Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?
करेक्ट! असाच प्रश्न मी पहिल्या पानावर विचारला आहे आणि त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. :) - ('मनातलं जनात,ब्रिजेश उवाच' बोलणारा)‌ सोकाजी

म्हणून `नाम-साधनेवर' लिहीणार नव्हतो पण त्यावर सतत प्रश्न येत राहिल्यानं लिहावं लागलं. अर्थात त्याचा देखील विचार करू शकणार्‍यांना उपयोग होईलच.
माझ्या अनुभवानं सर्वांना उपयोगी होईल अशी एक अत्यंत नवी पद्धत सांगितली आहे. सदस्यांनी एकतर त्या पद्धातीचा उपयोग करून येणारे निष्कर्श लिहावे किंवा मनावर हुकुमत मिळवण्यास प्रचलित पद्धती (अवलोकन आणि नामसाधन) कश्या सहाय्यक ठरतात ते दाखवावं इतकी साधी अपेक्षा होती.
हे वर नमूद केलं आहेच. पुढच्या भागात स्मृती ऐवजी जाणिवेनं कसं जगावं, अंतःप्रेरणा म्हणजे काय आणि तन्मयता कशानं साधते यावर लिहीणार होतो पण ते पहिली स्टेप ( जो या लेखाचा विषय आहे : `स्मृती सक्रिय होण्यावर हुकुमत') जमल्याशिवाय शक्य होत नाही.

या धाग्यावर प्रतिसाद द्यायची ईच्छा नव्हती. अगदीच राहवलं नाही तेव्हा आमचे परम मित्र प्यारेमहाराज वाईकर यांना उद्देशून एक उपहासात्मक प्रतिसाद दिला. "अचपळ मन माझे नावरे आवरीता" दुसरं काय? :) असो. हा प्रतिसाद वेगळ्या कारणासाठी आहे. "मन" या विषयावर एक अतिशय सुंदर पुस्तक नुकतंच वाचून संपवलं. आपल्या सुदैवाने मराठीत मानसशास्त्र या विषयावर खुप उच्च दर्जाचं लेखन होतं. डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. रमा मराठे, डॉ. वैजयंती खानोलकर या मानसोपचार तज्ञांनी विपुल लेखन केलं आहे. पण एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक हाती पडलं, आणि एक अनमोल ठेवा हाती लागला. पुस्तकाचं नाव आहे "मनाचे व्यवस्थापन", लेखक संजय पंडित, ध्रुव मीडीया पब्लिकेशन. जवळपास चारशे पानांच्या या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये आहे. अगदी सहज सोप्या भाषेत, पुर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून या पुस्तकात "मन" उकलण्याचा प्रयत्न केला आहे. भगवद्गीतेची एक वेगळी ओळखही या पुस्तकात करुन दिली आहे. असो. पुस्तकाचं परीक्षण लिहिण्याईतका मी मोठा नाही. एव्हढंच लिहीन की आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्य सुसह्य करायला आणि आयुष्याचा खरा अर्थ कळायला हे पुस्तक नक्कीच मदत करेल. प्रत्येक घरात असावं, प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

बरोबर आहे. त्या पुस्तकाच्या परिक्षणाचा वेगळा धागा काढायला हवा होता. अजून ही काढा, मी नक्की प्रतिसाद देईन.

तुम्ही माझा प्रतिसाद व्यवस्थित वाचलेला नाही. मी म्हटलंय,
पुस्तकाचं परीक्षण लिहिण्याईतका मी मोठा नाही.
परीक्षण तर लिहायचे नव्हते परंतू पुस्तकाचा विषय या धाग्याशी संबंधीत आहे. म्हणून इथेच प्रतिसाद लिहिला.

इथे जनसामान्यांचं भलं व्हावं म्हणून मनासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर संजय क्षीरसागर यांच्यासारखी नम्र आणि ऋजू स्वभावाची या क्षेत्रातील अतिशय अधिकारी व्यक्ती कळकळीने लिहित असताना तुम्ही उगाचच आपले पुस्तकी ज्ञान पाजळताय आणि वरुन प्रतिसादातिल त्यांच्या चुकाही काढताय. ;)

अनेक गोष्टी - लेखातल्या आणि प्रतिसादातल्याही - कळण्याइतकं डोकं आपल्याला (प्रथमपुरुषी, आदरार्थी!) नाही याबद्दल समाधान वाटतं आहे आत्ता तरी. पण चिकित्सेच्या मार्गावर 'प्रबोधन ( अर्थात दुस-यांचे,स्वतःचे नाही) करण्याची ऊर्मी' हा एक भुलभुलय्या असू शकतो, सावध राहिलं पाहिजे आपण (पुन्हा प्रथमपुरुषी, आदरार्थी!) याची जाणीव मात्र झाली. ती किती काळ टिकेल ते बघायचे :-)

या धाग्यावरचे सगळे इश्यूज सॉर्ट आऊट झाले का..? झाले असल्यास `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (दोन) च्या प्रतिक्षेत. (आशावादी) मोदक.

