Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

माझ्या मनात गेले काही दिवस कॉफीवर एक लेखमाला लिहायचा विचार बळकावतोय...... तुमच्या या लेखाने तो जवळ जवळ पक्का होतोय......:-)

The whole purpose of places like Starbucks is for people with no decision-making ability whatsoever to make six decisions just to buy one cup of coffee. Short, tall, light, dark, caf, decaf, low-fat, non-fat, etc. So people who don't know what the hell they're doing or who on earth they are can, for only $2.95, get not just a cup of coffee but an absolutely defining sense of self: Tall. Decaf. Cappuccino -You've got mail (1998)

रोचक आहे वाक्य. 'जागतिकीकरण' या विषयाचा अभ्यास करताना 'मॅक्डोनाल्ड'बद्दल 'फक्त काही ठराविक पदार्थ उपलब्ध असण्याचा पर्याय आणि त्याचे परिणाम' याबद्दल बरंच काही वाचलं होतं त्याची आठवण आली हे वाक्य वाचून.

क्या बात है | आवडेश... बर्याच वेळा असे असते , फारसे सायास न करता सुख अलगदं आपल्यापर्यंत पोहोचतं . फक्त ते आप्ल्याला कवेत घेता यायला हवे. त्याचा कार्यकारण भाव न शोधता ! पाणी म्ह्णजे एच टू ओ , इथेच सारे थांबले . प्रुथक्करण पाण्याचे कराय्चे तहानेचे नाही ( इति वपु )

उत्तम! लेखन विषय, शैली वगैरे नेहमीप्रमाणे उत्तम आहेच. त्याच बरोबर "तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस" वगैरे वाक्यातून हल्लीची बोली मराठी नेमकी पकडली आहे :)

असाच प्रकार 'सब-वे' सँडविचचा. एक चिकन सँडविच मागितलं तर ब्रेड कुठला हवा? १ फूट की १/२ फूट?, सॅलड कुठलं कुठलं हवं? (६-७ भाज्या निवडीसाठी), सॉस कुठले पाहिजेत? (पुन्हा ६-७ वेगवेगळ्या रंगाचे सॉस), हालपिनो (की जालपिनो? मला कधीच लक्षात राहात नाही) पाहीजे की नको?, कोल्ड पाहिजे, वॉर्म पाहिजे की हॉट पाहिजे. एक सँडविच घ्यायचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रश्नपत्रिकेला सामोरे जावे लागते हे पाहिल्यावर पुन्हा 'सब-वे' च्या वाटेला गेलो नाही. आपला मुंबईतला, नाक्यावरचा, सँडविचवाला आवडतो. 'व्हेज सँडविच दे' म्हंटल की 'चिझ चाहिए?' हा, विश्वामित्रासमोर अप्सरेने नृत्य करावे असा, प्रश्न फक्त तापदायक ('नही' म्हणायला) असतो बाकी सँडविचाने पोट आणि मन दोन्ही भरते.

पण सबवेमधे किंवा तत्सम ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं देणं कंपल्सरी नसतं हे नक्की. सबवेमधे ज्याला हवं तो अगदी एकेक घटक कस्टमाईझ करुन घेऊ शकतो. त्यातून आपली खास स्टाईल उभी करता येते. इतर अनेकजण म्हणजे: अ. ज्यांना प्रश्नावलीचा कंटाळा येतो. ब. हनी-मस्टर्ड, बारबेक्यू, गार्लिक मेयो अशांच्या चवीच्या फरकाची माहिती नसल्याने नक्की काय मागवले म्हणजे चांगले ठरेल हे कळत नाही. क. वेळ नसतो ड. फोनवर डिलिव्हरी मागवायची असते. अशा सर्वांना कोणतेही स्पेशल कस्टमायझेसन न सांगताही सब मिळू शकते. किंवा निदान (भारतातल्या सबवेमधे)फक्त "जास्त आंबट नको" किंवा "वो तीखा मिर्ची जैसा क्या है, वो मत डालो.. बाकी सब डालो" अशा अत्यंत देसी पद्धतीनेही ते फटाफट बनवून घेता येतं असा स्वतःचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. असे ट्रायल एररने काही काळात आपोआप प्रमाण सांगणं सोपं होतं किंवा पुन्हा एकदा आपल्या देशी हॉटेलच्या पद्धतीप्रमाणे सबवेमधला मनुष्यही वरचेवर येणार्‍या गिर्‍हाईकाची आवड लक्षात ठेवतो आणि आपसूक सँडविच लावतो. कोणत्याही ब्रँडचे देशीकरण आपल्याच हाती आहे.. ;) :)

