Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

Hate to break it to you तुमच्या लेखनात कोणालाच रस नाहीये पण मी (आणि इतरही बहुतेक जण) तुमच्या लेखनातील शब्दांच्या तर्कशून्य खेळाला आणि व्यर्थतेला आक्षेप घेत आहेत. तुम्हीच स्वत:ला हवे तसे शब्द मोडून वाकवून आपण कारणे देतोय असे काहीतरी समजताय. वर लिहील्याप्रमाणे त्या प्रक्रिया व्यर्थ आहेत असे तुमचे मत झाले. ती कारणे जी देताय ती कारणे नसून तुमचे वैयक्तिक मत आणि अनुभव आहेत. वर लिहील्याप्रमाणे तुम्हाला एका विशिष्ट प्रक्रियेने फरक पडला आणि इतर प्रक्रियांनी तुम्ही तसाच परिणाम साधण्यास असमर्थ ठरलात ह्याचा निष्कर्ष त्या प्रक्रिया व्यर्थ आहेत असा कसा काय ब्वॉ? हे म्हणजे तुम्हाला Tylenol ऐवजी Advil ने गुण आला तर मग Tylenol व्यर्थ आहे म्हणण्यासारखे झाले. (दोन्ही तापावरची औषधे म्हणून वापरली जातात अमेरिकेत - आपल्याकडे क्रोसिन असते तशीच). अर्थात, कोणी स्वतःला सर्वज्ञ समजत असेल तर माझा नाईलाज आहे.

ते तेवढे स्मृतीच्या मुद्द्याचं उत्तर देण्याचे राहून गेलेय तुमचे. ते देता का? की मला रस नाहीये म्हणून दिले नाही आहे?

भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.) ज्या विषयी तुम्ही काहीही लिहणार नाहीत त्यावर या लेखात भाष्य करायची आणि संतांची आणि नाम साधनेला व्यर्थ ठेवायचा तुमचा विचार तुम्ही याच लेखात विस्ताराने का नाही लिहले. आणि जर इतक्यात काही लिहायचे नव्हते तर मग त्या विषयावर या लेखान आपण विधाने कोणत्या कारणाने करत आहात ? म्हणुनच मी या धाग्यावर तुम्हाला वारांवार विचारले :- भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही माझ्या शेवटच्या प्रतिक्रियेला दिलेल्या तुमच्या प्रतिसादात शोधुन सुद्धा सापडले नाही. तुम्हाला वाटतंय मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर टाळतोय. मी तुम्हाला विचारलं होतं की `हा राम कुठे असतो?' तुमचं उत्तर आहे ( ते देतांना तुम्ही मनाच्या जाळ्यात सापडलाय हे बहुदा लक्षात आलेलं दिसत नाही) : आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा ! थोडक्यात ती एका जनसमूहाची धारणा आहे, इट हॅज नो एक्झिस्टन्स बिसाइडस वन्स ओन माइंड. सत्य सार्वभौम आहे. त्याला कोणत्याही श्रद्धेची वा धारणेची गरज नाही. मनाच्या अस्तित्वावर वि़ज्ञान सुद्धा अथक संशोधन करत आहे आणि आंतरमन आणि बाह्यमन या संकल्पना विज्ञानाने मान्य केल्या आहेत अशी माझी माहिती आहे, ती चूक असल्यास तसे मला सांगा. मी जे तुम्हाला उत्तर दिले आहे ते योग आहे असे मला वाटत आणि मी कोणत्याही मनाच्या जाळ्यात सापडलेलो नाही. जेव्हा बाह्यमनातुन घेतले जाणारे नाम आंतर मनातुन सुद्धा घेतले जाउ लागते तेव्हा साधकाची पुढची अवस्था अजपाजप ही असु शकते.श्वासागतीक ही क्रिया घडली जाते.मग कोणी सोहम् म्हणते तर कोणी राम कोणता मंत्र आपण नामात घेतला हे त्यावर अवलंबुन आहे आणि साधनेवर. राम होता की नव्हता हा वाद नाही. तो आता, इथे, (सर्वांना आणि सर्वत्र) उपलब्ध आहे का? मुळात ज्याला राम म्हणजे कोण हे शिकवलं नाहीये त्याला तो दिसेल का? आपणास वाल्मिकी ठावुक असतील असे गॄहित धरुन सांगतो...त्यांना सुद्धा राम कोण होता हे माहित नव्हते,नारद मुनींनी त्यांना राम नाम घेण्यास प्रवॄत्त केले. सुरवातीला मरा मरा असे नाम उलटे घेणारा नंतर रामनाम चिंतनात मग्न झाला आणि या रामनाम चिंतनानेच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी महर्षि झाले. हे चिंतन, भ्रम सघन करण्याचा राजमार्ग आहे. मन हे जसं बायो कंप्युटर आहे तसंच बायो-प्रोजेक्टरही आहे. तुमच्या धारणा ते प्रोजेक्ट करायला लागतं. तुम्हाला (एकट्याला) समोरचं स्पष्ट दिसण्या ऐवजी तुमच्या मानसिक प्रतिमा दिसायला लागतात. आणि भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास. हे जे सर्व वरील लिहले आहे त्यालाच मी भ्रम म्हणतो.मला वाटतं. या उलट तुम्ही मनापासनं जसजसे मोकळे होता तसतसं तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूला चालू असलेलं ऐकू यायला लागतं. त्याला `दॅट विच इज' म्हणतात. आणि ते जगातला कुणीही नाकारू शकत नाही. गंमतच आहे,हजारो साधकांनी साधना केली, संतांनी नामाचे महत्व सांगितले आणि ते जगमान्य असताना देखील तुम्ही त्यास व्यर्थ म्हणता ! मात्र स्वतः जे काही लिहता त्याला जगात कोणीही नाकारु शकत नाही असे प्रमाणपत्र जोडता. तुम्ही आणि इथले सदस्य थोडे सामंजस्यानं काय लिहीलंय ते समजावून घेतील आणि चर्चा व्यक्ती निरपेक्ष होईल अशी अपेक्षा आहे. मी इथे कुणाचेही उतारे, लिंक्स काहीही डकवत नाही, तुम्ही देखील कुणाला मधे आणू नका. अमका शहाणा की वेडा हे ठरवण्यात काही अर्थ नाही. आणि ते आपल्याला ठरवताही येणार नाही. मी स्वतः कधीही त्या फंदात पडलो नाही. द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. तुम्हाला लेखनातली प्रक्रिया उपयोगी ठरते का ते पाहा. प्रक्रिये विषयी मी निशं:क आहे, तुम्ही लेखनावर फोकस करा. क्षीरसागरजी पुन्हा नम्रपणे मी आल्याला निदर्शनात आणु इच्छितो की आमचाही सामंज्यस्याने लिहण्याचा हा प्रयत्न आहे तो समजण्याचा प्रयत्न करा.तुम्ही तुमच्याच लेखनात ज्यांची नावे घेउन त्यांची साधना त्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे असे विधान केले आहे.मग त्याच संतमंडळी पैकी मी काहींची उदाहरणे माझ्या प्रतिसाताद दिली तर ते तुम्हाला का खटकते ?अमका वेडा का शहाणा हे ठरवण्यात अर्थ नाही म्हणता आणि स्वतः इतरांची सानधा व्यर्थ ठरवून मोकळे होता,याला दुट्टपीपणा असे म्हणतात. आणी मी सुद्धा म्हणतो द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. माझ्या प्रतिसादातले संदर्भ आणि शेवटी दिलेला व्हिडीयो तुमच्या उपयोगी पडतो का ते पहा आणि मनावर फोकस करा.

