आध्यात्मिक गुरू नसावेत बहुतेक. घरचे नीट असले तरी वडिलांचे आपण करतोय त्याला आनुकूल्य नसेल तर काही उपयोग होत नाही म्हणून तसे म्हटले असावे असे वाटते. अन अण्णा हा शब्द सिंबॉलिकली वापरला असावा.
(असं माझं मत आहे.)
गुरु वगैरे नाही हो, ते माझे क्षेत्र नाही. 'दाम करे काम', 'आधी पोटोबा मग विठोबा' या पिढीतला आहे मी.
सिंहगड रस्त्या वरच्या डुक्कर (टमटम) वरचे साहित्य वाचून मी मराठी शिकलो आहे. त्यामुळे असे अनेक शब्द ओठांवर लोळण घेतात ;)
रिक्षा, ट्रक, इ. च्या मागचे साहित्य वाचत नाही काय?... "अण्णांची कृपा", "तात्यांचा आशिर्वाद", "आईची पुण्याई" असे अनेक लघुवाहनलेख असतात तेथे, आणि जागा उरेल तेथे तोंडी लावायला असंख्य चिल्यापिल्यांची नामावळ. साहित्याचा इतका समृद्ध प्रकार, तोही सतत गावोगावी, गल्लोगली प्रवाही (फिरता) आणि लोकाभिमुख (म्हणजे वाहनाच्या पाठीमागे पण मागच्या जनतेच्या तोंडापुढे) असलेला प्रकार, दुसरा मिळणे नोहे ! ;)
तुम्ही दिलेल्या उदाहरणातले पालक त्यांच्या मुलांनी शर्यतीत मागे राहू नये म्हणून काळजी (!) घेताहेत इतकंच म्हणेन. पण एकदा अक्कल आली की या मुला-मुलींना आपण शर्यतीत धावायचं की नाही - हे ठरवता येईल की. धावायचं नसेल तर प्रश्न नाही, धावायचं असेल तर 'आम्हाला पुरेसं पाठबळ दिलं नाही' अशी तक्रार करायला नको त्यांनी भविष्यात.
शर्यतीत उतरायचं नाही (कष्ट नकोत) पण विजेत्याला मिळणारे सर्व फायदे मात्र पाहिजेत - अशी मानसिकता असली की मग जगणं 'उंदीरशर्यत' वाटायला लागतं - खरी अडचण ती आहे. कुठल्याही शर्यतीत न उतरता सुखा-समाधानाने जगणारे अनेक लोक पाहिल्यावर शर्यतीत उतरायचं का नाही याचा निर्णय आपण स्वतः घ्यायचा असतो याची जाणीव झाली आहे आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही इतकं मी माझ्यापुरतं मान्य करुन टाकलं आहे. इतरांनी ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही.
अजुन तरी लेकीला या स्पर्धेत उतरवलं नाही आणि या पुढेही तिला आम्हा उभयतांकडुन यात लोटलं जाणार नाही असाच दोघांचा निश्चय आहे.
काही वैयक्तीक कारणांमुळे सिबिएसी मस्ट होतं ते टाळता आलं नाही. सध्याचा महाराष्ट्र बोर्डाचा शालेय अभ्यासक्रम काय असतो? किती कठिण आहे? हे माहित नाही. पण जेव्हा मी लेकीच्या वयाचा होतो तेव्हाचा माझा अभ्यासक्रम आणि तिचा आताचा अभ्यासक्रम यांच्यात किमान ४-५ इयत्तांचा फरक आलेला पहातोय. म्हणजे मी जे सातवी वैगरे शिकलो ते ती तिसरीत असतानाच शिकली. तिच्या वर्गातली मुलं दुपारी शाळेतून आली की दप्तर टाकलं दोन घास कसे बसे घश्यात कोंबले की दुसरं दप्तर उचलून शिकवणीला पळतात. दया येते त्यांची. एकतर सकाळी शाळेत जायचं म्हणुन लवकर उठतात, आणि दुपारी शिकवणीला पळतात त्यामुळे सकाळची राहीलेली झोप दुपारीही मिळत नाही. दुपारच्या शिकवणीतुण सुटका झाली की हौशी आई-वडलांच्या खातर एकादा नाच/कराटे/गायनाचा क्लास त्यांची वाट पहात असतो.