लेख सुंदरच. जे सांगायचं ते अगदी नेमक्या शब्दात मांडल्यामुळे वाचतानाही फार गडबड न करता आपण वाचतो आणि मग काहितरी 'वेगळंच' वाचल्याचं समाधानही मिळतं.

पण आता चाहाचा टपरीवाला आणि नाक्यावरचा सँडविचवाला कमी होत चालेत आणि कॉफी शॉप/ सब-वे जास्त चालतात, त्यामुळे आता सहज आनन्द मिळ्ण्याचे चान्सेस कमी, आपल्यापुर्ती सगळ्या प्रश्नान्चि उत्तर आलेलि बरी

मस्त लिखाण अतिवासतै. एकदम घोटीव आणि परफेक्ट शब्दरचना असते तुमची.

कशाचंही निमित्त आनंदासाठी पुरेसं व्हावं हे आनंद आत आहे, बाहेर साधनात नाही हे सांगण्यासाठी पुरेसं ठरावं. तुमचा अभिषेक त्याला तिकडे सुख म्हणतो नि इकडे तुम्ही. थोडक्यात नि महत्त्वाचं म्हणजे सहज लेखन. हॅट्स ऑफ. (एवढ्यासाठी कितीक लेख नि कितीक प्रतिसाद. तरी जमत नाही ते नाहीच्च. ;) तहानेचं अ‍ॅनॅलिसिस करावं पण ते आतल्या आत. बरं असतंय. )

तुफान! आणि आमच्या साउथच्या फिल्टर कॉफीचा फोटो एकदम सुखावून गेला :) चला एका कॉफी घेऊन येतो, तो पर्यंत तुम्ही ही गाथा कॉफीची १ आणि गाथा कॉफीची २ वाचा!

लिखाणाची शैली नेहमीसारखीच ओघवती.. आवडली. 'कॉफी' ची तुलना रोचक वाटली. मुळात आपल्या काय हवय ते कुठेतरी खोल आधीच डिफाईंड असतच्, ते वरती येण बाकी असतं. त्याची ती डेफिनेशन आपण ज्या वातावरणात वाढलोय त्यात तयार होते. त्यामुळे भारतियांना जगात कुठेही गेलं तरी स्टीलच्या ग्लासातलीच कॉफी अपिल करेल हीच शक्यता जास्त. तुमच्या जागी एखाद्या अमेरिकन माणसाला बसवा आणि कन्याकुमारीला कॉफि प्यायला न्या, तो बिचारा स्टार बक्सच्या आठवणीने झुरेल कदाचित! थोडं अनुषंगिक अवांतर - मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की वेगवेगळे पर्याय शोधण्याचं. अजमावण्याच आणि त्यांना कस्टमाईज करण्याच आर्थिक, मानसिक स्वातंत्र्य आणि बळ पुढच्या पिढीस आहे. तेवढे विकल्प त्यांच्यापुढे आहेत आणि ते चोखंदळपणे निवडतायत त्यांना काय हवं ते. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण पुढच्या पिढीला जास्त समजून घेऊ असं वाटतय!

थोडं अनुषंगिक अवांतर - मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की वेगवेगळे पर्याय शोधण्याचं. अजमावण्याच आणि त्यांना कस्टमाईज करण्याच आर्थिक, मानसिक स्वातंत्र्य आणि बळ पुढच्या पिढीस आहे. तेवढे विकल्प त्यांच्यापुढे आहेत आणि ते चोखंदळपणे निवडतायत त्यांना काय हवं ते. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण पुढच्या पिढीला जास्त समजून घेऊ असं वाटतय! फार आवडल. बरीच मदत होइल मुलांच्या अपेक्षा समजुन घ्यायला, त्यांचे दृष्टीकोण समजुन घ्यायला. आमच्याच पिढीच सगळ योग्य अन तुमच सगळ वाईट हा विचार गुंडाळुन ठेवलेलाच बरा.

