Welcome to misalpav.com
लेखक: श्रीगुरुजी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

;)मस्त विडंबन. मोदींनी एका समाजाला कुत्रा म्हणुन हीणवले ही बातमी वाचुन तर चाट पडलो होतो परवा. बाद्वे..आयबीएन-लोकमत किंवा तत्सम मराठी व्रुत्त्वाहिन्यांवर वाद्-विवाद करायला पैसे मिळतात का हो? आम्हाला पैसे घेउन काथ्या कुटायला खुप आवडेल. :)

>>> अलीकडे मोदी bashing ची हद्द झाली आहे. +१ मोदींनी काहीही केले तरी माध्यमे व विरोधी पक्ष त्यांना झोडपून काढतात. त्यांनी पाणी पिण्यासाठी उजवा हात वापरला तर ते प्रतिगामी उजव्या विचारांचे आहेत अशी टीका होऊ शकते. त्यांनी पूर्वी एका सभेत मुस्लिमांची टोपी घातली नाही. तेव्हा म्हणे त्यांनी बरेच विचित्र हातवारे केले होते. म्हणजेच ते मुस्लिमविरोधी आहेत अशी त्यांच्यावर टीका होते. परवा बोलताना त्यांनी बुरखा शब्द वापरला, मुखवटा किंवा चादर हा शब्द का नाही वापरला, म्हणजेच ते मुस्लिमविरोधी आहेत, बुरखा मुस्लिम स्त्रियांशी संबंधित आहे, काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरते म्हणजे काँग्रेस बुरखा वापरणार्‍या प्रतिगामी स्त्रीसारखा दुर्बल पक्ष आहे . . . असे वाटेल ते अर्थ त्यांच्या बोलण्यातून काढून त्यांना झोडपले जाते. यावरून एक गोष्ट आठवली. एका चित्रप्रदर्शनात अनेक नामवंत समीक्षक एका अमूर्त चित्राभोवती उभे राहून रसग्रहण करत असतात. एक समीक्षक म्हणतो की हे एका आगीत झोपलेल्या बैलाचे चित्र आहे. दुसरा म्हणतो हे चित्र म्हणजे गरूडाचा भेदक डोळा आहे. तिसर्‍याला ते चित्र म्हणजे युगायुगांची पोकळी वाटते. चवथ्याला ते चित्र म्हणजे फांदीवर मजेत झुलणारा पोपट वाटतो. एवढ्यात एक व्यक्ती पुढे येऊन ते चित्र उचलून ते उलटे ठेवते. सर्व समीक्षक भडकून त्याला मारायला जातात. यावर तो सांगतो की तोच या चित्राचा चित्रकार असून ते चित्र चुकुन खालची बाजू वर असे ठेवले गेले होते आणि आता ते सरळ ठेवले आहे. मोदींच्या वाक्यातून स्वतःच्या मनाने अनेक अर्थ (की अनर्थ) काढून त्यांना झोडपणार्‍यांना पाहून या कथेची आठवण झाली.

मोदीच नव्हे.. इतरही सर्व पक्षाच्या नेत्यांचे bashing आणि glorification ची हद्द झाली आहे.. facebook च्या माध्यमातून कार्टून जोक्स यामध्ये फार खालच्या पातळीवर जाउन वैयक्तिक टीका होताना दिसते.. याच धाग्यातील एका प्रतिसादातील कार्टून त्यातलेच एक.. सगळे एकाच माळेचे मणी..

>>> मोदीच नव्हे.. इतरही सर्व पक्षाच्या नेत्यांचे bashing आणि glorification ची हद्द झाली आहे.. facebook च्या माध्यमातून कार्टून जोक्स यामध्ये फार खालच्या पातळीवर जाउन वैयक्तिक टीका होताना दिसते.. "bashing" बाबतीत सर्वात वाईट संकेतस्थळ म्हणजे "रीडीफ" आणि "मटा". रीडीफवर इतक्या घाण, अश्लील आणि असभ्य कॉमेंट्स असतात की वाचतानाच शरम वाटते. बरीच संकेतस्थळे (इंडियन एक्सप्रेस्, द हिंदू इ.) कॉमेंट्स सेन्सॉर करून किंवा तपासून मगच प्रकाशित करतात. पण आउटलुक किंवा रीडिफमध्ये कॉमेंट लगेचच प्रकाशित होते. आउटलुकवरील बर्‍याच कॉमेंट्स सभ्य असतात, पण रिडीफवरील कॉमेंट्सचा दर्जा अत्यंत खालच्या थराचा आहे. "मटा" कॉमेंट्स तपासून २ तासांनी प्रकाशित करतात. पण तिथेही अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा असते.

