पाककृती
आईस कचांग
Primary tabs
येथे ''आईस कचांग''हा बर्फाच्या गोळ्यासारखा दिसणारा पदार्थ जेवणानंतर डेसर्ट म्हणून लोकप्रिय आहे.मोठ्या ग्लासात तळाशी शेंगदाणे,शिजविलेले रेड बीन्स,कॉर्न घालावे.

त्यावर आपल्या आवडीचे सरबत(रोज,काला खट्टा इ.)घालावे.
त्यावर बर्फाच्या चुरा एकत्र म्हणजे गोळा करून ठेवावा.त्यावर पुन्हा सरबत घालावे.आपल्याकडील बर्फाच्या गोळ्यासारखीच चव पण शेंगदाणे,बीन्स इ.मुळे अधिक चविष्ट लागतो.
काय सह्ही दिसते आहे ते... जबरा फोटो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अहो पण हे आमच्यासारख्या मागासलेल्यांच्या घरात होणे शक्य आहे का?
रेड बिन्स आणि काय कॉर्न्स वगैरे अशा अनेक जिन्नसांची नावे देखिल आम्ही ऐकलेली नाहीत.
त्यापेक्षा त्या रहाळकरणीचा फोडणीचा भात बरा. कसें?
गोविंद कृष्णाजी पटवर्धन
<<<<<<रहाळकरणीचा फोडणीचा भात बरा. कसें?>>>>>
:O फोडणीचा भात नाही हो......टोमॉटो राईस हो...
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
बर्फाच्या गोळ्याबरोबर काही मजेदार दाणे वगैरे टाकायची कल्पना छानच आहे.
बघुनच खावसं वाटत...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
सह्ही पाकृ, सुंदर फोटू... :)
तात्या.
हे सर्व मटेरिअल काचेच्या ग्लासातच ठेवावे लागते का?
(लहान मुलांकडुन काचेच्या वस्तु फुटण्याचा धोका आसतो.)
स्टील च्या पेल्यात ठेवले तर चालेल.
करून बघते. मागे एकदा टी वी वर मलेशिया का थाइलंड मध्ये पावामध्ये आइसक्रीम घालतात असे पाहिले होते. म्हणजे आपल्याकडे अगदी गाडीवर वडापाव मिळतो ना तसेच..
चकली
http://chakali.blogspot.com
नावावरून हा खाद्यपदार्थ असेल असे वाटले नव्हते!
दिसतोय छान पण सांप्रत घसेदुखीने हैराण असल्यामुळे करून बघण्याचा विचारही करवत नाही. नंतर कधीतरी...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.