अगदी अगदी. (अर्थात मी ह्या विचारांशी माझ्या पन्नाशीतही सहमत असेन की नाही, नो ग्यारंटी. पण प्रयत्न नक्की करेन, हा विचार आठवून तरी..) :)

उपास, सहमत आहे. पुढच्या पिढीलाच काय पण कुणालाही समजून घेताना 'आपल्याला समजलं नसण्याची शक्यता आहे' हे लक्षात घेतलं की समजून घेण्याची प्रक्रिया जरा सोपी होते. अर्थात त्यामुळे लगेच कुणी अथवा काही समजेल अशातला भाग नाहीच म्हणा :-)

अतिवास....साध्या साध्या गोष्टीतुन अस बरच काही उमजत जात नाही? फक्त मन अन विचारांची कवाडे उघडी पाहिजेत. खरच ओघवत, अन सुरेख लिखाण.

वाहवा. अगदी मनातले लिहिलेत. आमचाही अनुभव अगदी अस्साच. उजवीकडील किंमती आधी वाचणे, वगैरे सकट सर्व अगदी डिट्टो. वरकरणी सहज सोप्या वाटणार्‍या प्रसंगातून गहन जीवनसत्ये सांगण्याची हातोटी औरच. खूप आवडले लिखाण.

आतिवासताई, लेख नेहेमीप्रमाणेच झकास! मला वाटतं दुसरी स्थिती (पहिल्या फटक्यात पाहिजे ते मिळणं) ही पहिल्या स्थितीच्या वारंवार केलेल्या प्रयोगाने येते. याचं बेष्ट उदाहरण पानाच्या दुकानात. नवीन पानवाल्याकडे पहिल्यांदा गेलं की "कलकत्ता, किमाम, कत्री, लच्छा,इलायची नहीं" असा संपूर्ण मंत्र म्हणावा लागतो (पहिली स्थिती). रोज त्याच्याचकडे जात राहिलं तर त्याला आवड बरोब्बर लक्षात येते, आणि दुरून येताना दिसलो की तो पर्फेक्ट पान बनवूनच हातात ठेवतो (दुसरी स्थिती). मोठमोठ्या कंपन्या (विशेषतः ऑटो क्षेत्रातल्या*) अशा व्हेंडर डेव्हलपमेंट वर भरपूर वेळ आणि पैसे खर्च करतात. *कारण एका कारमध्ये त्यांच्या अ‍ॅन्सिलरी कारखान्यांनी बनवलेल्या अनेक वस्तू असतात. उदा. सां गोबेनच्या काचा, ब्रेंबोचे ब्रेक वगैरे.

मस्त लिखाण !! खरच पहिल्यादा सबवे ला गेलो तेव्हा "ब्रेड नको पण प्रश्न आवर" अशी गत झाली होती... :)

अगदी सहज आणि मनोमन पटणारं लिखाण. अनुभव अगदी खरा. अवांतर - आपण ग्राहकला ओळखुन पदार्थ बनविणार्‍यांचे उपभोक्ते आणि भोक्तेही. कमीत कमी प्रश्न विचारुन हवे ते देणारे हे खरे ग्राहकाभिमुख. कालच सकाळी पॉण्डिचेरी चेन्नै प्रवासात 'घेतलीच पाहिजे' अशी 'मधुरंगदम' येथली 'कॉफी ओन्ली' ची मस्त कॉफी प्यायलो. फक्त एकच विचारणा - 'स्ट्राँग की मिडिअम?' पाठोपाठ लखलखीत पितळी पेला-पातेलीतुन वाफाळ कॉफी आणि पातेलीच्या काठावर सांडलेली चार कण साखर. ती जीभेनं टिपण्यात एक विलक्षण आनंद असतो. न मागता मिळालेलं सुख.