Welcome to misalpav.com
लेखक: श्रीरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

'दुनियादारी'वर चित्रपट्/मालिकेच्या संदर्भात सुशिंनी 'दुनियादारी'च्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहिलेली काही वाक्ये:
मला वाटतं, दुनियादारी ही फसवी कादंबरी आहे. वाचताना, तिच्यावर उत्कृष्ट काही करता येण्याचा अनेक शक्यता निर्माता- दिग्दर्शकांना भारावू शकतात. तिच्यातले पात्रं व प्रसंगांनी अनेक माणसं झपाटली जातात. हे सगळं ठीक आहे. यात चूक काहीच नाही. एक बारईक्शी चूक दिग्दर्शकाच्या हातून 'आत्मपरिक्षणा'अभावी होत असावी! निर्मितीच्या शक्यतेसाठी कादंबरीनिर्माता/दिग्दर्शकाच्या पसंतीस उतरावी लागते; तसंच, निर्मितीच्या यशासाठी कादंबरीलाही निर्माता/दिग्दर्शक भावणं आवश्यक असतं! याव्यतरीक्त, दुनियादारीच्या निर्मितीतला तिचा सर्वात मोठा शत्रू कोणी असेल, तर तो म्हणजे या कादंबरीची अफाट लोकप्रियता! कादंबरीबरहुकूम चित्रीकरण करावं, तर दिग्दर्शकाला 'अ‍ॅरेंजर' झाल्यासारखे वाटतं,मुळातं,बरेच दिग्दर्शक अ‍ॅरेंजरच असतात, ते अलाहिदा. )आणि बदल करावेत, तर वाचकांची वाक्यंच्या वाक्यं, प्रसंग-पात्रं तोंडपाठ! त्यांना जरासाही बदल खपत नाही!
'दुनियादारी' ही 'दुनियादारी' आहे. ती स्वयंभूपणे वाचकांवर राज्य करीत आली आहे. मालिका नव्हती, तेव्हाही ती तिच्या-तिच्या स्वयंगतीने विकली जात होती. मालिका चालू असताना,वा, ती संपल्यानंतरही, 'दुनियादारी' विकली जात राहील्च! तिला असल्या कुबड्यांची गरज नाही. फायदा झालाच, तर तो कादंबरीच्या वाचकप्रियतेचा मालिकेला होईल; मालिकेचा कादंबरीला नाही!
तरीही एक स्वतंत्र कलाकृती म्हणुन चित्रपट मला बघायचा आहे.

तरीही एक स्वतंत्र कलाकृती म्हणुन चित्रपट मला बघायचा आहे.
जरुर बघा. चित्रपट नक्की आवडेल. आपलं होतं काय, एक तर आपण मुळ कलाकृतीने प्रचंड झपाटलेलो असतो किंवा मग आपण मनातल्या मनात त्या मुळ कलाकृतीचे आणि त्या कलाकाराचे "लॉयल" रसिक आहोत हा अहं कुरवाळत असतो. अशा वेळी त्या मुळ कलाकृतीला ठीगळं लावण्याचा प्रकार झाला किंवा मुळ कलाकाराला नावं ठेवली गेली की आपला अहं दुखावतो. आणि मग आपण चवताळून उठतो. अशा वेळी ती मुळ कलाकृतीसुद्धा कल्पनाविलासच आहे हे आपण विसरुन जातो.

लॉयल असल्याचा अहं?? वाट्टेल ते.. नुसते कादंबरीचे नाव वापरून लोकांची उत्सुकता चाळवायचे, आणी स्वतःला वाटेल तशी कथा वळवायची, या खोटारडेपणाला नावं ठेवण्यात कसला आला आहे अहं?? आणी एवढीच खाज होती मांडलेकर-जाधव मंडळींना तर दुनियादारी नाव तरी का वापरावं? वेगळ्या नावानी काढायचा चित्रपट..

