त्यात अनेक वचन नाही.. तो एकच आहे. जैन , बौद्ध , ईसाई, महमद् दीय, सीख असे त्याचे विविध प्रकार अथवा रुपे नाहीत. तो एक आणि एकच आहे .. त्याचाकडे जाण्याचे विविध उपासना मार्ग असतील पण गन्तव्य एकच आहे. सबका मालिक एक !
सही बोललात...
सदर पुस्तक वाचलेले नाहीये ...पण एकुणच मिपावरच्या अनेक तात्विक आणि व्यवहारौपयोगशुन्य अशा काथ्याकुटात(पक्षी इं.मा.) लक्ष घातल्यापासुन " हिंदु ही खरच जगण्याची समृध्द अडगळ " असल्याचे पटायला लागले आहे .
असो.
..................................................................तत्र मौनं हि शोभनम् ||.
हिंदू धर्म म्हणजे नक्की काय हा प्रश्न असतानाही अनेक लोक (लेखकाला उद्देशून नव्हे) हिंदू धर्माचा किंवा त्या धर्मात स्वतः जन्माला आल्याचा अभिमान धरताना बघितले की जरा गंमतच वाटते.ही मंडळी अभिमान धरतात तो नक्की कसला?
(बहुदा हिन्दु धर्माचे ड्यान मिळाल्याने आपले सावज हातातुन निसटेल म्हणुन भयभीत झाले वाटते.)>>>>>>> जे धर्माचे बुद्ध्याची जाहले सावज,त्यांसी आंम्ही काय मारावे???
असो.......................................!
चालू द्या निवांत!
असे ऐकिवात आहे कि मनुष्य मेल्यानन्तर पिशाच्च योनित जातो खितपत पड्तो वगैरे,तर ते पिशाच्च माण्साला धर्ण्यासाठि शोधत असते असे हिन्दु धर्मिय मानतात,तर असे सावज हातातुन निसटले तर अशी पिशाच्चे थयथयाट करतात हे मी आपल्या स्मायली सन्दर्भात विनोदाने टन्कले होते कारण ट्वाळा आवडे विनोद या उक्तिने, बाकी आमची मति (बुद्धी) ही आधीच धार्मीक असल्याने आपणास चिन्ता करण्याचे काहि कारण नसावे तसेच आपण पिशाच्च नसल्याने आम्हास मारण्याचा प्रश्ण्च येत नाही कारण आप्ल्या म्हण्ण्या प्रमाणे धर्माने आम्हाला आधीच मारले आहे.
@हे मी आपल्या स्मायली सन्दर्भात विनोदाने टन्कले होते कारण ट्वाळा आवडे विनोद या उक्तिने, >>> म्हणजे मी टवाळ का??? बरं...असो..असते एकेकाची समज!
@बाकी आमची मति (बुद्धी) ही आधीच धार्मीक असल्याने आपणास चिन्ता करण्याचे काहि कारण नसावे>>> असू दे की मति धार्मिक... आंम्ही कधी चिंता असल्याचं म्हटलं?
@तसेच आपण पिशाच्च नसल्याने आम्हास मारण्याचा प्रश्ण्च येत नाही कारण आप्ल्या म्हण्ण्या प्रमाणे धर्माने आम्हाला आधीच मारले आहे>>>>>> असं का???? ब्वार्र...ब्वार्र...! .
