आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक टकाटकटंकनकाव्य नावाचा प्रकार आलाय. तांब्या संप्रदायाचे संस्थापक आणि कवी, लेखक रा.रा.दु.दु.त्मु.त्मु.गुरुजी ह्यांच्या काव्यावर (आणि नंतर संप्रदायाच्या जीवावर) बेतलेलं विडंबनकाव्य ह्या लेखन प्रकारात मोडतं. बाकी एकमेव टकाटकटंकनकवी रा.रा.श्री.श्री.ट.वा.ळ.का.र्टे. हे मार्गदर्शन देतीलचं.
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक टकाटकटंकनकाव्य नावाचा प्रकार आलाय. तांब्या संप्रदायाचे संस्थापक आणि कवी, लेखक रा.रा.दु.दु.त्मु.त्मु.गुरुजी ह्यांच्या काव्यावर (आणि नंतर संप्रदायाच्या जीवावर) बेतलेलं विडंबनकाव्य ह्या लेखन प्रकारात मोडतं. बाकी एकमेव टकाटकटंकनकवी
ए हल्कट =))
आणि मध्ये ग्रंथ घेऊन कोल्लापुरी लोक्स बसले असते सरदारांसारखे, अस्सल कोल्लापुरी भाषेतील भजने म्हणत...
"आयच्यान् सांगतो लडतर हूंदे नैतर काही हूंदे
पायजे तितके करशिला पालथे गावभरचे हो धंदे
टायमाला पायजे घरात यायला, बोलायचं अन काम न्हाई
नायतर पिट्टा पाडतिल पुरता, बाबा अन सोबत आई"
(ढगाला लागली कळ च्या चालीवर वाचावे.)
प्रत्येक गाव / परिसराच्या रहिवाश्याने आपापल्या गोष्टींचे कौतुक केले तर इतर कुणाला त्यावर आक्षेप घेण्यासारखे काय त्यात? प्रत्येकाला स्वतःच्या गावातल्या / परिसरातल्या गोष्टींचे कौतुक करण्याचे स्वातंत्र्य आहेच अन तसे ते करत असतातही.
जरा अवांतर -
या निमित्ताने माझे गेल्या काही वर्षांतले मराठी माणसांच्या आंतरजालावरील प्रतिनिधित्वाचे निरिक्षण नोंदवतो. समजा मराठी भाषा शिकलेला एखादा परदेशी माणूस मराठी आंतरजालावर वाचन करू लागल्यास त्यास असे नक्कीच वाटेल की महाराष्ट्र राज्यात पश्चिमेकडील भूभाग सोडल्यास अत्यंत तुरळक लोकवस्ती असावी. उर्वरीत महाराष्ट्रात आंतरजालावर मोठ्या प्रमाणात दखल घेण्याजोगते फारसे काही घडतच नाही (किरकोळ अपवाद वगळता).
याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता असे जाणवते की, गेल्या दशकभरात आंतरजालाची सुविधा सगळीकडे पोचली व विस्तारली गेली असली तरी महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग वगळता लोडशेडींगचा फटका उर्वरित महाराष्ट्राला फारच बसला. निवांतपणे जालावर बसून लेखन / वाचन करण्याची संधी तेवढ्या प्रमाणात मिळाली नाही.
अन एकदा एक प्रवाह जोमाने सुरू झाला की इतर प्रवाह त्यापुढे जोम धरू शकत नाही.
पण कारणे काहीही असोत, आंतरजालावर कुठल्याही परिसराचे प्रतिनिधित्व कमी पडत असेल तर त्याचा दोष त्या परिसरातील जालावर वावरणार्यांनाच जातो. ज्यांचे प्रतिनिधित्व भरपूर आहे त्यांना याबाबत दोष दिला जात असेल तर ते चूक आहे.