संक्षी... तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे ते एका सुटसुटीत वाक्यात सांगता का प्लीज..?

मोदका , एका वाक्यात मी सांगू मी सांगू?????????? (संजय सर माझी टैम्प्लिस हा.... आमी कटापच हावो पण आप्लं १२ वा खेळाडू पाणी द्यायला येतो तसं. आय होप तुम्हाला काही त्रास नाही होणार! ) एका वाक्यात 'फक्त मलाच सगळ्या विषयातलं सग्गळंच्या सगळं कळतं'

अजून एक संक्षिप्त अर्थः आमचे येथे सर्व प्रकारच्या चर्चा 'निराकार'पणे लांबवून सर्वांची घड्याळे फेकून दिली जातात.

संक्षी म्हणजे भिडस्त पणा न ठेवता भिडणार्‍या खेळाडूचा खेळ !! सामना रंगलेला दिसतोय ! आमची साठा उत्तराची कहाणी हे सांगते की आपला उद्धार आपणच करावा . त्यासाठी आपल्याच मनाचे निरिक्षण करायला जमले पाहिजे म्हणजेच अहंकारावर मात करता आली पाहिजे. समाजधर्म म्हणून इतराना बदलायचा प्रयत्न थोडाफार करावा पण आपल्या मनाकडे दुर्लक्ष न करता. विवेकानंदाचे एक वाक्य आठवले . There is no help outside !

त्यासाठी आपल्याच मनाचे निरिक्षण करायला जमले पाहिजे म्हणजेच अहंकारावर मात करता आली पाहिजे. समाजधर्म म्हणून इतराना बदलायचा प्रयत्न थोडाफार करावा पण आपल्या मनाकडे दुर्लक्ष न करता.
तुमचं हे म्हणणं सर्वसामान्यांना लागू होतं, ज्यांना निराकार गवसलाय त्यांना नाही. ;)

सर्वसामान्य म्हणजे साधक आणि आणखीन एक कोणतातरी प्रकार वगळून शिल्लक राहिलेले अध्यात्मविहीन लोक. संक्षींच्या मते तर असे अध्यात्मविहीन लोक फक्त गॉसीपमध्ये रस घेतात.

मार्गही अनंत असू शकतात. कुठला तरी एकच मार्ग बरोबर आणि बाकीचे मार्ग तितकेसे उपयुक्त नाहीत हे म्हणजे आमचाच देव खरा आणि तुमचा देव खोटा ह्यातला प्रकार झाला. आपल्याला अंतिम सत्याची जाणीव झाली आहे असा ज्यांचा दावा असेल त्यांनी इतरांच्या चुका पोटात घालून सातत्याने सत्य मांडत राहणे ही त्यांची जबाबदारी आहे. साक्षात श्रीकृष्ण स्वत: अर्जुनाचा सारथी होता तरी अर्जुनाने विचारल्याशिवाय त्याने मार्गदर्शन केले नाही आणि अर्जुनाच्या इच्छेविरुद्ध सारथ्यही केले नाही. अमुक मार्ग चूक आणि तमुक मार्ग बरोबर या द्वैतातून जे बाहेर पडू शकत नाहीत त्यांना अद्वैत कसे कळावे?