सगुणोपासना (मूर्तीपूजा) हे हिंदू धर्माचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. इतर कोणत्याही धर्मात सगुणोपासनेला इतके महत्त्व दिलेले नाही. सगुणोपासना, पुर्नजन्म व कर्मानुसार फलाचा सिद्धांत, सर्व प्राणीमात्रात एकच ईश्वर आहे व आत्म्याचे अस्तित्व हे हिंदू धर्माचे प्रमुख गुण आहेत. नवविधा भक्ती तसेच भक्तीमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्घ हे चार मार्ग परमेश्वरप्राप्तीकडे नेणार मार्गे आहेत असे हिंदू धर्म मानतो. हे मानणारा कोणीही हिंदू असू शकतो. अर्थात हिंदू धर्माने नास्तिकांनासुद्धा दूर लोटलेले नाही. एखादी व्यक्ती पूर्ण नास्तिक असूनसुद्धा किंवा परमेश्वरप्राप्तीचा कोणताही मार्ग न अवलंबता सुद्धा हिंदू असू शकते. हिंदू धर्माचा कोणीही एक प्रेषित किंवा व्यक्ती संस्थापक नाही किंवा कोणतेही एकमेव पुस्तक हे धर्मग्रंथ म्हणून दाखविता येत नाही. अनेक वेगवेगळ्या उपासना मार्गांचा संगम म्हणजे हिंदू धर्म. या धर्मात परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची सक्ती नाही किंवा एखादी विशिष्ट प्रार्थना म्हणणे किंवा एखादा विशिष्ट उपासना मार्ग निवडण्याची सक्ती नाही.
अगदी बरोबर आहे. हा मुद्दा राहीला होता. पण हिंदू उपासना पद्धतीत शेवटी पुन्हा सगुणाकडून निर्गुणाकडेच जायचे आहे. आणि अशी थेट निर्गुण उपासना करणारे पंथ ही आहेत. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद ! पण रामकृष्ण मिशनने पुन्हा माताजी आणि रामकृष्णांच्या प्रतिमा आण्ल्याच आहेत.
सामान्य माणसाला प्रतिकांशिवाय उपासना हे जरा अवघड जाते, म्ह्णून अशी सोय केली असावी.
अगदी एका वाक्यात सांगायचं तर सत्याप्रती जिज्ञानेसेवर आधारीत (अथातो ब्रह्मजिज्ञासा) ति एक प्राचीन जीवन प्रणाली आहे.
वर्णाश्रम व्यवस्था, भक्ती-कर्म-योग आदि उपासना पद्धती, वेद-पुराणादी साहित्य, एक/बहु/निरीश्वरवाद , ज्ञानसंपादनाच्या पद्धती... हे सगळं काळाच्या ओघात या व्यवस्थेत समाविष्ट होत गेलं. ज्ञानमार्ग गर्विष्ठ झाला तर त्याला कर्मकांडाने आव्हान दिलं. कर्मकांडाने जनतेच्या सुख-दु:खांकडे दुर्लक्ष्य केलं तर त्याला ध्यानमार्गाने आवर घातला. ध्यानमार्गाने निवृत्तपणाचा कळस गाठला व समाजाची घडी बिघडली तर त्याला भक्तीने रिप्लेस केलं. भक्तीत पाखंड माजलं तर तिथे विवेकाने लाथा मारल्या.
या सर्व घडामोडीत मनुष्यमात्राने अगदी सर्व भोग भोगले. प्रेमाचे पाट वाहले तर रक्ताचेही. हा प्रवाहीपणाच बहुतेक या व्यवस्थेचा प्राण आहे.
अर्धवटराव
The Harvard University PIN System, and the systems, data, and other resources that require PIN authentication for access, are only for legitimate Harvard University users. Use may be monitored, and improper use of the PIN System or those resources may result in disciplinary action and civil and criminal charges.
परंतु इज द लिंक इज लेजिट्मेट ?
एरवी माझ्या संग्रहात असलेलं पुस्तक वाचते. घराबाहेर/गावाबाहेर असले की मात्र या दुव्यावरुन उतरवून घेतलेलं पुस्तक वाचते. गरज पडेल तसं. अजून तरी काही शंकास्पद फरक दिसला नाहीये - पण आता जरा एकदा नीट पाहायला हवं :-)
तसं पहायला गेलं तर मी स्वतः हिंदूत्वाबद्दल कमालीचा आग्रही (आक्रस्ताळा म्हणू शकता) असतो. हिंदूधर्माचा मला अभिमान/प्रेम का वाटतो/ते असा प्रश्न कधी पडला नाही. जन्मदात्या आईबद्दल प्रेम वाटतं, लाज नाही, बापाबद्दल प्रेम वाटतं, लाज नाही...तसंच हिंदूधर्माबद्दल प्रेम वाटतं. कदाचित जे आपलं आहे त्यावर प्रेम करायची शिकवण आहे आपल्याकडं म्हणून असेल! मग जिथं प्रेमाचा प्रश्न येतो तिथं माणूस उसळतोच (जनरली!)