शेवटी दमलेलं-भागलेलं कोकरू शाळेत परफॉर्म करत नाही म्हणुन परत दबाव येतो ते वेगळच.
माझा मुलगा सिबिएसी शाळेत नववीत आहे. मी अजुनही त्याला कोणताही क्लास लावलेला नाही. त्यान्च्या अभ्यासाची रचना समजुन घेतली तर सीबीएसी काही कठीण नाही.आपण थोडे मर्गदर्शन जरुर करावे लागते, पण ती पालक म्हणुन आपलीही जबाबदारी आहे असे मला वाटते. अर्थात हे प्रत्येकाच्या इंटरेस्ट्वरही अवलंबुन आहे, काही लोक मुलांचा अभ्यास काय आहे हे न बघताच वर वर बघुन कठीण आहे म्हणुन ट्युशनला पाठवतात. नर्सरी,ज्यु केजी ला असा काय तुफान कठीण अभ्यास असतो जो आपण सुशिक्षीत पालक घेउ शकत नाही.
पण ह्या समस्येला उत्तर काय ?
मी आमच्या घरी होम ए़जुकेशन विषयी बोललो...की पोरांना घरीच शिकवुयात ... तर माझीच अक्कल काढण्यात आली :(
--प्रचंड शिक्षण घेवुन कॉर्पोरेट वर्ल्डमधे अडकलेला उंदीर
मी देखील प्रवाहाविरुद्ध पोहा वगैरे लिहिले आहे पण स्वतः असा निर्णय घेऊ शकेन का याबाबत साशंक आहे (लाजलेली स्मायली). पण असे वेगळे निर्णय घेऊन यशस्वी होणारेदेखिल पाहीले आहेत.
पत्रकारीता, उपहारग्रुह, नाटक, ईंजिनियरींग वर्कशॉप, पौरोहीत्य, शेती यात शुन्यापासुन सुरुवात करुन यशस्वी झालेले मित्र, नातेवाईक बघण्यात आहेत.
पत्रकारीता, उपहारग्रुह, नाटक, ईंजिनियरींग वर्कशॉप, पौरोहीत्य, शेती यात शुन्यापासुन सुरुवात करुन यशस्वी झालेले मित्र, नातेवाईक बघण्यात आहेत.
असेच आमचे काही मित्रही !! त्यांच्या कडे पाहुन एका मनाला आनंद वाटतो तर एका मनाला हेवा (एन्व्ही ) . पण असं काही करण्यासाठी गट्स पाहिजेत हे मात्र खरं ....
उंदीर व्हायचं की मांजर की सिंह ते! ट्युशन्स ची फार गरज अशी नसते. फक्त पालक मुलांकडे पुरेसा वेळ आणि लक्ष देऊ शकत नाहीत त्यावेळी निदान मुले तिथे बसून थोडा तरी अभ्यास आणि पेपर्स सोडवणे असे काहीतरी करतात. नाहीतर आई बाप ऑफिसात आणि एकटा मुलगा घरी ऑनलाईन गेम्स खेळतोय असले प्रकार पाहिले आहेत. मुलांना अभ्यासात डांबून ठेवले तरी आणि पूर्ण मोकळे सोडले तरी काही ना काही तोटा आहेच. शक्यतः सुवर्णमध्य कसा काढायचा हे त्या त्या पालकांवर आणि मुलांवर अवलंबून आहे.
दहावीपर्यंत सिबीएस्सीत शिकलो (नवोदय विद्यालय).. ट्युशन नव्हतीच. पण नवोदयची 'सिस्टम' म्हणजे अभ्यासतास, मासिक परीक्षा इत्यादी असल्याने गपगुमान पास झालो. बारावीत 'महा' बोर्डात होतो, ट्युशनपण होती, पण गणितात (ते मॅट्रिक्स, सेक थिटा, काॅस थिटा इ.) रुची नसल्याने नापास झालो. मग बारावी काढल्यावर सेकंड क्लासमधे बी. एस्सी. झालो. मग इचार केला की आतापर्यंत लै कचरा झाला, आता जरा अभ्यास करावा. दोन-तीन वर्षं घासली आणि आता सरकारी नोकर आहे.. आता तुम्हीच ठरवा, रॅट का काय ते..
