अगदी समतोल आणि समस्येच्या गाभ्याला स्पर्श करणारा परखड प्रतिसाद.
मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करणे म्हणजे 'विनाकारण एखाद्याला कोपर्यात घेऊन खिल्ली उडविणे नाही.' एकतर धागाकर्त्याच्या मुद्द्यांना नंदीबैलासारखी मान डोलवा नाहीतर, प्रतिवाद करू नका. नाद सोडून द्या. मग 'चर्चा' नांवाची गोष्टच हरवून जाते.
असो. आम्ही नाद सोडलाच आहे. इतर सदस्यांनी काय करावे त्यांचा प्रश्न आहे.
अत्यंत समर्पक आणि समतोल प्रतिसाद. _/\_
दुसर्या एका धाग्यावर टाकलेले एक विडंबन इथे द्यायची प्रकर्षानं ईच्छा झाली -
उगाचेची शब्द, नसत्या करामती
फाटकी संस्कृती.. ’वीट’लेली.
सर्व जन भ्रमी, मीच केवळ ज्ञानी
सतत हेची जनी, आळवावे..
एक पालुपद स्विकृती बिनशर्त
जगणे होई मस्त... मस्तवाल!
सांगोनी जे गेले संत-ज्ञानी काही
त्यांना काही नाही, अनुभव.
मीच घेतलाहे अनुभवाचा ठेका
हाच माझा हेका.. सांगतोय.
म्हणोन राघवा ऐक बोल माझे
ढोल अनुभवाचे.. बडवलेले.
काल बर्याच दिवसांनी थोडा निवांत वेळ मिळाला आणि हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले. वाचून खुप वाईट वाटलं.
आभार!
मायबाप वाचकांना एव्हाना या धागाकर्त्याच्या स्वभावाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे शक्य असेल तर लेखकाच्या अहंकडे दुर्लक्ष करुन त्याचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यावं किंवा नसेल शक्य तर धाग्याकडे दुर्लक्ष करावं असं काहीसं व्हायला हवं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही.
सध्या याविषयी काही लिहीत नाही. पण प्रतिसादांमागे नक्की काय मानसिकता आहे याचा उलगडा वेळ झाला की केला जाईल.
याला सन्माननिय अपवाद फक्त गविंचा.
येस!
स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो.
असा प्रामाणिकपणा फक्त गविच दाखवू शकतो.
सुरुवातीला `एक शब्द कळला नाही' असा स्टँड घेऊन पोस्टवर संभ्रम करण्याचा प्रयत्न झाला. पण गविच्या प्रतिसादानंतर रोख `अहंकाराकडे' किंवा `इतरांना कमी लेखणं' याकडे वळवला गेला.
साधी गोष्ट आहे, मी कुणाला कसा मूर्ख म्हणेन? तसे प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकणार नाहीत. ते संकेतस्थळाच्या धोरणाविरूद्ध आहे. ती गोष्ट खपवूनच घेतली जाणार नाही. सो द वेरी पॉसिबिलीटी इज रूल्ड आऊट.
>अजून एक थोडा वेगळा अपवाद आहे, "मी नाही त्यातली..." टाईपच्या नवतत्वज्ञान्यांचा.....
याविषयी माहिती अभावी लिहू शकत नाही.
पण एक नक्की, इतक्या कल्लोळात हा प्रतिसाद अनपेक्षितपणे सुखावून गेला!
तुम्ही १००-१५० मधले फक्त गविंचेच प्रतिसाद धरणार हो.. बर गविंनी पुढे हे ही लिहीलय..
लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.
....
तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.
पण छे.. तुम्हाला सोयीस्कर तेवढं Quote करता येतं..अर्थात हे काही नवीन नाही म्हणा..
आता तुम्ही कुणाला मुर्ख (सरळ सरळ) म्हणला नाहीत.. म्हणु शकतही नाही.. पण आपण फक्त पेठकर काकांना दिलेले काही प्रतिसाद जरी पाहीले तरी पहा तुम्ही काय लिहीताय..
