जैक साहेब
घोणस चावलेल्या माणसांचे दोन चार फोटो लोकांना दाखवायला पाहिजेत तरच हे अति उत्साही लोक गायब होतील. पुल नि म्हटल्याप्रमाणे कुत्र्यापेक्षा त्यांचे मालकाच जास्त उच्छाद आणतात तसेच सापापेक्षा हे इतर लोकच जास्त उच्छाद आणतात. आपले लेखन रंजकच नाही तर ज्ञान वर्धक सुद्धा आहे असेच चालू ठेवा
धन्यवाद
हरचन पालवाच्या कपाटाची दुरुस्ती करून येताना साप 'प्रतेक्ष' पहिले लोक खूप असायचे.
ह्या एका वाक्यानेच पूर्ण परिस्थिती डोळ्यासमोर आली :) परफेक्ट वाक्य वापरलेत.
पूर्ण लेख एकदम सही! आधीचे भाग हि मस्त आहेत.
अवघे प्रचितीचे बोलणे असल्यामुळे फार भावले.
मला एकूणच सापांबद्द्ल खूप भिती वाटते.. ही अर्थात अज्ञानापोटी आहे.
आणि ती पुस्त्के वाचून जाईल असे वाटत नाही,
ही भिती जावी म्हणून अन्य काही प्रयत्न करता येईल का?
सापांची ओळख अथवा माहीती असा एखादा छोटेखानी कोर्स सर्पोद्यानातर्फे घेतला जातो का ?
असा कुठला कोर्से वगैरे घेतला जात नाही. पण तुम्ही तिकडे दर वेळ काढून गेलात तर तुम्हाला ते माहिती देतील आणि तुमचे नशीब असेल तर बिनविषारी साप हाताळू पण देतील.
भीती ही तुमची स्वतः ची असल्यामुळे तिच्या वर कोणाचा हक्क नाही ;)
किंग कोब्रा पण पकडायची तयारी असायची!
मायला, काय निरिक्षण आणि लेखनाचा अंदाज आहे. वाट्टेल त्या गंभीर परिस्थितीत विनोद करू शकणारा मी फक्त एकच माणूस पाहिला होता तो म्हणजे पुलं आणि आता तू. मान गये उस्ताद!
आमच्या घरात २ वेळा साप घुसले होते. त्या पैकी एक नाग होता (हो, हो नक्की). दुर्दैवाने त्यावेळी साप पकडणे वगैरे माहितच नव्हते. दोन्ही वेळा साप मारले. आता वाईट वाटतं.
वाईट वाटून घेऊ नका. लेखात लिहिल्या प्रमाणे सापाबद्दल फक्त माहिती अजून भागत नाही, अजून पण गोष्टी तो पकडताना विचारात घ्यायला लागतात. चुकून जरी नागाचा दात घासून गेला तरी जीवावर बेतू शकते, किंवा हात-पाय तरी गमवावा लागतो. त्यामुळे अर्धी माहिती असेल तर पकडायचा प्रयत्न करू नका.
नाही नाही, मी स्वत: असं काही धाडस कधी करीन असं मला वाटत नाही. पण साप पकडून सोडुन देता येईल असं कोणीही माहिती नव्हतं. अजून एक असं की, घरात जनावर आलं (मला अजुन कळलेलं नाहीये की सापाना जनावर का म्हणतात ते) म्हणजे घरातल्या कुणाचतरी धक्का लागून डुग ठेऊन आलं असलं पाहिजे, मग ते मारलचं पाहिजे अशी एक भावना असायची.
एक विनंती, जर किंग कोब्राचा काही अनुभव असेल तर जरुर कथन करावा. मध्ये व्हिटेकर साहेबांचे काम पाहिले. एका भागात एक male किंग कोब्रा एका female किंग कोब्राला मारतो. त्या आधी तो तिच्यासोबत असलेल्या दुसर्या male ला hood battle मध्ये रीतसर हरवतो आणि पळवून लावतो. ती female जवळ जवळ २७ अंडी बाळगलेली pregnant असते. असं का व्हावं कळायला कठीण आहे, पण ह्या जमाती बद्दल अजून बरच काही उजेडात यायचं बाकी आहे एवढं नक्की.
