काय राव तुम्ही. पेंटागॉनमध्ये बसलेले तेलसमृध्द देशावर हल्ला करणार नाहीत अशी अपेक्षाच कशी करता तुम्ही.किंवा कितीही उगाळला तरी कोळसा काळा नसेल अशी अपेक्षा कशी करता तुम्ही. इतरांच्या अकला काढणे हा स्थायीभाव असला तर तो काहीही झाले तरी जाणे नाही.
हा प्रतिसाद मला कळला आणि आवडला. कदाचित लेखकाच्या विचार मांडण्याच्या पद्धतीवर (मास्तरांच्या शिकवणीच्या पद्धतीवर) बर्याच गोष्टी अवलंबून असतात. संक्षीना कदाचित हेच सांगायचं असेल पण ते माझ्यासारख्या बर्याचजणांना समजण्यात अडचण येते.
लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो.
नाहि. "बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे, हाच अन्वयार्थ मला अभिप्रेत आहे.
त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.
थोडं चुकलात. वाचकांच्या अनुभुतिचा संक्षिना विचार करता येत नसल्याने त्यांचा हमखास गोंधळ उडतो व त्यात ते अक्षरशः विचित्रपणे वाहवत जातात हे वास्तव आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.
"बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे. बरेच चांगले विचार चक्क मी सुध्दा करतो/मांडु शकतो. म्हणजे ते वास्तववादी असतात दिशाभुल करणारे नसतिल असे न्हवे.
लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही.
इनोवेशनच्या नादात रुट कॉझ्कडे होत असलेले लेखकाचे अक्षम्य दुर्लक्ष. हेच मुलभूत कारण होय.
त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.
नो कमेंट्स. वाचक सुज्ञ नाहित हि गोश्टच पटणे अशक्य. पण काहि वाचक संपुर्ण तैलानिक विचार पक्रियेला महत्व देउ इछ्चित नसल्यास संक्षि रॉक्स.
गवि, सुंदर विवेचन.. आवडलं. पण 'बिनशर्त सहमती = समाधान' हे असेल तर आणखी चांगलं होण्यासाठी प्रयत्न का करायचा? परिस्थितीचा स्विकार न करता 'डिनायल मोड' मध्ये जाणं जसं चुकीचं तसंच 'ठेवले अनंते'पण चुकीचं.. मला शोभेल असं उदाहरण द्यायचं झाल्यास -- एका 'पनिशमेंट पोस्टींग' मानल्या गेलेल्या जागी, जिथे भरपुर अनागोंदी कारभार आहे, कटकटी आहेत, ट्रांसफर झाल्यावर अशी केस होईल.
पहीला पर्याय - डिनायल : न जाण्यासाठी प्रयत्न करणे. जावंच लागल्यास, तिथे चीडचीड करत जगणे, आणि सटकायचा प्रयत्न करणे.
दुसरा पर्याय - बिनशर्त स्वीकृती : आहे ते चालू देणे. 'पार्ट आॅफ द गेम' होणे..
तिसरा पर्याय - स्वीकृती आणि प्रयत्न : जे आहे, त्याला शांतपणे विचार करुन, सुधारण्याचा प्रयत्न करणे..
मालक, 'बिनशर्त स्वीकृती' मानल्यास माझी स्वाक्षरीच बाद होते की..
लेख नीट वाचला....आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय...लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही...पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात....
अग्दी ब्रोब्रर!
यातला गुरुदेवांच्या "हु आर यु?" चा उल्लेख वाचुन गटण्याचे "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही" हे सांगणे आठवले.. जे खर्या नाटकात एका विनोदी पात्राच्या प्रसंगात असते..
>या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.
= दॅटस द पॉइंट. मला हेच नवल वाटतं. लोक डोक्यावरून गेलं, काही समजलं नाही वगैरे कसं म्हणतात?
>आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय.
= दॅटस द वेरी पॉइंट अगेन. विडंबनं काय, उलटसुलट प्रतिसाद, त्यावर उपप्रतिसाद काय फुल कल्ला चललायं.
>लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.
= अशी विधानं दा़खवून दिली तर त्यावर नक्की चर्चा होऊ शकेल.
>शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो.
= नाऊ जस्ट सी धीस :
अनंत हा पहिला गोंधळ आहे कारण ती मानवी कल्पना आहे. यू आर अगेन इन द रिल्म ऑफ माइंड.
`आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही'
ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण `असू द्यावे' ही पुन्हा मनाची मनधरणी आहे, तो प्रयास आहे. वास्तविकात समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं.
>तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.
इथे मजा आहे :
१) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड.
२) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार?
३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो?
मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन.
१) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड.
२) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार?
३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो?
फक्त हे थोड्याश्या सोप्या भाषेत मला सांगा ना
बाकी प्रतिसाद आवडलाच , आणि गाविंचा पण
अवांतर : चला आमच्या टीम मध्ये गवी आले :)
रावणकाय फाष्ट बॉलरने टाकलेला एखादा चेंडू बॅट्समनच्या नाकाशी सलगी करून गेला, की "ही स्मेल्ट लेदर" असं कॉमेंट्रीत म्हंटात. तसे हे लेख मला चामड्याचा वास देतायत.
पण एक मात्र खरं - मी प्रतिसादांची गम्मत बघायला येतो ;)
मागे मी कुठेतरी एक वाक्य वाचले होते. मला वाटते की ते वाक्य व्यवस्थित आचरणात आणले तर बर्याच गोष्टी सोप्या होतील. ते वाक्य आहे: "God, grant me the serenity to accept the things I cannot change, courage to change the things I can and wisdom to know the difference"
पण काय असते की "गॉड" कसा नाही हेच सिध्द करण्यात आपला सगळा वेळ जातो आणि मुख्य गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष होते.
>>पण काय असते की "गॉड" कसा नाही हेच सिध्द करण्यात आपला सगळा वेळ जातो आणि मुख्य गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष होते.
-- "wisdom to know the difference" हि खरी मेख आहे :)
हे सर्व लेख वाचकांना 'आत्मपरिक्षण' करण्यास प्रवृत्त करतात, हा फायदा काय थोडा आहे?
... म्हणजे काहीतरी वाचायचे वा ऐकायचे, त्याने तात्पुरते भारून जायचे, त्यातच होणारा 'आत्मसाक्षात्कार' की अरे, हे तर सर्व मला अवगतच आहे, हे तर सर्व मी माझ्या जीवनात उतरवलेलेच आहे, म्हणजे मी किती थोर वगैरे आहे.... मग येणारी बेचैनी, की माझे हे थोरपण मी दुसर्यांना पटवून दिले नाहे, तर त्याला काय अर्थ?.... आणि अन्य सर्वजण अर्थातच या गोष्टीपासून वंचित आहेत... वाट चुकलेली कोकरे आहेत बिचारी... त्यांना सर्व नीट समजावून सांगितलेच पाहिजे...
आणि मग त्यासाठी लेखन प्रपंच, आणि जरा काही विपरित प्रतिसाद आला, तर होणारी चिडचिड ... कळत कसे नाही या मूर्खांना, एवढे सोपे करून तर सांगितले आहे मी... नीट न वाचताच प्रतिसाद ...
... सुजाण वाचक हे सर्व बघून आत्मपरिक्षण करू लागतो, की असे मी तर करत नाही ना?
हेच या लेखांचे यश.
हे सगळे प्रतिसाद वाचून तरीही संजयादित्याने आपला हट्ट सोडला नाही अशा अर्थाची अध्यात्म पंचविशी अशा ग्रंथाची निर्मिती झाली पाहिजे असे वाटू लागले आहे.
खरे तर मी " मनुष्य जीवनाची कुंडली" असा गंभीर चितंनाचा धागा बरेच दिवस मनात बाळगून आहे. कर्म व दैव म्हणजे प्रॅक्टीकली आहे तरी काय असा काहीसा विषय आहे. पण असा धागा काढला तर मी दमून जाईन का काय असे
भय वाटतेय. बाकी विक्रमादित्याला माझा सलाम. बाबौ काय टंकनाची चिकाटी आहे राव !
महान बोधीवृक्ष, त्याखाली ज्याला ज्ञानप्राप्ती झाली तो महान बुध्द, त्या बुध्दाला हिणवणारे बुध्दू आणि हे सारं वाचणारा म्या पामर! (इथूनपुढं 'म्या' च वापरावं लागणार. 'मी' वापरण्याइतका अभ्यास अन आवाकाच उरला नाय आपल्यात)
रुणझुणू मालिका वाचायला घेतली, त्यावर उतारा म्हणून मिथूनचे शिन्मे पाहिले...मिथूनच अगम्य वाटायला लागला साला.मग परत रुणझुणायला लागलो...हळूहळू मिथून उलगडायला लागला.
