दोन्ही वेगळे अनुभव. म्हणजे वेळीच उपाय झाल्यामुळे दोघांचेही मोठे नुकसान टळले होते. पण एकाची प्रतिक्रिया अगदी कृतघ्नपणाची तर दुसर्या वेळी निदान तुमच्या वरिष्ठांना चांगल्या कृत्याची कौतुक करावे अशी इच्छा झाली हे फार मोठे! मात्र तुम्ही त्याचे क्रेडिट घेतले नाहीत. एवढे निर्लेप रहाणे फार थोड्यांनाच जमते!
संग्रहणी (म्हणजे मला जे समजले ते असे) कि अगोदर काही दिवस बद्धकोष्ठ होते आणि त्यानंतर काही काळ पातळ शौचास होणे. हा अर्थ बरोबर आहे काय हे मला पण नक्की माहित नाही( कोणी आयुर्वेदाचार्य असतील तर ते याबद्दल आपला बहुमुल्य सल्ला देऊ शकतील) परंतु कुलकर्णी साहेबाना वरील लक्षणे होती. मी आमच्या पोटविकार तज्ञ सरांनी आपल्या अनुभवाने काही रुग्णांना कसे उपचार केले होते ते पाहिले होते. कुलकर्णी साहेबांनि पिंपळे निलख का गुरव येथे एक छोटासा बंगला बांधला होता आणि त्यांच्याकडे बोअरचे पाणी होते त्या पाण्याने त्यांचे पोट बिघडून गेले होते आणि त्यांना वरील लक्षणे झाली होती. त्यांची सोनोग्राफी केल्यावर त्यांच्या आतड्याला सूज आलेली आढळली होती. त्यांना मी प्रथम पाणी उकळून घेण्यास सांगितले त्यानंतर त्यांना घरचा फिल्टर झिरो बी या जंतुनाशक वापरून भरायला सांगितले. त्याच वेळेस त्यांना चांगल्या कंपनीचे कुटजारीष्ट ३० मिली दिवसात तीन वेळा कोमट पाण्यातून जेवणा अगोदर अर्धा तास घेण्यास सांगितले. असे पंधरा दिवस करून पहा असे सांगितले होते आणि जर गुण आला तर पुढे तीन महिने घ्या नाही आला तर सोडून द्या.
सुदैवाने कुलकर्णी साहेबाना चांगलाच गुण आला त्यामुळे ते माझे चांगले मित्र झाले.
कुटजारिष्ट मध्ये कुडची या झाडाच्या सालीचा अर्क असतो आणि हा सौम्य अमिबा नाशक आहे आणि पोटाच्या स्नायूचे शक्तिवर्धक (TONING) करते. आयुर्वेदात याचा काय उपयोग आहे हे मला माहित नाही पण वरील तर्हेने मी बरेच रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार केले आहेत.
अल्सरेटिव्ह कोलायटीस हा फार गंभीर आजार आहे आणि यात मोठ्या आतड्याला आतल्या बाजूने व्रण(अल्सर) पडतात आणी आतड्याला मोठ्या प्रमाणावर सूज आलेली असते.(हे सर्व बेरियम एक्स रे वर किंवा एण्डोस्कोपीमध्ये स्पष्ट दिसते.) त्यामुळे रुग्णाला रक्ताची आव पडते. मी पाहिलेला पहिला रुग्ण (१९८५) याला दिवसात ४०-५० वेळेस अशी पातळ रक्ताळलेली हगवण लागलेली होती आणि त्यामुळे त्याचे २ महिन्यात २० किलोने वजन कमी झाले. अशी लक्षणे बहुतांश रुग्णात दिसतात. आता आधुनिक औषधांनी हा आजार बर्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो.
या विरुद्ध IBS (इरीटेबल बॉवेल सिंड्रोम) हा आजार मानसिक तणावातून उद्भवणारा आहे. मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम म्हणून रुग्णाला बद्धकोष्ठ पासून हगवण पर्यंत होते आणी त्यात पोटात जोरात मुरडा होऊन दुखते. जेंव्हा जेंव्हा मानसिक तणाव वाढतो तेंव्हा हा आजार परत उपटू शकतो. याच्या त सर्व तर्हेच्या शरीराच्या आणी पोटाच्या चाचण्या पूर्ण नॉर्मल येतात.