जर इतक्यात काही लिहायचे नव्हते तर मग त्या विषयावर या लेखानं आपण विधाने कोणत्या कारणाने करत आहात ?
`या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो' हे मी या आधीच म्हटलंय. थोडक्यात विषय तुम्ही सुरू केलाय म्हणून प्रतिसाद देतोय. तरी आता परत परत तो मुद्दा काढू नका हे नम्रपणे सांगतो कारण आता चर्चा सुरू झालीये. आता तुमचे मुद्दे :
जेव्हा बाह्यमनातुन घेतले जाणारे नाम आंतर मनातुन सुद्धा घेतले जाउ लागते तेव्हा साधकाची पुढची अवस्था अजपाजप ही असु शकते.श्वासागतीक ही क्रिया घडली जाते.मग कोणी सोहम् म्हणते तर कोणी राम कोणता मंत्र आपण नामात घेतला हे त्यावर अवलंबुन आहे आणि साधनेवर.
अजपाजप याचा अर्थ आता मनाची विचार करण्याची क्षमता संपली. भ्रम अंतर्मनात पोहोचला. तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो, मन श्वासातून घेतलेल्या प्राणवायुवरच चालत असल्यानं, विचार करतांना श्वासाची लय बदलते. एकदा भ्रम अंतर्मनात पोहोचला की न्यूनतम श्वासात तो संगृहित राहतो. याचा अर्थ तुम्ही श्वासाची लय बदलून सुद्धा त्यात काही फरक पडत नाही. म्हणजे नॉर्मली एखादा नेगटीव विचार आपण खेळायला लागतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन आणि श्वासाचा जोम वाढून निघून जातो आणि आपण फ्रेश होतो पण अजापाजपात भ्रम कायमस्वरूपी मेंदूत राहतो. तो हटता हटत नाही.
आपणास वाल्मिकी ठावुक असतील असे गॄहित धरुन सांगतो...त्यांना सुद्धा राम कोण होता हे माहित नव्हते, नारद मुनींनी त्यांना राम नाम घेण्यास प्रवॄत्त केले. सुरवातीला मरा मरा असे नाम उलटे घेणारा नंतर रामनाम चिंतनात मग्न झाला आणि या रामनाम चिंतनानेच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी महर्षि झाले.
अर्थात! ते दाऊदला उपरती होऊन त्याचा साने गुरुजी होण्यासारखं आहे. याच्या विपरित घटना म्हणजे एखाद्या होतकरू तरूणाचा संपूर्ण चिंतन-मननानं ओसामा बिन लादेन होणं. पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी लिहीला आहे ते या कॅटेगरीत येत नाहीत. इथे मनावर हुकुमत मिळवण्याची गोष्ट चालू आहे. व्यक्तिमत्त्वाच्या रूपांतरणाची नव्हे.
गंमतच आहे,हजारो साधकांनी साधना केली, संतांनी नामाचे महत्व सांगितले आणि ते जगमान्य असताना देखील तुम्ही त्यास व्यर्थ म्हणता ! मात्र स्वतः जे काही लिहता त्याला जगात कोणीही नाकारु शकत नाही असे प्रमाणपत्र जोडता.
मी साधनेला व्यर्थ म्हणतो कारण ती फारफार तर (खरं तर थोडं फार) व्यक्तिमत्त्व बदलू शकते. पण सूज्ञ माणूस कधीही वाल्मिकी सारखं वागत नाही त्यामुळे त्याला असल्या साधनेची गरज नसते. आणि त्याही पुढे जाऊन त्यानं अजपाजप वगैरे साधना केली तर तो हमखास भ्रमिष्ट होतो. माझ्या एका मित्राच्या आईनं (अक्कलकोट का कुणी तत्सम) स्वामींचं असंच घनघोर चिंतन, मनन आणि जप अनेक वर्ष केला. आता कुणीही आलं तरी त्या, "स्वामी आलात? यावं. किती उशीर करायचा तो. आता जेवूनच जायचं हं. आणि असं मला सोडून, न सांगता जायचं नाही" वगैरे सुरू करतात.
माझ्या प्रतिसादातले संदर्भ आणि शेवटी दिलेला व्हिडीयो तुमच्या उपयोगी पडतो का ते पहा
दादा, आता हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद आहे याचा उपयोग होतो का ते पाहा. नाही तर माझं लेखन वाचणं तरी थांबवा, तुम्हाला कधीमधी दिसणारा राम एकदम अंतर्धान पावेल.

पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी लिहीला आहे ते या कॅटेगरीत येत नाहीत.> माणूस म्हणजे माणूस! त्यात कॅटेगरी नसते. हे म्हणजे फक्त ९५% च्या वर मार्क असलेल्या मुलांसाठी क्लासेस चालवण्यासारखे झाले. शिवाय त्यांनीपण प्रश्न विचारायचे नाहीत. इथे मनावर हुकुमत मिळवण्याची गोष्ट चालू आहे. व्यक्तिमत्त्वाच्या रूपांतरणाची नव्हे.> बुद्धी वापरली की मनावर हुकुमत येतेच. आणि व्यक्तिमत्व बदलणार नसेल तर मनावर हुकुमत येणार म्हणजे नक्की काय होणार आहे? त्याही पुढे जाऊन त्यानं अजपाजप वगैरे साधना केली तर तो हमखास भ्रमिष्ट होतो. माझ्या एका मित्राच्या आईनं ........> फक्त एका उदाहरणावरुन असा निष्कर्ष? अभ्यास फारच कमी पडतोय...... शिवाय कित्येक लोक जप न करताही म्हातारपणी भ्रमिष्ट होतात. त्यांचे काय? एक मित्रत्वाचा सल्ला: यापुढे कुणावरही, कुठल्याही संदर्भात, कुठल्याही पद्धतीवर, राळ न उडवता केवळ तुमच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल आणि विचारांबद्दल लिहिलेत तर बरे होईल.

>माणूस म्हणजे माणूस! त्यात कॅटेगरी नसते. हे म्हणजे फक्त ९५% च्या वर मार्क असलेल्या मुलांसाठी क्लासेस चालवण्यासारखे झाले. = त्याच्या पुढे तुम्ही वाचलेलं दिसत नाही :पण सूज्ञ माणूस कधीही वाल्मिकी सारखं वागत नाही त्यामुळे त्याला असल्या साधनेची गरज नसते. >शिवाय त्यांनीपण प्रश्न विचारायचे नाहीत. हे मी ज्यांना म्हटलंय त्या विषयी तुम्ही पूर्वीच्या प्रतिसादात राजी झाला आहात. बाकीच्या सर्व जवाबदारीनं विचारलेल्या प्रश्नांना मी सविस्तर उत्तरं दिलीयंत. > फक्त एका उदाहरणावरुन असा निष्कर्ष? मी अजापजप या साधनेची फलश्रुती सांगितली आहे आणि ती प्रत्येक मानवी मनाला अ‍ॅप्लिकेबल आहे. उदाहरण फक्त स्पष्टीकरणासाठी, नेमकं काय होतं ते समजावं, म्हणून दिलंय. >बुद्धी वापरली की मनावर हुकुमत येतेच. आणि व्यक्तिमत्व बदलणार नसेल तर मनावर हुकुमत येणार म्हणजे नक्की काय होणार आहे? = मनावर हुकुमत याचा अर्थ अंतःप्रेरणेनं (इंटीश्यूननं) जगणं. त्यासाठी बुद्धी उपयोगी असते पण ती निर्णायक नाही. ते जाणिवेच्या प्रगल्भतेनं शक्य होतं. त्याविषयी पुढे लिहीणार आहे. जाणिव प्रगल्भ झाली की माणूस आपसूक संवेदनाशील होतो त्याला व्यक्तिमत्त्व बदलाची वेगळी गरज राहात नाही. > एक मित्रत्वाचा सल्ला: यापुढे कुणावरही, कुठल्याही संदर्भात, कुठल्याही पद्धतीवर, राळ न उडवता केवळ तुमच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल आणि विचारांबद्दल लिहिलेत तर बरे होईल. = तुम्ही इतरांसारखीच चूक करतायं. मी प्रचलित साधना पद्धतीचे दोष सविस्तर स्पष्टीकरणासहित सांगितले आहेत. आणि माझ्या अनुभवानं सर्वांना उपयोगी होईल अशी एक अत्यंत नवी पद्धत सांगितली आहे. सदस्यांनी एकतर त्या पद्धातीचा उपयोग करून येणारे निष्कर्श लिहावे किंवा मनावर हुकुमत मिळवण्यास प्रचलित पद्धती (अवलोकन आणि नामसाधन) कश्या सहाय्यक ठरतात ते दाखवावं इतकी साधी अपेक्षा होती.

मी अजापजप या साधनेची फलश्रुती सांगितली आहे आणि ती प्रत्येक मानवी मनाला अ‍ॅप्लिकेबल आहे. > पण तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे का, की त्याची फलश्रुती तुम्ही सांगताय..... :( शिवाय तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतय हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानी करुन पाहवी. शिवाय प्रत्येक मानवी मन सारखं असेल आणि त्याला एकच साधना अप्लिकेबल असेल तर अपवादांचे काय? असे अपवाद कसे काय असतील? शिवाय कॅटेगरीही कशी काय असेल? मनावर हुकुमत याचा अर्थ अंतःप्रेरणेनं (इंटीश्यूननं) जगणं.> ही व्याख्या पटत नाही. शिवाय मन म्हणजे काही 'शत्रु' नाही त्यावर हुकुमत गाजवायला.. it is seat for emotions. अंतःप्रेरणा म्हणजे काय? instinct? मी फक्त महात्मा गान्धीच्या लिखाणात हा शब्द वाचला आहे. पण म्हणजे तुम्हला नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे? आणि अंतःप्रेरणेचा बुद्धीशी संबंध काय आणि कसा असतो तेपण सांगा. कारण शेवटी माणूस स्वतःच्या बुद्धीवरच विश्वास ठेवतो.

हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानी करुन पाहवी.
मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कलापव्यय ही नाही.
तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे का, की त्याची फलश्रुती तुम्ही सांगताय..
मनाची `धारणा' ही फॅकल्टी अशी काम करते : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यासाठी मनाला तिचं सतत स्मरण घडवून द्यावं लागतं. समजा राम भेटावा अशी इच्छा असेल तर उठता-बसता, प्रत्येक वेळी, जरा फुरसत मिळाली की त्याचा जप करावा लागतो. असा जप दीर्घ काल केल्यानं मनात येणारे इतर विचार थांबून केवळ रामनाम मनात रूंजी घालू लागतं. मनाला सवय लावायला वेळ लागतो पण एकदा लागली की सुटणं कठीण. जप करणार्‍याला जपाचा आधार वाटायला लागतो कारण अनेकानेक विचारांऐवजी मनात `राम' हाच विचार घुमू लागतो. वास्तविकात मात्र भक्ताची श्रवणसंस्था निकामी व्हायला लागते कारण जाणीवेची नॉर्मल डायनॅमिक स्टेट संपून (थोडक्यात आपण जसं एकावेळी आजूबाजूला चाललेलं सगळं ऐकत असतो), आता तिचा रोख मनाकडे वळायला लागतो. अजपाजप सुरू झाला की भक्ताला आजूबाजूचं ऐकू येण्याऐवजी `रामनाम' ऐकू यायला लागतं. मग त्याला आणखी बरं वाटतं पण परिस्थिती गंभीर व्हायला लागलेली असते. कारण मनाचा दुसरा पैलू दृक आहे. एकदा अजपाजप सुरू झाला की नामघोष निद्रेत प्रवेश करतो. मग मनात रामाची प्रतिमा तयार व्हायला लागते. एकदा अंतर्मनात (किंवा सबकाँशसमधे) अशी प्रतिमा तयार झाली की भक्ताच्या जाणीवेचा रोख मनाच्या पुरत्या कह्यात जातो. आधी श्रवण नादुरस्त आणि मग अवलोकन नादुरूस्त होऊ लागतं कारण अंतर्मन ती प्रतिमा समोरच्या निराकारावर प्रोजेक्ट करायला लागतं. भक्ताला समोरचं स्पष्ट दिसण्याऐवजी सगळीकडे राम दिसायला लागतो आणि आजूबाजूचं नीट ऐकू येण्याऐवजी रामनाम ऐकू येऊ लागतं. तो मनाच्या पूर्ण ताब्यात जातो, याला सायकॉलॉजित भ्रमिष्टावस्था म्हटलंय. भक्ताला वाटतं आपण भवसागर पार केला पण परिस्थिती नेमकी विपरित असते, तो वास्तविकतेपासून पूर्णपणे भरकटलेला असतो. ही इज टोटली कट ऑफ फ्रॉम द रिअ‍ॅलिटी. मी मनाला इतकं अंतर्बाह्य जाणलंय की माझ्या जाणीवेचा रोख ते माझ्या इच्छेशिवाय स्वतःकडे वळवू शकत नाही. त्यामुळे मला समोरचं लख्खं दिसतं आणि बाजूचं स्पष्ट ऐकू येतं! तुमच्या `तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे क`?' या प्रश्नाचं आता वेगळं उत्तर देण्याची गरज नाही. मनावर हुकुमत याचा अर्थ मन शत्रू आहे असा नाही तर मनाच्या गुलामीत न जगता, मन या फॅकल्टीचा उपयोग करत स्वेच्छेनं जगणं असा आहे. अंतःप्रेरणेबद्दल पुढच्या लेखात लिहीन.

मनाचे अवलोकन करणं अगदीच निर्धोक आहे हे मला आणि इतर अनेकांना नक्कीच माहित आहे. पण या पूर्वी अनेकांनी सांगितलेल्या साधनापद्धती मोडीत काढून तुम्ही वेगळंच काहितरी सांगत आहात अशी कल्पना तुमच्या लिखाणावरुन होतेय. म्हणून पुन्हा खात्री करुन घेतली. स्वतःच्या मनाचा-भावविश्वाचा शोध घेण्यात तसेही कठीण काहीच नाही. पण जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ते मात्र पूर्णतः गैरसमजांवर आधारीत आहे असं खेदानी नमूद करतेय. अजपाजप करणारे शिवाय अतिशय बुद्धिमान आणि मेन्दूच्या सगळ्या फॅकल्टॅज उत्तम चालू असणारे, मनानी आणि शरीरानी व वागणूकीनीदेखिल अतिशय निर्मळ असणारे अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत. अर्थात, मी इथे जपाचे फायदे लिहित बसणार नाही. तुम्हाला कधी वेळ असेल तर पूर्वग्रहदूषित द्रुष्टीकोन न बाळगता करुन पाहा. अजून एक प्रश्न म्हणजे 'स्वेच्छेने जगणं' हे अन्तिम ध्येय कसं काय होउ शकत? स्वेच्छेने जगणं हे प्रत्येक वेळेस योग्य जगणं असेलच असं नाही. आणि जरी तसं असलं तरीही त्यातून आनंद मिळेलच असंही नाही. सैनिक स्वेच्छेनी जगू शकत नाही, आणि त्यामुळेच आपण इथे मजेत स्वेच्छा वगरै गप्पा करतोय याची निदान मला तरी स्वच्छ जाणीव आहे.

ते मात्र पूर्णतः गैरसमजांवर आधारीत आहे असं खेदानी नमूद करतेय. अजपाजप करणारे शिवाय अतिशय बुद्धिमान आणि मेन्दूच्या सगळ्या फॅकल्टॅज उत्तम चालू असणारे, मनानी आणि शरीरानी व वागणूकीनीदेखिल अतिशय निर्मळ असणारे अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत.
`अजपाजप' याचा अर्थच: "तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष". तुम्हाला बहुदा अजपाजप म्हणजे नक्की काय याची कल्पना नसावी. तुम्ही तुमची व्याख्या लिहा म्हणजे चर्चा होईल.
अर्थात, मी इथे जपाचे फायदे लिहित बसणार नाही.
तोच तर चर्चेचा विषय आहे!
तुम्हाला कधी वेळ असेल तर पूर्वग्रहदूषित द्रुष्टीकोन न बाळगता करुन पाहा.
माझा कोणताही पूर्वग्रह नाही. सध्या जगात प्रचलित असलेल्या सर्वच्यासर्व साधनांचा (तंत्रसूत्र, झेन (जाझेन), सूफी (वर्लिंग), डायनॅमिक आणि कुंडलिनी (ओशो), गुर्जेफियन स्टॉप मेथडस, पातंजलींच्या अष्टांगयोगाची सूत्र, बुद्धाची विपश्यना) मी अभ्यास केला आहे. आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे. "राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय?
अजून एक प्रश्न म्हणजे 'स्वेच्छेने जगणं' हे अन्तिम ध्येय कसं काय होउ शकत?
मला ही त्यावर लिहीयंच आहे पण प्रथम हा इश्यू सेटल व्हायला हवा.