मालक, मांडलेकरांनी शिरीनचं साईनाथबरोबर लग्न लावण्याचा घाट घालून आणि त्या लग्नात नाटयमयरीत्या श्रेयसला उभा करुन, मारधाड करुन नंतर श्रेयस आणि शिरीनचं लग्न लावून दिलंय. "दुनियादारी"च्या वाचकांच्या दृष्टीने त्यांचा अक्षम्य अपराध आहे हे मलाही मान्य आहे. कारण मी ही "दुनियादारी"च्या भक्तांपैकी एक आहे. ही फसवणूक झाल्याची भावना तुमच्या मनावर स्वार झालीय त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तो तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. परंतू तुम्ही जो स्ट्राँग निगेटीव्ह रीव्ह्यु दिलाय तो प्रमाण मानल्यामुळे इथले बरेच जण एक चांगला मराठी सिनेमा पडद्यावर पाहण्याच्या अनुभवापासून वंचित राहणार आहेत. शेवटी एक लक्षात घ्यायला हवं की हा चित्रपट दुनियादारी या कादंबरीवर "आधारीत" आहे, दुनियादारीचं "लाईन बाय लाईन" रुपांतर नाही. :)

मी मुळातली कादंबरी वाचलेली नाही. पिच्चर मी अस्सल "चि. मा." असल्याने टी व्ही वर पाहीन कदाचित. पण मी १९७० च्या दशकात स प जवळून पाहिले आहे. मला स प एक सपक कॉलेज वाटत असे. त्यात हे ग्यांग वगैरे प्रकरण असावे असे वाटत नाही. उदय विहार मधे काही " पडीक" पोरं त्या काळात दिसत पण यातील ग्रूपस जर ग्यांग या सदरात मोडणारे असतील तर मूळ कादंबरीच फार काल्पनिक असावी असे वाटते.

फेसबूकवर माझ्या बरेच मित्रांना चित्रपट आवडला असेच अपडेटस आहेत.. आणि ते अपडेट्स प्रामाणिकच असतात, आवडला तर आवडला नाही तर दे दणादण शिव्या.. जवळपास सर्वच जणांनी ते "टिकटिक" गाणे देखील उचलून धरलेय.. हे सर्व मित्र २२ ते ३० च्या वयोगटातले आणि त्यातील कित्येक असे असावेत की दुनियादारी पुस्तक वाचणे तर दूर असे काही पुस्तकावरून हा सिनेमा आहे हे देखील माहित नसावे.. :)

मुळात कादंबरीच इतकी सशक्त आहे की वाचत असतानाच डोळ्यासमोर ती पात्र अगदी चित्रपटासारखी अवतरतात्,त्यामुळे चित्रपट बघण्यापेक्षा पुन्हा एकदा कपाटातली दुनियादारी काढुन वाचावी हेच उत्तम.