आता हे एव्हढं पाल्हाळ वर लाऊन झाल्यानंतर पुढं हे सांगावंस वाटतं, की वर लेखात जे तीन मुद्दे दिलेले आहेत, त्यातल्या तिसर्या मुद्द्याचा अर्थच नीट कळला नाही. बाकी त्याआधीचे दोन मुद्दे हे निव्वळ टाकाऊ वाटतात..अन अशाच मुद्द्यांमुळं बर्याचदा तथाकथित सेक्युलरवादी उर्फ कुर्हाडीच्या दांड्यांचं फावतं.
पुनर्जन्म! ही एक भानगड काय कधी कळली नाही बॉ. शिंचं ते चौर्यांशी लक्ष योनी हिंड हिंडून परत बोंबलत मनुष्यप्राण्याच्या जन्माला यायचं म्हणजे पीडाच की वो! वर आणि चौर्यांशी लक्ष योनींपुर्वी आपण घातलेली काशी लक्षात ठेवायची किंवा सध्याच्या अवतारात त्या अनुशंगानं स्वतःच्या नकळत वागायचं! कसं काय जमतं बॉ? मला मजा वाटते तेव्हा, जेव्हा एखाद्या घरचं एखादं पिकलं पान वयानुसार गळतं; पुढं त्या घरात वर्षादिडवर्षात एखाद्या नातवा/नातीकडं पाळणा हलतो अन मग "आमच्या माईचा फार जीव होता हो ह्याच्या/हिच्यावर! लेकराच्या रुपानं आली ती परत" वगैरे ऐकायला मिळतं. च्यायला! भडव्यो चौर्यांक्षी लक्ष योनीचं गणित कुठं गेलं? किडा-मुंगी, अल्पजिवी जनावरं, अपघाती मृत्यू असं सगळं क्यालक्युलेट करुनसुध्दा वर्षा-दिडवर्षात परत सेकंड इनिंग खेळायला तयार? एक जरा कासव घेतलं तर पाचशे-सातशे वर्षं कुठं गेली नाहीत, त्यात परत हत्ती वगैरे म्हणजे ऐंशी शंभर सालं आणखी...आता अशा जन्तेला म्हणलं, "घे पाटी, अन घाल त्रैराशिक.." तर आपलं तोंड झोडलं जायचं म्हणून गप बसायचं. पण ह्या अशा येडेपणामुळंच आजूबाजूच्या विचारजंतांना हिंदूधर्माला शिव्या घालायला, कमी लेखायला कोलीत मिळतं. पण लक्षात कोण घेतो?
आता तो कर्माचा सिध्दांत!
आयला! ते पुस्तक एकदा वाचून पाह्यलं. काय सालं लिहिलंय पण. मानलं. शप्पत! मानसिकदृष्ट्या खचलेल्यांसाठी समजूत घालण्याचा हा सगळ्यात बेष्ट उपाय आहे. पण तात्पुरता! नायतर माणूस झालाच साला पांगळा. अरेऽऽ...लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी जिद्द ठेवायची, का घडणार्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून त्याचा दोष पुर्वजन्मीच्या सुकृतावर (सुकृतच ना? नक्की शब्द आठवेना आता.) ढकलायचा? आपलं कुठं चुकतंय हे पहायचं, त्या अनुशंगानं प्रयत्न करायचे की कुठल्यातरी पुर्वजन्मातल्या कृत्यावर दोष ढकलायचा?