चालायचच...शेवटि ते नर्मदेतले गोटे'च ना!? ;-) असो. न.गो.- त्या 15 वर्षांपूर्वीच "खतम" झालेल्या एका मिसळवरुन "अख्या" पुण्याचा अंदाज काय काढताय?तुमची इच्छा असेल तर आमच्या संग या,हव्या त्या जातिची ;-) मिसळ आणी सरमिसळं(ही) खायला घालतो! :p
असाच पांचटपणा
एकदा एक कोल्हापूरकरांचा राँग नंबरचा फोन भर दुपारी पुणेकराला लागतो ..
कोल्हापूरकर : अहो देशपांडे आहेत का ?
पुणेकर ( चिडून) :देशपांडे गेले आहेत पावन खिंडीत..
कोल्हापूरकर : त्यांना सांगा , राजे गडावर पोचलेत ..आता घरी जावा !!
कालच याच छापाच्या 'प्रेमळ' वादात ऐकलेली वाक्ये,
माणसाने पुणेरी असावे,
कोल्हापुरी तर चप्पल पण असते ;)
किंवा,
माणसाने पुणेरी असावे,
सोलापुरी तर चादर पण असते
वगैरे वगैरे....
नर्मदेतल्या गोट्यालाही काही सूक्ष्म गोष्टी जाणवून गडगडत गेले आहेत .पण ते मुळा मुठातल्यांना अजिबात आवडलेले दिसत नाही .कुल्हापुरच्या पंचगंगेतूनही आबूराव -बाबूरावछाप गडगडाट झाला .अवधुत आणि सुरेशजींना तर कुल्हापुरच्या आठवणींनी सारख्या उचक्या लागत असतात .परवा मुलाखतकार सुधीर गाडगीळांचा सत्कार झाला त्यावेळी त्यानींही सांगितले 'पुणेकर सर्व गोष्टींचे कौतुक करतात म्हणून सर्वाँनाच आवडतात' ( प्रचंड टाळ्या ) .पुणेकरांनी अमृततुल्य ,मस्तानी ,मिसळ ,बाकरवडी याची परंपरा कायम ठेवावी त्याची कैलाश लस्सी,चौपाटी भेळ ,अथवा चाट करू नये .पर्वती ,शनिवारवाडा ,तुळशीबाग आणि लक्ष्मीरोड(दादर आणि मालाड मार्केटपेक्षा भाऽरी आहेत ) ,डेक्कन बद्दल त्यांना रास्त आदर आहे .१९७० नंतर स्थानिक वैविध्य कमी होत चालले आणि एकसारखे मॉल्स ,पंजाबी डिशेस येऊन भारतातल्या शहरांचा चेहरा हरवला आहे .
पुण्याचे पुनेपण हाळुहळू लोपत चालले आहे. हिंजवडी ला हिंजेवाडी आणि पुण्याला पूना म्हणणार्या उत्तरभारतीयांचे प्रस्थ इथे वाढत आहे. पुण्यात काही वर्षानी कानपूर लखनौ प्रमाणे भिंतीभिंतींवर " पेट गैस और सैक्स की दवाईया उपलब्द " अशा झैराती दिसायला लागतील आणि सदाशिव पेठ रविवार पेठ या ऐवजी सदाशिव पुरा रविवार गंज असे ऐकायला मिळेल.
असे वातावर्ण आहे
असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइड बिझिनेस आहे.
ह्या वाक्याशी एकदम सहमत.... १९८८ साली पुण्यात आल्यावर हा प्रकार प्रकर्षाने जाणवला.
एक प्रवासी ट्रेन मधून प्रवास करत असतांना, रात्री एका स्टेशनवर जाग आल्यावर बाहेरील एकास विचारतो की कोणते स्टेशन आले ?
" शिंच्या डोळे फुट्लेत का ? वाचता येत नाहि का? " उत्तर आले.
प्रवासी उद्दगारतो " हं! पुणे आले वाटतं "
नकारात्मक भाषेत असला म्हणून काय झाले? पुण्याची व पुणेकरांची महती आणि माहिती देणारा लेख खासच आहे. बाहेरून पुण्यात येणाऱ्या माणसाने पुण्यात पाय टाकता टाकता नक्कीच वाचावा या साठी स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन वर मोठ्या फ्लेक्सवर लिहून लटकावला पाहिजे!
