Welcome to misalpav.com
लेखक: स्पंदना | प्रसिद्ध:


Comments

बाफल्या? पद्धत मी बनवली आहे तशी की वर पिलीयन रायडरने दिली आहे तशी?

दाल बाटीचा आस्वाद घ्यायला मिळेल असं मुंबईतलं नावाजलेलं ठिकाण कुणी सांगितलं तर आभारी राहीन.

ओव्हन शिवाय बाटी तुम्ही केक पॅनमध्ये करु शकता, किंवा एका मोठ्या भांड्यात (जुना कुकर शक्यतो वापरात नसलेला) घेउन त्यात वाळु पसरा तळाला, वाळु गरम झाली की आंच कमी करुन त्यात दुसर्‍या एका भांड्यात किंवा ताटलीत बाटी ठेवुन मंद आचेवर १५ मिनिट ठेवा. नंतर आच बंद करुन न उघडता ठेवले तर बाटी तयार होतील. किंवा आजकाल गॅस ओव्हन पण मिळतात. पावभाजी साठी पाव तयार करायला एका कुकरी शो मध्ये हा गॅस ओव्हनचा प्रकार पाहिला होता मागे एकदा. तो ही चालेल.

तंबिट!!!!!!!! आईची आई करायची हे लाडू कधीमधी त्याची आठवण झाली या निमित्ताने एकदम :) मस्त चव असायची.

गवि, तुम्ही मला माफ कराच आता! मी प्रयत्न केला नाही असे नाही पण काही केल्या तसे लाडू जमत नाहीयेत. त्यासाठी भारतात असायला हवे. इथे केलेले लाडू दोनदा काळपट झाले. संपवताना नाकी नऊ आले होते.

अपर्णा तुमची नाही व पिलियन पिलीयन रायडरने बनविली तसे हि नाही..! तर त्यांच्या सासुबाई करतात त्या प्रमाणे :) . पण मी त्याच्यात थोडा खाण्याचा सोडा पण घालते जेने करून त्या खुस -खुशीत होतात व त्या गोळ्याचे सारखे ४/६ भाग करून तळते ,ह्या बफ्ल्या आणि हेच गोळे जेव्हा आहारावर भजतो त्याला बाटी असे म्हन्तो. तसे तुमची पद्धतही छान आहे . तसे दाळ हि तुमची वेगळीच आहे . आमच्याकडे ती जरा पातळ असते व केवळ त्यां साठी तुरीची डाळच वापरतो तुमच्या पद्धतीने हि एकदा नक्की करून पाहिलं :)

@श्रुती ...मराठवाडा का ? मच्याकडे ती जरा पातळ असते व केवळ त्यां साठी तुरीची डाळच वापरतो तुमच्या पद्धतीने हि एकदा नक्की करून पाहिलं >> करेक्ट ...विषेश सांगायचे म्हणजे मी जी खाल्ली त्यात हळद टाकत नाहीत , तर ती बाटी त टाकतात :)

त्या पेक्षा तूर दाल मध्ये ज्वारी ची भाकरी कुस्करून, तूप घालून खालेल्ला बरा … स्वाद लागतो

ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला सांगीतली होती? ऑ? झाली का पंचाइत? जावा आता पिठ शोधायला. आणि हे बघा भाकरीची तुलना बाकी कोणत्याही चवीशी होत नसल्याने आम्ही ती कटाप समजतो कळलं? नाव कर्ण आहे मग काय भाकरी दान करणार का काय? अन करत असलात तर कोठे दान करता तेही कळवा. उगा सक्काळी सक्काळी डोक्याला शॉट...

बुट्टीतल्या भाकर्‍या..त्यातली एखादी शिळी. त्या शिळ्या भाकरीवर तेल-तिखट-मीठ अन मेतकुट कालवून फासलेलं, सोबत झुणका नायतर पिठलं, बचकभर ठेचा/खर्डा, लसणाच्या चटणीचा गोळा, पातीचा कांदा, गाडग्यातलं कवडी-कवडीचं दही, वाटीभर काकवी, त्यात साजूक तूप....अन हे सगळं हादडून झाल्यावर गप्पा मारत चघळायला एखादं ऊसाचं कांडकं. :D

कुणी हाय का? धम्याची सुपारी द्याची हाय! कोण हाय का तयार? धम्या तुझ दिस भरलं! कुटल्या देवाच नाव घ्याच आसल तर लागलीच घे. म्या सुपारी काढल्या तुझ्या नावाची.

बास झालं आता! नाहीतर त्या ऊसाच्या कांडक्यानेच मार खाशील... ऊस खाऊन कित्येक वर्षं झाली असतील :(

घोळ मिटवून आज सकाळी घरला पोचलो. आनि पयला पोराला बगिटलो. त्ये झालं की .... आनि मग साडेपाच म्हैन्यांनी पोहे खाल्लो. (च्यामारी त्या अल्जेरियन लोकांच्या. हे सुट्टी संपेस्तवर ;) ) आनि दुपारी जेवताना काय जेवलो म्हायत्ये? मेथीची भाजी लसूण फोडणी वाली नि जोंधळ्याची भाकरी. तुमाला अ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ! ;)

कितीही अ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ केलास तरी वैनीच्या हातच्या भाकरीचा राग नाही धरणार मी, आज ना उद्या मला खाऊ घालेलच ती. खाऊन घ्या! खाऊन घ्या! उगा भाव नका मारु!

अपर्णा, मस्तच गं! इन्दुरला एका मारवाडी लग्नात हा पदार्थ संपवताना जीव गोळा झाला होता!! कसाबसा संपवला नाही तर नवर्या मुलीच्या वडिलांनी अरे, एतनेसे क्या होगा डॉक्टर, करत एक रास ताटात वाढली होती, तेव्हा अक्षरशः हात जोडुन पळुन आले होते!!

सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई, रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करिते लवकर न्येई ग तिला भवानी आई, रोडगा वाहीन तुला भवानी आई ....................