जाधव ने आधीच म्हटले होते हा सिनेमा कादंबरी वर आधारीत नसून प्रेरित आहे , मुळात आजच्या कॉलेज मधील १६ ते २० वर्षांची बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या मुलांना दुनियादारी नावाचे मराठी साहित्यात एक वादळ ७० च्या दशकात येउन गेले ह्याची ह्या सिनेमाच्या निमित्ताने माहिती होईल , कदाचित हि कादंबरी वाचण्याचा ते प्रयत्नही करतील , आज ३० उलटलेले अनेक महाभाग आहेत त्यांना सुशी व दुनियादारी माहिती नाहीत , आजही अनेक विचारजंत सुशी ह्यांच्या कादंबर्‍या वाचतात पण त्यांना दिवाणखान्यात मानाचे स्थान देत नाही , तेथे ठरावीक पुस्तके हटकून आढळतात. ज्यांचे नाणे खणखणीत आहे ते पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यावर आधारित पांचट शिनेमा जर गर्दी खेचू शकतो म्हणजे मूळ कलाकृती काय ताकदीची होती ह्यांची सगळ्यांना कल्पना येते. सुशी ह्यांच्या कादंबऱ्यांतील एखादा उतारा शाळेच्या पाठ्यपुस्तकात आला पाहिजे असे मनापासून वाटते. राहिला प्रश्न म्हातारे अवजड देहयष्टी असलेले नट त्यांना इलाज नाही , आमचा खारघर चा इम्रान हाश्मी संतोष जुवेकर , ह्या शिनेमात हवा होता. असे राहून राहून राहून वाटते हा शिनेमा जाधव ह्यांनी केला असला तरी त्यापुढे रवी हे नाव नसल्याने अभ्यासपूर्ण कलाकृती सादर करण्याची अपेक्षा बाळगले हे अती होते. डेविड चा चष्मे बद्दूर हा पराजाप्यांच्या मूळ सिनेमा एवढा सरस का नाही झाला असा टाहो कोणी फोडला नाही कारण जरी डेविड परांजपे ह्यांचा अनेक क्लासिक सिनेमात त्यांचा सहाय्यक होता. बेडकी ची म्हैस व पालीची मगर होणे शक्य नाही हे माहिती असून सुद्धा ह्या सिनेमाला जातांना त्यांच्या मर्यादा व दिग्दर्शकाची कुवत लक्षात घेऊन त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा अपेक्षा करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे आहे. त्यापेक्षा डे डी ला जाऊन त्यावर काही खरडले असते तर आमच्या सारख्या पैलतीरी लोकांना कोमल सारख्या तस्सम लोकांवर विसंबून राहावे लागले नसते. ताजा कलम ज्यांनी child plays , पहिला आहे त्यांनी झपाटलेला भाग १ व २ वर टीका केली नाही महेश चे शिनेमे जसे असतात तसे ते होते. म्हणूनच ते पहिले गेले म्हणजे सहन केले गेले. ह्याच तत्त्वानुसार ज्यांनी चेकमेट, रिंगा रिंगा पाहून सुद्धा मल्टीप्लेक्सेस मध्ये सिनेमा छोट्या पडद्यावर येण्याची वाट न पाहता मोठ्या पडद्यावर पाहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो पाहून उगाच आता त्याच्यावर चिखलफेक करू नये. एक सिनेमा म्हणूनच तो पाहावा .

ही कादंबरी आमच्याकडे आहे पण १५ पाने वाचल्यानंतरही त्यात विंट्रेष्ट वाटेना! मग नाही वाचली. आता शिनेमा हा नेहमीचा शिनेमा म्हणूनच बघीन. या पुस्तकावर आधारीत म्हणून नाही बघणार.

रच्याकने इतक्या संमिश्र प्रतिक्रिया पाहून दुनियादारी पाहण्याची रिस्क घेतोय. कितीतरी आवडत्या पुस्तकांचे सिनेमे बनवल्यानंतर त्यांची झालेली वाट पाहिली, आणखी एकाने काय फरक पडतो. अवांतरः आपण तर बुवा कोणी मायचा दिग्दर्शक सुशिंच्या चारही मानसपुत्रांना एकत्र एका कथेत गुंफून सिनेमा बनवतोय याचीच वाट पाहतोय्.(होय कि नाय रे धम्या?;))

आपण तर बुवा कोणी मायचा दिग्दर्शक सुशिंच्या चारही मानसपुत्रांना एकत्र एका कथेत गुंफून सिनेमा बनवतोय याचीच वाट पाहतोय्.(होय कि नाय रे धम्या?smiley)
नक्की का? की सलोनीला पडद्यावर पाहायची सुप्त ईच्छा या निमित्ताने व्यक्त्त करताय ? ;)