अगदी आयआयटी, आयआयएम, एमबीबीएस करणारेही कित्येकदा त्यांच्या मनाविरुद्धच धावतात असं वाटतं. नाहीतर सिव्हील सर्विसेस मध्ये अश्या उमेदवारांचा वाढता टक्का दिसला नसता..
माझ्या लेकराला उंदिरशर्यतीत धावायला लावणारच नाही, असं म्हणु शकत नाही. ते भविष्यच ठरवेल. पण अगदी केजीपासुन ट्युशन्स किंवा सातवीपासुन आयआयटी प्रवेशाची तयारी ही सोंगं करणार नाही. स्वत:चंच नालायक उदाहरण समोर असल्याने असेल कदाचित.. ;-) :-D
याचे कारण एक असे सुद्धा असु शकते कि स्वताहा पालक हे कमी शिकलेले असल्याने तसेच मुलाना ईन्ग्रजी माध्यमात शिकावयास घातल्याने त्याना नाईलाजाने असे करावे लागते.
ना आमच्या वेळी ही उंदीर शर्यत होती ना आम्ही आमच्या एकुलत्या एक मुलाला अशा शर्यतीत ढकलले. इथे आखातात CBSC शिवाय पर्याय नाही म्ह्णून दहावी पर्यंत CBSC मध्येच शिक्षण झाले. पुढे पुण्यातही कॉलेज शिक्षण घेताना त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता.
माझ्या शिक्षण वयात आमच्या घरात अभ्यास घेणे हा प्रकार तर नव्हताच आणि शिकवणी लावली म्हणजे मुलगा/मुलगी 'ढ' आहे ह्याची जाहिरातच मानली जायची. पदवी नंतर १७ वर्षे नोकरी करून, स्वतःच्या मालकीचे घर झाल्यानंतर, आता हरकत नाही ह्या विचाराने, स्वतःच्या आवडीच्या व्यवसायास (उपहारगृह) सुरुवात केली. आयुष्यात समाधानी आहे.
मुलालाही ह्याच व्यवसायात ये असा आग्रह नाही. त्या जे करायचे असेल ते करण्यास जी काही मदत शक्य आहे ती नक्कीच करेन.
मुलाचे शिक्षण आणि व्यवसाय जरी त्या त्या व्यक्तिचा वैयक्तिक प्रश्न असला तरी मुलांवर कुठले दडपण असू नये असे वाटते.
+ १००
मी संपूर्णपणे स्वतःच्या मताने डॉक्टर झालो( आईचे मत विरुद्ध असताना) आणी सैन्यात गेलो. साडे अठरा वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन निवृत्त झालो. चार वर्षे दोन कोर्पोरेट रुग्णालयात विभागप्रमुख म्हणून काम केले आणी एके दिवशी राजीनामा देऊन बाहेर पडलो. तीन महिने घरी बसून स्वतंत्र व्यवसायाची तयारी केली.( आमची मद्रासी मोलकरीण बायकोला विचारती झाली कि अण्णा काम का करीत नाही?). याला थोडेसे धाडस आणी स्वतः वर विश्वास पाहिजे आणी घरच्यांचा पूर्ण पाठींबा पाहिजे( सुदैवाने मला तो आई वडिलांकडून आणी नंतर बायको कडून मिळाला) स्वतःचा व्यवसाय गेली साडे तीन वर्षे आरामात करीत आहे. सकाळी साडे आठ ते साडे बारा आणी संध्याकाळी साडे पाच ते साडे आठ.घरापासून दवाखाना १ किमी वर आहे. दुपारी थंड झोपतो. कोणतीही शर्यत न पळता किंवा कोणाचाही जास्त पैसे मिळवतो म्हणून हेवा न करता.
हेच उदाहरण माझ्या मुलांच्या डोळ्यासमोर ठेवले आहे त्यांना जे काही करायचे आहे ते करा असे मोकळ्या मनाने सांगितले मी तुम्हाला वयाच्या ३० वर्षे पर्यंत पोसेन असे सांगितले आहे. मुलगी कॉमर्स ला गेली आहे मुलगा इंजिनियर व्हायचे म्हणतो आहे. उत्तम त्यांनी सुद्धा आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगावे. एखादे वर्ष रिकामे फिरण्यात घालवले तरी चालेल. बाकी ईश्वरेच्छा
हे मनोरूग्ण पालक व आपल्या आजच्या जगातील मनोरुग्णावस्थेत गेलेले " महान" शिक्षण तज्ञ पाहिले की जगाच्या
इतिहासात आपण १९५३ साली म्हणजे योग्य वेळी जन्माला आलो व अंदाजे २०२३ साली म्हणजे योग्य वेळी मरणार आहोत या बद्द्ल स्वत: चाच हेवा करावासा वाटतो.