येस, पण तुम्हाला एकच मार्ग अनुसरावा लागतो.
कुठला तरी एकच मार्ग बरोबर आणि बाकीचे मार्ग तितकेसे उपयुक्त नाहीत हे म्हणजे आमचाच देव खरा आणि तुमचा देव खोटा ह्यातला प्रकार झाला.
मी फक्त दोन प्रचलित साधना पद्धतींचे दोष सविस्तर दाखवून दिले आहेत आणि नवी प्रणाली मांडली आहे. इथे कुणीही त्याचा प्रतिवाद करू शकलेला नाही. तुम्ही काय करावं हा आता सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.
आपल्याला अंतिम सत्याची जाणीव झाली आहे असा ज्यांचा दावा असेल त्यांनी इतरांच्या चुका पोटात घालून सातत्याने सत्य मांडत राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.
मग चर्चाच होणार नाही.
साक्षात श्रीकृष्ण स्वत: अर्जुनाचा सारथी होता तरी अर्जुनाने विचारल्याशिवाय त्याने मार्गदर्शन केले नाही आणि अर्जुनाच्या इच्छेविरुद्ध सारथ्यही केले नाही.
एकदा तुम्ही म्हणतायं `सत्य मांडत राहा' आणि आता म्हणताय `विचारल्याशिवाय बोलू नका'. शिवाय मी कुणाच्या रथाचं सारथ्य करत नाही कारण ज्यानं त्यानं आपला रथ चालवायचा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
अमुक मार्ग चूक आणि तमुक मार्ग बरोबर या द्वैतातून जे बाहेर पडू शकत नाहीत त्यांना अद्वैत कसे कळावे?
`मार्ग अनंत असू शकतात' हे तुमचं विधान आहे (आणि ते अर्थात योग्य आहे) याचा अर्थच मार्गात द्वैत आहे. अद्वैताप्रत पोहोचायला निश्चयात्मकपणे एकाच मार्गावर चालावं लागतं आणि अद्वैत जाणलेल्यालाच सर्व मार्गांचं आकलन असू शकतं त्यामुळे तो सर्वात सोपा मार्ग सांगू शकतो.

येस, पण तुम्हाला एकच मार्ग अनुसरावा लागतो.
हा एकच मार्ग कोणता असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर मार्गांना व्यर्थ ठरवून आपलाच मार्ग बरोबर आहे असे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर ते मानसिक असुरक्षिततेचे लक्षण आहे. अध्यात्म हे निव्वळ शब्दांतून मांडण्यापेक्षा आचरणातून दिसले पाहिजे. संतांनी केवळ अभंग लिहून ठेवले म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. तर त्यांनी त्या अभंगांतील तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवले म्हणून आज त्यांना समाजात आदराचे स्थान आहे. तथागत बुद्धांना स्वत:चे बुद्धत्व शाब्दिक पांडित्यातून सिद्ध करण्याची वेळच आली नाही. त्यांच्या अस्तित्वातूनच त्यांच्या बुद्धत्वाची ओळख पटत होती.
मग चर्चाच होणार नाही.
वरील प्रतिसादात प्रतिवाद हा शब्द वापरला आहे. चर्चेचा उद्देश विचारमंथन करून एका निष्कर्षाप्रत येणे हा असतो. प्रतिवादाचा उद्देश स्वत:ची बाजू बरोबर आहे हे पटवून देण्याचा असतो. तुमचा मार्ग चुकीचा आहे असे सिद्ध करण्यात कोणालाच रस नाही. पण इतर मार्ग दोषपूर्ण आहेत हे तुमचे मत इतरांना मान्य नाही. अध्यात्माचा मुख्य उद्देश इतरांचे दोष दाखवणे हा नसून स्वत:मधील दोष दूर करणे हा आहे. प्रत्येक नदी आपापल्या मार्गाने सागराला जाऊन मिळतच असते. एका नदीचे पात्र विशाल आहे म्हणून इतर नद्यांनी आपले मार्ग सोडून तिला जाऊन मिळावे अशी अपेक्षा निसर्ग देखील करत नाही.
एकदा तुम्ही म्हणतायं `सत्य मांडत राहा'
इतरांच्या चुका पोटात घालून सत्य मांडत राहणे असे पूर्ण वाक्य आहे. आपल्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे अशी धारणा असेल तर इतरांचे दोष दाखवण्यापेक्षा त्यांच्यात स्वत:मधील दोष दूर करण्याइतके परिवर्तन घडवून आणणे हे ध्येय असले पाहिजे.
याचा अर्थच मार्गात द्वैत आहे. अद्वैत जाणलेल्यालाच सर्व मार्गांचं आकलन असू शकतं
जशी दृष्टी तशी सृष्टी. आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती ज्या जगात आहेत त्याच जगात संत महात्मे देखील आहेत. पण त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी सामान्य जनांहून वेगळी असल्यानेच ते त्या पदाला पोचले आहेत. द्वैत हे मार्गांत नसून दृष्टीमध्ये असते. ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे त्यांना मार्ग अनंत असले तरी त्यांत भेद दिसत नाही.