याच पद्धतीचा जोक वाचला होता चेपू वर. वरील सर्व कमेंट्स टाकून झाल्या सगळ्यांच्या की तोच रिपोर्टर पुन्हा मोदींकडे जातो. मोदी म्हणतात - "मजा आवे छे| नेक्स्ट क्वश्चन.. " :D

अवांतरः परवाच फर्ग्युसन कॉलेजमधील सभेत मोदी म्हणाले होते की 'मला एक दिवस पुण्यात फिरवुन लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज यांची माहिती देणारा गाईड मिळेल का? मला वाटत नाही मिळेल असं' हे ऐकुन मला वल्लीशेटची गाईड म्हणुन आठवण झाली.

फेस्बूक वरचे विनोदी स्टेटस मिपा वर धागा म्हणून प्रकाशित करण्याचा नवीन ट्रेंड सुरू करण्याचे श्रेय श्री गुरुजीना मिळेल काय?

मस्तच .... डोळ्यांसमोर चित्रच उभे रहिले... ७० % लोकांच मत आहे हो .... त्याना पण आंबाच आवडतो, आणि ३० % लोकांना पेरु आवडतो.... :-)

जितेंद्र आव्हाडांचे नाव वाचून मस्तक आदराने झुकले.
महाराष्ट्रातील एक थोर तत्त्ववेत्ते म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल.

जितेंद्र आव्हाडांचे नाव वाचून मस्तक आदराने झुकले. महाराष्ट्रातील एक थोर तत्त्ववेत्ते म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल.
अगदी मान्य. दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती | उदा:- आदर्श मधल्या काही फ्लॅटची मालकी, ठाण्यातले अनधिकृत बांधकाम न पाडण्याचे आंदोलन आणि अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस त्याना न. गो. ची उपमा देउन त्यांचा पुतळा जाळून केलेले ''अहिंसक'' आंदोलन हे त्यांपैकी काही नमुने. आनंद परांजपे ना "इकडे" आणण्याचे त्यांचे कार्य तर थोरच आहे. असो.

>>> जितेंद्र आव्हाडांचे नाव वाचून मस्तक आदराने झुकले. महाराष्ट्रातील एक थोर तत्त्ववेत्ते म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. +१ थोरल्या साहेबांनी ज्या उदात्त हेतूने जनकल्याणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला, त्यात आव्हाडांसारखे गांधीजीभक्त अगदी चपखल बसतात. आदर्शमधली सदनिका, बेकायदा बांधकामे पाडण्याविरूद्ध ठाणे बंद, इशरत जहाच्या परिवाराला मदत या व अशा अनेक प्रसंगी त्यांचे कर्तृत्व सोन्यासारखे उजळून निघाले आहे. महाराष्ट्राचे भाग्य थोर की या भूमीत अशी नररत्ने अवतार धारण करतात!

आव्हाडांचे नाव अतीराष्ट्रवादी म्हणौन दुमदुमते आहे. त्याने बलवा जमीन प्रकरणी जी मुक्ताफळे उधळली होती ती ऐकणेबल होती ( ऐकण्यासाठी बल लागते म्हणून)

टीवीवर बोलताना ते जो आव आणून बोलतात त्याचे कौतुक वाटते.
निखिल वागळेच्या कार्यक्रमात ते अर्धवेळ नोकरी करतात असा अंदाज आहे.

आणि दुसर्‍या एका नोबेल लॉरिएटचे पी.एच.डी गाईड काय म्हणतात हे पण बघा: दुवा . तेव्हा एका अर्थतज्ञाचे काही मत असेल तर तेच प्रमाण सगळ्यांना वाटलेच पाहिजे असे अजिबात नाही.