संग्रहणी मध्ये वरील दोन्ही तर्हेची लक्षणे दिसत नाहीत. पण सतत पोट बिघडलेले राहणे. भूक न लागणे. अगोदर हगवण आणी नंतर बद्धकोष्ठ (किंवा उलटे) अशा तर्हेची लक्षणे दिसतात. आणी त्यात रुग्णाची तब्येत तेवढी बिघडलेली नसते.
कुटजारिष्ट मध्ये कुडची या झाडाच्या सालीचा अर्क असतो आणि हा सौम्य अमिबा नाशक आहे आणि पोटाच्या स्नायूचे शक्तिवर्धक (TONING) करते. आयुर्वेदात याचा काय उपयोग आहे हे मला माहित नाही पण वरील तर्हेने मी बरेच रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार केले आहेत.
कुटजारिष्ट याचा अनुभव हल्लीच घेतला आहे,माझे आणि माझ्या तिर्थरुपांचे एकाच दिवशी पोट बिघडले होते तेव्हा तिर्थरुपांनी स्वतः घेतले आणि मला देखील याचा डोस दिला शिवाय या बरोबरच बिल्वादि चूर्ण देखील घेतले. एका दिवसात आराम पडला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
दोन्ही केसेस मधे चांगलं काम केलंत अन मुद्दाम प्रशंसापत्र मिळवण्यासाठी ते लिहुन दिलं नाहीत हे वाचुन पण बरं वाटलं. नाहीतर लोकं जरा काही केलं की लगेच पब्लिसिटी करतात.
डॉक्टरसाहेब.. मी एक सुचवू का..?
ऑपरेशनच्या वेळी पाळायच्या प्रोटोकॉलबद्दल लिहा.
लाल दिवा लागल्यानंतर दुधी काचेचा दरवाजा बंद झाल्यानंतर आत नक्की काय काय होते ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
उदा - ऑपरेशन करणार्या डॉक्टरला प्रि-ऑपरेशन वॉश घेवून तयार होण्यास अर्धातास वगैरे लागतो किंवा हत्यारांची जागा व त्यांच्या बोटांच्या / हातांच्या हालचालींशी ठरलेल्या खुणा.. असे काहीतरी येवूद्यात!!
बायपास ऑपरेशनच्या दरम्यान डॉ. नीतू मांडकेंनी सुरू केलेले (बहुदा जगन्मान्य झालेले) काही प्रोटोकॉल आहेत का..?
केलेल्या कामाचे समाधान आणी त्यामुळे येणारी शांत झोप हे कोणत्याही शाबासकी पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे > सहमत.
तुमचे सर्वच अनुभव कथन वाचले आहेत. लिहीत रहा.
डॉ. साहेब तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच आवडतात..जगात अशीही माणसे आहेत त्यामुळे दुर्दैवाने माझ्यावर काही प्रसंग आला तर मदत करणारे कोणीतरी असतीलच असे वाटले.
"फुकटची" हा शब्द नावात योग्य वाटत नाही......
प्रतिक्रिया
उल्लेखनीय सेवा..
ग्रेट!
आम्ही तुम्हाला शाबासकी देतो.
संग्रहणी म्हणजे काय
संग्रहणी म्हणजेच अल्सरेटिव्ह
आय बी डी (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम)
अल्सरेटिव्ह कोलायटीस हा फार
खर आहे खरे साहेब...
डॉक्टरसाहेब,
आपले प्रेरणादायी लेखन असेच
कुटजारिष्ट मध्ये कुडची या
दोन्ही केसेस मधे चांगलं काम
तुमचे लेखन आणि केलेले कार्य
पुढे?
/तोच तो पणा ( monotony)
डॉक्टरसाहेब.. मी एक सुचवू का.
कर्तव्यपूर्ती आनंद.
चान चान !
सोसल तेवढी सोशल सर्व्हिस
मस्त लेख.....
छान किस्से!
मी तो हमाल
आवडले.
अतिशय कौतुकास्पद.....
केलेल्या कामाचे समाधान आणी
जबरदस्त अनुभव कथन !
छान...