सावध केलेत मानून मनापासून आभार खरे पुस्तक जनी वाचले त्यांना हे बदल खपणार नाहीत, त्या मुले न जाणेच चित्रपट बगायला चागले. उगाच जाऊन चुकल्या सारखे वाटायला नको काही वर्ष पूर्वी मणजे जेवा झी मराठी चा अल्फा मराठी हे नाव होते तेवा "दुनियादारी" हि मालिका लागायची. पण ती मधेच बंद करण्यात आलि. त्या मालीकातले काही पत्रे अजून लक्षात आहे DSP - दिग्या - संजय नार्वेकर, शिरीन पटेल - शर्वरी जेमिनीस , त्यातला दिग्या अजून मनात घर करून आहे. आणि जर सुहास शिरावाकारचा पुस्तक फिल्म न बनवनेच चागले. i.e : येता जाता , बरसात चाद्ण्याची

पत्नीहट्टामुळे चित्रपटाची तिकीटे काढायला काल गेलो होतो पण एका चित्रपटग्रुहात हाऊसफुल आणि दुसर्‍यामध्ये पहिली रांग होती म्हणुन गेलो नाही. आज तुमचे परिक्षण वाचुन देव करतो ते भल्यासाठीच करतो यावर विश्वास बसला. :) आजच जाताना वाचनालयातुन दुनियादारी घेऊन अजुन एक पारायण करतो. बाकी पत्नीहट्ट पुरवण्यासाठी 'काट्कोन त्रिकोण' ची तिकिटे काढली आहेत. कसे आहे हे नाटक एनी आयडीया?

काटकोन त्रिकोण नाटक चांगले आहे. ट्विस्टचा जरा अतिरेक केलाय शेवटीशेवटी, पण ऑन द होल चांगले एंजॉयेबल आहे. डायलॉग्स उत्तम आहेत.

पण एका चित्रपटग्रुहात हाऊसफुल आणि दुसर्‍यामध्ये पहिली रांग होती म्हणुन गेलो नाही.
यातच आलं नाही का? इन फॅक्ट काल हा चित्रपट पुण्यातल्या बर्‍याच थेटरात हाउसफुल होता. माझा भाऊ दोन तास वणवण करुन दिवसभराचे सारे शो हाऊसफुल आहेत हे ऐकून आला. "पीअर प्रेशर" हा प्रकार इतका इफेक्टिव ठरु शकतो याचं आश्चर्य वाटत आहे. :)

धन्यवाद बॅटमॅन. धन्या, पीअर प्रेशर, जाहीरातबाजीमुळे तर फरक पडतोच शिवाय काल असे लोक (तरुण, तरुणी) पण पाहिले की जे फक्त आणि फक्त चित्रपट बघण्यासाठी आले होते. भाग मिल्खा भाग हाऊसफुल आहे मग दुनियादारी द्या, दुनियादारी हाऊसफुल आहे मग रमय्या वस्तावया (का काय ?) तो द्या. त्यांना काहीही करुन कोणता का होईना पण चित्रपट बघायचा होता.

त्यांना काहीही करुन कोणता का होईना पण चित्रपट बघायचा होता.
नाहीतर अन-कूल , वेडे किंवा गावंढळ ठरतील ना! वीकेंडला पिच्चर नै पाहिला तर काय खाक वीकेंड साजरा केला???इ.इ.इ.

असे लोक (तरुण, तरुणी) पण पाहिले की जे फक्त आणि फक्त चित्रपट बघण्यासाठी आले होते.
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो, 'आज आपण पिक्चर बघायला जाऊ. मी एकदम शेवटच्या रांगेतील एकदम कोपर्‍यातील दोन तिकिटे काढतो.' प्रेयसी: 'आणि अशी तिकिटं नाही मिळाली तर?' प्रियकरः 'पिक्चर पाहूsss..!.'

चित्रपट बघुन ठरवीनार की तो चांगला आहे की वाईट ..... आणी श्रीरंग साहेब, चित्रपट निरीक्षण करताय ..तेव्हा किमान अपेक्षा आहे की spoiler alert ठेवावा .. ईथे बर्याच लोकांनी कांदबरी वाचली आहे पण चित्रपटात जे बदल केले गेले आहे असे ऊघड करायला नको होते..