माझ्या समजुतीप्रमाणे अमर्त्य सेन हे डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्री आहेत. १९९० च्या दशकातील नरसिंहराव सरकारने केलेल्या व नंतर वाजपेयींनी पुढे सुरू ठेवलेल्या आर्थिक सुधारणांना त्यांचा पाठिंबा नव्हता. त्यांना अर्थशास्त्रात नोबेल मिळाले असले तरी त्यांची आर्थिक थिअरी भारत किंवा इतर देशांनी स्वीकारल्याचे दिसत नाही. गुजरातेत अल्पसंख्याकांना व मागासवर्गियांना सुरक्षित वाटत नाही हे त्यांचे विधान राजकीय व अत्यंत ढोबळ वाटते. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी आकडेवारी व पुरावे द्यावयास हवे होते. ज्याप्रमाणे निव्वळ पर्सेप्शनवर अर्थशास्त्राची थिअरी मांडता येत नाही, त्याचप्रमाणे निव्वळ पर्सेप्शनवर असे आरोप करता येत नाही. त्यांची मते ही निव्वळ राजकीय आहेत असे दिसून येते.

माझ्या समजुतीप्रमाणे अमर्त्य सेन हे डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्री आहेत.
हो. अर्थतज्ञांमध्ये डावे विरूध्द उजवे हा कधी न संपणारा वाद आहे.मी स्वतः उजवा असल्यामुळे मला अमर्त्य सेनांपेक्षा जगदीश भगवती अधिक भावतात.तर इतर कोणाला अमर्त्य सेन भावतात.पण अमर्त्य सेनांनी अमुक एक विधान केले म्हणून तेच प्रमाण असे म्हणणार्‍यांची मात्र गंमत वाटते. अवांतरः जे नावापुरते भारतीय नागरिकत्व ठेवतात, परदेशात राहून ज्यांना भारतात परत यायची अजिबात इच्छा नसते आणि ते परत आले तरी डॉलरच्या तुलनेत रूपया सिनिअर सिटिझन झाल्यामुळे इथल्या सामान्य लोकांप्रमाणे अशांना झगडावे लागणार नाही अशांनी भारताचा पंतप्रधान म्हणून कोण योग्य/अयोग्य आहे अशी विधाने करून उंटावरून शेळ्या हाकल्या की तो प्रकार भयंकर डोक्यात जातो.सध्या भारतातील जनतेला जर काही हवे असेल तर महागाई आणि भ्रष्टाचारापासून सुटका आणि काहीतरी करणारे सरकार.या उंटावरून शेळ्या हाकणार्‍यांच्या सेक्युलॅरिझमला रस्त्यावरचे कुत्रंही तंगड वर करायचे नाही काही दिवसांनी.

हे गृहस्थ देशाची फाळणी झाल्यावर ४७ साली पूर्व पाकिस्तान मधून पळून आले. खूप श्रीमंत घराण्यातील आणि सेक्युलर असूनसुद्धा सध्या बरेच हिंदू रहात आहेत तसे बंगला देश मध्ये न रहाता भारतात निघून आले. ते सध्या कायम इंग्लंड अथवा अमेरिकेत राहतात आणि येथे आले म्हणजे त्यांची सेक्युलर मते मांडतात. त्यांच्या पहिल्या भारतीय बायकोशी घटस्फोट झाल्यावर त्यांनी एका विदेशी महिलेशी विवाह केला आणि तिच्या निधना नंतर दुसर्या विदेशी महिलेशी विवाह केला. त्यांची मुले अमेरिकेत स्थायिक आहेत. तेंव्हा त्यांनी जरी भारतीय नागरिकत्व सोडले नसले तरी हे गृहस्थ पूर्णपणे anglicized आहेत असे म्हणावयास हरकत नसावी. भारतात राहणार्या लोकाना ज्या परिस्थितून जावे लागते त्याचा त्यांना अनुभव नाही. अर्थशास्त्रातले विद्वान असतील तरी त्यांच्या राजकारणातील मतांना स्वदेशी लोकांनी महत्व दिले पाहिजे असे नाही.

आता यांच्या मनातली खरी इच्छा बाहेर पडली. मोदींचं गुजरात विकासाचं मॉडेल, गुजरातमध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत वगैरे कारणे उगाचच पुढे केली होती. अंतस्थ हेतू वेगळाच होता. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/rahul-gandhi-might-be-an-excellent-alternative-but-i-havent-decided-yet-amartya-sen/articleshow/21357283.cms

