Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सध्या 'काय काय त्याज्य करावं' हा विचारच त्याज्य करावा असे वाटू लागलय खरं :( असो.....................................जय जय रामकॄष्ण हरी

आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
पेरण्या मृगनक्षत्रावर होतात हो विजुभाऊ. दहा दिवसात पेरण्या उरकतात, नव्हे तर उरकाव्याच लागतात. उन्हाळाभर अश्या वार्‍या नसतात कारण जमिन तयार करावी लागते अन ते जास्त कष्टाचे असते. पाऊस पडत असताना तस शेतात फार काम नसत. गुडघाभर चिखलात आपल काही चालत नाही. हां पण आषाढ सरताना पिकं उगवलेली असतात अन मग कोळपणी करु शकतो, विरळणी करु शकतो, तोवर माणस परतलेली असतात. भांगलण मात्र जरा चांगली उघडीप झाल्यावरच. तंबाखु, ऑगस्ट मध्ये लावायचा असतो कारण त्याला एव्हढ पाणी सोसत नाही. तस काय अडत नाही शेतांच या मोसमात एकदा पेरणी झाली की, अन वारीला काही सारं घरदार झाडुन जात नाही, एखादा वारकरी असतो घरपती. उगा शेताचा विषय काढला म्हणुन हा प्रतिसादाचा उपद्व्याप, बाकी चालुदे.

नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही काहीवेळेस असे वाटायचे की शेतातली कामे असताना ती सोडून कसे काय लोक वारीला जाऊ शकतात म्हणून. पण शेतीशी काही संबंध नसल्याने-पूर्ण अज्ञान असल्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचारही कधी केला नाही. तुम्ही दिलेली माहिती सर्वस्वी नवीन अन उपयोगी आहे, बहुत धन्यवाद. आणि आता हाइंडसाइट मध्ये लक्षात येतंय, शेतीला फारसा अडथळा होत नसल्यानेच वारी चालूये, नैतर इतकी वर्षे चालू राहिलीच नसती.

आणि आता हाइंडसाइट मध्ये लक्षात येतंय, शेतीला फारसा अडथळा होत नसल्यानेच वारी चालूये, नैतर इतकी वर्षे चालू राहिलीच नसती.
हे सगळ्यात महत्वाचं!! तैं च्या म्हणण्यालाही (अनुभवोक्त) अनुमोदन..

शेतीची बहुतेक कामे झालेली असतात… त्या काळात भयंकर दुष्काळ पडला असताना आणि मोगलांनी महाराष्ट्रावर आक्रमण केल असतानाहि छत्रपति संभाजी महाराजांच्या छत्राखाली पालखी सोहळा सुरूच राहिला याशिवाय १६८५ साली तुकोबांच्या पादुका पालखीत पंढरपूरला नेण्याचा प्रघात पडला त्यासाठी निधी आणि संरक्षणसुद्धा स्वराज्याच्या नाजूक काळात देण्यात आलं होत…त्यामुळे आताच्या राज्यकर्त्यांना व्यवस्थेवर ताण येतो असं वाटत असेल तर त्यांनी जीव द्यावा फुलपात्रात (फुलपात्र बुवा देतील :P )

तुकोबांच्या मुलांचे शिवाजीमहाराजांशी काहीतरी बोलणे कधीकाळी झाले होते असे वाचल्याचे आठवत आहे, पण १६८५ साली असा प्रघात पडला हे माहिती नव्हतं. रोचक आहे!

तुकोबांच्या मुलांचे शिवाजीमहाराजांशी काहीतरी बोलणे कधीकाळी झाले होते असे वाचल्याचे आठवत आहे
होय ते नारायणमहाराज तुकोबांचे कनिष्ठ चिरंजीव बहुतेक…त्यांनीच तुकोबा-माउली यांचा पालखी सोहळा वारी बरोबर चालू केला, पूर्वी एकाच पालखीत तुकोबा-माउली दोघांच्या पादुका असत…नंतर (१५० वर्षांनी) काही वाद झाल्याने सरदार हैबतबाबांनी माउलींची पालखी स्वतंत्रपणे आळंदीहून नेण्यास सुरुवात केली.

'तसा' वाद नव्हता हो, तुकोबांच्या वंशजात वाद निर्माण झाला…त्यामुळे पालखी निघेल कि नाही असा संभ्रम होता…आणि एकाच पालखीत दोन्ही पादुका असल्याने त्याचा फटका उगाच माउली यांच्या पालखीला बसला असता…म्हणजे तुकोबांची पालखी निघाली नसती तर ज्ञानोबांची पण नसती निघाली,म्हणून पालखी वेगळ्या करण्याचा निर्णय शिंद्यांनी आणि हैबतबाबा पवारांनी घेतला.