कळत नकळत ब्रांड वेल्यू वाढविण्यासाठी उपयुक्त असा हा लेख लिहून आपण आपले मार्केटिंग चे कसब समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
ता.क. भारताच्या branding साठी मोदींना आपल्यासारख्या तज्ञाची/विचारवंताची गरज आहे.हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.
>> ता.क. भारताच्या branding साठी मोदींना आपल्यासारख्या तज्ञाची/विचारवंताची गरज आहे.हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.
ही गोष्ट तुम्ही चेष्टेनी लिहीली असली तरी खरी आहे... ही विचारणा झाली होती पण...
अहो मी काहीच चेष्टेने लिहीत नाही.(नाहीतर स्म्यायल्या टाकल्या असते की!)
हे गुणविशेष कसे वाढविता येतील याबाबत अधिक मेहनत घेतली तर नक्कीच फायदा होईल.
कल्याण होईल हो तुमचे!
नर्मदेचा गोटा..... सुन्दर चित्रण केलेत.. पुण्याचे!!!.. चितळेंच्या बाकरवडीचे आणि ती घेतानाचे अगदी हुबेहूब वर्णन!!!!! :)
या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे.
खरा पुणेकर शनवारवाडा पाहतच नाही... हे पटले नाही. शनवारवाडा ही पर्यटकांना दाखवायची "वास्तु" असली, तरी साधारण १९९५ च्या अलीकडेपर्यन्त शनवारवाडा आतून बघणे.. हे सर्वांसाठी फुकट होते. आतमधल्या गवताची / हिरवळीची दर १५ दिवसांनी कापणी व्हायची...आम्ही बर्याचदा शनवारवाड्यावर खेळावयास जात असू... अर्थात तेव्हा "आताइतकी" गर्दी नक्कीच नसायची. आणि शनवारवाड्याचा वॉचमन-अन्कलही बर्यापैकी ओळखीचा असायचा... आतमधल्या सुन्दर बागेमध्ये काहीजण अभ्यासाला यायचे. कपल्स आत जास्त येत नसत.. किम्बहुना वॉचमन त्यांना जास्त एन्टर्टेन करीत नसे.
त्यामुळे बर्यापैकी कपल्स हे संध्याकाळपासून सारसबागेच्या कोपर्याशी किंवा मग गंधर्व पूल- दोन्ही साईडचे फुटपाथ आणि मधला डिव्हायडर- निम्मा अडवून त्यांची हौस पुरी करत असत. (अजूनही करतात...) (नर्मदेचा गोटा- आपण सारसबागेचा आणि आमच्या तळ्यातल्या गणपतीचा साधा उल्लेखही केला नाहीत की!!!! :) खास पेशव्यांचा आवडता गणपती आहे तो!!! )
त्याचबरोबर आमच्या पुण्याची "मस्तानी" ज्याने खाल्ली नाही.... त्याने पुणे काय पाहिले!?!
पुण्याच्या दगडूशेठ'ला लांबलांबचे लोक्स नवस बोलतात... आणि दर्शनासाठी येत राहतात.... आणि सगळ्यांत महत्वाची म्हणजे आमच्या पुण्यातली युनिक- "तुळशीबाग".... सुन्दर रामाचे मन्दीर.. आणि जगात कुठेही होणार नाही.. असं बार्गेनिग!!! आणि बायकांना, मुलींना लागणार्या सगळ्या वस्तू!!... :)
पूर्वी म्हणजे आमच्या वडिलांच्या लहानपणी पुण्याला तित्कासा "सेलेब्रिटी फीवर" नव्हता... तेव्हा आचार्य अत्रे यांना लोक मुद्दाम आपल्या घरच्या फंक्शनला बोलवायचे.. लग्न-मुंज इ. कार्यक्रमांना आचार्य अत्रेंना खास निमन्त्रण असायचे. सुप्रसिद्ध गायिका- हिराबाई बडोदेकरांचे गाण्याचे कार्यक्रम गणपतीच्या दिवसांमध्ये- रात्री (प्लीज डोन्ट फील अॅज रा.गा. ;) ) भर रस्त्यात व्हायचे..... आणि लोक देखील त्यांना पाहायला आणि ऐकायला भरगच्च जमायचे... पुण्याच्या गणपती उत्सवाबद्दल तर नव्याने कुणाला सांगायलाच नको!!...