फक्त या गीतेचा योग्य तिथे कितपत परिणाम होईल याबद्दल साशंक.

>हा एकच मार्ग कोणता असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे = मी कुठे म्हणतोय माझ्या मार्गावर चला? >इतर मार्गांना व्यर्थ ठरवून आपलाच मार्ग बरोबर आहे असे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर ते मानसिक असुरक्षिततेचे लक्षण आहे. = नेमकं विरूद्ध लिहीलंय. तुम्ही प्रतिसाद वाचले असतील तर ज्यांना स्वत:चा मार्ग चुकला असं वाटतंय ते व्यक्तिगत प्रतिसाद देतायंत. >संतांनी केवळ अभंग लिहून ठेवले म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत...वगैरे = प्रत्येकाचा तो जीवंत असताना उपहास केला गेला आहे आणि नंतर गोडवे गायले गेलेत याची दखल घ्यावी. >वरील प्रतिसादात प्रतिवाद हा शब्द वापरला आहे....वगैरे = चर्चेचा अर्थ वैचारिक देवाणघेवाण. तुम्हाला बळजबरी का वाटतेय? मी सुरूवातीलाच म्हटलंय, पटत नसेल तर तुमचा मार्ग अनुसरा. >आपल्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले...वगैरे = ज्याला अंतिम ज्ञान झालं त्याला ‘दोष नव्हताच, गैरसमज होता’ हे लक्षात येतं. तो कुणालाही दोषी ठरवत नाही याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. एखादी नवी प्रणाली मांडताना, जुनी निरुपयोगी आहे असं म्हणणं म्हणजे व्यक्तिगत दोषारोप नाही. >द्वैत हे मार्गांत नसून दृष्टीमध्ये असते. ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे त्यांना मार्ग अनंत असले तरी त्यांत भेद दिसत नाही. = साधी गोष्ट आहे : तुमच्याकडे अद्वैतदृष्टी असेल तर तुम्ही ‘नामसाधना किंवा मनाचं अवलोकन’ मनाचा उलगडा करायला कसं समर्थ आहे ते सांगा. उगीच गोलमाल प्रतिसाद देऊन काही उपयोग नाही.

मी कुठे म्हणतोय माझ्या मार्गावर चला?
आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे. भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. इतरांच्या मार्गांना आधीच व्यर्थ, निरर्थक आणि कंटाळवाणे ठरवल्यावर आणखी कुठला पर्याय तुंम्ही त्यांच्यासमोर शिल्लक ठेवला आहे?
प्रत्येकाचा तो जीवंत असताना उपहास केला गेला आहे..
प्रत्येकाला त्यांच्या हयातीत बरेच अनुयायी देखील मिळाले आहेत. ते अनुयायी निव्वळ उपदेश ऐकून नव्हे तर त्या महनीय विभूतींचे आचरण बघून प्रभावित झाले होते.
पटत नसेल तर तुमचा मार्ग अनुसरा.
इतरांच्या मार्गांना व्यर्थ निरर्थक आणि कंटाळवाणे ठरवण्याआधी हाच विचार तुम्हाला का बरे सुचला नाही? जे मार्ग तुम्हाला व्यर्थ वाटतात त्या मार्गांचा अवलंब करून कोणालाही अंतिम सत्याची अनुभूती आलेलीच नाही असे ठाम विधान तुम्ही करू शकता काय?
ज्याला अंतिम ज्ञान झालं त्याला ‘दोष नव्हताच, गैरसमज होता’ हे लक्षात येतं. तो कुणालाही दोषी ठरवत नाही..
मी फक्त दोन प्रचलित साधना पद्धतींचे दोष सविस्तर दाखवून दिले आहेत..
हे तुमचेच विधान आहे. जुनी प्रणाली दोषपूर्ण ठरवणे म्हणजे ज्यांनी ती प्रणाली शोधून काढली त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्यासारखेच आहे. याचा अर्थ तुम्हाला अंतिम सत्याचे ज्ञान झालेले नाही असा होऊ शकतो.
तुमच्याकडे अद्वैतदृष्टी असेल तर..
अध्यात्म हा अनुभूतीचा विषय आहे, तर्काचा नाही. ही अनुभूती मिळवण्याचे विविध मार्ग हजारो वर्षांच्या परंपरेतून निर्माण झालेले आहेत. स्वामी विवेकानंद यांना देखील प्रथम निराकाराची साधना सर्वश्रेष्ठ असून मूर्तीपूजा व्यर्थ आहे असेच वाटत असे. त्यावर रामकृष्ण परमहंस यांनी तार्किक युक्तिवाद न करता त्यांना कालीमातेच्या मंदिरात नेउन प्रत्यक्ष अनुभव दिला. त्यानंतर विवेकानंदांनी कधीही मूर्तीपूजेचा विरोध केला नाही. आपलाच मार्ग बरोबर आहे आणि इतर मार्ग निरुपयोगी आहेत हे तर्काच्या आधारे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर अंतिम सत्याचे ज्ञान झालेले महात्मे आणि नुसतेच शब्दपंडित यांच्यात फरक तो काय राहिला?

