Welcome to misalpav.com
लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छान लेखन. बरण्यांतल्या पदार्थांची यादी आणि त्याच्यासमोरुन जाणार्‍या मुलांची मनःस्थिती वाचून स्वतःच्या लहानपणी अस्सेच बरण्यांकडे आशाळभूतपणे बघण्याचे दिवस आठवले. सर्वच मुलांच्या बाबतीत गरीबी म्हणूनच असं व्हायचं असं नाही. घरचं ठीकठाक असूनही मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत लहान गावांत तरी नव्हती. दुकानाचं वर्णन एकदम फिट्ट..

घरचं ठीकठाक असूनही मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत लहान गावांत तरी नव्हती.
हे बाकी खरं! १-२ रुपये मागतानाही भीती वाटत असे असा काळ अजूनही आठवतोय :)

आमच्या इथे पण असेच एक दुकान होते. दुकानाचे नाव होते "प्रपंच भांडार". पण सगळे लोक त्याला लक्ष्मन बुरुडाचे दुकान म्हणायचे. तिथे पाहिजे ती गोष्ट मिळायची. पण आम्हाला लहानमुलांना तिथे मिळायचा भवरा,गोट्या, पतंग,भिंगरी, गोळ्या, १० पैशाची ३ छोटी बिस्कीट, खायची भिंगरी, लिमलेटच्या, दुधाच्या,साखरेच्या,श्रीखंडाच्या आणि पेपर मिंटच्या गोळ्या, देवाचे व हीरोचे फोटो, प्लास्टिकचा बॉल . कधी घरच्यांनी ५० पैसे दिले तर तिथे सोरट होते. त्याच्याकडे कित्येक स्कीम यायच्या, उदा. रामायण,शेहनशहा. आता गाव, शहर झाले आहे. बुरुड पण वारला …. त्याच्या दुकान करून टेम्पो घेतला …असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ।

धन्यवाद अनिरुद्ध प, प्रसाद१९७१, मोहनराव,गवि, बॅटमॅन, दादा कोंडके, अमित तलथि जी आपण माझा लेख वाचल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आभारी आहे -सार्थबोध

तुमचा लेख आवडला आणि उपक्रम सुद्धा.. आमच्या गावाला पण असेल एक दुकान होते, त्याची आठवण झाली. उन्हाळ्यात गावाला गेल्यावर आज्जी आम्हा मुलांना १-१ रुपया द्यायची आणि मग ते घेउन त्या दुकानातुन आम्ही बॉबी घेउन खायचो. मस्त दिवस होते ते. :)

खुपच सहि झाला आहे हा लेख. माझ्या चुलत मामचे असेच दुकान आहे. खुप आठवनि ताज्या झाल्या.. लिहित रहा...अनि आप्ल्या उपक्रमाला शुभेच्च्या...

धन्यवाद इस्पीकचा एक्का, मृणालिनी, सुजित, मन१ जी आपण माझा लेख वाचल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियांबद्दल मी आभारी आहे

असंच..अगदी असंच दुकान माझ्या सख्ख्या मामाचं आहे. लहानपणी आजोळी गेल्यावर तुम्ही वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. नॉस्टॅल्जिक झालो एकदम. :)

छान वर्णन केलय.. हरिकाका आणि मगनकका आठवले गिरगावातले शाळेसमोरचे! अवांतर - >>आजकालच्या लहान मुलांना वस्तू चटकन आणि इतक्या सहज उपलब्ध झाल्या आहेत कि त्यांना या असल्या दुकानाची मजा; आणि >>किती आनंद झाला असेल? तो त्या वहीत मांडलेला मला माझ्या पुढच्या भेटीत नक्की दिसेल. पुढच्या शाळेच्या भेटीत अजून काही पैसे.. गज्याकडे ठेवायचे आणि हा आनंद वृद्धिंगत करत राहायचा असा मानस आहे आता बघा, प्रश्न तुमचाच आणि उत्तरही तुम्हीच दिलेत. अहो, आजकालचे आईवडिल मुलांच्या डोळ्यात हाच आनंद शोधतात आणि त्यांना परवडतं म्हणून आणि परवडत तेच घेतात. आता पूर्वी इतकी अपत्यही नसतात संख्येने.. :)