचा scope आहे का?)

चित्रपट पाहण्याची हिंमत कधी झाली नाही. चिरफाड वाचून मात्र भरपूर करमणूक झाली.

हे ही.. भारीच.. आधी वाचलं होतं, पुन्हा वाचूनही तेवढीच हसले. " हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती." बेस्ट!