रेप्टाईल्स आणि एकूणच प्राणिविश्व हा आवडीचा विषय असल्याने हे प्रामाणिक लेखन फार आवडले. कॉलेजात एक वर्ष न जाता बरेच शिकणे, टॉरन्ट डाऊनलोड करता आले की कॉम्प्युटरचे शिक्षण झाले, साप पकडणार्यांविषयी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया हे सगळे मनापासून पटले आणि आवडले.
पाप-पुण्य वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही, पण तुम्ही जे काम केले आहे, त्याची कुठल्या तरी पुस्तकात 'चांगले काम' (मनुष्यजातीसाठी इतक्याच मर्यादित अर्थाने नव्हे) म्हणून नोंद झाली असणार अशी माझी खात्री आहे.
शुभेच्छा!
धन्यवाद् !
आधीच्या पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे मला कॉल वरती भेदरलेल्या लोकांचे चेहरे दिसायचे म्हणून मी कधीच कॉल ला नाही म्हणू शकायचो नाही. रात्री- बेरात्री, अगदी परीक्षेच्या आधल्या दिवशी पण कॉल केले आहेत मी, फक्त परीक्षेच्या दिवशी फोन बंद ठेवायचो.
तुमच्यासारख्या लोकांचा खुप आदर वाटतो, जेडी.. लगे रहो. पहील्या भागाची लिंक देता का ?
(माझ्या बायकोचा चुलतभाऊपण हे साप वगैरे पकडतो ब्वॉ.. तो ज्या प्रेमाने पालींबद्दल वगैरे बोलतो, त्यावरुन तुमचं ते "लोभस पाल" वालं वाक्य पटलं..)
चांगले लिहीताय...
कोकणात बालपण गेले असल्याने सापांना अनेकवेळा जवळून पाहता (आणि मारता :-() आले. साप आणि त्यांचे खवले / कल्ले त्याच्यावरचे डिझाईन आणि एकूणच गूढ वावर.
साप कुठेही दिसतात या गोष्टीशी लै वेळा सहमत. सूड आणि बुवा निर्विवाद सहमत होतीलच ;-)
अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न जाने याला "वर्ष वाया" का म्हणतात हे मला अजून समजले नाही, कारण त्या वर्षात मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो ते शाळा किंवा कॉलेज चालू असताना पण नाही.
लाखात एक वाक्य आहे हे.
माझ्या पहिल्या नोकरीला असताना तेथील एच आर सरांनी असेच काहीसे तत्वज्ञान आम्हाला दिले होते.
बाकी आपले अनुभव भन्नाटच.. आणि तितकीच रंजक लिखाणशैली ... येऊद्या जमेल तितके पेटार्यातून.. :)
फोटु शेयर करा की राव
( आमच्या कॉलेजातल्या आठवणी आठवल्या . आमचे एक सर , झू चे , ते सापांवर काम करायचे , अन आम्ही केवळ उत्सुकतेपायी सरांबरोबर असायचो ( स्वतःचा विषय दुसर्या टोकाचा असतानाही ) . एकदा सरांनी एक पोतं हातात दिलं अन म्हणाले " हे भेट तुम्हाला . गावाबाहेर जाऊन सोडा जिथे नेहमी सोडतो तिथे " जाम फाटली होती तेव्हा... कोणता तरी बिन विषारी नेहमी आठळणारा साप होता...
असो . तुमच्या लेखामुळे जुन्या ठवणी जाग्या झाल्या लय भारी)
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत !!
एक सुचवणूक - सर्पोद्यानात येणारा प्रत्येक "कॉल" व त्या अनुषंगाने केल्या गेलेल्या हालचाली / प्रोसेसेस ची माहिती पुढील भागात द्याल का..?
उदा. - बिबवेवाडीला एका घरात साप आहे असा कॉल आला तर "एखादा सर्पमित्र लगेच रवाना होतो" हे ठीक. परंतु त्यासोबत / त्याच्या मागोमाग एखादी बॅकप पार्टी, साप पकडायचे पिंजरे पाठवले जातात का..? एखादी "सपोर्ट सिस्टीम" स्विच ऑन होते का..?
मस्त आठ्वणी.
आयुष्यात पुढे गेल्यावर मागे वळुन पहाताना तेंव्हाचे प्रसंग तेव्हढ्याच तिव्रतेने जाणवत रहातात. काही वर्षाने त्यांची धार कमी होइलच असे नाही. अन मग अश्यावेळी आपल्याबाजुने उभे रहाणारे लोक अजुनही मनात आदरभावना निर्माण करतात. एकच उपाय असतो परत फेडीचा तो म्हणजे पुढे आपल्या समोर अश्या परिस्थीत कोणी आल तर त्याला मदत करणे.
तुमची "साप कसे काय पकडता?" या प्रश्नाची वेगवेगळाली उत्तरे ऐकुन मजा वाटली. अन अश्या रिकाम्यावेळी (एक वर्ष वाया जाणे) रिकामटेकडेपणाचे उद्योग करण्याऐवजी काही तरी भरीव केल्याबद्दल अभिनंदन.