अर्र्र.. तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. spoiler alert च मुद्दा लक्षातच आला नव्हता. क्षमस्व. यापुढे काळजी घेण्यात येईल.

चित्रपट पहायला गेलो. काल सलग चार थेटरात हाऊसफुल ऐकून परत आलोय. रिक्षेला दिलेल्या पैशात पिक्चर बघून झाला असता या विचारानेच दडपण आलं. दुनियादारी बघायला सकाळी साडेअकराला म्हणून आम्ही जे बाहेर पडलो ते इथे तरी मिळेल तिथे तरी मिळेल म्हणून पळापळ करुन शेवटी संध्याकाळी साडेसातच्या शोसाठी सुद्धा दुपारी दोन वाजता हाऊसफुल ऐकलं तेव्हा नाईलाजाने घर गाठलं.

चित्रपटकर्त्यांचा खोटारडेपणा मला व्यक्तिशः कितीही आवडला नसला, तरी एका मराठी चित्रपटाबद्दल हे वाचून खरोखर खूपच बरं वाटलं. :)

+११११११११११११. अगदी असेच म्हणतो. तेलुगु अन तमिळ पिच्चरसारखे मराठी पिच्चर कधी हौस्फुल्ल होतील देव जाणे.

रिक्षेला दिलेल्या पैशात पिक्चर बघून झाला असता या विचारानेच दडपण आलं.
आधी इंटरनेटवरून तिकीटे काढावीत असे सुचवतो. ;)

चित्रपट पाहणारा वर्ग हा कादंबरी वाचणार्या वर्गा पेक्षा खूप मोठा आहे. आणि चित्रपट जर आर्थिक दृष्ट्या यशस्वी करायचा असेल तर तो class पेक्षा पिटातल्या public ला पटेल असा बनवावा लागतो... उत्तम उदाहरण म्हणजे "3 idiots ". अमीर खानचे पात्र चित्रपटात खूपच यशस्वी दाखवले आहे पण मूळ कादंबरी मध्ये तसे नाही दाखवले. मला वाटते कि दुनियादारी बाबतही तसेच काहीसे बदल केले गेले आहेत. आणि माझ्या तर सर्व मित्र मैत्रीणीना हा चित्रपट खूप आवडला ( वयोगट १६ ते २६ ) आणि त्यापैकी एकानेही कादंबरी वाचलेली नाही....

दुनियादारीवर चित्रपट येतोय हे समजताच तो बघायचा नाही हे ठरवले होते. माझ्या डोक्यात घट्ट बसलेली दुनियादारी मी स्वतः पडद्यावर आणायची म्हटली तरी जमणार नाही