अमर्त्य सेन यांच्याकडे भारताचे नागरिकत्व आहे का? माझ्या समजूतीप्रमाणे ते इंग्लंडचे नागरिक आहेत. (चूभूद्याघ्या). ते काहीही असले तरी मोदींवर टीका करणार्‍यांमध्ये आता ते सुद्धा सामील झालेले दिसतात. "समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात." त्यांच्या या वाक्यावरून ते अर्थशास्त्री या नात्याने बोलत आहेत की काँग्रेसचा प्रवक्ता या नात्याने बोलत आहेत हे कळत नाही. हे वाक्य त्यांचे नाव न घेता वाचले तर मनीष तिवारी, राहुल गांधी अशांपैकी कोणीतरी हे वाक्य म्हटले असावे अशी समजूत होईल. "नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे." या वाक्यांवरून तर त्यांनी आर्थिक दृष्टीकोनातून नव्हे तर एक राजकीय विधान केले असावे असे वाटते.

अमर्त्य सेन हे भारतीय नागरीकच आहेत. ते केंब्रिज, अमेरीका (बॉस्टन) येथे रहातात आणि हार्वर्डमध्ये प्राध्यापकी करतात... त्यांच्या किती बायका आहेत वगैरे हा त्यांचा खाजगी मामला आहे. पण त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असे वाटते. त्यांचे ९३ आणि ९४ साली रामजन्मभूमीवरून कडाडून टिका केलेली भाषणे ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. वास्तवीक अशा व्यक्तीने तात्विक दृष्ट्या रामजन्मभूमी आंदोलनकर्त्याबरोबर उभे रहाणे देखील अयोग्य आहे. पण काय झाले, त्याच लोकांच्या राज्यात त्याच लोकांच्या शिफारसीवरून त्यांना भारतरत्न मिळाले... Bharat Ratna तेंव्हा उद्या खरेच जर मोदी पंतप्रधान झाले तर एक भारतीय नागरीक म्हणून अमर्त्यसेन यांची सद्य भुमिका अमर्त्यच राहील असे काही वाटत नाही. असो.

कसला पुरावा ते समजले नाही. पण जेंव्हा मोदींना व्हिसा नाकारण्यात आला होता तेंव्हाची पंतप्रधानांची भुमिका योग्य होती असे वाटते... PM upset over Modi's visa denial बातमीतील काही भागः Sharing the concern of members from all sides in the House, the Prime Minister said, "When I came to know of the denial of visa to Modi yesterday I immediately instructed our external affairs minister to call the US Ambassador and explain to them that we are greatly concerned and we greatly regret the decision that has been taken by the US government." He said the government had taken note of the developments arising from the US decision and was also "greatly concerned" at the American action to revoke other categories of US visas already issued to the Gujarat chief minister.

.. मोदी हे महाराष्ट्र द्वेषी आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याला कमी लेखण्याची चुकभूल करु नये, मराठी जनतेमुळेच गुजराथी लोकांची प्रगती झाली; अशा आशयाचे पोस्टर आज (रविवार) सकाळ पासून ठाणे शहरात अनेक ठिकाणी झळकत आहेत. संभाजी ब्रिगेडने हे पोस्टर लावले आहेत. अलिकडेच मोदींनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. या भाषणामुळे नाराज झालेल्या संभाजी ब्रिगेडने पोस्टर लावून मोदींना उघडपणे विरोध सुरू केला आहे. संभाजी ब्रिगेडने लावलेल्या पोस्टरवरील मजकूर जसाच्या तसा - उत्तराखंडमध्ये १५ हजार गुजराथी बांधवांना आपण वाचवले. पण, भारतीयांना मात्र आपण विसरलात. हे कबूल की, गुजराथी धंद्यामध्ये खूप मोठे आहेत. पण मराठी माणसाने परीश्रमातून घाम गाळून महाराष्ट्र मोठा केला. हा देश तुम्हांला धंदा करण्यासाठी सुरक्षित ठेवला आणि म्हणूनच आज धंद्यामध्ये तुम्ही ८० टक्के आहात. धंदा सुरक्षित ठेवण्यासाठी देश सुरक्षित असायला हवा. देश सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर लढणार्‍यांमध्ये आम्ही 'मराठी' ८० टक्के आहोत. 'मराठा' आणि 'महार' या नावाने दोन मराठी माणसांच्या रेजिमेंट भारतीय सैन्य दलात आहेत. हा देश सुरक्षित आहे. म्हणूनच तुम्ही धंदा करु शकता याची आठवण असावी. देश सुरक्षित तर धंदा सुरक्षित!