न्या. रा मोड. ऑन > बरें कां अंर्धवट्रांव, जगात मोठें व्ह्यायचे असेल तर ट्रोलिंगचे ज्ञान मिळवल्याशिवाय काही शक्य नाही बरें! न्या. रा. मोड ऑफ >

या प्रतिसादातील वैयक्तीत सूर पटला नाही. "प्राचिन ऋषीमुनींनी आणि संतांनी पेटवलेल्या ज्ञानरूपी मशालीच्या प्रकाशाकणांच्या सहाय्याने आजकालच्या अप्राचिन काळातील बाबाबुवांचे अनुयायी एन्लाईटमेंटच्या मृगजळात गळ टाकून मासेमारी करत आहेत" असा काहीसा सूर वाटतो आहे.

आता मात्र तुम्ही फाटे फोडताय मोदकराव. ना तुम्हाला प्राचीन ऋषीमुनी माहित, ना प्रकाशाचे नियम कळतात ना मासेमारी करता येत. नुसतं धन जमवायचं कळतं.. अश्यानी चर्चेचे किती नुकसान होतय.

चर्चा..???? बॉर बॉर.. तुमचे चालूद्या. ना तुम्हाला प्राचीन ऋषीमुनी माहित, ना प्रकाशाचे नियम कळतात ना मासेमारी करता येत. नुसतं धन जमवायचं कळतं.. हा साक्षात्कार कोणत्या झाडाखाली झाला..?