श्रीरंगजींच्या ह्या परीक्षणानंतर "दुनियादारी" पुन्हा वाचली, आणि पटकथा लेखक, दिग्दर्शक ह्यांची मजबूरी कळली.. सुशिंनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, ही एक अत्यंत फसवी कादंबरी आहे. वरकरणी धुमाकूळ, मस्ती असलेल्या ह्या कादंबरीत कुणाच्याच नशीबी सुखांत नाही. मग ते श्रेयस-मिनु-शिरीन असो, मीरा सरदेसाई-श्रेयस गोखले- एम. के. - तळवलकर असो, दिग्या - सुरेखा असो की अगदी एका प्रसंगापुरते आलेले अपर्णा भालेराव - मनीष जाधव असोत. श्रेयस शिरीनऐवजी मिनुकडे का जातो, शिरीनला श्रेयस आवडत असतांनाही ती धीरुभाईशी लग्न का करते, कादंबरीत शेवटी शेवटी मिनु आणि शिरीन दोघीही त्याच्याकडे यायला तयार असतांना श्रेयस त्यांना का नाही म्हणतो इत्यादी गोष्टी कादंबरी वाचल्यावरच कळतात. चित्रपटाला दुनियादारीतली भावनिक गुंतागुंत आणि बारकावे दाखवायला जमणं जवळपास अशक्य आहे.. पात्रांच्या परस्पर संबंधातली अंडरकरन्ट्स दाखवणंही फार कठीण. ते दाखवायला अभिनेत्याला, दिग्दर्शकाला जमायला पाहीजे, आणि प्रेक्षकांनाही ते "कन्व्हिंसींग" वाटलं पाहीजे.. कशाला एवढा त्रास घ्या मग? शिरवळकर थोडीच "समिक्षक-मान्य" होते.. करा मग राडा. (कहर म्हणजे "ह्या चित्रपटाच्या म्युजीक रिलीजला "सुहास" उपस्थित होते." हे वाचण्याचं दुर्दैव नशीबी आलंय. अरे, बातमी देतांना जरा अभ्यास / विचार कराल की नाही !? तर, आम्हाला चिन्मयबुवांची मजबूरी कळलीय. ती आम्ही समजूनही घेतोय. फक्त मायबाप रसिकांना एकच विनंती आहे, की चित्रपट पाहील्यावर ही कादंबरी वाचा. चित्रपटाचं यश त्यांचं त्यांना लखलाभ होवो, पण "दुनियादारी" म्हणजे "कॉलेजात जाणार्‍या पोरापोरांची टगेगिरी" असं चित्रपट पाहून वाटलं, तर तुम्ही चुकताय.. बाकी प्रकाशनापासून गेल्या एकतीस वर्षांत कॉलेजात जाणार्‍यांच्या आवडीनिवडीत आणि एकंदरीत सामाजिक परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक पडला, लेखकाला "त्याच्या लिखाणात काही साहित्यमुल्य आहे का?" म्हणून नाकारलं गेलं असलं तरी तितक्याच आवडीने दर तरुण पिढीला आवडणार्‍या "दुनियादारी"ला सर्टीफिकेट्सची गरज नाहीय, हेही तितकंच खरंय.. :-)

ज्जे बात! "उलटा प्रवास" म्हणजे चित्रपटावरून कादंबरीला जोखलं जाण्याची शक्यता लक्षातच आली नव्हती...

सुशि पासुन नेहमीच लांब राहिलो कारण ओरिजिनॅलिटी यथातथाच वाटायची... कारण आधिच इतरांचे अनुवादित साहित्य जास्तच वाचलं गेलं होतं. दुनियादारीच्या नादि मात्र न लागण्याचे एकमेव कारण म्हणजे भर तारुण्यात व्यसनाधिन बनलेला एक आप्त सदानकदा या कदंबरिच गुणगान करायचा म्हणुन तर विषेश तिटकारा. आजच हा चित्रपट बघुन आलो. रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा, खोलि सोडा आगापिछाच नसलेलि पात्रे वगैरे कमकुवत बाजु उच्च निर्मीतिमुल्ये, सुरेख अभिनय व काही संवाद यांच्या जोरावर शेवटपर्यंत बसणे सुसह्य करतो इतकच.

बाकी सुशि नै वाचले पण दुनियादारी वाचवली नाही ती अशाच काहीशा कारणांमुळे. कॉलेजात जास्तीत जास्त पोरे करू तरी काय शकणार-गँगबाजी. लिहा गँगबाजी. असे काहीसे वाटले. असो.

सुशि नै वाचले पण दुनियादारी वाचवली नाही अगदी अगदी. खूप बोलबाला असल्यानं एवढ्यातच ते पुस्तक आणलं गेलं पण मी कॉलेजात असतानाही ते भावलं नसतच. कुठेच कनेक्ट होत नव्हते. नुकतच झिम्माही वाचलं. नाटकाच्या संदर्भात असलेलं तरी कुठे सगळं आपण रिलेट करू शकतो? पण काहीतरी असं होतं की ज्यामध्ये थोडंफार गुंतता येईल. आता सिनेमाबद्दल जितकं जास्त बोललं जातय तितकं ते पुस्तक वाचावसं वाटण्याऐवजी नकोसं झालय. मला जसं वाचवलं नाही तसं आणखी कोणालातरी वाटलं म्हणून बरं वाटलं. ;)

माझ्या दुनियादारी कॉलेज लाईफ 'कसं असतं' यापेक्षा ते बहुसंख्यांना 'कसं असलेलं सांगायला आवडलं असतं' त्याचं वर्णन आहे. आणि त्या दृष्टीकोनातून पुस्तक नेमकं आहे!