लेख शांतपणे न वाचताच प्रतिसाद देण्याची घाई केली आहे
माझ्याशी वादाचा, उपहासाचा मुद्दा
अशक्य
होता.
अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
असे तुमचे बाकी २ लेख झाडुन काढले तर एक नवा लेख तयार होईल..
कसय ना संक्षी.. ह्या अशा लिहीण्यालाच "मुर्खात काढणे" म्हणतात.. पण इथे ही तुमच्या वर हा आरोप झाला की तुम्ही सोयीस्कर रीत्या "मी मुर्ख म्हणालोच नाही" अशा शब्दशः अर्थ काढुन नामानिराळे होऊ पाहताय..
अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म, जीवन जगण्याची कला आणि अजुन काय फलाणा फलाणा शिकायच?
तुम्हाला हे सगळं लिहीणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पण तरी..
आता येऊन म्हणा मलाही...
"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."
मी वाट पाहतेच आहे...
मतभेद असणे किंवा एखाद्याची मत न पटने हे समजू शकतो पण लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत. काही मतभेद असून पण उत्तम प्रतिवाद करणारे प्रतिसाद पण आेतच अर्थात
मतभेद असणे किंवा एखाद्याची मत न पटने हे समजू शकतो पण लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत.
तुम्ही हे विचारत आहात याचाच अर्थ तुम्ही या लेखकाची मिपावरील वाटचाल नीट बघितलेली दिसत नाही असे वाटते.सतत इतरांना उपदेश करत राहायचे, इतरांच्या अकला काढायच्या, मी म्हणजे लई शाना आणि इतरांना काही कळत नाही अशा प्रकारचा अॅटिट्यूड कोणाला आवडेल?तेव्हा या लेखकाला कुठल्यातरी कारणावर मिपाकरांकडून धोपटले जाणे अगदी स्वाभाविक आहे.नेमके ते कारण संजयरावांनी स्वतःहून दिले मग इतर मिपाकरांनी त्याचा फायदा घेतला तर त्यात चूक काय? शेवटी काय करणार? इट्स ह्युमन टेन्डेन्सी. (इंग्रजी आम्हालाही येते बरे का).
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा कर्त्यावर तुटून का पडत आहेत??
खरचं?? हा प्रश्न पडु शकतो??? तुम्ही वाचले आहेत का सरांचे प्रतिसाद??
इतके सगळेच्या सगळे त्यांच्या मागे पडलेत ह्यातच कोण चुक कोण बरोबर हे समजुन घ्याना.. आणि किती जण बोलत आहेत ह्यापेक्षा "कोण कोण" बोलत आहे हे ही पहा.
एक) `काही समजलं नाही' किंवा त्याही पुढे जाऊन `शब्द..शब्द..शब्द.. काही अर्थ नाही'
सुरुवातीला असा प्रयत्न झाला. पण गविचा प्रतिसाद आल्यावर तो मुद्दा बाद ठरला.
दोन) लेखक अहंकारी आहे, मीच सर्वश्रेष्ठ, मी शहाणा ...वगैरे
हा प्रतिवाद फार मजेदार आहे. ट्राय टू अंडरस्टँड :
>`जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे'
याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' (त्यामुळे आम्हाला तुम्ही काय `शिकवतायं) असा पूर्वग्रह करुन लेखनाकडे बघायला सुरुवात केली की हा लेखच काय बाकी सर्व लेखन तसंच दिसतं.
असा पूर्वग्रह का होतो? तर आधी कुठे तरी एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर प्रतिवाद करता आलेला नसतो. उदा. `पैसा' या लेखातल्या `पैसा ही कल्पना आहे' या बेसिक विचाराचा प्रतिवाद न करता आल्यानं `पैसा हेच सर्वसाधन' मानणारं मन दुखावलेलं असतात.