म्हणजे, गणित असंय, दुर्बळाची हत्या हे पाप. समजा, मी गेल्याजन्मी साप असेन, तर उंदीर ह्या दुर्बळ जीवाची हत्या करुन त्याला खाऊन मी आयुष्य काढलं म्हणजे माझ्या खात्यात सगळं पापच पाप! आता हेच जर झाडं, पिकं कापून अन्न बनवणं, जमीन खोलवर उकरुन त्यातून धातू/कोळसा काढणं हे जर इतर कोणत्या योनीतल्या पॅरामिटर्सप्रमाणं पाप असेल तर? म्हणजे, मला असं म्हणायचंय, पाप-पुण्य म्हणा, केल्या कर्मांचं वर्गिकरण म्हणा, हे सगळं निरनिराळ्या योनीमध्ये एकच असतं का? नसेल तर त्याची डिफाईन करण्याची काही विशिष्ट पध्दत आहे का? की ज्यायोगे चौर्यांशी लक्ष योनींमधल्या निरनिराळ्या पाप-पुण्यांची वर्गवारी होऊन नंतर तुमचा सिबिल रिपोर्टसारखा एक 'कन्सोलिडेटेड रिपोर्ट' तयार होईल?
हे असंय. त्यामुळं असे फसवे मुद्दे घेऊन ज्यांना धंदा करायचा असतो ते पोटभर धंदा करतात. ज्यांना गरज असते ते येनकेन कारणे त्यांच्याकडे ओढले जाऊन अशा गोष्टींमध्ये विश्वास ठेवतात...हरकत नाही! तत्कालिन वेदनाशमनासाठी मॉर्फिन दिलं म्हणजे काही लगेच व्यसन लागत नाही, पण पुढे उठसूठ मॉर्फिनचा डोस घेणं योग्य नाही. इतकंच माझं म्हणणं.
विटेकरबुवा, तुमच्या मूळ भावनेचा आदर आहेच, सहमतीदेखील आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की जे तीन मुद्दे प्रमुख म्हणून मांडले आहेत त्यातले पहिले दोन मुद्दे (तिसरा मला अडाण्याला कल्लाच नाय) हिंदूधर्माच्या कुचेष्टेला कारणीभूत असणार्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहेत...कारण ते तसेच आहेत.(असं माझं मत आहे.) ह्याउप्पर, जर खरोखर कुणी मला कर्माच्या सिध्दांताबद्दल आणि पुनर्जन्माबद्दल नीट समजाऊन सांगणार असेल तर नक्कीच मी माझं मत बदलायला तयार आहे.
सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे.)
धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो अशी हिंदू मान्यता आहे.
या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण !
कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही)
धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे.
हे मात्र आवडलं. शेवटी काय, सारासार विचार, सद्सदविवेकबुध्दी, आणि विनम्रपणा ह्यांचा एक सुंदर मिलाफ म्हणजे हिंदूधर्म. पुढे त्या त्या काळातल्या धर्मदंडांनी स्वतःच्या सोयीच्या पण अयोग्य प्रथा घुसडून मूळ संकल्पनेचं मातेरं केलं ही बाब अलाहिदा! पण कुणी सांगावं, कदाचित त्या-त्या काळी त्या गोष्टी करणं त्यांच्या बुध्दीला योग्य वाटून त्या तत्कालिन परिस्थितीशी सुसंगत म्हणून ठरवल्या गेल्या असाव्यात. पुढे आहेतच आपले आंधळे आचरणकर्ते...माझा बा करित व्हता...त्याचा बा करित व्हता...त्याच्या बा चा बा करित व्हता...मग मलापण केलंच पाहिजे म्हणणारे!
थोडक्यात काय, तर हे सालं हिंदूधर्म म्हणजे सालं एक मोठी गुंतागुंतीची चीज आहे. भल्याभल्यांना आजवर झेपलं नाही, की भल्याभल्यांकडून आजपर्यंत झोपलं नाही!
असो! टंकनकंडातून बरंच काही भलं बुरं लिहून गेलो! चुकलंमाकलं माफ करा..
-(अभिमन्यू) धम्या.
आता कसा खराखुरा धमाल ष्टाइल प्रतिसाद दिसला.