अंदाजे २०२३ साली म्हणजे योग्य वेळी मरणार आहोत
हा अंदाज कसा काढला बरं? काही फॉर्म्युला असला तर आम्हालाही गणित करुन ठेवता येईल.
बाकी रॅट रेस मधे मागेच राहिलो होतो. पण नशिबाने हात दिला त्यामुळे तरंगलो तरी!
डॉक्टरसाहेब, लेखतील उदाहरणांतून एका महत्वाच्या सामाजिक समस्येवर इथे भाष्य केले आहे. अनेक प्रतिसाद विचारांत पाडणारे आहेत.
मी व माझ्या पिढीतील अनेक लोक इतके नाही तर या प्रकारच्या दडपणातून गेले आहेत (खास करून ८वी ते १२वी या काळात).
माझे स्वतःचे सांगायचे तर दडपणामूळे १२वीत गाडी घसरली तरी त्यानंतर कुठलेही दडपण न घेता आवडीच्या विषयांमध्ये (संगणकशास्त्र) स्वतःला झोकून दिले व इतर अनेक विषय अभ्यासक्रमात असले तरी (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अकौंटींग, स्टॅटिस्टीक्स इत्यादी) त्यांचा केवळ पास होण्यापूरता अभ्यास केला.
या धोरणाचा मला पहिली नोकरीत सहजपणे मिळण्यात व नोकरीतील प्रगती करण्यात चांगलाच लाभ झाला.
या समस्येवर व्यवस्थेद्वारा व सामाजिक संकल्पनांतील बदलांद्वारा तोडगा निघेल असे सध्यातरी वाटत नाही.
किमान गेल्या काही वर्षांपासून १०वी १२वी ची प्राविण्ययादी बंद झाली आहे हीच काय एक दिलासा देणारी बाब.
विनोबा भावेचे कार्य करणारे एक सदगृहस्थ मला माझ्या कॉलेज जीवनात भेटले
त्यांच्याशी बोलताना बेकारी विषयावर मी बोलू लागलो तेंव्हा त्यांनी मला पुढील प्रश्न विचारले
तुला कॉलेज मधे जाण्यास कोणी सांगितले ?
पदवी प्राप्त झाल्यावर तुला नोकरी देण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे ?
वय वर्षे १८ पूर्ण झाली की कायद्याने शहाणे समजले जाते . पण १८ व्या वर्षी हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत .
वरील प्रश्न विचारणे शहाणपणाचे ठरते ?
परंतु या प्रश्नाकडे संपूर्ण आयुष्यभर दुर्लक्ष करता येते का ?
योग्य वेळी योग्य प्रश्न विचारले गेले पाहिजेत . त्या प्रश्नाची उत्तरे मिळवली पाहिजेत
शिक्षण हे क्षेत्र राजकारणाचे कसे ?
काय शिकवायचे , कसे शिकवायचे ,हे ठरवणारी व्यक्ती अक्षरशत्रू असली तरी चालते कारण POLICY ठरवणे हे काम कुणीही करू शकतो
आणि POLICY चुकीची असली तर ती व्यक्ती बदलण्याची संधी ५ वर्षाने मिळतेच
TWO ON A TOWER ही कादंबरी मला कॉलेजला होती . ती कादंबरी अश्लील आहे असे पुणे महानगरपालिकेच्या सभासदांचे मत होते आणि ती कादंबरी काढून टाकावी असा त्यांचा
ठराव पास झाला होता
महानगरपालिकेचे हे काम आहे ?
लोकशाही म्हणजे दुस -याने काय करावे हे सांगण्याचे स्वातंत्र्य असा आपला समज आहे
इथे उस गावात काही भारतीय लोकांकडुन असे एकले कि जिथे आशियाई वंशाची मुले शाळेत जास्त असतात तिथले स्थानिक लोक आपल्या मुलांच्या शाळा बदलत आहेत कारण आशियाई वंशाची मुले खूप अभ्यास करत असल्याने त्यांच्या मुलांना या रॅटरेसमध्ये धावावे लागु नये म्हणून :-) हे कितपत खरे आहे महित नाही.