नाटकप्रेमींसाठी टिळक'बरोबरच "भरत"ही तितकंच प्रिय!!.. किम्बहुना.. पुरुषोत्तम'साठी तर-- केवळ भरत आणि भरतच!!!.
आणि अतिउच्च अभिरुची असणार्यांसाठी शनवारातलं- सुदर्शन कला मंच!!!! :) प्रथम येणार्यास प्रथम प्रवेश!!!! :)
सुबोध भावे पुण्याचा.. प्रसाद ओक पुण्याचा...सिद्धार्थ चांदेकर पुण्याचा.. सोनाली कुलकर्णी'ज पुण्याच्या, पु.ल. "शेवटी" पुण्याचेच!...
खूप गोष्टी आहेत.. पुण्यामध्ये.. जितक्या बोलाव्यात.. तितक्या कमीच्च!!! ...
आमच्याकडे डोंबिवलीमध्ये पण 'मुनमुन' ची मिसळ फ़ेमस आहे……………। अस काही लोक म्हणतात.
९९% डोम्बिवालीकरांना मुनमुन सेन आंघोळ कुठे करते ते माहित असेल पण या मिसळच्या दुकानाचा पत्ता सांगता येणार नाही.
ह्याच पुण्याबद्दल पुलं नी दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत " मी रहातो पुण्यात , म्हणजे विद्वत्तेच्या ' ठाण्यात ' ! "
आता ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे , हे मला वाटतं , पुणेकर सोडून सर्वांना माहित असेल ! !
प्रतिक्रिया
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक
टकाटकटंकनकवी
पुस्प्गुच् चं बजेट कोंबडीकडे
ये कुछ ज्यादा ही नही हुवा?? ;
त्या कोंबडीत वाटा मिळेल कै ;)
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक
ए हल्कट =))
ए बाबा मला दोन्ही शहरांच्या
आम्च्या गुर्जींनी व्हिआरेस
जागा दिल्ती ओ
आणि मध्ये ग्रंथ घेऊन
_/\_ _/\_ ढिंच्याक राडा...
+१
चला करायचा का कोल्हापुर मिसळ/
आक्षेप घेण्यासारखे काय?
लै गार गार वाटतय आज! :D
सोडा हो बुवा... अतिसुक्ष्म
चालायचच...शेवटि ते नर्मदेतले
आयडी सार्थ
@धागा शिळ्या कढी ला उत
पुणेकर -कोल्हापूरकर
हाच पांचटपणा फकत शेवटच्या
कालच याच छापाच्या 'प्रेमळ'
नर्मदेतल्या गोट्यालाही काही
गाडगीळछाप पुणेरी अभिमानाबद्दल
तुम्हाला कोल्लापूर म्हणायचं
पुण्याचे पुनेपण हाळुहळू लोपत
कुणी वंदा कुणी निंदा
पुणेकर
पुणेकर
आव्हान देणारी
आज कळले काही हॉटेलांना मॅकडी
मॅकडी
या धाग्याकडे जरा दुर्लक्ष
तुम्ही पुणेकर आहात का..?
हॅ हॅ हॅ. भेटा एकदा......
भावना दुखावल्या का
निशानी..
कोण पुणेकर? धन्यवाद.
व्वा फारच छान अप्रतिम लेख !
>> ता.क. भारताच्या branding
कल्याण होईल हो तुमचे!
नर्मदेचा गोटा..... सुन्दर
पुण्याबद्दल किती लिहू नि किती
हि घ्या माझीपण दोन अक्षर
आमच्याकडे डोंबिवलीमध्ये पण
ह्याच पुण्याबद्दल पुलं नी दोन
ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे
नायतर काय. जवा तवा आमच्या
तो
Pagination