कॉफीची पण आपली खास वेळ, प्रसंग असतात! मराठी हाटेलांमधे आणि घरांतून अनेकदा गोडमिट्ट काफी देतात त्यामुळे किंवा इन्स्टंट कॉफी जास्त प्यायल्यामुळे असेल, तुम्हाला कॉफी नावडती झाली बहुधा. पण सौधिंडियन लोकांची 'फिल्टर कापी' आणि 'चाया' पिऊन बघा. मग नाय तुमची चाहाची आवड सुटली तर सांगा!
फिल्टर कॉफी पिऊन पहा एकदा. चहा विसरून जाल.
कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसा चहाचा नाही. कॉफी झोप उडवते हे चूक आहे. मला रात्री कधी झोप येत नसेल तेव्हा स्ट्राँग कॉफी पिते. मग डोळे जे गपागप मिटू लागतात, की बस !.
कॉफीचा आणखी एक गुण म्हणजे ऑईली जेवणानंतर एक कप गरमागरम कॉफी घ्या. जिभेपासून जठरापर्यंत पसरलेला ओशटपणा ताबड्तोब गायब होईल. दिवसभर ऑफिसात काम करून कंटाळा आल्यावर एक कप गरम कॉफी हाच उतारा टुणटुणित बनवू शकतो !
( कॉफीप्रिया ) स्नेहांकिता
+१
या बाबतित माझे पण सेम टु सेम रुटिन आहे..
चहा मला फक्त स्वताच्या हातचाच (घरच्या तुळशी व गवतीचहा घातलेला) लागतो.. मला दुसर्यांच्या हातचा चहा किंवा मशिनचा अजिबात जमत नाही.
>>> पण कॉफी ????
>>> तिची नशा मला चहा एवढी काही धुंद करणारी वाटत नहि.
>>> झोप उडवण्याची ताकत तिची चहा पेक्षा जास्त पण तरीही चहा तो चहा
>>> पण कॉफीचा साज जरा वेगळाच . तिच्या साठी खास CCD....
>>> शेवटी हेच वाटत कि चहात जो आपले पणा पण वाटतो तो कॉफीत वाटत नहि.
तो चहा असतो अन ती कॉफी असते म्हणून कदाचित तुम्हाला तो चहा आवडत असावा.
कॉफी ती कॉफी, चहा तो चहा.. त्यांच्या आपल्या आपल्या वेळा असतात. नुसत्या कॉफीत सुद्धा फिल्टर कॉफीची आपली वेळ आणि इन्स्टन्टची आपली वेळ. आणि चहात तर अनेक प्रकारच्या आणि अनेक क्वांटिटीच्यापण अनेक वेळा असतात..
सबब दोघांत श्रेष्ठ-कनिष्ठ काही नाही...
CCD पंखा आहात का..?
पुण्यातून सातार्याच्या दिशेने जाताना कात्रज बायपासवरती (वारजे फ्लायओव्हर - सिंहगडरोड (वडगांव) फ्लायओव्हर - नर्हे आंबेगांव फ्लायओव्हर क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला, दरी पुलाच्या अलीकडे एक CCD आहे. वरच्या मजल्यावर एक संपूर्ण भिंत काचेची आहे आणि त्या ठिकाणाहून कात्रज तलावाचा विहंगम नजारा दिसतो.. व्वाह्!!
रिमझीम पाऊस.. समोरच असलेल्या हायवेवर रोंरावत जाणार्या गाड्या आणि गरमागरम कॉफी..
मला घरी केलेली कॉफी जास्त आवडते.
पूर्ण दुधातली (पाण्याचा एकही थेंब न मिसळता) वेळ असेल तर अर्धा पाऊण तास दुधामध्ये केशराची एखादी काडी टाकून ठेवायची. नेसकॅफे. साखर उगाच अर्धा चमचा वगैरे.. आणि कॉफी कपात ओतल्यानंतर एखाद्या डार्कचॉकलेटबारचे एक दोन फेरे.. (गढूळ पाण्यात तुरटी फिरवतो तसे)
स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा म्हाराजा!!!!!
थोडासा वेगळा अनुभव. लहानपणापासून आल्याच्या चहाची सवय, त्यामुळे दुधात नेसकॅफे टाकून मिळणार्या कॉफीने तितकीशी चटक लावली नव्हती. शिवाय त्या कॉफीचा संबंध का कोणास ठाऊक फक्त आजारपणातच यायचा. पण बाहेरगावी एकटं राहत असताना दरोजच्या चहाचे वांदे झाले आणि नाइलाजोस्तव ऑफिस मध्ये मिळणारी कॉफी तोंडाला लावावी लागली. मशीन मधून खाली ती काचेच्या भांड्यात पडायची. मग ग्लासभर? एवढ्या कपात साखरेची एक पुडी आणि दुधाचे चिंटुकले ४-५ थेंब टाकायचे. हे म्हणजे अगदी आमच्या दुधातल्या नेसकॅफे पेक्षा विचित्र होतं. :) (यालाच फिल्टर कॉफी म्हणतात काय?). पण वर्षभरात त्या कडवट कॉफीची चटक इतकी लागली की चहा विसरलो. पुन्हा घरी आल्यावर मला तशी (चटक लावणारी, कडवट) कॉफी सीसीडी मध्येपण पण नाही मिळाली (एकदाच अनुभवली, त्यानंतर सीसीडी मध्ये नाही गेलो. मद्राशाच्या हाटलात मिळेल असेल कदाचित पण तिथे इडली-वड्या शिवाय कधी दुसरं ट्राय नाही केलं). आता मला चहा काय आणि कॉफी काय हवीच असं वाटत नाही.
प्रतिक्रिया
असा नाय वो!
फिल्टर कॉफी
चहा आणि कॉफी या उत्तेजक
मग कोणत्या उत्तेजक पेयांना
दूध, ताक अन लस्सी.
यावरुन एवढेच सिद्ध होते की
अगदी अगदी!!
वाटलेलंच.
एवढेच हा शब्द एवढेच असा
या काडीबद्दल तुम्हाला झब्बू
दूध, ताक अन लस्सी.
अगदी अगदी मदनारि साहेब
अगदी अगदी मदनारि साहेब!!
जीवनोन्नतीचे सहा सोपान
चौखुरेगुर्जी अमर रहे!!!
चहा आणि कॉफी च्या धर्तीवर रम
अनेकदा वाईट्ट चहा आणि त्याहून
"मी सकाळी चहा तर संध्याकाळी कॉफी (अर्थात ऑफिस मध्ये )पसंत करते."
+१
>>> पण कॉफी ????
पाभे
गैरलागू तुलना
कॉफी ती कॉफी, चहा तो चहा..
CCD पंखा आहात का..?
चहा आणि कॉफी
काफि ती काफिच बॉ.. चिचिडी ची