Welcome to misalpav.com
लेखक: सचिन कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हो. नोटीसा आल्या आहेत. पण पन्चाहत्तर मीटर अंतर पुढे काय? जी गावे हायवे वरच वसलेली आहेत तेथे कस्से करावे? ड्रायवर लोकानी जवळ दारु बाळगलि तर काय करणार? गावातली दारु चढत नाही काय? खूप जेवण करून सुस्ती येते म्हणून हायवे वरची होटेल पण बंद करावीत.

आता हायवे सोडून शेता-गावात दारु मिळेल आणि पुन्हा रोडला लागायचे, इतकेच या निर्णयाचा अर्थ. मोठमोठी हॉटेल्स जी हायवेवर होती आता तिथे चोरुन लपून दारु मिळेल आणि शेता-गावात सर्व माल ठेवाला लागेल. शासनाला सर्वात मोठा महसुल इथे मिळतो तो शासन कशाला बुडवेल ? -दिलीप बिरुटे

माझ्या मते शोषणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि माझ्या दृष्टीने तो एकमेव महत्त्वाचा मुद्दा आहे. देहविक्रय करायला परवानगी असावी का ? असावी. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर. पुरुषांनी आपापल्या लैंगिकतेला वाट करून द्यावी का ? करावी. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर. पुरुषांनी दौलतजादा करावा का ? करावा. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर. लोकांनी एडस सकट रोगराईचा धोका पत्करावा का ? जरूर. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर. थोडक्यात सार्‍या प्रश्नांच्या उत्तरामागचं "कॅव्हिआट" एकच आहे : त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर. आणि मी जे ऐकतो/वाचतो/पाहातो, मला जे समजतं ते असं की देहविक्रयाच्या व्यवसायाचा मूलाधार आहे शोषण, अल्पवयीनांचं, समाजातल्या दुर्बल घटकांचं. शोषणाचा मुद्दा बाजूला काढा. डान्स बार थांबतील. देहविक्रयाची उच्च आर्थिक वर्तुळातली प्रकरणं वगळतां बाकीची यंत्रणा थांबेल. देहविक्रयाच्या - फ्लेश मार्केटचा - पाया आहे शोषण. या कारणामुळे डान्सबारवरची बंदी उठणं ही घटना मला दुर्दैवी परिस्थितीत "दुष्काळात तेरावा महिना" आहे अशी वाटते. डान्सबारशी संलग्न असणार्‍या लोकांच्या काम करण्याच्या हक्कापेक्षा शोषण होत असलेल्या घटकांच्या मानवाधिकाराचं रक्षण करणं ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. उच्च-सर्वोच्च न्यायालय , एकंदर शासनयंत्रणा, समाजातल्या अनेकांची विचारसरणी असा विचार करत नाही याचा मला खेद आहे.

डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे का ? माझं मत नाही. अन्य ठिकाणीही स्त्रीयांचे शोषण हा मुद्दा असेलच. समजा डान्सबार ही शोषणाची जागा असेल तर स्त्रीयांनी / तरुणींनी तिथे जावेच का ? जाऊ नये. अनेक स्त्रीया/ तरुणी तिथे भूलथापींना बळी पडून तिथे जात असतील आणि त्यांचे लैंगिक, आर्थिक, शोषण होत असेल तेव्हा त्यांच्या सूटकेचा मार्गच नाही का ? तर सुटकेचा मार्ग आहे. दोन हजार पाचच्या नंतर डांस बार बंद झाले आणि या तरुणी / स्त्रीया कमी वेळात अधिक पैसा मिळतो म्हणून अन्य काम करायला तयार झाल्या असतील असं काही मला वाटत नाही. डांसबार बंद झाल्यानंतर दोन हजार पाच दरम्यान आम्हा काही मित्रांना मुरुड जंजी-याला जायचं होतं. रात्री उशीर झाला म्हणुन लॉज शोधत होतो. ठाणे शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणचे लॉजवर गेलो तर मालक जागाच नाही म्हणाला. पहिला मजला, दुसरा मजला, आणि तिसरा मजला या बारवर जाणार्‍या मुलींनी गच्च भरुन गेला होता. चार पाचशे मुली अक्षरक्षा कोंबलेल्या कोंबड्याप्रमाणे बसलेल्या होत्या. काम उरले नाही. काम करायची लाज वाटते. त्या पेक्षा त्यांनी काही सोपे मार्ग निवडले होते. असो. -दिलीप बिरुटे

कत्तलखाना ही प्राणीहत्येची जागा आहे का ? माझं मत नाही. अन्य ठिकाणीही प्राण्यांची हत्या हा मुद्दा असेलच. समजा कत्तलखाना ही प्राणीहत्येची जागा असेल तर प्राण्यांनी / प्राणिणींनी तिथे जावेच का ? जाऊ नये. अनेक प्राणी / प्राणिणी तिथे चुचकारण्याला बळी पडून तिथे जात असतील आणि त्यांची शारिरीक मानसिक लेखनिक हत्या होत असेल तेव्हा त्यांच्या सूटकेचा मार्गच नाही का ? तर सुटकेचा मार्ग आहे. जर का कधी कत्तलखाने बंद झाले आणि हे प्राणी/प्राणिणी कमी वेळात अधिक जगायला मिळतं म्हणून आणखी श्वास टाकायला तयार झाले असतील असं काही मला वाटत नाही.

मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे सहमत ! डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे का ? माझं मत नाही. ही शोषणाचीच जागा आहे,फरक इतकाच आहे की रांड बाजारा पेक्षा इथे कमी वेळेत जास्त पैसा कमवता येतो,आणि शुकशुक करुन गिर्‍हाईकाला बोलवण्या पेक्षा ठुमके लावुन काम लवकर होतं... रांड बाजारात स्वतःची वासना शमवण्यासाठी जाणारा वर्ग आणि डान्सबार मधे जाणारा वर्ग यात थोडासाच फरक करता येईल असे मला वाटते... दोन्ही वर्गाची भूक तितकीच ! फक्त इथे सामान्य घरातला कर्ता पुरुष वर्ग आणि हरामचा कमवलेला पैसा उडवणारा वर्ग दोन्ही येतो.समाजासाठी हे नक्कीच धोका दायक आहे... डान्सबारचा नाद सामान्य व्यक्तीलाही लागु शकतो... पण रांडबाजारचा नाद लागणे तसे जरासे कठीणच. अवांतर :--- माझ्या मित्रांच्या डान्सबारमधे काही वार्‍या झाल्या होत्या...त्यांनी मलाही अनेकवेळा आग्रह केला होता... अरे एकदा तरी जन्नत बघ ! आयुष्यात एकदा तरी अशी मजा बघ, पाहिजे तर तुझा खर्च आम्ही करतो पण तू चलच... अशी विविध प्रलोभने त्यांनी मला दिली होती...पण मी कधी त्या मार्गाला वळलो नाही, व तशी इच्छाही कधी व्यक्त केली नाही.पण त्यांची नंतर झालेली अवस्था मी पाहिली आहे...छोटासा मोह देखील तुम्हाला किती त्रास दायक ठरु शकतो हे मी पाहिले आहे.

बाणा, डान्सबार ही एकच जागा स्त्रीयांची शोषणाची आहे का ? आणि सर्वात जास्त शोषण इथेच होते काय ? समजा एका बार मधे १०० मुली आहेत तर जवळ जवळ ८० मुलींचे लैंगिक, आर्थिक, आणि शारिरीक छळ हा होतच असेल तर मी म्हणालो असतो की होय इथे (सर्वात जास्त) स्त्रीयांचे शोषण होतेच. पण, तसे काही दिसत नाही. अशा काही बातम्या वाचनात आल्या नाही. आणि सरासरीने असे शोषण होत असेल तर मग म्हणता आले असते की डान्स बार शोषणाच्याच जागा आहेत. आणि तसा काही विदा असेल तर दाखवा ... शोषणाबद्दल काही विदा मिळाला असता तर चर्चा करता आली असती. डान्सबार मधे जाणार्‍यांचे शोषण होते काय ? वाटल्यास अशी चर्चा करा. काही अधिक उणे हाताला लागेल, असे वाटते. -दिलीप बिरुटे

वर्षा काळे तर उलट म्हणत होत्या डान्स बर बंद झाल्यामुळे त्यांचे शोषण होत आहे कारण बर्याच जणी देह विक्रयाकडे वळल्या आहेत.

डान्सबार ही एकच जागा स्त्रीयांची शोषणाची आहे का ? शोषणाच्या अनेक जागांपैकी एक सोपी आणि सहज पोहचता येईल अशी जागा आहे. बार मधे १०० मुली आहेत तर जवळ जवळ ८० मुलींचे लैंगिक, आर्थिक, आणि शारिरीक छळ हा होतच असेल तर मी म्हणालो असतो की होय इथे (सर्वात जास्त) स्त्रीयांचे शोषण होतेच. पण, तसे काही दिसत नाही. कॄपया खालचे व्हिडीयो पहावा :--- डान्सबार / लेडीजबार, ऑर्केस्ट्रा बार आणि जितके प्रकार असतील ते सर्व पीक अप पाँइट्स म्हणुन उपयोगात आणले जातात. विदा तर माझ्याकडे नाही पण १दुवा देतो... बघा त्याच्यातुन काही उपयुक्त माहिती मिळते का ते... http://alturl.com/g73pm

>>>शोषणाच्या अनेक जागांपैकी एक सोपी आणि सहज पोहचता येईल अशी जागा आहे. अनेक आभार....! आज फेसबुकवर एक लेख वाचायला बारच्या मुलींना कशी कमाई होते..वगैरे... मुलींना विविध आमिषे दाखवल्या जातात. लैगिंक छळ , शारिरीक छळ होतो, हे मान्यच नाही असे कृपया समजू नका. स्त्रीयांच्या शोषनाला डान्स बारच जवाबदार आहे, हा मुद्दा मला तितकासा मान्य नाही. इतकेच. -दिलीप बिरुटे

बहुतेक आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांनी "छमछम पुन्हा चालू" इत्यादि डान्सबारची जाहिरात वाटावी अशा हेडलाईन छापून आपल्या सामाजिक जबाबदारीची परत एकदा झलक दाखवली आहे.

डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे का ? माझं मत नाही.
आमच्या सारख्या पामराचे आहे त्या नोकरीत शोषण होते ते कोणाला दिसत नाही का? :-( शेवटी उपजीविके साठी प्रत्येक जण काहीतरी करत च असतो. कोणी कारखान्यात, ऑफिस मधे काम केले काय किंवा डांसबार मधे नाचले काय? जबरदस्ती नसेल तर काहीच फरक नाही. डान्सबार मधे मुलींना ८ तास उभे रहावे लागते म्हणुन कोणीतरी तक्रार केल्याची वाचले. सामान्य कामगार, गवंडी , बिगारी ८ तास उभेच असतात. त्यांचे कष्ट दिसत नाहीत का?