मुद्दॅ वाचले, काही पटले. इतक्या लहान वयात मुलाला ट्युशनला घालतायत म्हणजे वर ऋषिकेशने म्हटलय तसं त्यांचा वेळ देता येत नाही मुलाला हा न्युनगंड असण्याची शक्यता जास्त. होमलोनचे हप्ते भरताना येणार्या फेसामुळे दोघांना नोकरी करणे तर आवश्यकच ना.
पण दुसरा मुद्दा 'शाळा बुडेल' हा मुद्दा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असावा. साधारणपणे ३ ते ५ वर्षांची मुलं (ज्यांचा स्वभाव ठरण्याचा हा कालावधी) बरीच हुषार असतात. त्यांच्याकडे निगोशिएशन्स स्कील्स आलेली असतात आणि पूर्णवेळ घरात राहून ती अनंत उद्योग करू शकतात. त्यांना सांभाळणे ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे, त्यापेक्षा मुलाचे 'रुटीन' लागलेले असणे केव्हाही चांगले. तो शाळेत जाईल तेव्हा आई इतर कामे पटापट उरकू शकेल, त्यालाही चार मुलांमध्ये वावरता येईल, वेगळे वातावरण मिळेल. हेच जर तो सलग घरी राहिला, तर शाळेची सवय सुटण्याची शक्यता जास्त. ज्यांच्या घरात आजी-आजोबा नाहीत तेथे हा प्रश्न अजून भेडसावतो.
आता रॅट रेस बद्दल. ती होती, आहे आणि राहाणारच. निव्वळ रॅट रेस मध्ये धावणार नाही ह्या हट्टापायी तसेच थोड्या आळशीपणे किंवा खोड्या आत्मविश्वासापायी हुशारी फुकट घालवून नैराश्य आलेल्यांची पण कितीतरी उदाहरणे समोर बघतो, मग त्यावेळी प्रवाहपतितांनी प्रवाहाच्या प्रगतीनुसार प्रगती केल्याने त्यांचं कौतुकच वाटत. तस्मात, प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं. शेवटी 'लोकल मॅक्झिमा' च्या बाहेरही जग असतच, तुमच्या कक्षा रुंदवल्या की ते दिसतच!
- उपास
प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं.
प्रचंड सहमत!!!
हे वाक्य फक्त मुलांनाच नाही तर असंख्य कॉर्पोरेट जनांनाही लागू पडेल बहुदा!
बीटेक आणि एमटेक करून साधे एक वाक्य नीट इंग्लिश मध्ये बोलू न शकणार्या किंवा चेन्नई ला जायला तयार नसलेल्या किंवा गोलमाल उत्तरे देणार्या किंवा उगीचच नोकर्या बदलणार्या किंवा अवास्तव अपेक्शा ठेवणार्या मठ्ठ गाढवांना मी आमच्या कंपनीच्या इंटर्व्ह्यु मध्ये पास करत नाही. बाकीच्यांच्या साठी आजही भरपूर नोकर्या आहेत.
खरतर साडेपाच वर्षापर्यंत शाळेत घालायचे नाही असा निय्म करायला हवा. मी इथली मुले पहाते. त्यांना प्रेप ( पहिलीच्या आधी १ वर्ष प्रेप मध्ये जाव लागत) पर्यंत अगदी ए बी सी डी सुद्धा शिकवत नाहीत. का? तर नंतर त्यांना बोअर होइल म्हणुन. पण त्या वयातल्या मुलांला उच्चारावरुन स्पेलींग लिहाय्ची मुभा असते. सो नो रट रट. प्रेप ची मुले एफ आर डी हे फ्रेंड म्हणुन लिहीतात अन टीचर ते वाचते. मी विचारल तू पहिला स्पेलिंग का नाही करुन घेत तर म्हणे व्यक्त होण महत्वाच, इंग्लेश येणे नव्हे!!
खरेच बिचारी मानसी. इतकी झोप येत असताना त्या बिचारीला शाळेत पाठवलेच कशाला. बर पाठवले तर पाठवले त्या शिक्षिकेने तरी तिला उठवण्यासाठी इतके कष्ट घ्यावेत कशाला झोपु द्या ना त्या बिचारीला.
