थोडं शब्दबंबाळ वाटलं लिखाण.
>>श्रीसमर्थ तुम्हा आम्हांस लोकमान्य टिळकांसारखेच समर्थ, राष्ट्रभक्त, विरक्त, सशक्त, नीतीमान, तीव्र बुद्धिमान, कणखर, खंबीर, धीरोदात्त, धूर्त, साक्षेपी, राजकारणी, सिद्ध, नि:स्पृह, नि:ष्काम कर्मयोगी करोत अशी त्यांचे चरणी कळवळून प्रार्थना...
-- समर्थांनी त्यांच्या काळात जे करायचं ते व्यवस्थीत केलं. दासबोधासारखा मार्गदर्शक ग्रंथ रचला. टिळकांनी राष्ट्रोद्धाराची हिम्मत दाखवली म्हणुन त्यांना दासबोधातलं ज्ञान काहि कामात आलं. याऊपर समर्थांनी आणखी काय करायला हवं?
अर्धवटराव
समर्थ आपल्याला अमुक अमुक बनवोत अशा प्रार्थनेपेक्षा समर्थांनी लिहून ठेवल्यानुसार आचरण आम्ही करू ही प्रतिज्ञा अधिक योग्य ठरावी. महामानवांनी त्यांचे त्यांचे कार्य त्या त्या काळात करून ठेवलेलेच आहे. सांप्रतच्या काळानुसार आवश्यक तेव्हढेच बदल करून त्यांची शिकवणूक आचरावी हे उत्तरदायित्व आपले.
लोकमान्यांचे हे सर्व विचार वाचून कोणालाही त्यांचे जडणघडणीतील खरे आदर्श कोण होते हे कळाल्यावाचून रहाणार नाही!
तुमचा हा लेखन प्रपंच केवळ वरील वाक्य ठासून सांगण्यासाठी आहे हे कुणीही सांगेल.
असो. महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात हे पुन्हा एकदा लक्षात आले.
निषेध :-(
मिपा च्या संपादक मंडळानी माझे २ प्रतिसाद काढुन टाकले. सत्य बोलायची पण चोरी झाली आहे. बाहेर तर होतीच पण आता मिपा वर पण
खालचे वाक्य सुद्धा हास्यास्पद आहे.
“स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली!
नै म्हंजे बाकी काही असूदे पण भारतीय असंतोषाचा जनक असे ज्यांना म्हटल्या गेले होते त्यांच्याबद्दल हे वाक्य अतिशयोक्त असले तरी मूलतः असत्य नाही हे लक्षात घ्यावे.
तुम्हाला ही माहिती आहे, इंग्रज का आले आणि का सोडुन गेले ते.
कोणाला त्याचे श्रेय घ्यायचे किंवा द्यायचे असेल तर ठीक आहे.
अगदी १९१० साली सुद्धा १ लाख पण इंग्रज ( कूटूंब ) धरुन भारतात नव्हते. जवळ जवळ सर्व सैन्य आणि पोलिस भारतीय च होते. खरे तर मेजोरिटीला काही तक्रार च नव्हती इंग्रजांबद्दल.
मेजॉरिटी नेहमीच अशी असते. काही किती म्हटलं तरी आहे हे असंच असतं. असो.
अवांतरः लोकमान्यांवरचा रामदासांचा प्रभाव उल्लेखनीय नक्कीच होता. शेजवलकरांच्या लेखात त्यांनी तसे प्रतिपादन केलेले आढळते, ते पटण्यासारखे आहे.
अहो नेता हवाच.. नुसती जनता जाउन लढु शकत नाही.. पण नेत्यांच्या प्रत्येक आवाहनाला जनता साद देत नाही..
स्वातंत्र्याच्या मागणीला एवढा प्रतिसाद मिळाला तो काहीतरी तक्रार होती ईंग्रजांविरुद्ध म्हणूनच.. उगाच १००रु आणि बिर्याणीसाठी लोकांचा पाठिंबा नक्कीच मिळाला नाहिये त्यांना.. आणि तेव्हा तेवढा पैसादेखिल असण्याची शक्यता नव्हती नेत्यांकडे..
स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात सर्वसामान्यांच्या गरजा अतिशय कमी व मर्यादीत होत्या.
इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होण्याचा लढा तसाही कोणा एकाचा नव्हताच. पण त्यात सहभाग मात्र प्रयत्न करणार्या प्रत्येकाचाच होता.
असे असले तरी धागाकर्त्यांनी टिळकांचा जरा जास्तच उदोउदो केलाय. एवढे काही इंग्रज टिळकांना घाबरुन नव्हते. किंबहुना नव्हतेच.