संभाजी ब्रिगेड मोदींबद्दल काय म्हणते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सैन्याबद्दल गैरसमज पसरवणे मुळीच चांगले नाही कारण त्यांचा या दोन रेजिमेंट वर दावा लावणे हे चुकीचे आहे. या न्यायाने भारताचे संरक्षण नेपाल किंवा पंजाब करीत आहे असे म्हणायला लागेल कारण ७ गुरखा रेजीमेंटस आणि त्यात ३९ बटालियन आहेत. एकट्या सिख रेजिमेंट च्या १९ बटालियन आहेत( सिख LI किंवा पंजाब रेजिमेंट अजून वेगळ्या आहेत) मराठा आणि महार या दोन रेजिमेंटस आणि त्यातील पाच पाच म्हणजे दहा बटालियन या संख्यात्मक दृष्ट्या एक चतुर्थांश आहेत. सर्वच रेजिमेंटचा इतिहास गौरवशाली आहे आणि त्यात तुलना करणे चुकीचे आहे.पण बहादुरी आणि मर्दुमकी कोणा एका गटाची किंवा समूहाची मक्तेदारी नाही. परन्तु संभाजी ब्रीगेड लष्कराला राजकारणात ओढत आहे हे अत्यंत अश्लाघ्य आहे असे माझे स्पष्ट ( वैयक्तिक)मत आहे.

७ गुरखा रेजीमेंटस आणि त्यात ३९ बटालियन आहेत. एकट्या सिख रेजिमेंट च्या १९ बटालियन आहेत
लक्षात घ्या.. संभाजी ब्रिगेड आहे ती.. गुढघ्यातच..

उत्तराखंडमध्ये १५ हजार गुजराथी बांधवांना आपण वाचवले.---- ही बातमी times ऑफ इंडिया ने प्रथम दिली. भाजप आणि मोदींच्या ऑफिस मधून मोदींनी असा दावा केला नाही असा खुलासा करण्यात आल्यावर times ने त्यांच्या पुढील अंकात दिलगिरी जाहीर केली आणि ही बातमी पाठविणार्या त्यांच्या उत्तरा खंड मधील वार्ताहराचे नाव ही छापले. या वार्ताहराने उत्तरा खंड मधील एका भाजप च्या कार्यकर्त्याचे नाव त्याचा source म्हणून सांगितले. आता त्या कार्यकर्त्याने अब्रू नुकसानीचा दावा केला आहेत. मोदी मुरलेले राजकारणी आहेत. तेंव्हा त्यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस शासनावर टीका केली कि महाराष्ट्रावर टीका केली हे त्यांच्या भाषणाची फीत बघून मगच ठरवता येईल.

नरेंद्र मोदी यांनी पुण्यात दोन भाषणे केली. त्या पैकी बी. एम. मेडिकल कोलेजच्या मैदानावर केलेले ४५ मिनिटाचे भाषण येथे ऐका. त्यात कुठेही महाराष्ट्रा वर टीका टिप्पणी नाही . कोन्ग्रेस वर आणि महराष्ट्राच्या कोन्ग्रेस शासनावर टीका केली आहे पण विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून हे त्यांचे कामच आहे. तेंव्हा संभाजी ब्रिगेडच्या पोस्टर मध्ये लिहिलेल्या मजकुरात तथ्य नाही आणि ते पोस्टर कोन्ग्रेस प्रेरित आहे असे मानण्यास जागा आहे. http://www.youtube.com/watch?v=sDpdHIbC-ak याच्या आधीचे भाषण फर्गुसन कॉलेजे मध्ये मध्ये झाले. ता भाषणात ते फक्त शिक्षण या विषयावर बोलले. त्याचा दुवा खाली देत आहे. http://www.youtube.com/watch?v=Zb3433C9urA

नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नका - भारताच्या ६५ खासदारांची ओबामांना विनंती (23-07-2013 : 17:34:36) ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. २३ - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नये अशी विनंती भारताच्या ६५ खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना केली आहे. भारतातल्या १२ राजकीय पक्षांच्या खासदारांचा यात समावेश असून यामध्ये राज्यसभेचे २५ तर लोकसभेचे ४० कासदार आहेत. यामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या सिताराम येचुरी व एम. पी. अचुतानंद यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याचे सध्याचे जे धोरण आहे ते सुरू ठेवावे अशी आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो अशा आशयाचा मजकूर या सगळ्यांच्या पत्रात आहे. विशेष म्हणजे ही पत्रे सहा महिन्यांपूर्वीच ओबामा यांना पाठवण्यात आली आहेत, परंतु राजनाथ सिंह यांनी अमेरिकेने आपल्या धोरणाचा फेरविचार करावा असे सुचवल्यानंतर अशी पत्रे ६५ खासदारांनी पाठवल्याचे समोर आले आहे. इंडियन अमेरिकन मुस्लीम काउन्सिलने या पत्रांच्या प्रती उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यसभेचे अपक्ष खासदार मोहम्मद आदीब यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी पाठवलेली ही पत्रे ओबामांना पुन्हा पाठवली आहेत. राजनाथ सिंह यांनी रविवारी अमेरिका भेटीमध्ये मोदींना व्हिसा देण्यात यावा अशी मागणी अमेरिकी सरकारकडे केली होती. दरम्यान, येचुरी यांनी अशा स्वरुपाच्या कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही असा खुलासा केला आहे. येचूरी म्हणाले,'मी पत्रावर स्वाक्षरी केली नसून हा कट पेस्टचा प्रकार दिसतोय. अमेरिका प्रशासनाला पत्र लिहीणारा मी अंतिम व्यक्ती असीन.देशाच्या अंतर्गत प्रश्नावर परकीयांनी हस्तक्षेप करावे ही भुमिका मला अमान्य असल्याचे येचूरी यांनी सांगितले आहे.

मोदी योग्य का अयोग्य, धर्मांध की धर्माभिमानी....आणि कायकाय..हे असले प्रश्न राहुद्या क्षणभर बाजूला. एक नाही, दोन नाही, तब्बल पासष्ट खासदारांनी हे असलं दळभद्रीपणाचं कृत्य करावं? थ्थू: तिच्यायला ह्यांच्या जिनगानीवर! घरच्या भानगडी घरात सोडवाव्यात...चव्हाट्यावर बोंबलत जाऊ तर नयेच, आणि ज्यांना जिथंतिथं लुडबुड करायचा भोचकपणा असतो, निदान त्यांच्या हातात तरी कोलित देऊ नये इतकी साधी अक्कल नाही ह्या 'लोकप्रतिनिधीना'? हूण मुघलांपासून ते इंग्रजांपर्यंत ही अशीच आमंत्रणं जात राहिली होती की माजघरातली भांडणं सोडवायला! पुढे काय झालं? त्या घरबुडव्या स्वार्थी बेअकल्यांचे वंशज म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहेत हे खासदार. अरे, त्या अमेरिकेचा व्हिसा नाय मिळाला...काय बिघडू शकतं मोदी नावाच्या माणसाचं? निवडणूक लढवायला ते काय अमेरिकेत जाऊन बसणार हैत काय? जिंकण्याचे चान्स असतील तर मोदी देशात राहूनच ह्यांना आसमान दाखवणार नायत काय? फक्त अपशकुन करायचाय म्हणून स्वतःचं नाक कापण्यासारखी गत झाली ही! राजकारणात माणसं निवडताना फक्त पैसा आणि गेमा करता येण्याची कुवत एव्हढंच पाहिलं जातं हे अगदी मान्य आहे. पण निदान एक किमान पातळीवरची अक्कल असण्याचीही अपेक्षा करणं आता चूक आहे असं समजायचं काय जन्तेनं? ह्या पासष्टच्या पासष्ट खासदारांची एकडाव आय.क्यु. टेष्ट घ्यायला पायजे राव. ५५ ते ६९ च्या रेंजपलिकडं एकतरी शानं जाऊ शकतंय का बघू. - (हतबुध्द अन उद्विग्न) धम्या.

कीव वाटली त्यांच्या बुद्धीची, संताप झाला तो वेगळाच! त्या ६५ जणांची नाव जाहीर करुन देशद्रोहच भरला पाहिजे तिच्यायला. पुन्हा अशा कागाळ्या करणार नाही कोणी देशाच्या बाहेर!

आंधळा द्वेष.. आणखी काय? उद्या मोदी पंतप्रधान झालेच, तर अमेरीका झकत विसा देईल त्यांना.. बाकी 'परंपरेचे पाईक' आहेत हे खासदार म्हणजे. बादवे, धम्याभौ हामेरीकेला मोदींपेक्षा जास्त कामाचा वाटतो.. ;-)