पिल्लु आजारी आहे,खोकतय्,साला सर्दी खोकल्याच्या औषधाने थोडीशी गुंगी येते. त्यामुळे झोपतय बाकी काही नाही. आपला तर पहिली पासुन वैद्यकिय शिक्षाण पुर्ण होइपर्यंत दुपारच्या जेवणानंतरच्या जो कुठला ही तास असु दे मास्तर कितीही शिव्या घालु देत्,पन तरी झोप काढल्याशिवाय अजिबात जमत नव्हत. साला दुपारच्या जेवणानंतर समोरच्या मास्तरच ते संथ लयीतील शिकवण आणी त्याचा शरिर आणी मनावर आलेला गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव परत या धकाधकीच्या जिवनात मिळालाच नाही, त्यामुळे आजही वाटत दुपारी मजबुत बासुंदी पुरी,किंवा पुरणपोळी खावी,आणी समोर माझ्या चरकच्या किंवा बालरोग च्या मास्तरांचे व्याख्यान आसावे,असा योग परत नाही......
मी पण गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव इंजिनियरिंग मध्ये घेतला आहे. इंजिनियरिंगचा पहिला दिवस आणि पहिला गणिताचा तास, मस्त झोप. फक्त पहिला दिवस असल्यामुळे वर्गाच्या बाहेर केले नाही.
लै बेकार वाटलं राव! काय त्या लेकराचा छळ. वर आणि व्हिडो शूट करतीये मास्तरीण! पालकांना पुरावा दाखवायला असेल बहुतेक. अन त्या मानसीची अवस्था म्हणजे..."उभी दुनया गेली खड्ड्यात! च्यायला एक जरा तासभर पडू द्या रे! " अशी.
माझी मुलगी १ ली त आहे. काल तिची dictation test होती. (दर वीक ला असणार म्हने आता)....तिने काहिच लिहिले नाहि. ती ं=म्हनत होती की मी होमवर्क लिहुन घेत होते. मला खुप टेण्शन आले. फोन केला एका पालकाला.. तर ति म्हणाली, आर्य ने तर लिहिले स्पेलीन्ग्स, ......मला वाइट वाट्ला..रागावले मी मुलीला.... काय करनार....पालकाची जास्त कुतरअओड होतीय...:(
राणी ताई
आपल्याला पहिलीत( फार कशाला नववीपर्यंत च्या सर्व इयत्तांमध्ये) किती मार्क होते हे आता आठवते आहे का? आणि त्याचा आपल्या आयुष्यात किती फरक पडला?
मला इतकेच म्हणायचे आहे कि ज्या गोष्टीचा आयुष्यात काहीही फरक पडणार नाही त्या साठी इतकी आटाआटी कशाला?
>आयुष्यभर मौज मजा करावी आणि जावं निजधामास..
सगळ्यात फर्मास प्रतिसाद! (पण आलीयेत ना ती आता बाहेर...)
मुलांचा कल शोधणं हा सर्वावर एकमेव पर्याय आहे. त्यानं संगोपनापासूनच तुफान मजा येते. मुलाला रेस खेळल्यासारखं वाटत नाही. माझा मुलगा स्वेच्छेनं चित्रकार (ग्राफिक डिजायनर) कसा झाला, त्याच्या शिक्षणाचं कधीही टेंशन आलं नाही आणि त्याचं मस्त चाललंय याची गोष्ट वेळ झाला की लिहीन.
ज्या मुलांना पहिल्यापासुन सक्ती असते जास्त अभ्यास आणि एकही दिवस खाडा न करण्याची ती त्यांच्याकडून शालेय जीवनात पुर्ण राबवताना मी पाहीले आहे.
माझ्या मुलीच्या शाळेत १००% अटेंडंन्स वाल्यांना बक्षिस दिले जाते रिझल्टच्या वेळी. काही आया मुलांना बरे नसले तरी पाठवतात शाळेत. खुप राग येतो अशा पालकांचा. अरे अभ्यासाच समजू शकतो पण बक्षिसासाठी ?
जागू ताई, शाळेत गेल्याने अभ्यास होतो हे (जास्तीत जास्त) अर्धसत्य आहे.