टिळकांची विद्वत्ता खरी दिसते ती गीतारहस्य ग्रंथात. बाकी त्यांचे वैदीक गणित व वेदांचा काळ पंधरा हजार वर्षे मागे नेणे हे आता कालबाह्य झालेले संशोधन आहे. वेदांचा काळ जास्त मागे नेता येत नाही हे आता अलिकडच्या सर्वच संशोधकांना मान्य आहे.
टिळकांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी (= सरवसामान्यांचे नेते) असं म्हटलं जायचं. शिवाय ते मंडालेला तुरुंगात होते तेंव्हा ते सुटून येइपर्यन्त अनेकांनी चपला न घालणे, चहा सोडणे... अश्या प्रकारचे नेम केले होते... असे मी वाचले आहे.
लोकांना त्यांच्यावर होणार्या अन्यायाची जाणीव करुन देण्यात लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारांचा फार मोठा भाग असावा असं वाटतं.
टिळक पंचांगाबाबत मी आत्तापर्यंत फक्त जोक्सच ऐकले आहेत.
पण किती लोक ते वापरतात मला माहित नाही.
शिवाय गणेशोत्सवातही गोंधळच पाहिला आहे. पण म्हणून त्याबद्दल टिळकांना जबाबदार धरायला नकोय.
गीतारहस्य अजून वाचलं नाहीये. त्यामुळे त्याबद्दल काहीच बोलता येणार नाही.
पण 'ऑन पर्सन' इतरांनी लिहिलेले वाचण्यापेक्षा 'फ्रोम पर्सन' वाचणं जास्त बरं आसं वाटतं.
आपण कोठल्या विभगाच्या हे माहित नाही,परन्तु आप्ल्या महिती साठी सान्गतो कि टिळक पन्चान्ग हे कोकणात अजुनही वापरण्यात येते,टिळकान्नी नक्ष्त्राअन्चा ऊत्तम अभ्यास करुन हे पन्चान्ग तयार केले आहे.आणि ते उत्तम आहे असे त्यचा वापर करणारे कोकणी माणसे म्हणतात.
संशोधन कालबाह्य झाले आहे म्हणजे काय? कोणतेही आधुनिक संशोधन आकाशातून पडत नाही. त्याला काहीतरी एक पाया लागतो. प्रत्येक वस्तुनिष्ठ संशोधक आपापल्या परीने पुढील नवीन संशोधनासाठी पायाच तयार करत असतो. त्यामुळे आधुनिक पद्धतींनी काहीही मान्य केलेले असले तरी या जुन्या संशोधनाकडे इतक्या तुच्छतेने पाहू नये असे मला वाटते...
संशोधन तुच्छ लेखण्याचा सवाल नाही. पण टिळकांच्या काळात हडप्पाचा शोध लागला नव्हता, बरीच उत्खनने व्हायची होती. त्यामुळे त्यांनी आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेली विधाने ही आज बर्याच अंशी चूक आहेत असे दिसून येते.
त्यामुळे त्यांनी आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेली विधाने ही आज बर्याच अंशी चूक आहेत असे दिसून येते.
मान्य आहे. पण ती विधाने 'आज' चुकीची ठरत आहेत. त्याकाळच्या उपलब्ध साधनांवरून त्यांनी शक्य ते निष्कर्ष काढले. माझा आक्षेप हा आज झालेल्या संशोधनाचा हवाला देऊन जुन्या संशोधकांची विद्वत्ता मोजण्याला आहे. जुन्या संशोधनाचे श्रेय नाकारण्याचा प्रकार मला उथळ वाटतो.
कॉपर्निकसने त्याचे सिद्धांत चुकीचे ठरवले म्हणून टॉलमीचे महत्व कमी ठरत नाही...
ओके. आणि खरे सांगायचे तर ते पुस्तक वाचल्यास कल्पनाशक्तीच्या भरार्याच जास्त वाटतात. आजची फार परिमाणे लावली नसती तरी तसे जाणवल्याशिवाय राहत नाही. वेदातल्या उल्लेखाचे एक्स्ट्रापोलेशन कल्पनेच्या बाहेर केलेय.
कोपर्निकस अन टॉलेमी चे उदाहरण इथे अप्रस्तुत वाटते. टॉलेमी आजही पूर्ण टाकाऊ ठरणार नाही, कारण अप्रॉक्सिमेशन म्हणून त्यात नमूद केलेले रिझल्ट्स आजही त्या मर्यादेत व्हॅलिड आहेत. टिळकांनी पूर्वसूरींपेक्षा जरा वेगळा अन काही मर्यादेत अजूनही व्हॅलिड असणारा कुठला सिद्धांत मांडला हे वाचायला आवडेल, नपेक्षा तुलना अप्रस्तुत होईल इतकेच म्हणतो. तसे काही वाचायला मिळाल्यास आनंदच आहे.