प्रामाणिक पणे मला किंग चा स्वतः काही अनुभव नाही. मी फक्त पुण्यात साप पकडत असल्याने किंग शी आमना सामना झाला नाही. सर्पोद्यान मध्ये किंग होता, त्याचा केज साफ करणे आणि त्याला खायला पाणी देणे एवढेच मी केले आहे. किंग ही खूप मोठी जवाबदारी असते, जर तो चावला (निट हाताळला तर चावत नाही)तर आपल्या कडे प्रती-औषध उपलब्ध नाही आणि असले तरी तो चमचा भर विष ओतत असल्यामुळे वाचायची शक्यता खूप कमी असते. पण चेन्नई सर्पोद्यान मध्ये किंग चे खूप उपक्रम चालतात. व्हिटेकर साहेब बेक्कार भारी आहेत त्या विषयात.त्यांच्या प्रमाणे, कलकत्यात दीपक मित्रा साहेब पण या विषयावर खूप जास्त काम करतात पण ते टी.व्ही. वर येत नाहीत.
नागराज (KING COBRA) याच्या विषावर सर्पविष प्रतिबंधक लस केंद्रीय संशोधन शाला कसौली येथे तयार केली जाते. परंतु या औषधाचे आयुष्य २ वर्षे असते आणी त्याची मात्र फार मोठ्या प्रमाणात द्यावी लागते म्हणून बर्याच ठिकाणी हि लस उपलब्ध नसते. दुसरे कारण सर्व सामान्य साप चावला तर एका वेळी ८० ते १२० मि ग्राम विष शरीरात भिनते हेच नागराज एकावेळी पाचशे ते सातशे मि ग्राम विष भिनवतो त्यामुळे एकावेळी फार मोठ्या प्रमाणात प्रतिविष द्यावे लागते. आणी एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली तर रुग्ण अर्ध्या ते एक तासात सुद्धा दगावू शकतो. म्हणून नागराजाबद्दल एवढी भीती आणी आदर आहे. हे विष तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते त्यामुळे रुग्णाचे श्वसन केंद्र बंद होते. अशा रुग्णाला प्रतिविष मिळे पर्यंत कृत्रिम श्वासोचछवासावर ठेवावे लागते म्हणून त्याला ताबडतोब मोठ्या रुग्णालयात हलवणे जरुरीचे असते. बाकी सहा इंचाचे फुरसे चावून विषबाधा झालेली मी पहिली आहे त्यामुळे कोणताही साप असेल तर त्याच्याशी खेळ हा जीवाशी खेळ ठरू शकतो. त्याला चार हात दूरच ठेवावे.
सुंदर लेखन !! एकदम थ्रीलिंग आहे सगंळं !!
(
नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार ह्या चौघांची इन्ग्रजी नावे कुठली ? नाग म्हणजे कोब्रा ...पण किंग कोब्रा म्हणतात तो काही वेगळाच असतो ...आपला मराठी नाग वेगळा असेही ऐकुन आहे !
बाकी जॅक डॅनियल ने पिल्लकड लोकांची अशी खेचावी ...छे छे छे ...आमच्या भावना दुखावल्या =))
)
नाग (COBRA),नागराज (KING COBRA), मण्यार (COMMON CRAIT) फुरसे (SAW SCALED VIPER) आणी घोणस( RUSSELS VIPER) हे चार साप भारतात प्रकर्षाने सापडणारे विषारी साप आहेत म्हणून आपल्याकडे मिळणारे (POLYVALENT) विविधआयामी सर्पविष प्रतिबंधक औषध हे वरील चारही सर्पांच्या दन्शासाठी उपयुक्त आहे. परंतु जर चावलेला साप नक्की माहित असेल तर( म्हणजे मारून आणला असेल तर (MONOVALENT) म्हणजे त्याच प्रकारच्या सापाचे सर्पविष प्रतिबंधक औषध पण देता येते. (याचे साईड इफेक्ट्स बरेच कमी असतात)
नागराज हा इतर साप( विशेषतः धामण) खाणारा साप आहे आणी आपल्याला नेहेमी म्हणजे नागपंचमीला दिसणाऱ्या नागाच्या तिप्पट मोठा (१८ ते २० फूट) असतो. त्याच्या विषाची मात्रा सुद्धा बरीच जास्त असते (त्य़ाच्या चाव्याने हत्तीसुद्धा मरेल) .