उच्च निर्मीतिमुल्ये, सुरेख अभिनय व काही संवाद ? उच्च निर्मीतिमुल्ये ? चकचकीत कपडे आणि चांगली सिनेमॅटोग्राफी असली की उच्च निर्मीतिमुल्ये ?? एक अंकुश चौधरीचा अभिनय सोडला तर इतर कोणी अभिनय केला आहे का ? >>रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा....यावर काहीच म्हणायचे नाहिये ..कारण मला एकहि व्यसन नसून , गुंडगिरी करत नसून देखील मला दुनियादारी आवडते

चकचकीत कपडे आणि चांगली सिनेमॅटोग्राफी असली की उच्च निर्मीतिमुल्ये ??
आणखि काय असते ? तांत्रिक सफाइ अन स्पेशल इफेक्ट्स खरोखरच सुरेख आहेत. म्हणूनच चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बघताना अगदी फ्रेश वाटते. उगाच चायनिज फोन मधुन शूटिंग केलेल्या प्रिंटसारखे दिसणार्‍या अनेको मराठि चित्रपटांपेक्षा हजारपटिने सरस आहे.
रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा....यावर काहीच म्हणायचे नाहिये ..कारण मला एकहि व्यसन नसून , गुंडगिरी करत नसून देखील मला दुनियादारी आवडते
मी चित्रपटाच्या कथेबाबत बोललोय कादंबरी न्हवे. तसही निव्वळ व्यसने व गुंडगिरी आहे या निकशावर मी चित्रपट चांगला अथवा वाइट हे ठरवत नाही. कथेचा गाभा कसा आहे हे महत्वाचे असते त्याला दिलेली फोडनी न्हवे. उदा. डि-डे चित्रपट, अतिशय बकवास वाटला.

दिग्याची इलेक्ट्रा आणि प्रीतमची क्लासिक दोन्ही मॉडेल नव्हते त्या काळात .. येझदी, जावा किंवा स्टँडर्ड बुलेट दाखवायला हवी होती

फक्त एकच म्हणेन तुम्ही 'दुनियादारी' मुळे बदलु शकता पण तुम्ही 'दुनियादारी' बदलु शकत नाही

'दुनियादारीच्या' हाऊस फुल्ल यशाच्या निमित्ताने आज झी टिव्हीच्या स्टुडिओत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात जो केक कापला गेला त्यावर 'हाऊस फुल्ल' चे स्पेलींग 'HOSE FULL'. असे पाहून हसावे की रडावे हेच कळेना. 'दुनियादारी'ची टिम आनंद जल्लोष साजरा करीत आहे आणि झी टिव्ही HOSE FULL चा केक मिरवते आहे असे केविलवाणे दृष्य झी २४ वर दाखविले जात आहे.

मी ह्या चित्रपटाच्या प्रिमीयरला गेले होते, पराच्या चेतावनीनंतरही. मनसोक्त शिव्या घालुन आले. कलाकारांनी ऐकल्याही. स्पेशली ज्तेंद्र जोशेए. मान वळवु वळवुन पाहत होता मागे. :ड

भारीच की ! "ना तुम जानो ना हम" नावाच्या भिक्कार पिक्चरच्या शो ला हेमा मालिनी आणि इशा देओल असताना आम्ही शिव्या घातल्या होत्या ..मग आम्हाला बाहेर काढला ... बाकी प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर "नशीबवान आहेत , सुटले !" असे भाव होते ..