१)#जैक आताचा भाग वाचायला मजा येते आहे . ईँनफ्रारेड कैमेऱ्यातून अथवा दुर्बिणीतून साप( किंवा सरडा वगैरे थंड रक्ताचे प्राणी) कसा दिसतो ? २)मी आणि इतर सहकारी ठाण्याच्या फैक्टरीतून एकदा जून महिन्यात फिरत असता एक तीन चार ईंचाचे सापाचे पिलू वळवळतांना पाहून आमच्यातले एकाने त्याला अत्यंत त्वेषाने बुटाखाली चिरडले . नंतर समजले की त्याचे वडील तो लहान असतांना शेतात साप चावून गेले त्यामुळे त्याला सापांबद्दल इतका द्वेष निर्माण झाला .३)ठाणे जिल्ह्यात काही गावात सापांना एक /दोन/तीन कलाकी अशी नावे आहेत -चावल्यावर किती कलाकांत /तासांत मनुष्यावर विष चढते त्याप्रमाणे .
मस्त लिहिले आहे.. सापप्रेमी भारीच असतात बुआ.. :)
मला सापांची भीती वाटत असली तरी सापांना माझ्याविषयी भारी प्रेम आहे. शेजारीच टपकणं, माझ्या रुमच्या छतावर लोंबकळणं, फुलं काढत असताना फुलांमागून डोकावणं असे रोमँटिक प्रकार (नशिबाने बिनविषारी) सापांनी केले आहेत.
मान्य...
येवोत बापडे..त्यांना स्वतःच्या वाटेने, स्वतःच्या इच्छेने जाऊ देणे ही आमची पॉलिसी आहे. ते अजगर लोक मात्र त्रास देतात. आमची कित्येक मांजरं नाहीशी होण्याला तेच कारणीभूत असावेत. :(
तुम्ही पण सर्पोद्यान ला फोन करून आपल्या आजूबाजूचे साप वाचवू शकतात. सर्पोद्यान: ०२०-२४३७०७४७
अत्यंत उपयुक्त माहिती.. परवा चिंचवडमध्ये फिरत असताना एक भयानक दृश्य पाहिले. एक हिरवागार साप (मी फक्त रंगच सांगू शकतो) झाडावरून खाली पडला होता आणि त्याच्या तोंडात एक प़क्षी होता. अर्थातच भोवती प्रचंड गर्दी जमली होती. त्यातली एक बाई जोरजोरात त्याला मारा-मारा असे ओरडत होती आणि एक माणूस त्या सापाला दगडाने ठेचून मारत होता. त्या सापाच्या तोंडात पक्षी असल्यामुळे (कदाचीत) हलता येत नव्हते. त्याचे पुढे काय झाले हे बघायला मी तिथे थांबू शकलो नाही. :(
कितीही किळसवाणे वाटोत. (मला वाटत नाहीत. मला प्रचंड कौतुक वाटते ह्या प्राण्यांचे (अर्थात योग्य अंतर राखूनच!) ) पण हे प्राणी निसर्गाचा भाग आहेत. कुठल्याशा अन्नसाखळीत त्यांचा सहभाग आहे. लाखो, कोट्यावधी वर्षे टिकून त्यांनी आपले स्थान पक्के केले आहेत.
भारतात ह्या प्राण्यांविषयी इतके बिनडोक गैरसमज आहेत की त्यामुळे त्यांचा अविरत संहार चालू असतो.
़खरे तर ह्या प्राण्यांकडे असणारी निसर्गदत्त आयुधे इतकी थक्क करून सोडणारी आहेत की भरीला आणखी अंधश्रद्ध गैरसमजुतींची गरजच नाही.
काही केले नसतानाही त्यांना मारले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे ह्या प्राण्यांना मोकळेपणाने राहता येईल अशा जागाही कमी होत आहेत.
त्यामुळेच ह्या लेखकाचे आणि सर्पोद्यानासारख्या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. आभार मानले पाहिजेत.
माझ्या बाबाना एक हात नसल्याने ते सापाची शेपटी पकडून गोल फिरवून जमिनीवर आपटायचे! हे बय्राचदा पाहिल्याने मीही लहानपणी हा प्रयोग करून पाहिला होता. नंतर कळले की तो साप विषारी होता. बाबांनी तंबीच दिली, यापुढे मी समोर नसताना हे उद्योग करायचे नाहीत! आता असले उद्योग नाही करत, कारण समोर उभे रहायला बाबा नाहीत.
प्रतिक्रिया
मस्त लिहिताय.
सापाची बरीच भिती अन थोडी किळस
प्रामाणिक लेखन
धन्यवाद् !
मस्तच..
धन्यवाद !http://www.misalpav
*****
चांगले लिहीताय...
अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न
अभ्यास न करणे किंव्हा शाळेत न जाने याला "वर्ष वाया" का म्हणतात हे मला अजून समजले नाही, कारण त्या वर्षात मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो ते शाळा किंवा कॉलेज चालू असताना पण नाही.लाखात एक वाक्य आहे हे. माझ्या पहिल्या नोकरीला असताना तेथील एच आर सरांनी असेच काहीसे तत्वज्ञान आम्हाला दिले होते. बाकी आपले अनुभव भन्नाटच.. आणि तितकीच रंजक लिखाणशैली ... येऊद्या जमेल तितके पेटार्यातून.. :)लय भारी
एक सुचवणूक - सर्पोद्यानात
नक्की. मी जेंव्हा होतो,
मस्त आठ्वणी.
१)#जैक आताचा भाग वाचायला मजा
मस्त लिहिले आहे.. सापप्रेमी
सापांना प्रेम वाटणारच, तुम्ही
मान्य...
बापरे, अबोलीतै! साप काय, अजगर
सु! रे!! ख!!! _/\_
तुम्ही पण सर्पोद्यान ला फोन
सरपटणारे प्राणी
+१
वडिल
सही
कोकणात खेडेगावात खूप साप यायचे.
जेडी,
Pagination