या प्रश्नाचं उत्तर खरंतर खुप सोप्पंय. वारीतला कुठलाही माणूस्/वारकरी हा त्याच्या फक्त आणि फक्त आत्मिक समाधानासाठीच वारीला जात असतो. त्यामागे धार्मिक भावनांचे सामुदायिक शक्तीप्रदर्शन अथवा शासन यंत्रणेवर भार देण्याचा यांपैकी कुठलाच हेतू नसतो. विजूभौ, एकदातरी या वारीत चार पावलं चालून पहा मग कळेल तुम्हाला कि लोकं आपली कामधामं सोडून आषाढी-कार्तिकीच्या पंढरपूरच्या वार्‍या का करतात ते.

एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.
या प्रथेचा 'उपयोग' संपलेला नाही असं वाटतं त्याचप्रमाणे यात काही विशेष अनाठायी प्रथा आहे असंही वाटत नाही.

पुणे व मार्गावरील इतर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण, शहरातील स्वच्छता तसेच इतर मुद्द्यांवर उपाय नक्की व्हावेत. त्यासाठी वारीचा मार्गबदल वगैरे इतर उपाय असल्यास तिथे मान, परंपरा वगैरे बाजूला ठेउन खुल्या दिलाने स्वीकारले जावेत... परंतु यासाठी वारीच बंद करणे फार टोकाची भूमिका वाटते. ज्यांना जायचय त्यांना जायला काय हरकत आहे? इतरांना कमीत कमी त्रास होइल इतकी खबरदारी घेतली की झालं.

त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो>> अहो, विरंगुळ्यासाठी लोक्स बागेत/ सिनेमाला जातील की. वारीला कशाला कोण पायपीट करत जाईल?

वारी मुळे पुण्यातील वहातूक व्यवस्थेवर तान पडतो. प्ण वारीच्या मार्गात बदल कोणी करीत नाही गणेशोत्सव , दहीहंडी यांच्या वाइट बाजुंबद्दल बरेचदा बोलून झालेले आहे. गणेशोत्सवातील देखावे एकेकाळी जेंव्हा व्यक्त होण्याची कोणतीच माध्यमे नव्हती तेंव्हा लोकांचे प्रबोधन करीत होती. देशभक्तांचे जिवंत देखावे देशभक्ती जागृत करीत होते , मेळे लोकाना कलागुणांचे एक व्यासपीठ देत होते त्याकाळात गणेशोत्सव आवश्यक होते. टिळकानी सार्वजनीक गणेशोत्सव ज्या उद्देशासाठी स्थापीत केले तो उद्देश साध्य करण्याची साधने आज उदंड आहेत. गणेशोत्सवातील ध्वनीप्रदुशण , मंडळांची दादागिरी वगैरेवर शासन अंकुश घालु शकत नाही. हे उत्सव बंद केले तर निदान लोकांचा त्यात जाणारा अनाठायी वेळ वाचेल. तो उत्पादक कामांसाठी वापरता येइल. आज आपण हायवेवर सुद्धा आसपास्च्या गावांमधुन निघणार्‍या पालख्या पहातो. त्यात बहुतेकदा २० ते ४५ वयोगटातील मंडळीच असतात. पालखी हा त्यांच्या साठी टाईमपास असतो. त्या ऐवजी या लोकानी श्रमदान वगैरे केले तर गावची कामे होतील. उत्पादक कामात वाढ होईल. गणेशोत्सवासारखा उत्सव हा तर निव्वळ शासन यंत्रणेवर /पोलीस यंत्रणेवर ताणच आणतो