>>`अजपाजप' याचा अर्थच: "तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष". -- नाहि. अजपाजप हा आवक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माईंड मधला नामघोष नाहि. काहि शब्दांचा/वाक्प्रचारांचा थोडासा खुलासा करतोयः अजपाजपः ज्याप्रमाणे परागकणांत सुगंध आहे त्याप्रमाणे नामात सच्चिदानंद आहे. हा आनंद प्रथम वाक्शक्ती वापरुन मनात उतरवला जातो. या प्रोसेसमधे मनाप्रमाणेच शरीराची देखील ध्यानशक्ती खर्च होते. अभ्यासाने ध्यानशक्ती पुरेशी बळकट झाली कि मन स्वयंस्फूर्तीने या आनंद निर्झराचा प्रत्यय स्वतः घेतं... आता त्याला शरीराकडुन ध्यानशक्ती उसनवारीने घ्यायची आवश्यकता नाहि. शारीरीक, बौद्धीक कार्य विनाअडथळा उत्तम प्रकारे चाललय व मनात निरपेक्ष आनंदाचा नामरुपी निर्झर वाहतोय याला म्हणावे अजपाजप. नामातला आनंद: सच्चिदानंदाने मानवी इंद्रियांना गोचर असे स्वरुप धारण केले व त्याचे नाम हे सच्चिदानंदाचे वाक्/श्रवणरूप झाले (याला नामाव्यतिरिक्त इतर काहि पुरावा नाहि... हा मुर्खपणा वाटण्याचा संभव आहे... पण त्याला स्वप्रत्ययाशिवाय दुसरा इलाज नाहि). म्हणुन गुळात गोडवा असावा त्याप्रमाणे नामात आनंद सामावला आहे (उदाहरण थोडं घिसेपिटे टाईपचे आहे, मान्य... माझ्या प्रतिभेचा संकुचीतपणा) राम दिसणं म्हणजे नक्की काय? : शरीर, मन, बुद्धी, चेतना... यच्चयावत पातळ्यांवर सच्चिदानंदाचा प्रत्यय येणे म्हणजे राम दिसणे. अमिताभ बच्चन पडद्यावर दिसतो. ते त्याचे प्रतिमारूप. प्रतिक्षा बंगल्याबाहेर एकाविशिष्ट वेळी जाऊन उभे राहिलात तर अमिताभ बच्चन स्वतः दिसतो. ते त्याचे स्वरुप. मास्तर वर्गात गणित शिकवत असताना आपण विजय दिनानाथ चौहाणचे अंगरक्षक बनुन फाईट सीन मधे रमुन जावे हा भ्रम (मधुबाला पासुन दिपीका पादुकोण पर्यंत सिनेनट्यांबरोबर सीन इमॅजीन करणे त्यातल्यात्यात विशेष सुखकारक) राम दिसणे शक्य आहे काय? : "इतर कुणाला चॅलेंज करण्यासाठी नाहि तर मला स्वतःला राम बघण्याची खरोखरची इच्छा आहे" हे रामच्य दिशेने उचललेलं पहिलं पाऊल. त्यासरशी स्वतः राम दहा पाऊले तुमच्या कडे टाकतो. योग्यवेळी दर्शनाचा लाभ होतो. जपाचे फायदे: अंतीम फायदा वर सांगितल्याप्रमाणे राम दिसणे व अक्षयीची आनंदठेव गटवणे. टेंपरपी फायदे: ध्यानशक्ती मजबूत होणे, निरपेक्ष आनंद हा केवळ भ्रम नसुन ते एक सत्य आहे हा उलगडा होणे, प्रेम हे निसर्गाने दिलेले सर्वोत्तम औषध आहे याचा प्रत्यय येणे... व इतर बरेच काहि. अवांतरः आम्हाला इतरांच्या चर्चेत मधे मधे टांग मारण्याची वाईट खोड आहे... क्षमस्व. अर्धवटराव

हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.
ज्याप्रमाणे परागकणांत सुगंध आहे त्याप्रमाणे नामात सच्चिदानंद आहे....वगैरे वगैरे
आनंद शांततेत आहे (नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे). शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे. मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अ‍ॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय. त्यातून सच्चिदानंद ही स्थिती आहे आकार नाही आणि स्थिती ही नेहमी स्थितीच राहते ती कधीही आकार होत नाही. त्यामुळे तुमचा फंडाच गंडला आहे. तुम्ही व्याख्येतच पराभूत झालात त्यामुळे पुढचा सर्व प्रतिसाद व्यर्थ आहे. अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.

नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे).> तोच 'अजपाजप' असतो. अनाहत नाद असतो. त्याचा फक्त निर्देश करता येतो. 'ऐकता येत नाही... जौ दे. ते फार कॉम्प्लिकेटेड आहे. शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे. > कशावरुन? कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला? जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का? अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता? त्यामुळे मला फार हसू येतं. =))

अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता? त्यामुळे मला फार हसू येतं.
करमणुकीच्या स्रोताला तू करमणूक का करतोस असे विचारून करमणुकीचा सप्लाय बंद का करतेस गं मौतै ;) =))

त्याचा फक्त निर्देश करता येतो. 'ऐकता येत नाही... जौ दे. ते फार कॉम्प्लिकेटेड आहे.
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात! आहो मग नाम घ्यायचंच कशाला?
कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला?
शब्बास! आहो स्वरूप म्हणजे आपण! तिथे जायला कशाला लागतंय?
जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?
नका फंदात पडू दुरूस्तीच्या, तिथे दुरूस्ती लागतच नाही

>>हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो. -- विषयाचं ज्ञान-अज्ञान तर माहित नाहि, पण कुठल्याशा कारणाने तुम्ही तुमचे ज्ञानदरवाजे जाम बंद करुन ठेवलेत हे नक्की. असो. >>आनंद शांततेत आहे (नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे). शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे. -- शांती (पीस) आणि शांतता (सायलेन्स) यात मूलभूत फरक आहे. तुमच्या धारणेनुसार एखादा जन्मजात बहिरा व्यक्ती (जर तो जन्मजात आंधळा, मुका, आणि त्वचेचे सेन्सेशन गमावलेला असेल तर फारच उत्तम) खरा शांत आणि सिद्ध, नाहि का? >>मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अ‍ॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय. -- शांती (पीस) आणि शांतता (सायलेन्स) या भिन्न गोष्टी आहेत हो. >>त्यातून सच्चिदानंद ही स्थिती आहे आकार नाही आणि स्थिती ही नेहमी स्थितीच राहते ती कधीही आकार होत नाही. त्यामुळे तुमचा फंडाच गंडला आहे. -- "निराकार" हा कन्सेप्ट्च मुळी आकारावर, त्याच्या निगेशनवर आधारावर आधारला आहे. आपण सभोवती जे आकार बघतो ते त्या सो कॉल्ड निराकारानेच धारण केले असतात. जर तुम्ही आकाराच्या शक्यतेचा, त्याच्या सृजन आणि प्रलयाच्या क्षमतेचा अस्विकार कराल... असो, ज्याचे त्याचे आकलन. सच्चिदानंद हि व्यक्ती आहे. तुमचीच खालील वाक्ये बघा: १)अर्थात! इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे २) आपण स्वेच्छेनं जगायला लागू. ३)आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो. सच्चिदानंदात इच्छा आहे, क्षमता आहे, इंटलिजन्स आहे. इट्स अ पर्सनॅलीटी. असो. सच्चिदानंदाच्या आकार धारणाच्या शक्यतेशी माझी १००% सहमती आहे. फंडा गंडणे, प्रतिसाद व्यर्थ असणे वगैरे कमेण्ट्स तुमच्या न्यायधिशाच्या भुमीकेला साजेशीच आहेत. त्यात काहि आश्चर्य वाटलं नाहि. >>अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे. -- अहो चालायचच. तुम्ही नाहि का मनाचे आकुंचन करुन त्याला एका वेगळ्याच "ऐच्छीक" एण्टीटीने कंट्रोल करायचे अगडबंब आणि निर्बुद्ध तत्वज्ञान ऐकवलं... मिपा त्याकरताच बनलय... इथे दोन्हि प्रकारचे लोक येतात... ज्यांना आपण अर्धवट आहोत हे कळलय आणि ज्यांना आपल्या अर्धवटपणाची अजीबात कल्पना नाहि. अर्धवटराव

तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष> अजपाजप हा अनाहत नाद असतो. पातन्जल योगसुत्र रिवाईज करावे ही विनन्ती. सब्कॉन्शस माईन्ड आवाक्यापलिकडे नसतं! जप फक्त नामाचा नसतो. जपाचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत. पण त्या सगळ्या जाउदेत. त्या कामाच्या नाहीत हे तुमचे मत ठाम असेल तर चर्चा तरी कशाला? पण एकच सांगते, जप करायला सांग्णार्‍या सर्व संतानी जप जा केवळ एक मार्ग आहे, एक क्रिया आहे, आत्मोन्नतीसाही पुढे जाण्याची एक सोपी पद्धती आहे असेच सांगितले आहे. तो केवळ दरवाजा आहे. पण कुणी जर ससा-कासवाच्या गोष्तीतल्याप्रमाने त्या मार्गावरच गंमतजंमत करत रेंगाळले तर तो दोष त्या मार्गाचा किंवा त्या मारगाकडे बोट दाखवणार्‍या व्यक्तीचा नाही. माझा कोणताही पूर्वग्रह नाही.. हे आणि सध्या जगात प्रचलित असलेल्या सर्वच्यासर्व साधनांचा (तंत्रसूत्र, झेन (जाझेन), सूफी (वर्लिंग), डायनॅमिक आणि कुंडलिनी (ओशो), गुर्जेफियन स्टॉप मेथडस, पातंजलींच्या अष्टांगयोगाची सूत्र, बुद्धाची विपश्यना) मी अभ्यास केला आहे.> हे वाक्य विरोधाभास दाखवतय. आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे. कुठे? "राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय? > नाही. मला माहित नाही. मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही 'राम दिसला' असं सांगणारं... शिवाय वर एके ठीकाणी तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्ताईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?

अजपाजप हा अनाहत नाद असतो
अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव. द साऊंड ऑफ सायलेंस. ती एकदा झाली की सतत तुमच्या बरोबर असते कारण तुम्ही आणि ती वेगळी राहात नाही.
जप फक्त नामाचा नसतो. जपाचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत.......पण एकच सांगते.....तो दोष त्या मार्गाचा किंवा त्या मारगाकडे बोट दाखवणार्‍या व्यक्तीचा नाही.
जाऊं द्या, एकच सांगतो जर तुम्ही जप-साधना केली असती तर त्याविषयी निश्चित असं काही तरी लिहू शकला असता. इतकी गोलमाल वाक्य फक्त हेच दर्शवतात की तुम्ही ती साधना केलेली नाही आणि तुम्हाला त्या विषयाची माहिती नाही.
आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे. कुठे?
इथे तर तुम्ही कहरच केलायं! आहो :
मनाची `धारणा' ही फॅकल्टी अशी काम करते : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यासाठी मनाला तिचं सतत स्मरण घडवून द्यावं लागतं......
हा इतका दीर्घ आणि मौलिक प्रतिसाद मी तुमच्याच प्रश्नाला दिलाय! याचा अर्थ तुम्ही प्रतिसाद देखील वाचत नाही! आणि काहीही न वाचता बिनधास्त फक्त प्रश्न फेकता.
"राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय?
>नाही. मला माहित नाही. मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही 'राम दिसला' असं सांगणारं.. = आख्ख्या प्रतिसादात हे एकमेव वस्तुस्थिती निदर्शक वाक्य तुम्ही लिहीलंय!
तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्ताईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?
या अत्यंत निरागस प्रश्नासाठी तुम्हाला सगळ्या चुका माफ! शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरूत्त्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत.