आपण खूप मोठे अभ्यासक आहात य बद्दल वादच नाही,परन्तु आपण ईन्ग्रजानी जे लिहुन ठेवले त्याच आधारावर लिहीणार कि ऊपक्रम या सन्स्थळावर श्री चन्द्र्शेखर यान्चे आपण हराप्पा मोहेन्जोदरो येथिल जे नवीन सन्सोधन झाले आहे ते तरि अभ्यासावे मग लिहावे निदान आपण लोकमान्याच्या एव्हडे मोठे नेते नाहि याची जाण ठेवावी.
वाह वाह. मी तसाही मूर्खच आहे हो, परंतु वाटल्यास/जमल्यास माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा की. टिळक किती मोठे नेते होते आणि मी कसा फालतू आहे हे वेगळे सांगायची गरज नाही- ते स्वयंसिद्ध आहे आणि मला माहितीदेखील आहे.
तस्मात माझ्या प्रतिपादनातल्या नक्की कुठल्या मुद्द्यात काय चूक आहे ते सांगण्याची कृपा करावी.
माझा प्रतिसाद हा आप्ल्याला व्यक्तिशहा नव्हता,तसेच मी आप्ल्याला विनन्ति केलि होति कि आपण उपक्रमावरिल नविन सन्शोधनाचा अभ्यास करावा मग बोलावे माफ करा लिहावे असे माझे म्हणणे आहे सध्या उपक्रम उप्ल्ब्ध नसल्याने लिन्क देवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व,बाकी जे म्हणणे आहे ते आपली पर्वानगी असेल तर व्य नि करिन.
.....त्यांच्या या ग्रंथाबद्दल महात्मा गांधी कानपूर अधिवेशनात म्हणाले होते की गीतेवर इतक्या अधिकाराने भाष्य करणारा दुसरा ग्रंथ कधी झाला नाही व लवकर होण्याचा संभवही नाही!...
हे वाक्य वाचून, का कुणास ठाऊक, लताबाईंचे 'ऐ मेरे वतनके लोगो' ऐकून पू.पं. न्हेरूंचे डोळे पाणाव्ले, याची आठवण येऊन आमचेही डोळे पाणाव्ले.
“स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली! अशा या लोकमान्यांच्या अंतरंगात डोकावून पाहता आले तर काय भाग्य ठरेल ते!
खरच काही ही लिहिलय राव ...
टिळकांविषयी पुर्ण आदर राखुन ....
साम्राज्यवादाविषयी आणि एकुणच जागतिक राजकारणाविषयी टिळकांचे अंडर्स्टँडींग गांधी इतकेच ढोबळ होते ... उगाचच असल्या मागण्या बिगण्या करुन कुठे स्वातंत्र्य मिळत असते होय ? बिस्मार्क, कैसर विल्यम आणि हिटलर झाले नसते तर असे ५-६ टिळक गोखले परांजपे बघायला मिळाले असते आपल्याला . हे कटुसत्य आहे !! कुठे चेंबर्लिन कुठे चर्चिल अन कुठे आपले टिळक गांधी ... रुझवेल्ट हिटलर स्टॅलिन तर फार दूर राहिले !! ( प्लीज नोट : हे विधान फक्त राजकारणाबाबत आहे . तत्त्वज्ञानाबाबत आपली माणसं लई पुढं होती )
अंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि साम्राज्यवादाची खर्याअर्थाने जाण असणारा व्हिजनरी माणुस एकच ....नेताजी . पण दुर्दैवाने ते फक्त व्हिजनरीच राहिले .
अंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि साम्राज्यवादाची खर्याअर्थाने जाण असणारा व्हिजनरी माणुस एकच ....नेताजी . पण दुर्दैवाने ते फक्त व्हिजनरीच राहिले .
ह्या साठी अगदी मनापासून सहमती. असा द्रष्टा नेता आपल्याला स्वात्रंत्र्यानंतर न लाभणे ह्यासारखे दुर्दैव नाही. जर ते असते तर नक्कीच आजचे चित्र वेगळे असते.
अवांतरः बाकी मूळ लेख वाचला नाही. प्रतिसादही सगळे वाचले नाहीत.
- (नेताजींचा निस्सीम भक्त) सोकाजी
नेताजींच्या मता प्रमाणे जपान जर दुसर्या महायुद्धात जिंकला असता तर भारताचा मांचुरीया झाला असता.
नेता़जींचे कर्तृत्व असले तरी जपान आणि जर्मनी च्या मागे जाणे फार धोकादायक होते.