शेतीचा वेळ वगैरेबद्दल अपर्णाने लिहिलं आहेच. माझ्या माहितीप्रमाणे माळकरी हे शक्य तेवढे चांगले आणि सत्वाचे आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिणामी काही गुन्ह्यांना तरी चाप लागत असावा. चालत जाणे हे कालापव्यय म्हणून पाहिले तर तसे. पण ज्याच्याकडे वेळ असेल आणि चालायची ताकद असेल त्याची मर्जी! तसे तर लोक नर्मदा परिक्रमा सुद्धा हजारों वर्षे करत आलेतच की! आणि प्रत्येक गोष्टीकडे असे उत्पादक आणि अनुत्पादक काम म्हणून पाहता येणार नाही. तसे पाहिले तर गायन, नृत्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला सगळ्याच अनुत्पादक ठरतील! पण प्रत्यक्षात त्यातून मिळणारा आनंद हा पैशात मोजता येण्यासारखा नसतो. बाकी वाहतुकीचा खोळंबा, ध्वनीप्रदूषण याबाबत सहमत. पण ते तारतम्य सगळ्यांनीच ठेवायला हवे. आमच्या इथे तर काही ठिकाणी रस्त्यात मंडप घालून सार्वजनिक गणपती बसवतात. तेव्हा ट्रॅफिक हळू चालते, तशाच शिमगा, कार्निव्हल अनेक मिरवणुका असतात. केरळी लोकांची सुद्धा कसल्याशा सणाची मिरवणूक असते. ओल्ड गोव्याला फीस्टपूर्वी आणि नंतर काही दिवस चर्चसमोरचा राष्ट्रीय हमरस्ता बंद करतात. तेव्हा ट्रॅफिकला ३ किमि चा जास्तीचा वळसा घेऊन आणि अर्धा तास खर्च करून जावे लागते. दर वेळी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, केरलाईट्स कोणाचाही कसलाही सण असो, पहिले काम म्हणजे रस्ता बंद. असंच आहे. मग त्या बिचार्‍या वारकर्‍यांनाच कशाला विरोध करायचा? मोठ्याने स्पीकर्स लावून गोंगाट केला की आपण ओरड घालतो, पण आमच्या घराशेजारी एक शाळा आहे. मधे फक्त एक लहान रस्ता, रोज सकाळी ७ वाजता मुलांना सोडायला येणार्‍या गाड्यांचे हॉर्न्स जे सुरू होतात ते दुपारी शाळा बंद झाली की थांबतात. अगदी वीट आला आहे. पण शाळेची मालकीण नगराध्यक्षा. कोणाला विचारणार? बरं लोकही असे की रस्ता सरळ आहे, मागचे पुढचे १/२ किमि व्यवस्थित दिसते, फक्त मुलांना घेण्यासाठी थांबलेली गाडी हलल्याशिवाय मागच्याला पुढे जाता येत नाही. एका सेकंदात यांचं पेंपें सुरू! या सगळ्याला आपण काय करू शकतो? घर बदलणे हा एकच उपाय मला दिसतोय!

माझ्या माहितीप्रमाणे माळकरी हे शक्य तेवढे चांगले आणि सत्वाचे आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिणामी काही गुन्ह्यांना तरी चाप लागत असावा.
छे. पैसाताई तुमच्याकडे शास्त्रीय दृष्टीकोन अजिबात नाही बघा.आकडेवारी कुठे आहे?नक्की किती माळकरी?चांगले आणि सत्वाचे आयुष्य म्हणजे नक्की काय? :)

"यामुळे काही गुन्हे थांबतील" अशा अर्थाच्या वाक्यासंदर्भाने. माळ घातली, की मटन मच्छी खाणे नाही. दारू पिणे नाही अशी शपथ असते. अन माळकरी ती जिवाच्या पणाने पाळतात हे पाहिले आहे.. वारीत उगा हौसे खातर सामिल होणारे आजकालचे येडे सोडले तर हार्डकोअर वारकरी हा माळकरीच असतो.

वारीत उगा हौसे खातर सामिल होणारे आजकालचे येडे सोडले तर हार्डकोअर वारकरी हा माळकरीच असतो. +१ बाकी लेखाबद्दल : आधी ते दिवसरात्र चालणारे कर्णप्रदुषण करणारे मशिदीवरचे भोंगे बंद करा मग पुढचं पाहु.

बाकी लेखाबद्दल : आधी ते दिवसरात्र चालणारे कर्णप्रदुषण करणारे मशिदीवरचे भोंगे बंद करा मग पुढचं पाहु.
दिवस रात्र कोणत्याही वेळी कुठेही चालणारी भजने. टीव्हीवरची भक्तीगीते बहुतेक चॅनलवरची गुरुदेवांची प्रवचने एह लिहायचे विसरलेला दिसताय.

आपण आधी वारि कधी व कशि व का सुरु झाली याचा अभ्यास करुन मगच वारी बन्द वगैरे करण्याचा विचार करावयास हवा होता.