माझी मुलगी बी कॉम च्या पहिल्या वर्षाला फार तर दोन महिने(सगळे मिळून) कॉलेजला गेली असेल आणि कोणताही क्लास नाही तरी तिला सत्तर टक्के मिळाले.( कसे कुणास ठाऊक) आमच्या सौ. नि बराच आरडा ओरडा केला होता( ती पहिलीपासून हुशार मुलात गणली जात असे आणि बर्याच वेळा आदर्श विद्यार्थिनी म्हणून पुरस्कार हि मिळाला होता असे ऐकले) पण त्याने काहीच फरक पडला नाही.( मुलीला माझी फूस आहे असा बराच त्रागा सुद्धा झाला) आता वातावरण निवळले आहे. दोन्ही मुलांनी दहावी पर्यंत फार अभ्यास केला असावा असे वाटत नाही तरीही त्यांचे काहीही बिघडलेले नाही. आता त्यांचे त्यांना कळले आहे कि आपली करियर आपण करणे आवश्यक आहे. बाप आयुष्याला पुरा पडणार नाही. बस इतकेच सांगणे आहे
मी बी.कॉम केले तेंव्हा नोकरी करीत होतो. मुंबईतला ३ तासांचा धकाधकीचा लोकलचा प्रवास, ८ तास नोकरी, नाटकांच्या तालीमी ह्या सगळ्या रगाड्यात कॉलेजची उपस्थिती अशक्यच होती. चारही वर्षे पुस्तके वाचून स्वतःच अभ्यास (सेल्फ स्टडी) केला बी. कॉम केले. मार्क विचारायचे नाहीत. कधी कुठला क्लास लावला नाही पण नापासही कधी झालो नाही. पुढे कोबोल प्रोग्रॅमिंग केले. आखातात आलो. १० वर्षे नोकरी केली आणि स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. आनंदात आहे.
प्रतिक्रिया
आध्यात्मिक गुरू नसावेत बहुतेक
असेलही.
अण्णा म्हणजे नीलमकुमार खैरे
गुरु वगैरे नाही हो, ते माझे
रिक्षा, ट्रक, इ. च्या मागचे
महान साहित्य.
आणखी एक सर्व विश्वाला व्यापून
बरोबर आहे तुमचे, अण्णा म्हणजे
जास्त कोणी रिक्षा वरचे
अलका अलका अलका ...अलका आहे का कोणी ?
अलका अलका अलका ...अलका आहे का कोणी ?
तुम्ही दिलेल्या उदाहरणातले
इतरांनी ते मान्य व्हावचं असा
इतरांनी ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही.हे वाक्य "इतरांना ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही" असं वाचावं :-)अजुन तरी लेकीला या स्पर्धेत
माझा मुलगा सिबिएसी शाळेत
पालकांच्या न्यूनगंडाची लक्षणे!
छान लेख आहे !
सहमत
सेम सेम
आपणच ठरवायचं आहे
केजीत ट्युशन !?
केजीत ट्युशन !?
दडपण नसावे.
मुलाचे शिक्षण आणि व्यवसाय मुलांवर कुठले दडपण असू नये असे वाटते.
हे सगळे पाहिले की ...
हा अंदाज
दीड!
काळजी व गंभीर उपाय करण्याची गरज असलेली समस्या
विनोबा भावेचे कार्य करणारे एक
डॉ.साहेब लेख आवडला आणि
अगदी पटले!
थोडाफार सहमत..
प्रवाहात पडणे वाईट नाही आणि
प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं.प्रचंड सहमत!!! हे वाक्य फक्त मुलांनाच नाही तर असंख्य कॉर्पोरेट जनांनाही लागू पडेल बहुदा!त्या वरून आठवले
बीटेक आणि एमटेक करून साधे एक
खरतर साडेपाच वर्षापर्यंत
बिचारी मानसी
खरेच बिचारी मानसी. इतकी झोप
पिल्लु आजारी आहे.
गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव ....
आईईईग्गं.....
आईग्ग! खरच बिच्चारी गं!
मुलांची शेती
:(
कुतरअओड होतीय
मुलं जन्माला घालूच नयेत
मुलं जन्माला घालूच नयेत त्यापेक्षा!
ज्या मुलांना पहिल्यापासुन
अभ्यासाच समजू शकतो
सहमत.
Pagination