पुनर्जन्म! ही एक भानगड काय कधी कळली नाही बॉ. शिंचं ते चौर्यांशी लक्ष योनी हिंड हिंडून परत बोंबलत मनुष्यप्राण्याच्या जन्माला यायचं म्हणजे पीडाच की वो! वर आणि चौर्यांशी लक्ष योनींपुर्वी आपण घातलेली काशी लक्षात ठेवायची किंवा सध्याच्या अवतारात त्या अनुशंगानं स्वतःच्या नकळत वागायचं! कसं काय जमतं बॉ? मला मजा वाटते तेव्हा, जेव्हा एखाद्या घरचं एखादं पिकलं पान वयानुसार गळतं; पुढं त्या घरात वर्षादिडवर्षात एखाद्या नातवा/नातीकडं पाळणा हलतो अन मग "आमच्या माईचा फार जीव होता हो ह्याच्या/हिच्यावर! लेकराच्या रुपानं आली ती परत" वगैरे ऐकायला मिळतं. च्यायला! भडव्यो चौर्यांक्षी लक्ष योनीचं गणित कुठं गेलं? किडा-मुंगी, अल्पजिवी जनावरं, अपघाती मृत्यू असं सगळं क्यालक्युलेट करुनसुध्दा वर्षा-दिडवर्षात परत सेकंड इनिंग खेळायला तयार? एक जरा कासव घेतलं तर पाचशे-सातशे वर्षं कुठं गेली नाहीत, त्यात परत हत्ती वगैरे म्हणजे ऐंशी शंभर सालं आणखी...आता अशा जन्तेला म्हणलं, "घे पाटी, अन घाल त्रैराशिक.." तर आपलं तोंड झोडलं जायचं म्हणून गप बसायचं. पण ह्या अशा येडेपणामुळंच आजूबाजूच्या विचारजंतांना हिंदूधर्माला शिव्या घालायला, कमी लेखायला कोलीत मिळतं. पण लक्षात कोण घेतो?
ह्याबद्दल ऐकलय ते असं.
मानव योनीत तुम्ही आलात म्हणजे एकच मानव जन्म असे नसून इन टोटल तुम्हाला ब्याक टू ब्याक सात मानव जन्म मिळतात.सर्व सातही जन्माचे मिळून चारेकशे वर्षे टेन्युअर असतं. त्यानंतर पुढील योनी सुरु होते.
एक योनी = एक जन्म असे नेहमीच असेल असे नाही.एका योनीत एकाहून अधिक जन्म तुम्ही घेउ शकता अशी ती थिअरी.
ही माझी ऐकिव माहिती. विश्वास वगैरे अजिबातच नाही.
पुन्हा एकदा तुपले प्रतिसाद पाहून मपल्याला लै बरं वाटतय हे साम्गू इच्छितो.
पुनर्जन्म! ही एक भानगड काय कधी कळली नाही बॉ. शिंचं ते चौर्यांशी लक्ष योनी हिंड हिंडून परत बोंबलत मनुष्यप्राण्याच्या जन्माला यायचं म्हणजे पीडाच की वो!
८४ लक्श योनी म्हणजे प्रत्येक योनीमध्ये जयलाच लागते असे नव्हे ! तुमच्या कर्मांशाप्रमाणे ( reward points) तुम्हांला जी योग्य ती योनी मिळेल. हे reward points तुम्हीच मिळवले आहेत , तेव्हा कोणत्या योनीत जायचे हा तुमचाच विकल्प आहे. आणि महत्वाचे म्हणजे या चक्रातून बाहेर पडायचा विकल्प ही तुमच्याकडेच आहे ना ?
एक जरा कासव घेतलं तर पाचशे-सातशे वर्षं कुठं गेली नाहीत, त्यात परत हत्ती वगैरे म्हणजे ऐंशी शंभर सालं आणखी..
ही काळाची गणिते आपण आपल्या कुवतीनुसार मांडतो. काळ अनंत आहे आणि आपली मोज-मापे अपुरी आहेत. सातशे वर्ष म्हणजे फार मोठ्ठा काळ असे जेव्हा म्हणतो , ते सापेक्षच नव्हे का ?
समजा, मी गेल्याजन्मी साप असेन, तर उंदीर ह्या दुर्बळ जीवाची हत्या करुन त्याला खाऊन मी आयुष्य काढलं म्हणजे माझ्या खात्यात सगळं पापच पाप!
