Welcome to misalpav.com
लेखक: लाल टोपी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एकवीस जूनचा मास्कोतल्या निसर्गाच्या विविध छटांची ओळख आवडली. आपल्याबरोबर आमचीही मास्को सफर झाली. व्हिक्टरी पार्कचा फोटो पाहून इंडिया गेटची किंचित आठवण झाली. घड्याळी, रशियन जाहिराती, नेपोलियनच्या पराभवाची जागा, आणि सर्वच फोटो आवडले. दहा अठराला दिवस मावळला विज्ञान असेल त्यापाठीमागे पण निसर्गाच्या चमत्काराची मोठी गम्मत वाटली. बाकी, तुम्हा दोघांचा फोटोही सुरेख. :) मला वाटतं तुम्ही मास्कोची तपशिलवार सफर आम्हाला घडवाच. आमचा आणि मास्कोचा संबंध यायचा तो रेडियोच्या एसडब्लू बँडवर चुकुन माकून मास्को रेडियो नावाचं स्टेशन लागायचं तेवढाच. :) -दिलीप बिरुटे

दोन्ही भाग लै आवडले. प्रचंड सुंदर फटू. उंचच उंच बिल्डिंगपेक्षा हे पसरट अन् सोनेरी झळाळलेलं बांधकाम लै च्या लैच राजेशाही वाटते. इतक्यात समाप्त ? अंधारातले, संध्याकाळ/रात्रीचे फोटो टाकणार होता ना??

फोटो आणि वर्णन छान आहे. एका गोष्टीविषयी मात्र आश्चर्य वाटले, ती म्हणजे नेपोलियन याचा १८१२ सालचा पराभव अमूकच जागी झाला, असे म्हणणे. वॉटर्लूच्या (हल्लीचे बेल्जियम) युद्धात १८ जून १८१५ रोजी नेपोलियन चा पराभव झाला, हे सर्वविदित आहेच. मास्कोत नेपोलियनने १५ सप्टेंबर १८१२ ला प्रवेश करून रिकाम्या असलेल्या क्रेमलिन राजवाड्यात वास्तव्य केले. या वेळेपर्यंत मास्कोतील २/३ लोक शहर सोडून निघून गेलेले होते. परंतु त्यापुढील सहा दिवसात मास्कोच्या गव्हर्नरच्या आज्ञेने मुद्दाम लावलेल्या आगीत मास्को शहर जळून गेले. नेपोलियनच्या सैनिकांनी जेवढे हाती लागेल, तेवढे लुटले, परंतु उपासमार, रोग, थंडी यांनी बेजार झालेल्या सुमारे ९५,००० सैनिकांसह १७ आक्टोबरला नेपोलियनने मास्कोतून माघार घेतली.

कदाचित रशियाच्या बाजूने केलेल्या प्रचाराचा भाग असावा. 'या ठिकाणी शहरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न नेपोलियन ने केला' असा मोघम उल्लेख या ठिकाणी आहे. त्याचाच स्थानिक गाईड 'नेपोलियनचा पराभव' असा कदाचित लावत असावेत. कारण काही दशकांपूर्वी पर्यंत व्हिक्टरी पार्क हा मॉस्को शहराचा भाग नव्हता.

pfu, इंटरक्लब, डिप. कॉर्प्स्, दोम तुरिस्ट, साल्युत, स्पुतनिक, युगोझापद्नाया (मेट्रो स्टेशन - या शब्दाचा अर्थ नैऋत्य) पासून प्रास्पेक्त वर्नात्स्कोवो, प्रास्पेक्त लेनिन्स्की ते अगदी प्रास्पेक्त मीरा पर्यंत, नदीपल्याडचे कॅथेड्रल, सेंट बसिल कॅथेड्रल, पार्क पबेदी (वर दिलेले victory park), क्रेमलिन आणि व्हाईट हाऊस, सेरेमेतोवो आणि दमेदेदोवो (दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि असे (तसेच इतरही बरेच) काही आठवले. यानिमित्ताने अनेक पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला. आधीच्या पहिल्या भागासही प्रतिसाद दिला होता, ते अगदीच न राहवल्याने. धन्यवाद लाल टोपी जी.

वर्षातील एका महत्वाच्या दिवसाची सचित्र मॉस्कोसफारी खूप आवडली. फोटो अप्रतिम आलेत ! वर प्रा. डाँनी म्हटल्याप्रमाणे मॉस्को शहराचे आणि इतर रशियाचेही प्रवासवर्णन वाचायला आवडेल... जरूर लिहा.

साहेब, आयुष्यात पहिल्यांदा रात्री ९:३० सुर्य पाहिला. धन्यवाद!! तुमच्यामुळे मॉस्कोची मस्त सफर झाली. अवांतर - रशिया बद्दल माझ्या मनात खुप कुतुहल आहे. जमल तर रशियन जीवन पद्धती, लोक, राहणीमान आणि पुतिन विषयी पण लिहा :)

वर्णन, फोटो आणि सावल्या सगळेच छान! रशियाबद्दल अजून लिहा! आणि २१ डिसेंबरच्या आधी मीच तुम्हाला आठवण करून देईन!

धन्स ज्योतीताई, शक्यतो मी लक्षात ठेवीनच पण तुमच्याही लक्षात राहिले तर अजूनच छान!