किंवा नामसाधनेचा कच्चा दुवा (या लेखमालेतला पहिला लेख) दाखवल्यावर त्या मार्गावर आतापर्यंत आयुष्याची वाटचाल केलेलं मन व्यथित झालेले असतात.
`देव ही मानवी कल्पना आहे' (निरक्षर) या उघड गोष्टीवर आधी स्कोर सेटलींगचा आरोप होतो. पण इतकी खोल रुजलेली कल्पना यथासांग चर्चेनंतर (आज) सुद्धा नाकरता येत नाही (आणि काय वाट्टेल ते झालं तरी त्या साहसाला मन धजावत नाही) यामुळे भक्तीमार्गाच्या मूळ धारणांना धक्का बसलेला असतो.
स्री देहाचा गौरव आणि प्रणयतृप्ती सारख्या मुलभूत विषयावर (बोला स्त्री मुक्ती आंदोलन झिंदाबाद) मांडलेले विचार पटून सुद्धा मान्य करता आलेले नसतात.
वेगवेगळ्या प्रतिसादातून केलेली अध्यात्मिक वक्तव्य किंवा लेख ( बुद्ध, एकहार्ट, महाराज) प्रस्थापित अध्यात्मिक धारणांना स्विकारायला अवघड वाटलेली असतात.
....थोडक्यात, मनानं इतकी वर्ष जीवापाड जपलेल्या धारणा आज अचानक फोल कश्या ठरवायच्या हा प्रश्न असतो.
वास्तविकात, मी फक्त तथ्य मांडलेलं असतं, नवा विचार दिलेला असतो. पण त्याचा अर्थ मात्र, `स्वतःचं खरं करतो' किंवा `स्वतःला शहाणा समजतो' , `फार अहंकार आहे' असा काढला की व्यक्तिगत जीवनातल्या जुन्या धारणा, जुने मार्ग कायम ठेवायला मनाला सोपं होतं.
तिसरी गोष्ट, `लोकांना मूर्ख ठरवणं'
हा मुद्दा टिकू शकत नाही कारण वर म्हटल्याप्रमाणे :
>साधी गोष्ट आहे, मी कुणाला कसा मूर्ख म्हणेन? तसे प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकणार नाहीत. ते संकेतस्थळाच्या धोरणाविरूद्ध आहे. ती गोष्ट खपवूनच घेतली जाणार नाही. सो द वेरी पॉसिबिलीटी इज रूल्ड आऊट.
आता हा प्रतिसाद शांतपणे वाचला तर मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं हे लेखावरच्या प्रतिसादांवरून लक्षात येऊ शकेल.... आणि बहुदा या सर्व प्रयासाची ती विधायक फलश्रुती असेल.
याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ' (त्यामुळे आम्हाला तुम्ही काय `शिकवतायं) असा पूर्वग्रह करुन लेखनाकडे बघायला सुरुवात केली की हा लेखच काय बाकी सर्व लेखन तसंच दिसतं.
असा पूर्वग्रह का होतो? तर आधी कुठे तरी एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर प्रतिवाद करता आलेला नसतो
तुमचं हेच होतय काका...
तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा १. तुम्हाला विरोधासाठी विरोध करायचा म्हणुन किंवा २. मी सर्वश्रेष्ठ , मला कोण शिकवणार? ह्या अहंकारा मुळे आलला आडमुठेपणा ह्या मुळे नसुन तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे.
प्रतिवाद करायला तुम्हाला जमत नाहीये हे लक्षात घ्या..
नवा विचार मांडताना, तो फक्त एक "विचार" असतो.. केवळ आणि केवळ तोच "सत्य" नसतो.. त्यामुळे देव आहे ही थिसरी जशी चुक असु शकते तशीच "देव नाही" ही सुद्धा चुकीची थिअरी असु शकते.
त्याच प्रमाणे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व वेगवेगळे "नवे (?) विचार" मांडले तेव्हा तेव्हा तुम्ही ते चुकीचे असु शकतात, किंवा दुसरीही थिअरी अस्तित्वात असु शकते हे मान्य करत नाही.. म्हणुन तुम्ही हेकेखोर आहात..