मनुष्य योनी सोडून बाकी सार्या योनी या पाप योनीच आहेत, तिथे भोगून संपवणे आहे. अन्य योनीमध्ये प्रज्ञा विकसित झालीच नाही ,तिथे पाप- पुण्याचा हीशेब नाही , केवळ फेडणे!
असो! टंकनकंडातून बरंच काही भलं बुरं लिहून गेलो! चुकलंमाकलं माफ करा..
छे हो , आपण सगळेच एकमेकांना मदत करत आहोत, जे मला समजले ते मांडायचा प्रयत्न केला आहे. ते पूर्ण सत्य आहे असे थोडेच आहे ? परिप्रश्नेन सेवया ....
माझ्या साठी माझा साथी हिंदु धर्म आहे.
म्हणजे काय बॉ....?
तर यात धर्मग्रंथ म्ह्णणतो तेच खरे असा दुराग्रह नाही.
माणूस परमेश्वराचे अस्तित्व मानणारा असलाच पाहिजे असा दुराग्रह नाही.
नास्तिकाने " प्रसाद " खाउ नये .असा दुराग्रह नाही.
हिंदूने नमाज पढू नये चर्च मासला हजर राहू नये. मस्जीदमधे वा चर्चमधे वा बुद्धविहारात जाउ नये असा दुराग्रह नाही.
पुनर्जन्म मानलाच पाहिजे असा दुराग्रह नाही
विशिष्ट दिशेला तोड करून देवाची प्रार्थना केली पाहिजे असे बंधन नाही.
एवढेच काय .. मृताला जाळलेच पहिजे वा पुरलेच पाहिजे असे बंधन नाही.
आस्तिक असलात तर रोजच्या रोज पुजा झालीच पाहिजे असे बंधन नाही.
बंधनेच कमी असल्याने धर्माच्या बाहेर टाकणे , फतवा काढणे ईई धोके नाहीत.
मी ही सारी स्वातंत्र्ये भोगली आहेत. सबब कोणी मला कोट्यावधीचे धन दिले तरी मी माझ्या हिंदू धर्माखेरीज कोणताही धर्म स्विकारणार नाही.
आलं का ध्येनात मंडळी ??? .
माझ्या साठी माझा साथी हिंदु धर्म आहे.
म्हणजे काय बॉ....?
१. तर यात धर्मग्रंथ म्ह्णणतो तेच खरे असा दुराग्रह नाही.
न्हाय बा. हिंदुधर्मातही आमचे पुस्तकच खरे असे कितीतरी ठिकाणी आहे. आमचा देव न पूजला तर नर्कात जाणार वगैरे भीतीही आहे. जर कोणताही देव कुणीही पूजला तर कुणाचेही पोट नसेल दुखत तर शंकराचार्यांना मंडनमिश्राला बुद्धाला सोड आणि विष्णूला भज असे का बरे सांगावे लागले?
२. माणूस परमेश्वराचे अस्तित्व मानणारा असलाच पाहिजे असा दुराग्रह नाही.
मग नास्तिक व्यक्ती आणि पंथ यांच्यासाठी पाखंडी असा अनादरपूर्वक उल्लेख का बरे केला जातो?
३. नास्तिकाने " प्रसाद " खाउ नये .असा दुराग्रह नाही.
पण प्रसाद नाही खाल्ला तर साधुवाण्याची नाव बुडाली तशी तुझीही बुडेल अशी भीती घालणं, हाही दुराग्रहच नाही का?
४. हिंदूने नमाज पढू नये चर्च मासला हजर राहू नये. मस्जीदमधे वा चर्चमधे वा बुद्धविहारात जाउ नये असा दुराग्रह नाही.
पुनर्जन्म मानलाच पाहिजे असा दुराग्रह नाही
बाकी धर्मातही असे नाही. शेजारी ख्रिश्चन असेल तरच प्रेम करा असे येशूने / ख्रिस्ताने/ पैगंबराने सांगितलेले नाही.
५. विशिष्ट दिशेला तोड करून देवाची प्रार्थना केली पाहिजे असे बंधन नाही.
हो का? शिवलिंगांची दिशा एकच असते. मेलेले मढेही विशिष्ट दिशेतच असावे. रात्री झोपताना अमक्या दिशेकडे तोंड करुन झोपू नये. वास्तुशास्त्र वगैरे वाचा. तुमच्या या अज्ञानाचे निरसन होईल.