हा पश्चिम आणी पूर्व घाट म्हणजे कर्नाटकात (उडुपी आगुम्बे ई भागात) आणी ओडीसात सापडतो. महाराष्ट्रात फारसा ऐकलेला नाही(सुदैवाने).
बाकी साप म्हणू नये धाकला
धन्यवाद् खरे साहेब !
मस्त माहिती दिली आहे पण काही बदल सुचवू इच्छितो,
आपल्या कडे "चष्मा नाग " (spectacled cobra) सापडतो. त्याच्या फण्यावर चष्मा सारखा आकार असतो जो काही लोकांना १० चा आकडा पण वाटतो.
राज नाग याचे खाद्य मुख्य करून साप आहे, धामण, मण्यार असे तो मिळेल ते साप खातो. तो दाट जंगलातच आढळतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या जवळ, दांडेली किंवा गोव्या मध्ये पण तो सापडतो. गोव्यामधल्या माझ्या काही सर्पमित्रांना तो कॉल ला पण मिळाला आहे.
नाग राज (king cobra) महाराष्ट्रात सापडतो. विशेषतः वेळुच्या बनात त्याची मादी अंडी घालते. आमच्या शेतात जो पर्यंत बांबुच बेट होत तोवर हा जंगी साप दिसायचा. जवळ जवळ गुडघ्याच्यावर अर्ध्या मांडीपर्यंत सहज उभा राहुन फुत्कार टाकत असलेला हा साप पाहुन गावात बर्याच अफवा असायच्या. अर्थात आम्हालाही तो किंग कोब्रा आहे हे खुप नंतर समजल. तोवर असला मोठा साप हा पूर्वज वगैरे चालायच. पण किंग कोब्रा महाराष्ट्रात असतो हे नक्की.
पुढे पुरात एकदा आख्ख बेट वाहुन गेलं. अन त्यानंतर काय माहिती नाही. निदान "दर्शन" झाल्याच्या बातम्या तरी नाहीत.
किंग कोब्रा ला थोडे दमट हवामान आणि गच्च झाडी लागते. तसेच त्याचे मुख्य भक्ष दुसरे साप असल्यामुळे त्याची पण त्याला खूप गरज असते. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या गावात किंग दिसायचा. तुमचे गाव अमरावतीच्या बाजूला होते का ? नवेगावबांध परिसरामध्ये किंग अजूनही आहेत, पण आत्ता तो भाग नक्षलवादी झाल्यामुळे तिकडे जास्त संशोधन करता येत नाही.(किंगचे नशीब चांगले आहे ..वाचले बिचारे ) आपल्या पुराणामधली भुजंगाची प्रतिमा ही किंगमुळेच आली असे माझे मत आहे.
समस्त जगातल्या तळीरामांची काळजी आहे म्हणून खेचली. दारू प्यायलेली असताना जर चुकून साप चावला तर त्याचे विष शरीरात लवकर पसरते. माझ्या एका मित्राने टल्ली असताना, मांजऱ्या साप (Cat snake बिनविषारी) समजून फुरसे (विषारी, saw scaled viper)पकडले आणि ते त्याला चावले. इतकी वाईट अवस्था मी कुठल्या पण सर्पदंश झालेल्या माणसाची पहिली नव्हती. ससून च्या कृपेने खूप हाल होत हा होईना तो मित्र जगला.