उदा- स्त्री देहा बद्दल तुम्ही स्त्रियांशी वाद घालायला लागलात, तेही "माझंच बरोबर" अशी भुमिका चेऊन तर कसं चालेल.. तुम्ही तिथे फक्त आणि फक्त "थिअरीच" मांडु शकता.. अनुभव घेऊच शकत नाही.. त्यामुळे स्त्री देहाची प्रणयत्रुप्ती हा तुमचा अधिकाराने बोलण्याचा प्रांत नाहीचे.. सो प्लिझ...
मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं
आता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!
हा टोन योग्य वाटतोय का ते पाहा :
>अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म, जीवन जगण्याची कला आणि अजुन काय फलाणा फलाणा शिकायच?
तुम्हाला हे सगळं लिहीणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पण तरी..
पुढे तुम्ही म्हटलंय :
>प्रतिवाद करायला तुम्हाला जमत नाहीये हे लक्षात घ्या..
= `बेशर्त स्वीकृती' या लेखनाच्या बेसिक मुद्यावर चर्चा कुठे होते आहे? विधायक मुद्दे आणि प्रतिवाद झालायं कुठे? तुम्ही म्हटलंय तोच तर रोख सगळ्या प्रतिसादात आहे : `अशा माणासा कडुन काय डोंबलाच अध्यात्म,.....
>नवा विचार मांडताना, तो फक्त एक "विचार" असतो.. केवळ आणि केवळ तोच "सत्य" नसतो.. त्यामुळे देव आहे ही थिसरी जशी चुक असु शकते तशीच "देव नाही" ही सुद्धा चुकीची थिअरी असु शकते.
या विषयी अत्यंत सांगोपांग चर्चा १) निरक्षर आणि २) देवाला रिटायर का करा या दोन लेखांवर झालेली आहे. `देव ही कल्पना आहे' या मुद्याचा प्रतिवाद होऊ शकलेला नाही. तुम्ही अत्यंत शांतपणे ते लेख वाचले तर तुमचं मत बदलू शकेल.
>त्याच प्रमाणे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व वेगवेगळे "नवे (?) विचार" मांडले तेव्हा तेव्हा तुम्ही ते चुकीचे असु शकतात, किंवा दुसरीही थिअरी अस्तित्वात असु शकते हे मान्य करत नाही.. म्हणुन तुम्ही हेकेखोर आहात..
= लेखाच्या गाभ्यावर चर्चा होत नाहीये हे कुणीही मान्य करेल. तशी चर्चा न होता मला हेकेखोर ठरवणं कितपत योग्य ठरतं?
>उदा- स्त्री देहा बद्दल तुम्ही स्त्रियांशी वाद घालायला लागलात, तेही "माझंच बरोबर" अशी भुमिका चेऊन तर कसं चालेल.. तुम्ही तिथे फक्त आणि फक्त "थिअरीच" मांडु शकता.. अनुभव घेऊच शकत नाही.. त्यामुळे स्त्री देहाची प्रणयत्रुप्ती हा तुमचा अधिकाराने बोलण्याचा प्रांत नाहीचे.. सो प्लिझ...
= नाजूक विषय आहे पण जहीर सय्यदच्या `बोला स्त्री मुक्ती आंदोलन झिंदाबाद' लेखावर; स्त्री देह आणि प्रणयतृप्ती या अत्यंत गहन विषयावर सांगोपांग चर्चा झाली आहे. त्यावरून मला कितपत अधिकार आहे याची कल्पना येऊ शकेल.
प्रणयतृप्ती हा केवळ स्त्री देहाचा विषय नाही. तो युगुलाच्या पारस्पारिक समन्वय आणि सहसंवेदनेचा अनुभव आहे.
>आता तुम्हाला केलेला विरोध हा तुम्ही "प्रुथ्वी गोल आहे ह्या साहसी विधानाला केलेला विरोध" ह्या कॅटेगरीत टाकणार असाल तर तुमची मर्जी...!!