आपल्या नशीबाने इंग्रज आणि अमेरिका जिंकले, नाहीतर जर्मन आणि जपान्यांनी कत्तल केली असती भारतात.
भावनेच्या भरात काही अतिशयोक्ती झाली असेल तरीही लेख उत्तम आहे, यात वाद नाही. चांगल्या लेखात काही तरी कुस्पट काधून त्यातील शब्दांवर खेळत बसणे , त्यातही आपलाच कंपू जमवून विषय भलतीकडे नेणे हीच गोष्ट काही मिपाकरांना भूषणावह वाटते,असो. वास्तविक लेख दासबोध आणि टिळकांचे जीवन असताना " आर्टिक होम इन वेदाज" वर घसरायचे काय कारण होते का ? पण तेव्ह्ढ्यावर थांबले नाही, त्याचाही काथ्याकूट ! या असल्या कम्पूबाजीमुळे मिपावर अ़क्षर: असार सोडून सार शोधावे लागते, आणि मग जाम कंटाला येतो.
असो , मूळ लेखाकडे.. टिळक हे सर्वार्थाने समर्थांचे महंत होते असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्याकाळातील अनेक महापुरुषांनी दासबोधापासून राष्ट्रकार्याची प्रेरणा घेतली हे खरेच आहे.
दासबोधात वर्णन केलेला कर्मयोग आणि गीतारह्स्यांत टिळक महाराजांनी गीतेचे केलेली प्रुव्रुत्तीवादी टिका यात कमालीचे साम्य आहे. गीतारहस्याचे दुसरे नावच मुळी " कर्मयोगशास्त्र" असे आहे. गीतारहस्यमध्ये अनेक ठिकाणी दासबोधाचे संदर्भ आहेत. अफलातून ग्रन्थ आहे गीतारहस्य ! टिळ्कांचे प्रकांड पांडित्य आणि अफाट बुद्धीमत्ता पाहून चकित व्हायला होते. उंदीर विभागात काम करणार्या लोकांना त्यांचे चुकले काय ? हेच फक्त दिसणार !
काही प्रतिसाद संपादित करावेत / उडवावेत अशी सं मं ला विनंती करावी की काय अशा विचारात आहे. खरे म्ह्णजे काही आय डी ब्लोक करायला हवेत, पण लक्षात कोण घेतो?
प्रतिक्रिया
भावना पोचल्या.
+१
वाचतो आहे...
लेखनशैली प्रवचनकाराची वाटली.
अर्थातच दंतकथा. बाकी लेखात
ब्लँकेट स्टेटमेंट्स
अतिशय सरसकट ढोबळ विधान.
लेख पुन्हा एकदा काळजीपुर्वक
__/\__
+११११११११११११११११११११.
माझे प्रतिसाद मिपा ने काढुन टाकले
नै म्हंजे बाकी काही असूदे पण
तुम्हाला ही माहिती आहे,
खरे तर मेजोरिटीला काही तक्रार
मेजोरिटीला अक्कल तरी होती का
+१ न्हाई !!!
मेजॉरिटी नेहमीच अशी असते.
मस्त मारला बाण
मस्त मारला बाण
नेत्यांच्या स्वातंत्र्याच्या
जनतेचे बळ मिळाले पण यामागचे
अहो नेता हवाच.. नुसती जनता
मान्यच... काहीतरी तक्रार होती
स्वातंत्र्यपूर्व काळात मुळात
टिळकांना तेल्यातांबोळ्यांचे
हॅ हॅ हॅ
छापिल ते सगळे बरोबर असे मानत
टिळक पंचांगाबाबत मी
टिळक पंचांगाबाबत मी
एकद बघेन टिळक पंचांग नक्की.
...हे आता कालबाह्य झालेले
संशोधन तुच्छ लेखण्याचा सवाल
त्यामुळे त्यांनी आर्यांच्या
ओके. आणि खरे सांगायचे तर ते
सॉरी... माझा अभ्यास या
आर्यांच्या मूलस्थानाबद्दल केलेली विधाने ही आज
वाह वाह. मी तसाही मूर्खच आहे
आगरकरांच्या विचारांना विरोध
ते एक टोक तर तुमचेही दुसरे
धन्यवाद
अवश्य व्यनि करा. याबद्दल
ते वाचलंस की बे तू.
आह ते आहे होय? मग वाचलेय.
.....त्यांच्या या ग्रंथाबद्दल
आमचेही डोळे पाणावले...
साम्राज्यवादाविषयी आणि एकुणच जागतिक
+१०००००००००
आपल्या नशीबाने इंग्रज आणि अमेरिका जिंकले,
लेख चांगला आहे..
टिळ्कांचे प्रकांड पांडित्य
Pagination