वाचवाचून प्रयत्न करायला घेतला. आधी मन बाहेर काढायचं, मग बाहेरुन आत बघायचं...मग परत मन आत घालून ठेवायचं...सालं ह्या काढण्याघालण्यात मूळ मुद्दा काय होता तेच हरवून गेलं. शेवटी भंजाळलो! सरळ उठून इजिप्शियन हाटेल गाठलं..तिथून एक जरा गोश्त कबाब घेऊन आलो, मस्तपैकी ओरिएंटल फ्लेक्सची तंबाखू भरली पायपात, व्हिस्कीचा एक पेग भरला अन पॅटिओत जाऊन बसलो वार्याला! हेऽऽ...असं धाव्व्या मिंटाला मन आतून बाहेर येऊन बसलं समोर. म्हणे, भर माझ्यासाठीही एक स्मॉल! अन मग आश्या गप्पा रंगल्या, आश्या गप्पा रंगल्या म्हाराजाऽऽ.....
व्वा! साला जंदगीच बदलून गेली. काय अनुभुती..काय अनुभुती! जियो!
आमच्या सारखे मित्र असल्याने धमुगुरु फ्लेक्साचा खर्च करत नाहीत.
आम्ही नुसते मांडून ठेवतो अन मार्च एंडाला वह्या जाळून टाकतो. :)
नुसती साईट सांगा. म्हणेल त्या स्साईजचे. म्हणेल तितके दिवस फ्लेक्स लावण्यात येईल. :)
काल बर्याच दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला आणि हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. वाचून खुप वाईट वाटलं.
मायबाप वाचकांना एव्हाना या धागाकर्त्याच्या स्वभावाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे शक्य असेल तर लेखकाच्या अहंकडे दुर्लक्ष करुन त्याचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यावं किंवा नसेल शक्य तर धाग्याकडे दुर्लक्ष करावं असं काहीसं व्हायला हवं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. धाग्याकर्त्याला कोपर्यात घेऊन त्याची खिल्ली उडवण्याची जणू शर्यतच लागली होती.
याला सन्माननिय अपवाद फक्त गविंचा.
अजून एक थोडा वेगळा अपवाद आहे, "मी नाही त्यातली..." टाईपच्या नवतत्वज्ञान्यांचा. ;)
असो. माझा हा प्रतिसाद वाचून काहींना माझ्याबद्दल "सौ चूहे खाके..." वगैरे वाटेल. खरं आहे ते. पण उशिरा का होईना पण शहाणपण आलं हे काय कमी आहे? :)
तुम्ही म्हणताय तसं झालय खरं... धाग्यात कोपर्यात घेऊन खिल्ली उडवण्याचा भरपूर प्रयत्न झालाय (त्याला स्वतः धागाकर्ता देखील अपवाद नाहि.)
प्रश्न केवळ धागाकर्त्याच्या अहंकाराकडे दुर्लक्ष करण्याचा नाहिए. आपलं काहि चुकतय, चुकु शकतं, हे कळायला/स्विकारायला जो एक बेसीक समजुतदारपणा लागतो त्याची धागाकर्त्यात वानवा आहे (त्यांच्या एकंदर लेखनशैलीवरुन तरी असच दिसतय). त्यामुळे होतं काय, कि कोणि कितीही तार्कीक मुद्दे मांडले, आणि त्याचा प्रतिवाद करणं धागाकर्त्याला शक्य झालं नाहि, तर धागाकर्ता प्रतिसादकांच्या ग्रहण क्षमतेवर घसरतो.
तत्वज्ञान, मन, जीवनातल्या अनेकानेक व्यवस्थांची गुंफण... हे विषय इतके मूलभूत आहेत कि प्रत्येक व्यक्तीची अगदी बेसीक असम्प्श्नस देखील वेगवेगळी असु शकतात, किंबहुना असतात. त्या असम्प्श्नस मधुन माणुस आपापले तत्वज्ञान विकसीत करतो (धागाकर्ता देखील हेच करतो). ज्यावेळी या मुलभूत धारणांचे वेगळेपण समोर येते त्यावेळी "अॅग्री टु डेसॅग्री" हाच संवादाचा गोड शेवट/पॉज असु शकतो. धागाकर्ता अशावेळी अत्यर्क आडमुठे धोरण स्विकारतो (पराभूत वगैरे शब्दांचा वापर हेच दर्शवतो).
