Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद प्रसाद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मलाही हे पुस्तक आवडले. फक्त काही गोष्टी (मला) माहित नव्हत्या त्याबद्दल खोलात जाऊन केलेली चर्चा कंटाळवाणी वाटली. ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांना नाही वाटणार.

विजयाबाईंचा सशक्त अभिनय 'अखेरचा सवाल' नाटकात पाहिला आणि मी त्यांचा पंखा झालो. दुर्दैवाने 'हमिदाबाईची कोठी' पाहायला मिळाली नाही. पुढे आखातात आल्यावर मराठी नाटकाचा संबंध तुटला तो आजतागायत. मध्यंतरी त्यांच्या नाट्यशिबिराची जाहिरात पाहून तिकिट घेतले आणि गेलो होतो. मी वगळता बाकी सर्व जण मराठी आणि हिन्दी नाट्यसृष्टीतील आणि सिरियल्स मधील कलाकार होते. शिबिरात कांहीही विशेष नव्हते. 'बेसिक्स' वर उथळ चर्चा होती. आणि पुढे अशीच अभिनय शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन होते. पुढे ते कधी पूर्ण झाल्याचे ऐकिवात नाही. सर्व कलाकारांच्या मनांत मात्र विजयाबाईंसाठी भरभरून आदर दिसून आला. तो योग्यच होता.

झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.
हा "आकृतीबंध" पाहून माझं डोकं उठलं आणि वाचणं बंद केलं. मला नानू सरंजाम्याच्या आत्मचरित्राची आठवण झाली. असाच एक प्रयोग श्री. ना. पेंडश्यांच्या आत्मचरित्रात आहे. पेंडशांच्या जिवलग मित्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून सगळं आत्म(?)चरित्र लिहिलं आहे. . "सोनाली शेरतुकडे*" कोण याचा आता उलगडा झाला! *बाई आडनावात गेली :)