Welcome to misalpav.com
लेखक: देशपांडे विनायक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विजुभाऊ, तब्येत ठिक आहे ना? शाळेत शिकलेल्या अल्पज्ञानाप्रमाणे समुद्राचे स्पेलिंग एस ई ए असे आहे, एस ई ई नव्हे. आमच्या शाळेत शिकवल्याप्रमाणे एस ई ए म्हणजे समुद्र आणि एस ई ई म्हणजे बघणे. चुकले असल्यास अवश्य सांगा, आत्ता मास्तरास जाऊन विचारतो. चुभुदेघे.

आमच्या दिक्शनरीत ही दोन्ही स्पेलिंगे आहेत. श्री श्री श्री संत तात्याबा म्हाराजानी ल्हिलेच आहे ना जे जे ठावे ते ते ल्ह्यावे सूढ्ध लेखनासी फाट्यावरी मारावे. इंग्रजी काय मराठी काय स्पेलिंगे म्हन्जें सूढ्धलेखनच ना. हिट ईट ऑन फाटा. हे ईग्रज मोठे चलाख असतात आपल्या गंडवतात. बघा ना रीड रेड आणि रेड या सर्वांची स्पेलिंगे आर ईए डी अशीच करतात. एत तर जौद्यात टी ओ = टू होते. जी ओ मात्र गो होते.

मह्यावाला परतिसाद काब्र दिसु न्हाई र्‍हायला बरं !

एकाला तीन तीन फडफडीत मासे मिळाले, सोबतीला भातही! आता आण्णा कशाला उठतेत? आडवा हात मारुन, कातरलेली पक्की सुपारी चघळत, सिलोन लाऊन निवांऽऽत ऐकत बसले असतील...तुम्ही आम्ही बसलोय हितं बिनाका'माचं डबडा ऐसपैस खेळत. :D

हे तर दोन पिढ्यांना जोडणारे दुवे श्रीरंग_जोशी ,विजय_आंग्रे,अनुप ढेरे,विकास -आपले आभार रेडीओ सिलोनवर प्रेम करणारी पिढी आता जेष्ठ नागरिक म्हणून वावरत आहे ज्यांच्यासाठी असे दुवे सुखावह असतात . मिसळ पाववर नसलेले काही प्रतिसाद खाली देत आहे . १] New generation always moves on. Like Bal Gandharva for our generation Ceylon is part of our memories. No more Ceylon exists (Now Shri Lanka) nor Radio Ceylon for Indian Youth. That is the life. We should just savor our memories, २] I agree with Kirit. Radio Ceylon is past. No need to get agressive if some one does not know it. Life has to change. and will change. Change is life. Do you remember or know what our parents had enjoyed during their young days ? They had their own wishes and methods. Ask your grand children what music they listen to or like ?.Most probably we do not know it. So do not brood. Enjoy today and today, not even tomorrow. Keep smiling. ३] KIRIT NE LIHILYA PRAMANE RADIO CEVLON - REDIO CEYLONE KA VYAPAR VIBHAG APALYA JEEVANACHA EK MAHATVACHA BHAG HOTA. APALYA LAHANPANI SUDHA AIKALELI PURANE FILMOKE GEET AAJHI AIKAVISHI WATATAT. 7 -57 VAJATA SAIGAL CHE GANE AIKALYA SHIVAY DIVAS SURUCH VAYACHA NAHI.

आजकाल च्यनेलच्या आणी एफ.एम.च्या गर्दीत सिलोन माहिती नसणे साहजिक आहे. गेले ते गेले दिवस, पण त्यासाठी आज खराब का करायचा ? सी= बघणे लोन= कर्ज यावरुन किमान १ तारखेला कर्जाचा हप्ता कापुनही पगार हाती मिळाला म्हणुन बहुदा किशोरकुमार गात असावा. मला त्यावेळी प्रत्येक गायक रेडिओ (स्टेशनवर) येउन गात असावा असं वाटायचं. :)

   छ्या, छ्या ! ... आताच हाती आलेल्या व्याकरणाच्या नविन नियमाप्रमाणे "किस = किस" आणि "कीस = दीर्घ किस" असे नक्की झाले आहे ;) पहिजे तर देशपाडॅ साहेबाना विचारा !

काय हो हे चक्की किसिंग अँड किसिंग अँड किसिंग अँड किसिंग =)) =)) =)) =)) अन हो, अंमळ गांगलीन झालेलं दिसतंय ;) त्यावर उतारा म्हणून थोडं तातीन घ्या बघू ;) ;)

मग तिथे मला शूर्पणखा भेटली अन बसले तिथेच गफ्फा मारत!

तिच्या नाकाचं कस आहे आता? जरूर पडल्यास सुश्रुतला भेटायला सांगा... २००० वर्षांपासून नाकाच्या प्लाष्टीक सर्जरीत एक लंबर हाय :)

आन सेकंड ओपिनियन घ्याला तुमच्याकडे धाडून देते! ;)

नको, नको. तिची फी द्यायची पद्धत आम्हाला परवडणार नाही आणि तसे केले म्हणून कोणाचे नाक (परत) कापणेही आमच्या स्वभावात बसत नाही ! त्यामुळे असले पेशंट आम्ही टाळतो +D

सीरीयल किसर इर्शाद हाश्मी ना दीर्घ आणि र्‍हस्व मधला फरक म्हैत असेल. असो. काय म्हणाल्या शूर्पणखा तै. त्यानी म्हणे नखांची नवी फ्याशन आणलीये.

कदाचित थोडेसे विषयांतर होत आहे. पण मला कोणी माश्याशी पाकृ देईल का? भात तर आहे माझ्याकडे. किमान माश्याशी एखादी नविन पाकृ तरी द्या. वाट पहातो आहे. ३ मासे आहेत आपल्याकडे. बनवुन बघेन म्हणतो. जमल्यास अवश्य कळवेन आपल्याला.

माशाची पाककृती: साहित्य : ताट वाटी पाण्याची लोटी. सर्वप्रथम वांद्र्याच्या हायवे गोमांतक ( कोकण्याची खाणाव़ळ) येथे जावे . तेथे ताजे फडफडीत पापलेट किंवा सुरमई तुकडी थाळी घ्यावी. मस्त ओरपून जेवावे. ( थाळीत भाताचा अंतर्भाव आहे)

देशपांडेआण्णा अजिबात वाईट वाटून घेऊ नका हा धागा टाकला म्हणून .मिपावर लिहिणारी पिढी रेडिओ सिलोन बंद झाल्यानंतरची आहे त्यामुळे सिलोनचं कालवण झालं आहे . इंडिका ,स्विफट मधून ऑफिसला जातांना एफेमवर गाणी ऐकता ऐकता ट्राफिक अपडेट ऐकणारी आहे .आज पेहली तारीख आहे .मी पण बैँकेत जाण्याचे बंद केले आहे पांढरे केसवाला कोणी दिसला की काउंटरच्या क्लार्कच्या कपाळावर आठ्या उमटतात .आण्णा ,तुम्हाला कुणाल ,अरबाज ,दिपिका ,कतरिना चे सिनेमे आवडत असतील तर त्यांच्यावर एक धागा काढा ना.