Welcome to misalpav.com
लेखक: टवाळ कार्टा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

त्याला रिटर्न फाईल करावं लागतं. तुम्हाला इतर कुणाचा आयटीआर फाइव मिळाला तो त्यानं रिटर्न फाईल केल्याचा पुरावा आहे. तुम्ही पेपर रिटर्न फाईल करता असं दिसतायं आणि ते ही अत्यंत फ्रॉड व्यक्तीकडून. तुमचं प्रत्येक रिटर्न तुमच्या इन्कमटॅक्स वॉर्डला उपलब्ध असतं. एक वर्षानंतर आयटीआर फाइव (म्हणजे रिटर्न फाईल केल्याची स्थळप्रत) मिळत नाही असं होत नाही. तुमच्या ऑफिसमधे चवकशी करून तुमच्या इन्कमटॅक्स वॉर्डला जा आणि ऑफिसरला भेटून मागच्या आयटीआर फाइवची झेरॉक्स मागा. तुमच्या सल्लगारानं रिटर्नच फाईल केलं नसेल तर तुम्हाला ते ही कळेल. (आणि तीच शक्यता आहे)

संक्षींना +१ काही प्रॅक्टिकल सूचना: १. ऑफिसमध्ये चौकशी कराच, पण वॉर्ड ऑनलाईनसुद्धा शोधून, त्याची प्रिंट घेऊन जा. वॉर्ड शोधण्यासाठी: https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/KnowYourJurisdictionLink.html (तुमचा पॅन क्रमांक वापरून) २. संक्षी म्हणतात त्याप्रमाणे थेट "ऑफिसर"ला भेटा. (बाहेर बसलेल्या कारकुनांना टाळून.) जमलं तर फोन करून अपॉइंटमेंट घेऊन. तुमची निकड सांगा. बँकेत द्यायचं आहे म्हणजे कालमर्यादा असेल. इन्कम टॅक्स ऑफिसरला सांगितलं तर तो भरभर सूत्रं हलवेल. ३. त्या एजंटाची हजामत करा. त्याला सांगा की योग्य आयटीआर देणं ही त्याची जबाबदारी आहे, आणि ताबडतोब हवा आहे. (तुमचे प्रयत्न चालूच ठेवा.)

वॉर्ड शोधण्यासाठी: = बरोबर. >इन्कम टॅक्स ऑफिसरला सांगितलं तर तो भरभर सूत्रं हलवेल. = जवळजवळ प्रत्येक ऑफिसर चांगला असतो (हा अनुभव आहे). आणि आपण प्रोफेशनली वागलो तर समोरच्याची लेवलच उंचावते. उगीच पडीक धोरण किंवा धसका घेण्याचं कारण नाही. एकदम सरळ आणि साधं काम आहे. >त्या एजंटाची हजामत करा. = आणि काय झालं ते इथे लिहा, तुमच्या अनुभवाचा इतरांना उपयोग होईल. लोकांना वाटतं इंटरनेट फुकट आहे म्हणजे `वापरा आणि विसरा!'

आहो मला सत्य गवसलं की नाही याबद्दल आधीच पब्लिकला डाऊट आहे. आता तुम्ही तर त्याच्या पुढची पायरी गाठली! जोक्स अपार्ट, क्वेरी विचारणार्‍या सदस्यानं मात्र कोणताही प्रतिसाद न देता `इंटरनेट मानसिकता' काय आहे याचा डेमो दिला आहे.

मदतीबद्दल धन्यवाद...सध्ध्या मी परदेशात असल्यामुळे भावाला ई ITO मधे चौकशी करायला सांगीतले आहे
जोक्स अपार्ट, क्वेरी विचारणार्‍या सदस्यानं मात्र कोणताही प्रतिसाद न देता `इंटरनेट मानसिकता' काय आहे याचा डेमो दिला आहे.
कैच्याकै

आहो ते उघड आहे. इ -फायलिंग २००७ पासून अस्तित्वात आहे. तुमच्या केसचं काय झालं असा प्रश्न होता?
आणि काय झालं ते इथे लिहा, तुमच्या अनुभवाचा इतरांना उपयोग होईल. लोकांना वाटतं इंटरनेट फुकट आहे म्हणजे `वापरा आणि विसरा!'

या वर्षीचे इ फाईलींग मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच सोपे होते. एक्सेल शीट तयार करा - डाऊनलोड करा वगैरे भानगड नव्हती ते बरे झाले.

एक प्रश्न.. मी आणि नवर्‍याने मिळुन एकत्र होमलोन घेतले आहे. ज्याचा EMI = Principal + Interest असा आहे, पण possession अजुन मिळालेले नाही. possession letter शिवाय Tax Benefit मिळते का? नवर्‍याच्या कंपनीत दिले आहे , तर माझ्या कंपनीत नाही.. असे कसे ते कळत नाही. बँके कडुन मिळालेले Tax Certificate पाहुन सी.ए म्हणाला की घेऊ शकता ... अजुन माहिती काढत आहेच, तरी कुणाला काही माहिती आहे का?

पझेशनपूर्वीच्या प्रिन्सिपलचं मिळत नाही (८०सी). इंटरेस्टचं मिळेल (२४बी), पण या वर्षी नाही; तर पुढच्या ५ वर्षांत समप्रमाणात. आयकर विभागाचं हे उपयुक्त प्रकाशन पहा: http://incometaxindia.gov.in/Archive/House_Property_18062012.pdf तुमचा सीए असं का म्हणतोय कळायला मार्ग नाही.

सीए तर जाऊच द्या हो, साक्षात कंपनीने ह्याच वर्षी आयकरा मध्ये सुट दिली आहे नवर्‍याला. मी हाच नियम सांगत होते पण त्याच्या फोर्म १६ मध्ये तर दिसतेय सुट दिलेली.. काही कळत नाही.. परत एकदा नीट वाचते..