माळकरी वगैरे ठीक आहे. वारीत गैर प्रकार होत नाहीत असे नाही. समाज एकत्र येतो तेथे गैर प्रकार येतातच. वारीतही दादागिरी मारामार्‍या होतात. त्याबद्दल नाही पण माझा मुद्दा आहे की शासन यंत्रणेवर अनाठायी ताण येणे वगैरेबद्दल आहे. वारीमुळे सातारा पंढरपूर रस्ता पहा संपूर्ण महामार्ग एक ओपन टॉयलेट होतो. त्याबद्दल कोणी लिहीत नाही. स्थानीक लोकाना त्याचा त्रास होत नसेल असे नव्हे. वारी /गणेशोत्सव्/मोहर्रम नेहमी एकापाठोपाठ येतात. राज्य पोलीस यंत्रणॅवर त्याचा जेवढा ताण येतो तेवढा इतर कशाचाही येत नाही. हल्ली गणेशोत्सवानम्त्र नवरात्रौत्सव येतो. महाराष्ट्रात सार्वजनीक नवरात्रौत्सव कधीच नव्हता. पन आपन त्यालाही आपलेसे केले आहे. एकूणच धांगडहिंगा /टाईम पास कसा करता येईल याची आपण वाटच पहात असतो. पण यात सामान्य नागरीक्/आजारी लोक/ विद्यार्थी /सामान्य पोलीस भरडले जातात. ( त्या उत्सवानंतर येणारे इतर प्रकार उदा: कानाचे घशाचे आजार/ गर्भपाताच्या प्रमाणात वाढ वगैरे. त्या बद्दल इथे बोलुन विषयांतर करायला नको) हे उत्सव बंद करावे असे नव्हे मात्र सार्वजनीक स्वरूप बंद व्हावे.

हे उत्सव बंद करावे असे नव्हे मात्र सार्वजनीक स्वरूप बंद व्हावे.
म्हणजे कंपाऊंडाच्या दारापासून ते देवघरापर्यंत वारी का? का ई-वारी? एका क्लिकावर इठोबारक्माई अ‍ॅटएटाइम?

विचारवंतांना वारी गँगरिन वाटू नये आणि वारकर्‍यांनी काळानुसार पुढे जावे यासाठी काही सोप्प्या उपाययोजना सुचवतो - वारकरी मंडळींचा टिळा, माळा वाला जुनाट पेहराव बदलून त्यांना त्या जागी फिकट भगवे आणि सफेद रोब द्यावे. फुगडी, रिंगण वगैरेना 'डायनॅमिक मेडिटेशन', 'सूफी व्हर्लिंग' अशी नावे द्यावी. डोळे मिटून स्वस्थ बसून हृदयी विठ्ठलाचे समचरण स्मरण्यात मन एकाग्र/ नाहीसे वगैरे करण्याला 'झाझेन' असे म्हणावे. कीर्तन, प्रवचने वगैरें इव्हेंटना 'इव्हिनिंग सत्संगा' सारखी नावे द्यावीत. एकमेकांना माउली म्हणत बंधुभावाने वावरणे थांबवून वारकर्‍यांनी त्याजागी एकमेकांना स्वामीजी आणि माताजी असे वरवर म्हणत एरवी निसर्गधर्मानुसार वागत मुक्त प्रणयाचा आनंद वगैरे लुटून झाल्यावर रोज एखादा तास 'व्हाईट रोब ब्रदरहूड' साठी राखून ठेवावा. वारीसारखे इव्हेंट पंचतारांकीत हॉटेले, अलिशान रिसॉर्ट अशा ठिकाणी ठेवावेत. रिसॉर्टचे मुख्य प्रवेशद्वार ते आवारातला बगिचा अशा दिंड्या काढाव्या. ईश्वर चराचरात असल्याने तिथल्या एखाद्या झाडात, रोपातच तुमचा विठ्ठल पहा असी सक्ती करावी. 'भाव' तेथे देव हे लक्षात घेता कुठल्याही रोबची किंमत किमान पाचशे रूपये असावी. वारीसाठीची दैनिक प्रवेश फी किमान पाच हजार असावी. या व्यतिरिक्त आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या सक्तीच्या करून त्यांचा खर्चही वसूल करावा. हे सगळे ज्यांना परवडत नाही त्यांनी वारीच्या फंदात पडू नये अशी सक्ती करावी. असे केल्याने व्यवस्थेवर ताण पडण्याचा प्रश्नच येणार नाही. असो.

