आमच्या कॉलनी बाहेर कुत्र्याचं एक छोट्टसं पिल्लू पाहिलं होतं. आपलं माणसांच पिल्लू असतं तसं एकदम गोंडस, पाहताच उचलून घ्यावं असं. टेनिसच्या चेंडू एवढा तरतरीत चेहरा, भाऊक आणि बोलके डोळे. पण बिचार्याच्या कमरेवरून गाडी गेली होती बहुतेक. कमरेतून लुळं होतं. फक्त पुढच्या दोन पायांच्या आधारे, कमरेखालील भाग घासत फिरत होतं. मी स्वतः गाडीत होतो आणि कुठेतरी चाललो होतो. त्या पिल्लाने माझ्या मनांत घर केलं होतं. जवळच पशू डॉक्टर होता. मनाला चुटपुट लागून राहीली. त्या पिल्लावर उपचार करावेत. एक्स-रे काढून, ऑपरेशन करून शक्य असेल तर त्याला पुन्हा चारही पायांवर उभं करावं. त्याच्या पुढे डोंगरा एवढं आयुष्य आहे. हे विचार कांही केल्या पाठ सोडेनात. पुन्हा घरी परतताना त्या पिल्लाला खुप..खुप शोधलं. पण कुठे दिसलं नाही. असं वाटलं, खड्यात गेलं आपलं काम, जेंव्हा दिसलं तेंव्हाच का नाही विचार आचरणात आणले?
आज ह्या गोष्टीला ७-८ वर्षे होऊन गेली पण ते, आपल्याला काय व्याधी आहे, आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत ह्याची सुतराम कल्पना नसलेलं, बालपणाच्या निष्पाप आनंदी स्वभावाने, कमरेखालील भाग घासत, बागडणारं पिल्लू नजरे समोरून हटत नाही. जेंव्हा जेंव्हा आठवण येते मनास फार अपराधी वाटतं.
आजच्या (आतापर्यंत) अपराधांची यादी.
१. बिल्डींगच्या खालीच गाडी काढताना दोन-तीन लूत भरलेली कुत्री पायाशी आली. त्यातल्या एकाच्या अंगावरचे पुर्ण केस झडले होते आणि आतल्या लालसर कातडीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या तर एका कुत्रीच्या शेपटा खालचा भाग अक्षरशः कुजला होता.
२. समोरच्या वळणावर स्वतः देखिल कचर्याचाच भाग वाटणारे दोन माणसं टोपलीत कचरा भरून ट्रकमध्ये टाकत होते. एक-दोघं जण त्या कचर्याच्या ढिगावर उभं राहून तो वर ओढत होते.
३. थोडसं पुढं गेल्यावर एका दुकानासमोर, सोडलेल्या गाईंनी घाण करून ठेवली होती. आणि दुकानदार त्यांना हाकलण्यासाठी एक फळकुटं घेउन मारत होता.
४. सिग्नलला एक म्हातारा भिकारी थोटे हात दाखवून भीक मागत होता.
५.....
चकचकीत ऑफीसमधून परत संध्याकाळी घरी जायचय.
:(
प्रतिक्रिया
छान....
वेदना हि सर्वत्र भारलेली आहे,
+१
अपराधी मन.
हम्म..
छान लिहिले आहे.
धन्यवाद
खूपच सुंदर !