जगात वावरणे फार सोपे असते. काही साध्या प्रक्रिया समजून घेतल्या तर तुम्हाला सतराशे साठ पंखे मिळू शकतात. आता पहा. मी म्हणणार, 'धावण्याच्या स्पर्धेत माझाच पहिला नंबर. मिल्खासिन्गला तर नुसते धावायचे शिकायला कितितरी वर्षे लागली. माझा तर दुसरी ब मध्ये असतानाच पहिला नंबर आलय.' यावर अर्धवटराव चकित होउन मला सांगायला येणार. 'अगं, माउ, तुझं वजन पाहिलयस का कधी? अशी कशी पहिली येशील? तो ब्याट्म्यान बघ किती जोरात पळतो. चल रेस लावुयात.' मी: त्या ब्याटम्यानाला उगीच मध्ये आणू नकोस. मला तुझं सांग. सांग बरं पळताना तू शेवटचा पाय कुठला टाकतोस? अर्धू: क्क्याय्य??? मी: तुला पळण्यातलं काहीही कळत नाही. माझाच नंबर पहिला. मी दुसरी ब मध्ये असतानाच पहिली आलेय. त्यावेळेस मिळालेल्या प्लास्टिकच्या ग्लासातूनच मी रोज पाणी पिते, हे त्याच पहिल्या नंबराचे द्योतक आहे'. अर्धू: अगं, पण उपयोग काय त्या पहिल्या नंबराचा? तुला रोजचे काळ, काम वेगाचे गणित जमतय का त्या नम्बरानी? मी: माझाच गणितात पहिला नंबर. मला शून्यापासून सगळे आकडे महितीयेत. अर्धू: बरं, चल. मला सांग (x+y) * (x-y) कसे सोडवशील? मी: याचा गणिताशी काय संबंध? x आणि y सारखे निरर्थक शब्द वापरुन तुझा गणितातला भोंगळपणाच दिसून येतोय. अर्धू: अगं माउ, सगळं गणित abstractच आहे. मी: तू निखालस चुकीचे शिकला आहेस. तुझ्या शिक्षकांच्या विद्वत्तेबद्दल वाद नाही. पण तुला गणितातला शून्यसुद्धा माहित नाही. मीच गणितात पहिली. इथे बाण बरोबर बसतो. अर्धवटराव गणित आवडीच विषय असल्यानी इमोशनल बनतो. अर्धू ( कळवळून): अगं माउ, तुझे आणि माझे शिक्षक एकच आहेत. गणित हे नेहमीच abstract असतं. म्हणूनच आपण त्याचा साचा वापरुन ते सगळीकडे नेमक्या values घालून वापरु शकतो. इथे मदनबाण पण कळवळून धावत येइल अणि युट्युबेतल्या बेसिक गणित शिकवणार्‍या पन्नसेक लिन्का दयाळूपणे अडकवून जाईल. आता खरी मजा सुरु. मी: पण तुम्हाला शून्याबद्दल काही माहित नाही. मला गणितातले शून्य येते! अर्धू: पण त्याचा उपयोग काय? ( पुन्हा कळवळून) त्या शून्यातून रोजचे गणित कसं काय जमायचं? मी: माझाच पहिला नंबर आहे. माझ्याकडे शून्य आहे. शून्यामुळे माझ्या प्रत्येक शब्दाला गोलाकार प्राप्त झाला आहे. अर्धू: त्यानी काय होतं? मी: गोलाकार शब्दामुळे त्यातील आवर्तने जाणवत नाहीत. अर्धू (डोकेदुखीनी हैराण): पण याचा गणिताशी आणि धावण्याशी काय संबंध?????? मी: तसेही माझे गणित आणि माझे धावणं तुझ्यासारख्या पुस्तके भरभरुन शिकलेल्य पूरवग्रहदूषित लोकांसाठी नाहीच मुळी. पुन्हा मीच: तुला धावण्याचे बेसिक्स माहित नाहीत. गणितात तर तुला काहीच गती नाही. माझाच नंबर पहिला. शिवाय रोज धावायचे तुझे तूच आहेस. ते तुला एकदा कळलं म्हणजे तू आपोआपच धावशील. अर्धू: ते शून्य बाजूला राहू दे. मी तुला गणितातली बेसिक्स सांगतो... मी: तुला बेसिक्स सांगावी लागतायत यातूनच तुझ्य गणितातला भोंगळपणा दिसून येतोय. अर्धू (फुल्टू हुकलेला!): आता गणितात कसं काय बुवा तुझं माझं? ते तर वैश्विक आहे. मी: तुझ्याकडे शून्य नाही, माझ्याकडे शून्य आहे. माझाच नंबर पहिला. ... ... ... आता अर्धू आजारी पडतो! त्यामुळे अर्थातच माझाच नंबर पहिला. धावण्यात सुद्धा आणि गणितात सुद्धा! ;) न्या. रानडे मोड ऑन > असेंच यां जगातलें ट्रोलिंग चांलत असतें बरें का. आतां तंरी कळंले का तुम्हास अर्धंवट्राव? न्या. रानडॅ मोड ऑफ >

खतरनाक... ह ह पु वा फक्त मध्ये मध्ये अजून थोडे हुकुमत, पराभूत, हल्ले इत्यादी शब्द यायला पाहीजे होते. 'म' ची बाराखडी सुद्धा वाढवली असती तरी चालले असते. जसे "मी अमुकतमुक करतो. तसे तुम्हाला जमणार नाही. पण तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. आत्ता इथेच ताबडतोब करा. जमले नाही तर माझा लेख पुन्हा पुन्हा वाचा. मी काय म्हणातोय ते तुम्हाला लगेच समजून येईल. सोपंय ते." वगैरे वगैरे

मन म्हंजे तरी काय ज्याला मरण नसलेल म्हंजे आत्मा. तो अमर असतो अशी आपल्या हिंदु मध्ये मान्यता आहे. मनाच अवलोकन म्हंजे आत्माच अवलोकन तो सापडण्याच्या रीती वेगवेगळ्या असु शकतात पण १००% तो सापडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते.

पुढचे प्रतिसाद दोन नंबरच्या लेखावर द्यावे किंवा व्यनि करावा. >मन म्हंजे तरी काय ज्याला मरण नसलेल म्हंजे आत्मा. = मन म्हणजे मेंटल अ‍ॅक्टीविटी. आत्मा म्हणजे आपण स्वतः >मनाच अवलोकन म्हंजे आत्माच अवलोकन तो सापडण्याच्या रीती वेगवेगळ्या असु शकतात > मन थांबलं की आपण स्वतःलाच शोधत होतो हे लक्षात येतं

खुप इंटरेस्टिंग आहे
ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे
हे तर जबरदस्तच..