आयुष्य एक पुस्तक आहे. त्यातली पाने पलटत जातात व माणुस शिकत जातो. त्यातनं माणसाची अनुभवसिद्ध गृहीतकं तयार होतात. धागाकर्ता त्याच्या अनुभवसिद्धतेला प्रमाण मानतो (ते योग्यच आहे) पण इतरांची गृहीतकं देखील अनुभवसिद्ध आहेत व आपल्याशी जुळत नसेल तरी ते आपल्या गृहीतकांएव्हढेच व्हॅलीड आहेत हे स्विकारायला धागाकर्ता तयार नाहि. त्याला इतरांच्या प्रतिसादांची शरणागती हवी असते. आपल्या व इतरांच्या अनुभवांच्या वेगळेपणाचे अॅनालिसीस करणे, तसं करायची इच्छा नसल्यास किमान दुसर्याच्या अनुभवांबद्दल आदर बाळगणे... अशा बर्याच सकारात्मक शक्यता असताना धागाकर्ता अकारण आपल्या अनुभवांव्यतिरीक्त इतर सर्व व्यर्थ आहे अशी टोकाची भुमीका घेतो.
जर कुणी तुमच्या दारावर येऊन "अबे मा***द, मी तुझ्याशी वाद घालायला आलो नाहि भें**द" अशी आरोळी देऊन संवाद साधायची करेल तर हा पाहुणा खरच संवाद साधायला आला आहे असं तुम्हाला वाटेल काय? त्यावर जर तुम्ही अरे ला कारे नि उत्तर दिलं तर पाहुण्याला कंप्लेण्ट करायचा अधिकार आहे काय?
असो. मी काहि भाईकाकांसारखा पोपटाच्या किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र सूराचा बारकाईने ष्टडी केलेला नाहि. उघड्या डोळ्यांनी जे दिसलं ते टंकलं.
अर्धवटराव
प्रतिक्रिया
आणि हो..
स्थायीभाव
लोकांची अक्कल काढणे देखील
लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..विदा आहे का..?हो.. आहे...
सुंदर
लेख नीट वाचला. समोरच्या
अंशतः सहमत..
गविसर झिंदाबाद
लेख नीट वाचला....आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय...लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही...पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात....अग्दी ब्रोब्रर!यातला गुरुदेवांच्या "हु आर यु
याचे ३ भाग आलेत?????
हो !!!
गवि, यू हॅव शोन द अंडरस्टँडींग!
वेल डन सर
ए
आमच्या
कै च्या कै!
गोणपाट घेऊन यावे लागतात फक्त.
@तू आधी कुंपणावरून खाली उतर
तू सुचव मी नक्की विचार करीन...
मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन.बगा बगा आपले सायेब कित्ती मोठठया मनाचे आहेत.हार्दीक अभिनंदन.
मिपाकरांचे भाग्य थोर, हेच खरे.
रावणकाय फाष्ट बॉलरने टाकलेला
पण एक मात्र खरं - मी
च्यामारी.. आदुबाळ माझा डुआयडी
अरे सामील कसलं व्हा? काहीतरी
शतकासाठी आमचा हा प्रतिसाद मदत
@सर आमच्यासाठी नेहमीच
(No subject)
एक वाक्य
हेच वाक्य ...
[अतिभयंकर अवांतर वॉर्निंग]
डेल कार्नेगी
ह्म्म.. मी ऐकलेले वाक्य होते.
मूळ :- Life is really simple,
धन्यवाद बाणा.. चला या
त्याला कारण आहे.
आत्मसाक्षात्कार आणि आत्मपरिक्षण
आपल्या लेखनातुन चित्र गुप्त
रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा
एव्हाना भ्रमर जाऊन गुणुगुणू
आ भ्रमर, मुझे चाव का?
हे सगळे प्रतिसाद वाचून
बोधीवृक्ष, बुध्द, बुध्दू आणि म्या पामर...
वा वा..
आमच्या सारखे मित्र असल्याने
क्या बात..!! क्या बात...!!
व्वा! साला जंदगीच बदलून गेली.
काल बर्याच दिवसांनी थोडा
खिक्क...!
धनाजीराव...
Pagination