तुमची शंका रास्त आहे. मी स्वत: वर म्हटल्याप्रमाणे अजूनही १००% "ओपन लूप्स" कॅप्चर करत नाही. टू-डू वा स्टीक पेपर वापरायची सवय असेल तर ही पद्धत एक पाऊल पुढे जाऊन त्या टू-डू लिस्टला लेबलं द्यायला, त्यांची वर्गवारी करायला सांगते येवढचं. काही मोबाईल अॅप्सही पण उपलब्ध आहेत पण माझ्याकडे जुना फोन असल्याने मी https://app.nirvanahq.com/ ची फ्री आवृत्ती वापरतो. (पण त्यात फक्त ५च प्रोजेक्ट बनवता येतात आणि जास्त टॅग्ज बनवायला पण मर्यादा आहेत, त्यामुळे एक "जनरल प्रोजेक्ट" बबनवून त्यामध्ये मी बाकीची सगळी टू-डू टाकतो आणि नावामध्येच टेग्ज देऊन मोकळा होतो). बरीच कामं पुन्हःपुन्हा येत असतात, त्यामुळे ती सॉफ्टवेअर मेध्ये रिपिट लावून एकदाच टाकावी लागतात. उदा. कपाट लावणं वगैरे अन्यथा माझ्यासारखी आळशी लोक ते करणं भाग होतं तेव्हाच करतात. साध्या टू-डू लिस्टचा फायदा हा की निदान अपूर्ण कामांचा ट्रॅक राहतो आणि या सिस्टीमचा फायदा येवढाच की कुठलं काम कधी करायला हवं हा निर्णय सुधारू शकतो.
बाकी माझा मिपा वरचा हा पहिलाच लेख. खरं तर मी मिपा जन्माच्या अगोदर पासून मराठी संकेतस्थाळांवर वावरायचो. अर्थात वाचनमात्र म्हणून. मी मिपाचा आयडी का घेतला हे मला माहित नाही, कारण चार शब्द लिहिता येतील का याची शंका होती. पण मिपाच्या प्रतिसादांच्या गमती-जमतीने मलाही लिहीतं व्हावसं वाटलं. अर्थात मला काही चांगलं लिहायला जमत नाही. बर्याच चुका असतील तर पोटात घ्या. :)
मी स्वतःबद्दल बोलत होते! तुम्ही एवढा मोठा लेख आणि व्यवस्थित टाईप केला याबद्दल खरंच कौतुक आहे. बरेच लोक नवीन आहे म्हणत कसेही टाईप करून टाकतात. आणि तुम्ही दिलेली आयडियाही नक्कीच वापरण्यासारखी आहे. साधारणपणे आम्ही लोक एका नोटपॅडवर 'आजची कामे' म्हणून रोज सकाळी नोंद करतो पण ते नोटपॅड बघायला दिवसभर विसरतो!!
वाटत सुद्धा नाही की हा तुमचा मिपावरचा पहिला लेख असेल.
माझ लिखाण पहा...दहादा सांगुन झालय मला की जरा , कॉमा, सेमी कोलन अश्या गोष्टी निटपणे वापरल्या तर खडे लागणार नाहीत, पण मी अजुन सुधारले नाही आहे. :D
देवा! एव्हढ ऑर्गनाइझ जर मला रहाता आला तर क्या कहेने?
वाचनखुण साठवते अन जरा प्रयत्न करते.
पण एक आहे हं सुधीर साहेब, अगदी ऐनवेळेला प्रवासात वगैरे, महत्वाच्या गोष्टी माझ्याकडेच असतात.बिकॉज आय मॅनेज वेल!!
पण तरीही.....काय सांगु...:(
प्रत्येक दिवसाला एक पान असणारी साधी डायरी ठेवली आहे तिच्यात जे करायचंय ते सगळं लिहीलेलं असतं. कुणाचेही कॉल्स आले तर घरचे त्यात लिहीतात. मग आवडेल तसं कोणतंही काम मनमुराद करतो. काम झाल्यावर तो आयटम स्कोराउट करतो. त्यातनं ओपन आयटेम्सची लिस्ट मिळते. नवं काम असेल तर आजच्या तारखेला (किंवा जुन्या अनफिनिश्ड लिस्टमधे) लिहीतो. झोपण्यापूर्वी एखादं महत्त्वाचं काम राहिलंय असा दिवस क्वचित येतो. आजचा लेफ्टोवर उद्यावर गेलायं असं कधीही होत नाही. त्यामुळे सकाळी जाग आल्याशिवाय कधी उठल्याचं स्मरत नाही.
`एका वेळी एक काम' आणि `हा क्षण' ही दोन सूत्रं इतकी पक्की आहेत की प्रत्येक काम वेळेपूर्वीच पूर्ण असतं आणि प्रत्येक काम आनंद देऊन जातं. एक गोष्ट निश्चित - टू बीट द टाईम, वन हॅज टू बी अहेड ऑफ द टाईम.