६. एवढेच काय .. मृताला जाळलेच पहिजे वा पुरलेच पाहिजे असे बंधन नाही.
कंच्या गाढवाने सांगितले? हिंदुंच्या लिंगायत वगैरे काही जातीतच पुरण्याची प्रथा आहे. त्यांचे स्मशान वेगळे असते. इतर जातीतल्या लोकाना दहनच करावे लागते. सरसकट मी माझ्या मर्जीनुसार हे किंवा ते करीन असा चॉईस माणसाला नसतो.
अधिक माहितीसाठी ..... http://www.mimarathi.net/node/9579
७. आस्तिक असलात तर रोजच्या रोज पुजा झालीच पाहिजे असे बंधन नाही.
इतर धर्मातही असे नाही.
८. बंधनेच कमी असल्याने धर्माच्या बाहेर टाकणे , फतवा काढणे ईई धोके नाहीत.
काही विशिष्ट लोकाना जन्मजात बाहेरच ठेवण्याची प्रथा होती. मग पुन्हा वेगळे फतवे कोण कसे काढेल? आणि फतवे निघत नाहीत, असे म्हणताय तर ज्ञानोबा/ तुकोबा / सत्यमेव जयते मधील खाप पंचायती हे सगळे फतव्यांचे ब्ळी नव्हते की काय?
मी ही सारी स्वातंत्र्ये भोगली आहेत. सबब कोणी मला कोट्यावधीचे धन दिले तरी मी माझ्या हिंदू धर्माखेरीज कोणताही धर्म स्विकारणार नाही.
आनंद आहे.
आलं का ध्येनात मंडळी ???
१.न्हाय बा. हिंदुधर्मातही आमचे पुस्तकच खरे असे कितीतरी ठिकाणी आहे. आमचा देव न पूजला तर नर्कात जाणार वगैरे भीतीही आहे. जर कोणताही देव कुणीही पूजला तर कुणाचेही पोट नसेल दुखत तर शंकराचार्यांना मंडनमिश्राला बुद्धाला सोड आणि विष्णूला भज असे का बरे सांगावे लागले?
आमचीच पुस्तके श्रेष्ठ असे हिंदू धर्मांतर्ग्ंत सांगत असतील तर ते निष्चितच चुकीचे आहे. कदाचित आपल्याच पंथाचे मार्केटिंग करण्याच्या नादात असे झालेही आहे पण त्यावरून सारा धर्मच वाईट आहे असे म्हणणे अतोशयोक्तीचे आहे असे मला वाटते. बौद्धपंथ उदयाला आला आणि त्यामुळे वैदिक धर्माला ग्लानि आली. लोक अतिरेकी अहिंसा मानू लागले. असा कोणताही अतिरेक समाजाच्या हिताचा नसतो आणि म्हणून आचार्यांना खंडन- मंडन करावे लागले. यातही वाद - विवाद करुन हरविले आहे. तलवारीचा धाक दाखवून नव्हे ! याच धर्माने सांगितले आहे - सर्व देवं नमस्करां केशवं प्रतिगच्छती.
२. मग नास्तिक व्यक्ती आणि पंथ यांच्यासाठी पाखंडी असा अनादरपूर्वक उल्लेख का बरे केला जातो?
कारण अस्तिक लोकांना " अंधश्रध्दाळू" असा उल्लेख होतो म्हणून ! आपण हे ही लक्षात घ्यावे की. याच देशात नास्तिक चार्वाकाचा उल्लेख देखील दार्शनिक असाच होतो.
३. पण प्रसाद नाही खाल्ला तर साधुवाण्याची नाव बुडाली तशी तुझीही बुडेल अशी भीती घालणं, हाही दुराग्रहच नाही का?
लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी काही गोष्टी प्रतिके म्हणून वापरावी लागतात. लोकांच्या सहज पचनी पडेल अशीच उदाहरणे द्यावी लागतात. आलंबन घ्यावे लागते. मुलाला समजावे म्हणून आई बोबडे बोलते ते चुकीचे का ? आणि अतिरेक होतो हे मान्य आहेच . आपण तेच धरुन बसणार का ?