तुमच्या सर्व प्रतिसादाला कोणत्याही कॅटेगरीत न टाकता मनःपूर्वक उत्तर दिलंय. आता...
`मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं'
हे मंजूर करणं, न करणं तुमची मर्जी.
संक्षी...
अजिबात लिहायचं नव्हतं, पण तुम्ही परत मी प्रतिवाद करत नाही म्हणजे मला तुमच्या शब्दांच्या कोलांट्या उड्या मान्य आहेत असा काढाल..
जो माणुस समोरच्याला सतत मुर्खात काढतो.....अशा माणासा कडुन काय डोंबलाच.......
असं वाचायचं होतं ते..
तुम्ही काय माझ्या भाषेवर आणि टोनवर आक्षेप घेणार? पेठकर काकांना दिलेल्या प्रतिसादात दोन्ही दिसले आहेतच.. नेहमीच दिसतात म्हणा..
जेव्हा तुम्ही स्वतःला "किमान चर्चा करण्याच्या लायकीचे" सिद्ध कराल तेव्हा कदाचित तुमच्याशी "बेशर्त स्वीकृती" ह्या विषयावर चर्चा होऊ शकेल. तुम्ही अर्थात सोयीस्कर प्रतिसाद पहात आहत. इथे तुमच्याशी चर्चेचा प्रयत्न लोकांनी केला होता. त्याची तुम्ही लोकांची चित्तदशा दाखवून वासलात लावलीत..
साधं पहा.. मी देव आहे की नाही हे केवळ उदाहरण म्हणुन दिलं होतं.. तुम्हाला एवढंही कळत नाही.. मला तुमच्या चित्तवृत्ती सोबत आकलन क्षमतेवर शंका येत आहे (आणि काही ठिकाणी विनोदबुद्धीवर सुद्धा). तुम्ही नीट वाचत नाही आहात. तुम्हाला केवळ उत्तर द्यायची घाई आहे. खरं तर ह्या नंतरच तुमचा सगळा प्रतिसाद चुकला आहे. पण तरी मी उत्तरं देते...
स्त्री देह आणि संबधित गोष्टींवर तुमचं मत एक तर तुम्ही माझ्या अंदाजा नुसार "स्वानुभवातुन" बनवलं आहे. जो की जेनेरीक मत मांडायला तोकडा आहे. शिवाय तुम्ही स्वतः तो देह अनुभवला नसल्याने तुम्ही "केवळ अंदाजच" बांधु शकता. त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही हे च बरोबर आहे.
(यापुढे मला ह्या विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही. कृपया प्रतिवादास उत्तर मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.)
तुम्ही एकदा माझे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचा.. आणि प्लिझ.. उद्विग्न होऊ नका..
आपलं चुकलय.. हे मान्य करायला त्रास होतोच.. आपण समजतो तेवढे आपण हुषार नाही, आपली मते काही फार जगावेगळी नाहीत..हे तुम्हाला एकदा फक्त "बेशर्त" स्वीकारायचं आहे!
(बिनशर्त हा साधा शब्द स्वीकारला तरी ह्याची सुरवात होईल)
त्यांच्या मुद्यांचा कोणि प्रतिवाद केला नाहि, असा धादांत खोटा समज ज्या मनाने करुन घेतलाय (ते प्रतिवाद धागा उघडला तरी अगदी सहज वाचता येतील... पण त्याचंही आश्चर्य नाहि. जिथे मनच मनाला नाकारतय तिथे इतर काहि कसं दिसेल) मग इतर मुद्द्यांची काय कथा.
अर्धवटराव
इथे लॉजिकल लिहून काही उपयोग नाही हे आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आले असावे.
स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट यांच्या जोडीला आता आध्यात्मिक हट्ट हा शब्दप्रयोग देखील चपखल बसेल.