खुसखुशीत शैलीत खूप महत्वपूर्ण माहिती नि अनुभव दिलेले आहेत.
संजय क्षीरसागर सरांचा प्रतिसाद तंतोतंत लागू.
- 'दिस जातील दिस येतील, भोग सरंल सुख येईल' अशा आशेत नेहमीच आशावादी प्यारे. ;)
प्रथम सापापर्यंत पोहचणे, नेमका प्रॉब्लेम ओळखणे (सापाची जात, ठिकाण), कौशल्याने साप पकडणे, ते करत असताना स्वतःला व इतरांना अपघात होऊ न देण्याची काळजी घेणे (प्रेसेन्स ऑफ माईण्ड), परिस्थितीचा समतोल ढासळु न देणे (तळीराम वगैरे मंडळी व "श्रद्धाळू" भगतांचा सासेमीरा), जीवावर बेतणार्या संकटाव देखील दया, प्रेम, आदर ठेवणे (सापाबद्दल), मिपा सारख्या संस्थळावर अत्यंत रंजक पद्धतीने लोक शिक्षण देणे... आणि हे सर्व करताना आपले पाय जमिनीवर ठेवणे... बापरे... जे.डी. मित्रा... तु फार वेगळं रसायन आहेस यार (तुला खरच काहि सिद्धी वगैरे प्राप्त आहे कि काय ;) )
अर्धवटराव
+११११११११११११११११११११११११११११.
स्टार वॉर्स मधल्या जेडीप्रमाणेच या जेडीला सुद्धा सिद्धी प्राप्त असणारे... स्ट्राँग इज द फोर्स विथ धिस वन!!!
(योडाभक्त) बॅटमॅन.
जॅक:
या लेखमालेतच आता क्रमशः एक-एका विषारी आणि बिनविषारी सर्पांची सचित्र ओळख येऊ द्यात, जनप्रबोधनाची उत्तम संधी आहे, एक संग्रहणीय लेख-मालिका लिहू शकाल.
दरवेळी प्रतिसाद लिहीन म्हणतो अन राहून जातंय.
एकुणच हे जे काही काम आहे ते महाजिकिरीचं आणि भयंकर जोखमीचं आहे हे आज उमगतंय मित्रा. तू फक्त लिहित रहा! (तुझ्या जेडीच्या अखंड ओघाची आम्ही काळजी घेऊ हवंतर ;) )
अधिक काय लिहू? :)
खरच कौतुक वाटत तुमच.
खरतर साप आहे म्हणुन तिकडे पळत सुटण्याऐवजी उलट बाजुला का पळत नाहीत लोक असा प्रश्न मला पडतो. अर्थात मी स्वतः उलट दिशेलाच पळते अजुनही.
वरुन धप्क्कन पुढ्यात पडणारे साप पाहिलेत, अन सगळ्यात महत्वाच, लहाणपणी याची देही याची डोळा मुंगुस अन साध्या नागाची लढाई पाहिली आहे. नदिच्या वाळुत, बिचारा नाग फार वेळ तग नाही धरु शकला. पहिल्यांदा सापा बद्दल वाईट वाटल ते तेंव्हा.
माझे पप्पा हाताने साप पकडायचे. खुपदा नाग पकडलेला पाहिलाय. पण गावात शिरलेला नाग जास्त करुन मारुनच टाकतात. त्यामुळे मारलेलेच नाग पाहिलेत. कसल तळपदार जनावर असत साप म्हणजे, किती चपळ! धामिण तर अशी जणु तरंगत जाते जमिनीवरुन. अतिशय सुंदर अन तेव्हढच घातक जनावर म्हणजे साप.
इतक्या गंभीर विषयाला अशी विनोदाची धार देत केलेल लिखाण अतिशय आवडल जॅक डी.
अहो, सचित्र म्हणजे पट्ट्या पट्ट्या चा जर साप असेल तोंडाजवळ जरा काळा डाग असेल.