"अनाहत" शब्दाचा अर्थ काय ?
उन्मेषदादा अनाहत म्हंजे आपण सगळे 'नॉन वेरीफाईड जेन्टस' ;)

म्हणे अनाहिता नाही ते "अनाहत"!! सौस्क्रुत कोणे शिकवले रे तुला?

धागा वाचून mind मध्ये mind बाबत बरेच प्रश्न पैदा झाले.तथापी उत्तर मिळायची शक्यता पडताळून, इतरांच्या mind ला सांगता येत नसल्याने, स्वतःच्याच mindला "Mind your own business" असं सांगून विषय संपवला.. ;)

तरी पण स्वतःला कटाप करणारे गडी पुन्हा खेळायला लागले, इतर वेळी संकेतस्थळावर कधीही न दिसणारे नेमके उगवले आणि मदतीला धावून आलेले अ‍ॅसिडीटीवाले उपयोग होत नाही म्हटल्यावर गप झाले!

कोण हो..?? कोण ते आयडी..?? आम्हाला पण कळूदेत की. बाकी तुमच्या मनोमनीच्या बाता असतील तर तुमच्यातच राहूदेत - 'सर्वांशी शेअर कराच' असा आग्रह नाहीये.

घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते पण त्याला पाणी पाजता येत नाही हेच खरे ! शेवटी संत श्रेष्ठ श्री चोखामेळा यांचा एक अभंग देतो आणि माझे व्यर्थ ठरु पाहणारे टंकन कष्ट आवरते घेतो. राम हीं अक्षरें सुलभ सोपींरे । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥ मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिकां नाहीं अंगीं ॥२॥ नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥ नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥ चोखा म्हणे नाम सुलभ सोपेरें । जपावें निर्धारें एका भावें ॥५॥

कुठलीही साधना करताना प्रथम साध्य काय हे कळायला हवं. मुद्दलातच बोंब असेल तर घोडं तहानेनी मरेल पण पाणि पिणार नाहि. असो... मी बसतोय बैठकीला... बीअर, व्होडका, रम... सगळं रेडी हाए... येताय का... अर्धवटराव

सेम हिअर! तुम्ही नामसाधना करत राहा आणि राम भेटला की लेख टाका. मला निराकार गवसलायं त्यामुळे कोणत्याही मानसिक धारणेची, आकाराची किंवा साधनेची गरज नाही.

मला निराकार गवसलायं म्हणजे नक्की काय? एखादी गोष्ट निर्गुण-निराकार असेल तर ती गवसेल कशी काय? ती कशी जाणीवेतच येणार नाही. तरीही समजा की जाणीव फारच प्रगल्भ झालीये आणि काहितरी निराकारच आहे असं वाटतय तर तो भ्रम/ झोप कशावरुन नाही? एक्दा का झोप लागली की सगळं अस्तित्वच निराकार होउन जातं........ असं मला रोजच वाट्तं.. जाग आल्यावर! मग मलापण निराकार गवसलाय की काय? आणि समजा यापेक्षा वेगळं काहितरी होत असेलही, तरिही त्याचा उपयोग काय? सर्वसामन्य आयुष्य जगणार्‍या साध्या सरळ माणसाला त्याच्या आयुष्यात या निराकाराचा काय उपयोग, की त्यानी त्यासाही काहितरी धडपड करावी?

पण भाषेत ते व्यक्त कसं करणार? मी स्वरूपानं निराकार आहे असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल `हा लिहीणारा कोण आहे?'
ती कशी जाणीवेतच येणार नाही.
येते! कारण निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे.
तरीही समजा की जाणीव फारच प्रगल्भ झालीये आणि काहितरी निराकारच आहे असं वाटतय तर तो भ्रम/ झोप कशावरुन नाही?
आपण निराकार आहोत हा उलगडा झाल्यावर माझ्या आयुष्यात दोन बदल झाले : एक, मी कधीही आणि कश्यानंही निराश होत नाही. आणि दोन, आपण मरू ही शक्यताच संपली. एक्दा का झोप लागली की सगळं अस्तित्वच निराकार होउन जातं. नाही. जाणीव जागृत असते.
असं मला रोजच वाट्तं.. जाग आल्यावर! मग मलापण निराकार गवसलाय की काय?
तुम्ही देखील स्वरूपानं निराकारच आहात पण स्वतःला व्यक्ती समजून जगतायं आणि ती मनाची किमया आहे! ही मनाची किमया नक्की काय आहे ते उलगडण्याचा प्रयत्न लेखमाला करणार आहे.
आणि समजा यापेक्षा वेगळं काहितरी होत असेलही, तरिही त्याचा उपयोग काय? सर्वसामन्य आयुष्य जगणार्‍या साध्या सरळ माणसाला त्याच्या आयुष्यात या निराकाराचा काय उपयोग, की त्यानी त्यासाही काहितरी धडपड करावी?
व्यक्ती म्हणून एक बंदिस्त आयुष्य जगणं आणि स्वतःच्या निराकारत्त्वाचा उलगडा होऊन मुक्त आणि स्वच्छंद जगणं असा तो फरक आहे. तुम्ही इतके बेसिक आणि कमालीचे सार्थ प्रश्न विचारले त्याबद्दल मन:पूर्वक आभार.

निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे.> म्हणजे कोमा का? आपण निराकार आहोत हा उलगडा झाल्यावर माझ्या आयुष्यात दोन बदल झाले : एक, मी कधीही आणि कश्यानंही निराश होत नाही. आणि दोन, आपण मरू ही शक्यताच संपली.>> हे तुम्ही सिरियस्ली लिहित आहात का? तुम्हाला अनेक्वेळा निराश होउन व्यक्त झालेले इथे अनेकांनी पाहिलं आहे. आणि निराशा हीदेखिल एक भाव्नाच आहे, ती तरी कशाला टाळायची? जश्या इतर भावना उचंबळून येतात आणि सरतात तशीच तेदेखिल होते. निराशेला कशाला घाबरायचय? त्यापेक्षा राग ही भावना जरा जास्त डेन्जरस आहे. तिच्यावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही काही साधना करता का? असल्यास आम्हालापण सांगा. त्याव्यतिरिक्त तुम्ही अमर असाल तर चांगलंच आहे. त्याची काही मी पडाताळणी घेणार नाही. तुम्ही निश्चिन्त रहा. तसेही मरण म्हणजे फक्त change of form आहे हे सगळ्यांनाच माहित असते. म्हणजे अत्ता मी एक complex system आहे. ती तयार करण्यासाठी ज्या मातीतून अनेक पदार्थ घेतले आहेत त्यात मातीत ही सिस्टीम बंद पडल्यावर मिसलणार आहे, म्हणजे फक्त विघटन होणार आहे. हे तसेही सगळ्यांना माहित आहेच. मग जाणीव स्थिर करुन त्यात काही फरक पडेल की काय अशी शंका मनात येतेय.

नाही. जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे सिद्धत्त्व!
तुम्हाला अनेक्वेळा निराश होउन व्यक्त झालेले इथे अनेकांनी पाहिलं आहे.
उलट आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं सतत (शाब्दिक) हल्ले होऊन देखील आजही मी जसाच्यातसा आहे!
त्याव्यतिरिक्त तुम्ही अमर असाल तर चांगलंच आहे. त्याची काही मी पडाताळणी घेणार नाही. तुम्ही निश्चिन्त रहा
तुम्हीही अमर आहात! माझ्या अमरत्त्वाचा प्रत्यय तुम्हाला, `तुम्ही निराकार आहात' हे माझं म्हणणं समजल्या क्षणी येईल.
त्यापेक्षा राग ही भावना जरा जास्त डेन्जरस आहे
हा एक पूर्वापार आणि मजेशिर गैरसमज आहे. राग हा अभिव्यक्तीचा आवेग आहे. त्यात विषेश काही नाही. अर्थात, माझ्या परखडपणाला राग समजणं हा दुसरा गैरसमज आहे. आणि तो प्रत्त्युत्तर न देता आल्यामुळे घेतलेला स्टँड असू शकतो. निराशा मात्र चिंताजनक आहे आणि त्यावर उपायाची गरज आहे.
तसेही मरण म्हणजे फक्त change of form आहे हे सगळ्यांनाच माहित असते.....
इथून पुढे मात्र तुमचा सर्व प्रतिसाद चुकला आहे. निराकार अपरिवर्तनीय आहे. आणि आपण निराकार असल्यानं अमर आहोत. तो उलगडा अर्थात, मनाच्या बाहेर पडल्याशिवाय अशक्य आहे.

सिद्धत्व म्हणजे नक्की काय? शिवाय जाणीव स्थिर झाली हे कसे काय जाणवतं? इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं सतत (शाब्दिक) हल्ले होऊन देखील आजही मी जसाच्यातसा आहे!> आता मात्र कमाल झाली! हल्ले?? तुम्हीही अमर आहात! > नक्को रे बाबा. मला स्वतःला गायब होउन इतराना जागा करुन देण्यात बिल्कुल दु:ख वाटत नाही. तरीही तसे असेलच तर माझा किन्वा इतर कुणाचा त्याला इलाज नाही. अश्या परिस्थितीत त्यात आनन्द मानून घेण्यासारखे देखिल काही नाही. मला जरी असं जाणवले की मी अमर आहे तरी मी काही आनन्दानी वेडी होउन नाचणार नाही.... इट्स ओके. अमर तर अमर! सगळेच अमर. इथून पुढे मात्र तुमचा सर्व प्रतिसाद चुकला आहे. ठीकेय. माझे विज्ञानाचे शिक्षण कमी पडतय बहुतेक !!! पण तसेही मी निराकाराबद्दल बोलत नाहीये. मी 'मी' म्हणून असलेल्या फॉर्मबद्दल बोलतेय. निराकार राहिल त्तसा राहु दे की. त्यानी अत्ताच्या माझ्या फॉर्मला काहीही फरक पडणार नाहीये. आणि फोर्म सम्पल्यावर निराकार हा निराकार म्हणूनच राहणार आहे. त्याचा आत्ता काय सम्बन्ध? माझा फॉर्म अबाधित असेपर्यन्त माझे आयुष्य सुरळित चालावं यासाही तुमच्याकडे काही उपाय आहेत का? तुम्ही पुन्हा तेच तेच सान्गताय. मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?

यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का?
हा लेख त्यासाठीच आहे.
मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?
ते तर लेखातच शेवटी सांगितलंय :
जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.

मला लेखात उपाय वगरै सापडला नाही. म्हणून तर परत परत विचारतेय हो. मनाच्या एका महत्वाच्या दालनावर जी काही हुकुमत वगरै चालेल ती त्याच्याच बाकीच्या दालनात बसून चालेल. मग 'बाहेर' म्हणजे काय? कशासाठी? आणि जाणीव मनाच्या बाहेर कशी जाणार? पुन्हा तेच, आणि जाणीव स्थिर झाली हे जाणवणार कसे काय? शिवाय माझ्या मनात कोलाहल वगरै काही नाहीये. पण मला विचार थांबवणं परवडणार नाही. मी अभ्यास कसा करु माझा? पैसे कसे मिळतील विचार थांबले आणि शांत राहिले तर?

मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?
करेक्ट! असाच प्रश्न मी पहिल्या पानावर विचारला आहे आणि त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. :) - ('मनातलं जनात,ब्रिजेश उवाच' बोलणारा)‌ सोकाजी