Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा अभंग सोयराचा आहे हे माहित नव्हतं. केवळ श्रवणभक्तीच्या जोरावर एक अशिक्षित बाई अशी रचना करू शकते ही चमत्कारच म्हटला पाहिजे. पण तिच्या रचनांना आयुष्यातले कठोर अनुभव आधार देत असणार.

अतिशय सुंदर लेख.. इतका अप्रतिम अभंग चोखा मेळा यांच्या सोयराबाईने लिहिला होता हे माहीत नव्हते.. किशोरीताईंनी तर अजरामर केला आहे ... तुनळीवरचा दुवा
"ही एक प्रकारची फसवणूकच आहे असे आज तुम्ही म्हणू शकता पण त्या काळी हा एक फार, फार मोठा दिलासा होता."
हे पटले नाही. ही फसवणूक कशी.. हा सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने सत्यापर्यंत नेण्याचा सोपा मार्ग नाही का? जर ही फसवणूक असेल तर विहीत कर्म मनापासून करणे यात ईश्वर नाही असे विधान करावे लागेल. माझा शास्त्रांचा अभ्यास नाही पण हाच कर्मयोग नाही का?

भक्ती आणि अध्यात्मानुभूती ही काही कुणा एका वर्गाची मिरासदारी नव्हे हे सिद्ध करणारी अभिव्यक्ती.

किती सुरेख.. सगळं वाचत असताना सोयराचे जीवन उभे राहीले समोर.. आणि मग खाली जो अभंग वाचला तो पाहुन तर थक्क झाले. इतका सुरेख अभंग अडाणी बाईने लिहीलाय? तिला अडाणी तरी कसे म्हणावे? किशोरी ताईंच्या आवाजात अनंतवेळा ऐकलाय.. पण आता त्यातला अर्थ जास्त भावतोय...

सर, नेहमीप्रमाणेच हाही लेख आवडला. पण सोयराबाईबद्दल अजून लिहायला पाहिजे होतं. सोयरा एक स्त्री आणि जात महार आणि समाजाने भेदांचा उच्चनिच्चतेचा कळस गाठलेला असतांनाही तीला जे वाटतं ते अभंगातून उमटलेलेचं असणार. सर, अजून लिहा....! संत ज्ञानेश्वरांची भूमिकेबद्दलचे मत तर पटणारेच आहे. विठोबाच्या निमित्तानं सर्व लहान थोर संत एकत्र आले पण काही भेद राहीलेच होते असे दिसते. अर्थात सामाजिक परिस्थिती कठीण असल्यामुळे त्यात काही नवं असं नव्हतं. चोखा मेळ्याच्या अभंगात तो म्हणतो- हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥ (खापरे वरुन साभार) अर्थात पुढे...याच्याही पलिकडे जाऊन ते म्हणतात- ''कोण तो सोवळा कोण तो ओवळा, दोहींच्या वेगळा विठू माझा'' समाज जरी भेद पाळत असला तरी आपल्या मनाशी मात्र विठू मात्र त्याहून वेगळा आहे, हे म्हणनं मला आवडते. बाकी, सोयराचा अभंग वाचून आत चाललेली धुसमुस अभंगातून बाहेर आलेली दिसते. चोखा आणि सोयराच्या अभंगावर अजून वाचायला आवडेलच. सर, तपशिलवार लिहाच सर....! -दिलीप बिरुटे (शरदसरांचा जालावरचा विद्यार्थी)

अदृष्य हातांनी सर्वांचे पोट भरवणारी माऊली. एकदा तो अमृत घास घेतला कि हृदयस्थ सरस्वतीच असे काव्य प्रसवते. चोख्याची महारी देखील त्याला कसा अपवाद असणार. सुंदर रसग्रहण. चिखलात उमललेलं हे पुष्प त्याच्या अत्यंत विषम परिस्थितीची जाणिव करुन दिल्याने अधिकच खुललं आहे. अर्धवटराव

नेहमी प्रमाणेच लेख आवडला.
दलित निदान चार वर्णातील एका वर्णाचे होते पण चारही वर्णात त्यांच्या सारखाच एक अतिशोषित, दुर्लक्षित, निराधार, असहाय्य वर्ग होताच (व आजही आहे) ... स्त्रियांचा.
पण निरनिराळ्या खेडेगावातील, निरनिराळ्या व्यवसायातील, जातीजमातीतील, बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना काव्य लिहण्यास उद्युक्त करणे हा केवढा चमत्कार !
दोन्हींशी सहमत.

अभंग सोयराबाईचा असलेला माहित होता, पण सोयरा कोण हे नव्हत माहीत. धन्यवाद सर. अतिशय आवडता अभंग अन अतिशय परिपूर्ण माहीती.

>>ही तर ईश्वराची सेवा आहे, मी त्याची पूजा केल्याने मला त्याचा या जन्मी व पुढील जन्मी फायदा होईल ’ असा आनंद मिळू लागला. ही एक प्रकारची फसवणूकच आहे असे आज तुम्ही म्हणू शकता पण त्या काळी हा एक फार, फार मोठा दिलासा होता. खर आहे. पण यालाच काही विद्रोही / बंडखोर ब्राह्नणी कावा असे म्हणतात.