@संक्षी तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. किंबहुना "एका वेळी एक काम" आणि "हा क्षण" ही परिस्थिती निर्माण व्हावी, हातातल्या कामावर १००% लक्ष देता यावं म्हणूनच हा सगळा प्रताप! कॉम्लिकेडेड म्हणाल तर, काही जण टू-डू लिस्ट बनवतात. (मीही त्यातलाच, कारण "विसरलो" हे पालुपद नको म्हणून. गाठी मारण्याचाच तो एक आधुनिक प्रकार) फरक एवढाच की हा माणूस फक्त त्यांना काही लेबलं द्यायला सांगतो एवढचं. काही कामांना भरपूर मानसिक शक्ती लागते तर काहींना शारीरिक तर काहींना दोहोंची गरज नसते, काहीं वेळ खावू असतात तर काही चुटकीसरशी होणारी. लेबलांमुळे कुठली गाठ कधी सोडवायची हा निर्णय सोपा होऊ शकेल. अर्थात काहीजण टू-डू लिस्ट शिवाय वेल ऑर्गनाइज असतात पण जी नसतात त्यांना कदाचित उपगोगी पडेल.
@पैसा, @जॅक डनियल्स, @aparna akshay, @संक्षी: प्रतिसादासाठी धन्यवाद.
प्रत्येक गोष्ट हातात राहते. लागला तर दोन-तीन वर्षापूर्वीचा रेफरन्ससुद्धा मिळू शकतो. समरसतेनं काम करायला फक्त एकच गोष्ट लागते : मन आणि शरीराची एकरुपता. थोडक्यात शरीराचं एक चाललंय आणि मन दुसरा विचार करतंय अशी स्थिती नको. हे एकदा लक्षात आलं की काम आनंदाचं होतं, मग ते कोणतही असो.
अॅलनच्या पद्धतीत ५ मुख्य पायर्या आहेत.
या पाय-या बहुतेक वेळा मनातल्या मनात 'लिहिलेल्या' असतातच. सवय नसेल तर ती निर्माण व्हायला कागदावर्/स्क्रीनवर लिहिण्याचा उपयोग नक्की होईल.
अनेकदा दुस-या कुणी सांगितलेल्या गोष्टी "साध्या" वाटतात; पण त्या करण्याने नक्की फरक पडतो. पूर्वी अनेकदा मी सकाळी ऑफिसात जाताना अनेक गोष्टी विसरायचे धावपळीत. त्यावर उपाय म्हणून "रात्री झोपण्यापूर्वी ऑफिसला नेण्याची बॅग भरावी" असा सल्ला एकदा वाचला होता - त्याचा मला खूप उपयोग होतो आहे.
या पाय-या बहुतेक वेळा मनातल्या मनात 'लिहिलेल्या' असतातच.
बरोबर! या सगळ्या पायर्या आपल्या मेंदूत आपोआप होतात. लेखकाने त्याला "नॅचरल प्लानिंग मॉडेल" म्हटलंय.
प्रतिक्रिया
चांगली सिस्टिम!
तुमची शंका रास्त आहे
तसं नाही!
वाटत सुद्धा नाही की हा तुमचा
खूप चांगले सल्ले !
देवा! एव्हढ ऑर्गनाइझ जर मला
बाप रे! इतकं काँप्लिकेटेड जगणं!
योग्य मुद्दा
डायरी ठेवून पाहा
अॅलनच्या पद्धतीत ५ मुख्य
अॅलनच्या पद्धतीत ५ मुख्य पायर्या आहेत.या पाय-या बहुतेक वेळा मनातल्या मनात 'लिहिलेल्या' असतातच. सवय नसेल तर ती निर्माण व्हायला कागदावर्/स्क्रीनवर लिहिण्याचा उपयोग नक्की होईल. अनेकदा दुस-या कुणी सांगितलेल्या गोष्टी "साध्या" वाटतात; पण त्या करण्याने नक्की फरक पडतो. पूर्वी अनेकदा मी सकाळी ऑफिसात जाताना अनेक गोष्टी विसरायचे धावपळीत. त्यावर उपाय म्हणून "रात्री झोपण्यापूर्वी ऑफिसला नेण्याची बॅग भरावी" असा सल्ला एकदा वाचला होता - त्याचा मला खूप उपयोग होतो आहे.बरोबर!
या पाय-या बहुतेक वेळा मनातल्या मनात 'लिहिलेल्या' असतातच.बरोबर! या सगळ्या पायर्या आपल्या मेंदूत आपोआप होतात. लेखकाने त्याला "नॅचरल प्लानिंग मॉडेल" म्हटलंय.छान लेख...