अमुक अमुक दिसत असेल, धमुक धमुक दिसत असेल तर त्याला हा साप म्हणावा.
उदाहरणार्थ मी जे खाली चित्र डकवले आहे ते नागाचे आहे. आता बघा, क्रमांक दोनचे जे चित्र आपण पाहात आहात तो गवत्या साप आहे. त्याला इंग्रजीत अमुक अमुक म्हणतात. हा प्रामुख्याने पावसाळ्यात दिसतो. संपूर्ण हिरवा असलेला हा बिनविषारी साप आहे. पण, बिनविषारी आहे म्हणून त्याला पकडायचा प्रयत्न करु नका. अशाच रंगाचा हा एक विषारी साप आहे तेव्हा सापाची संपूर्ण ओळख झाल्याशिवाय साप पकडू नये. अशा अर्थाने सचित्र. (हुश्श)
-दिलीप बिरुटे
बिरुटे सर,
माझ्या या लेखामुळे वाचकात जरी भीती निर्माण होऊन ते सापापासून दूर राहिले तरी माझे लिखाण सार्थक होइल. आधी लिहिल्या प्रमाणे मी जेंव्हा सापांची ओळख हा लेख लिहीन तेंव्हा चित्र टाकीन. तसेच माझ्या अनुभवाप्रमाणे छायाचित्र बघून साप ओळखणे फार कमी वेळा शक्य होते. कारण तो साप प्रत्येक वेळा तीच पोज देइल हे सांगता येत नाही ;) फणा बंद केलेला नाग समोर आला तर त्याला सापाला ओळखणारे (फोटो बघून ) लोकं धामण समजून पकडताना मी पहिले आहेत. त्यामुळे गैरसमज कमी करण्यासाठी मी छायाचित्र टाकली नाहीत.
प्रतिक्रिया
जो सापांबरोबर फोटो काढतो तो लवकरच फोटो मध्ये जातो !
धन्यवाद् !
आमच्या डोक्याची बिजागिरी गंजून खलास
हा हा हा !!!
लै आवल्डा!
खल्लास भाग!!!!
मस्त जमलाय हा भाग. माहिती आणि
छ्आन माहिती...पण कुठलीही कवच
सुरेख लेख ,, उत्तम महिती..
मला एकूणच सापांबद्द्ल खूप भिती वाटते.
असा कुठला कोर्से वगैरे घेतला
तुमचे नशीब असेल तर बिनविषारी साप हाताळू पण देतील!
या रविवारी ...
रोचक अन ज्ञानवर्धक दोन्हीही!!
२-४ क्वार्टर लावल्यामुळे त्यांची
रंजक आणि माहितीपूर्ण
धन्यवाद् ! नाही हा शेवटचा भाग
छान लेख. आवडला. पुढचा भागही
माहितीपूर्ण लेखन.
लेख आवडला...
वाईट वाटून घेऊ नका. लेखात
नाही नाही....
प्रामाणिक पणे मला किंग चा
नागराज (KING COBRA
अप्रतिम
नाग म्हणजे कोब्रा
धन्यवाद् खरे साहेब !
नाग राज (king cobra)
किंग कोब्रा ला थोडे दमट
समस्त जगातल्या तळीरामांची
=)
आवडला
खुसखुशीत शैलीत खूप महत्वपूर्ण
भारी
इतक्या स्किलसेट्स एकाच वेळी...
निराकार गवसला असेल त्यांना
__/\__
+११११११११११११११११११११११११११११
वाचनीय लेखमाला
माहितीपुर्ण लेखमाला झाली.
मला सापांची खुपच भिती वाटते.
एक संग्रहणीय लेख-मालिका
हो एका भागात विचार आहे सगळ्या
अशक्य भारीये!
खरच कौतुक वाटत तुमच.
वाचतोय.
बिरुटे सर,
तुम्ही वाचकांना सापाची भिती घालताय की भिती कमी करताय ?
बिरुटे सर,
आत्ता केक्युइडीवर
Pagination