"मी आणि माझा शत्रुपक्ष" मधील नको नको म्हणत असतांनाही बळेच स्वत:चे घर दाखवण्याचा प्रसंग आठवला.
तुमच्या मुद्द्यांना कोणि प्रतिवाद दिले नाहित, हा तुमच्या दाव्याबद्दल चर्चा चालली आहे... आणि तुम्ही रिप्ल्याय देताय कि तुम्ही कोणाला उत्तरे दिलीत. प्रतिसाद देताना तुमचा असा गोंधळ होतो.
शिवाय, तुम्ही शेवटपर्यंत उतर दिले हे ही खोटं आहे.
http://www.misalpav.com/comment/452245#comment-452245
http://www.misalpav.com/comment/451692#comment-451692
असो. तुम्ही ते स्विकारणार नाहि हे ठाऊक आहे.
अर्धवटराव
एखाद्या प्रश्नावर, चर्चेच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत उत्तर देणे आणि धाग्यावर शेवटचं उत्तर देणे या भिन्न गोष्टी आहेत बहुतेक. पण तुम्ही मुद्द्याला सोडुन उत्तर द्याल हि माझी अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.
अवांतरः त्याच धाग्यावर भक्तीमार्गाबद्दलचे तुमचे प्रतिसाद आणि इतरत्र त्याच विषयावरचे तुमचे प्रतीसाद यांत प्रचंड काँन्ट्रॅडीक्शन आहेत. आता त्याबद्दल देखील मुद्द्याला सोडुन एखादा प्रतिसाद तुमच्याकडुन अपेक्षीत आहे. बघुया, अपेक्षा कधि आणि कशी पूर्ण होते ते.
अर्धवटराव
अर्धवट राव, आधी म्याला तुम्ही उत्तर द्या की धावताना तुम्ही सगळ्यात शेवटचा पाय कुठला टाकता?
ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येइल त्या दिवशी तुम्हाला सगळीच उत्तरं मिळतील आणि तुम्ही 'मुक्त' व्हाल!
धागा काथ्याकूट या सदरात सरकवण्याची विनंती करतो. ;)
खरं तर लेख उमगला नाही. प्रतिक्रिया वाचून लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पण आता सगळंच डोक्यावरून जायला लागलंय.
ते काय ते शरणागती म्हणत होते ती आता घेतली.
संक्षी,
सगळ्या प्रति़क्रीया विसरुन परत पहिल्यापासून वाचायचा प्रयत्न केला. तात्विक पातळीवर विचार ठीक वाटला पण आचरणात आणण्याच्या दृष्टीने नक्की समजेना..
एखादे उदाहरण देउन स्पष्ट कराल का ??
की या परिस्थितीत असं वागणं म्हणजे तक्रारखोर मनाच ऐकणं आणि तसं वागणं म्हणजे "बेशर्त स्वीकृती"..
आचरणात आणण्याच्या दृष्टीने नक्की समजेना..
जस्ट सी धीस. सगळे तुटून पडलेत... बेशर्त मंजूर आहे....मी शांतपणे प्रतिसाद देतोय!
(आता लोकांना `शांतपणा' दिसण्याऐवजी शेवटच्या वाक्यातल्या `मी' तेवढा फोकस होणार. तो अहंकार ठरणार. पण शेवटचं वाक्य मराठीत (कर्त्याशिवाय) तरी लिहीणार कसं? यावर परत धुमाकूळ होईल... झाला तर तोही मंजूर आहे!)
सगळे तुटून पडलेत... बेशर्त मंजूर आहे....मी शांतपणे प्रतिसाद देतोय!
थापा बास. म्हणे सगळे तुटून पडलेत... बेशर्त मंजूर आहे....मी शांतपणे प्रतिसाद देतोय! मंजुर आहे तर मुळात प्रतिसाद देताच कशाला ? खर तर गवी सारखे अपवादात्मक प्रतिसादक जे सागळ्यांच्या विरोधात जाउन तुम्हाला तुमच्या विचारांचा अनुभव आहे वगैरे वगैरे छाति ठोकपणे सांगायचा यत्न करतात ते सोडलं तर तुम्हाला काहिच मंजुर नाही. सगळ सशर्त आहे. मुळात बेशर्त हा शब्द अस्तित्वात नाही इथुन आपलि सुरुवात आहे.