जबरदस्त! आपण पण ई-वारी काढूया का रे? माझ्याकडे डालडाच्या डब्यातली तुळस मात्र नाही हां!

दुपारी

दर दुपारी दुपारी दुपारी ला पंढरपूर ला दुपारी निघते. लाखो दुपारी दुपारीत दुपारी होतात. दुपारी दुपारीला जायचे म्हणजे खरेतर दुपारी दुपारीचा हंगाम ऐन दुपारात असतो. नुकतीच दुपारी झालेली असएत व्हायची असते अशातच दुपारी दुपारी सोडून दुपारीला जातात. त्यांच्यासाठी दुपारी हा एक दुपारी असतो. पण त्यामुळे दुपारी दुपारतात / दुपार यंत्रणेवर अवास्तव दुपार येतो. कारण नसताना दुपारी यंत्रणेला सुरक्षा दुपारी राबवले जाते. लोकांचाही दुपार दुपारी जातो. खरेतर दुपारी धर्मात दुपारी दुपार दर्शन या दुपारी गोष्टी मानलेल्या आहेत. दुपारी भावनांचे दुपार प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी दुपार नाही अशा दुपारीस दुपार धरण्याचे दुपारी बहुतेक सर्वच दुपारी वाढीस लागलेले आहेत. दुपारी उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ दुपार बाजूस राहील आणि भलतेच दुपार घेवून दुपारी खंडणी बहाद्दूर / दुपारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी दुपार बनला आहे.दुपारी जागृती हा उत्सवांचा दुपार कधीच मागे पडला आहे. आपण एखादी गोष्ट त्याचा दुपार सम्पल्यानंतर ती दुपारी ठरवतो तसे हे दुपारी देखील आता दुपार करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या दुपारी प्रथा सम्पवायला हव्यात. दुपारी काय वाटतय. ( दुपारीच्या गळ्यात दुपारी कोण बाम्धणार ???? )

ग्यांगरीन झालेले बोट्/पाय हात वगैरे कापावेच लागतात. त्यानी इतकी वर्षे सर्व्हीस दिली म्हणून ग्यांगरीन कोणी कुरवाळीत बसत नाही

अगदी अगदी.. करुन टाका वारी बंद. च्यायला, मी तर कुटूंबसंस्था आणि लग्नसंस्था कधी बंद पडतेय याचीपण वाट बघतेय. आणि त्यानंतर तर मी शिक्षणसंस्थांचा नंबर लावणारेय. कुणाचं भलं झालयं शिकून?

मी तर कुटूंबसंस्था आणि लग्नसंस्था कधी बंद पडतेय याचीपण वाट बघतेय. >>> अग मग भाड्याने खोली कशी मिळायची ;) ते ही आमच्या गरीबांच्या पुण्यात ;)

वारीवरच काय तर निवडणुकांचे प्रचार, तरूण व तडफदार युवानेत्यांचे वाढदिवस, नेतेमंडळींच्या जयंत्या मयंत्या, धनदांडग्यांकडची लग्नकार्ये या सगळ्यांवर बंदी आणावी. सामान्य लोकांना फार त्रास होतो सगळ्याचा. या निमीत्ताने ओशो कम्युनची संपत्ती स्थावर जंगम मालमत्तेसकट जप्त करून समोरच्याच बुधरानी हॉस्पिटलला किंवा टाटांच्या एखाद्या समाजोपयोगी संस्थेला दान द्यावी आणि कृष्णमूर्ति फाउंडेशन बरखास्त करून तिथल्या अभ्यासवर्गात कालापव्यय करणार्यांना तो वेळ किमानपक्षी दैनिक संध्यानंदचे मुद्रित शोधन (प्रूफ रीडिंग) करण्यासारख्या उत्पादक कामांसाठी वापरणे बंधनकारक करावे असेही सुचवावेसे वाटतो. असो.

नुसता घरात बसून काय जातंय मित्रानो वारी बंद करा बोलाया …एकदा अनुभव वारी आणि जे जातात वारीला ते आपला शेती पाणी घर संसार सांभाळून जातात बाबाहो …. त्यांच्या शेतात नाही पिकल तर काय तुमचा मायबाप सरकार नाही देणार त्यांना खायला …. बाकी शासन यंत्रणेचे म्हणाल तर बाकी कुठे कुठे आणि ती बिझी असते त्याचा हिशोब न मांडलेला बरा … (ती नसली तरी कुठे गर्दी गोंधळ जाळला ऐकवत नाही …। सगळ नीट चालू असत