करेक्षन आवश्यक : त्यांच्या विचारांचा त्याना अनुभव आहे असे छातीठोकपणे सांगणे किंवा त्याविषयी सर्वाना खात्री देणे असे माझे उद्देश नव्हते आणि नाहीत. (समजा जरी) त्याना स्वत: ला अनुभूति आली असेल तरी तीच तशीच अनुभूति इतर वाचकाना आलेली नसू शकत असल्याने त्याना थेट लक्षात येईलच असे नव्हे. तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.
अनेकाना मी संक्षीना साक्षात्कार होताना पाहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो म्हणून खुलासा. वाद भरकटत होता म्हणून मत मांडले. असो.
अनेकाना मी संक्षीना साक्षात्कार होताना पाहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो म्हणून खुलासा.
नेमकं ओळखलत. मी याच गैरसमजाचा बळी आहे. कारण तिथे वाचकांना क्रिटिसाइज केल्याची व सरांना वैयक्तिक क्लिनचिट दिल्यासारखि संदिग्ध वाक्यरचना घडली होती, पण या प्रतिसादामुळे जिवात जीव आला.
तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.
ज्या एकुलत्या एक गड्याला आपल्या संघात असल्याचे समजून ब्याटींग चालली होती त्याने पण गैरसमज दूर केला. आता काय करणार? रन काढायला पण पलिकडे कोणी नाही. चला आता ब्याट, बॉल, ष्टंपा वगैरे घेऊन घरला जायला हरकत नाही.
करेक्षन आवश्यक : त्यांच्या विचारांचा त्याना अनुभव आहे असे छातीठोकपणे सांगणे किंवा त्याविषयी सर्वाना खात्री देणे असे माझे उद्देश नव्हते आणि नाहीत. (समजा जरी) त्याना स्वत: ला अनुभूति आली असेल तरी तीच तशीच अनुभूति इतर वाचकाना आलेली नसू शकत असल्याने त्याना थेट लक्षात येईलच असे नव्हे. तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.
अनेकाना मी संक्षीना साक्षात्कार होताना पाहिला आहे असा गैरसमज होऊ शकतो म्हणून खुलासा. वाद भरकटत होता म्हणून मत मांडले. असो.
आय टेक सपोर्ट ऑन ओन्ली दिज टू फॅक्ट्स इन योर कमेंट:
>या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.
>आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय.
तुझ्या करेक्शन विषयी :
>(समजा जरी) त्याना स्वत: ला अनुभूति आली असेल तरी तीच तशीच अनुभूति इतर वाचकाना आलेली नसू शकत असल्याने त्याना थेट लक्षात येईलच असे नव्हे. तेव्हा उलट आपली अनुभूति इतरांवर लादू नये हा अर्थ होता.
= ऑफकोर्स. आणि अशी लादून घेणार आहे कोण? धिस इज अॅन ओपन फोरम. पण प्रयोग करून पाहिला नाही तर अनुभूति कशी येणार?
उदाहरण योग्य वाटत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे "शांतपणे" एखादी गोष्ट करणे म्हणजे "बेशर्त स्वीकृती" का?
नाही..
सगळे तुटुन पडलेत हा सत्याचा एक भाग तुम्ही बेशर्त स्वीकार करताय,
पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. तिथे मात्र तक्रारखोर मनाच ऐकताय !!
बेशर्त स्वीकृती ठीकाय पण काय स्वीकारायच त्याचा "स्कोप" कोण ठरवणार??
It is open to interpretation ..
म्हणजे शेवटी शब्दांचाच खेळ होणार..
आणखी योग्य उदाहरण असेल तर आवडेल वाचायला..
>.. तिथे मात्र तक्रारखोर मनाच ऐकताय
`मन कसं जुन्या धारणा कायम ठेवतं आणि नव्याच्या विरोधात तुटून पडतं' याचं उत्तम उदाहरण म्हणजे वरचे सर्व प्रतिसाद आहेत.
मी अहंकारी आहे म्हणजे नक्की काय? याची प्रतिसादकांना अपेक्षित प्रातिनिधिक व्याख्या दुवा दिलेल्या प्रतिसादात सदस्येनं केली आहे आणि त्याला समर्पक उत्तर दिलंय. त्यावर कुणीही प्रतिवाद केलेला नाही. तस्मात तो दावा फोल आहे.
त्यावर कुणीही प्रतिवाद केलेला नाही. तस्मात तो दावा फोल आहे.
मुद्द्यावर कोणीही प्रतिवाद न करणे याचा एक अर्थ असाही होतो की एखादा मनुष्य उगीचच काहीबाही बरळू लागला तर प्रत्येक वेळी कुठे त्याच्या तोंडी लागा तेव्हा उत्तम म्हणजे काहीच बोलायचे नाही.पण इतर कुणीही प्रतिवाद केला नाही याचा अर्थ आपणच बरोबर असा अर्थ घेणे म्हणजे अहंमन्य पणाचा कळस आहे.आणि इतके सगळे होऊनही स्वतःचीच टिमकी वाजविणे म्हणजे गिरा तो भी टांग उपर चे सर्वात मासलेवाईक उदाहरण झाले.
तरीही या लेखातून अनलिमिटेड मनोरंजन केल्याबद्दल संजयरावांचे आभार
प्रतिक्रिया
खिल्ली उडविणे....????
अत्यंत समर्पक आणि समतोल
द मोस्ट अनेक्सपेक्टेड!
मोस्ट एक्सपेक्टेड!
"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न
"तुमची चित्तव्रुत्ती उद्विग्न आहे.."
सहमत!आणि ती हिंसकही होत आहे..
+१
मतभेद असणे किंवा एखाद्याची मत
इट्स ह्युमन टेन्डेन्सी
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा
लोक तोळ धाडी प्रमाणे धागा
कोणत्याही नव्या विचारसरणीला तीन प्रकारे नाकारता येतं
याचा अर्थ `मीच सर्वश्रेष्ठ'
आता तुम्हाला केलेला विरोध हा
तुम्ही अहंकारी आहात हा मुद्दा तुमच्या "भाषेमुळे" आलेला आहे!
संक्षी...
तुम्ही स्वतःला काय समजता हा तुमचा प्रश्न आहे
असु द्या हो.
+१
तिथे अरांनी मला प्रश्न विचारलेत आणि मी शेवटपर्यंत उत्तरं दिलीयेत
उत्तम नमुना.
तिथला तुमचा धन्यवाद पाहा
आणखी एक नमुना.
अर्धवट राव, आधी म्याला
@सगळ्यात शेवटचा पाय कुठला
गुरुराज..
कुणी निंदा कुणी वंदा, शेवटचा
काथ्याकुट
संक्षी,
तात्विक पातळीवर विचार ठीक वाटला पण ...
:)
मुळात बेशर्त हा शब्द
करेक्षन आवश्यक : त्यांच्या
:) :)
संजय सर हे " सर जडेजा" सारखंच
सर जडेजांचा अपमाण???
च्यायला
गडी??
हॅ हॅ हॅ हॅ
गंमत.
करेक्षन आवश्यक : त्यांच्या
ऑ?
गवि, अनुभूतिच्या वेरिफिकेशनचा प्रश्नच नाही
उदाहरण योग्य वाटत नाही.
पण मूळ कारण जे सगळ्यांना वाट्तय ते कोण स्वीकारणार.. ?
अहंकार ?
गिरा तो भी टांग
गिरा तो भी टांग उपर
योग्य उदाहरण देण्याला बगल
मुळात बेशर्त हा शब्द
Pagination