४.बाकी धर्मातही असे नाही. शेजारी ख्रिश्चन असेल तरच प्रेम करा असे येशूने / ख्रिस्ताने/ पैगंबराने सांगितलेले नाही.
अभ्यास वाढवावा. शेजारयावर प्रेम करायला संगितले पण " माझ्याच मार्गाने गेलात तरच मोक्ष मिळेल अन्यथा तुम्ही पापी किंवा काफिर आहात" असे स्प्ष्ट सांगितले आहे. आणि प्रेम कशासाठी करा ? त्यांच्याशी गोड बोलून त्यांना आपल्या धर्मात घ्या - आजूबाजूला होणारे मतांतर उघड्या डोळ्यानी बघितले तर सेवाकार्यांच्या बुरख्याआड काय चालते ते सहज समजून येईल.
५.हो का? शिवलिंगांची दिशा एकच असते. मेलेले मढेही विशिष्ट दिशेतच असावे. रात्री झोपताना अमक्या दिशेकडे तोंड करुन झोपू नये. वास्तुशास्त्र वगैरे वाचा. तुमच्या या अज्ञानाचे निरसन होईल.
शिवलिंग उत्तरेकडे आहे म्ह्णून उत्तरेकडेच प्रार्थना करावी असे कोणत्या धर्ममार्तंडाने तुम्हाला सांगितले ? प्रेताची दिशा अशी असावी असा संकेत आहे , काहीतरी संकेत असायला हवा म्हणून , आचरणाच्या सोयीसाठी. फोन उचलल्यावर आपण "हालो" असे म्हणतो ते कोणत्या धर्मात सांगितले आहे म्हणून ? समाजाच्या हितासाठी आणि सोयीसाठी काही संकेत ठरवावे लागतात. वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि हा या धाग्याचा विषय नाही. आजच्या काळात अपार्टमेंट मधे राहताना वास्तुशास्त्र पाळ्णे अशक्य आहे. मग महानगरामध्ये राहणारे लोक अहिंदू झाले का ?
६.कंच्या गाढवाने सांगितले? हिंदुंच्या लिंगायत वगैरे काही जातीतच पुरण्याची प्रथा आहे. त्यांचे स्मशान वेगळे असते. इतर जातीतल्या लोकाना दहनच करावे लागते. सरसकट मी माझ्या मर्जीनुसार हे किंवा ते करीन असा चॉईस माणसाला नसतो.
दह्न अथवा द्फन याशिवाय मृतदेहाची विल्हेवाट लाव्ण्याची आणखी एखादी सोपी पद्धत असेल तर आपण जरुर सुचवावी. तुम्ही तुमच्या म्रूत्युपत्रात तुमच्या देहाची कशी विल्वेवाट लावावी हे जरुर सुचवावे. स्वीकारार्ह असेल तर आपण " दार्शनिक" व्हाल.
७.इतर धर्मातही असे नाही.
अभ्यास वाढवावा , चर्च्मध्ये मास साठी विशिष्ट दिवसांची हजेरी असेल तरच चर्च तुमच्या कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमाना परवानगी देते. माझ्या एका मित्राला हजेरी पूर्ण करण्यासाठी दर रविवारी जावे लागे आणि मग एका वर्षाने त्याला चर्चने लग्नाला परवानगी दिली.
८.काही विशिष्ट लोकाना जन्मजात बाहेरच ठेवण्याची प्रथा होती. मग पुन्हा वेगळे फतवे कोण कसे काढेल? आणि फतवे निघत नाहीत, असे म्हणताय तर ज्ञानोबा/ तुकोबा / सत्यमेव जयते मधील खाप पंचायती हे सगळे फतव्यांचे ब्ळी नव्हते की काय?
हजारो वर्षांच्या परंपरेत काही कुप्रथा शिरल्या आहेत, ज्याला वास्तविक धर्मांचा काडीचाही आधार नाही. पण कालानुरुप बदल घडत आहेत. उदा. सति प्रथा पूर्ण बंद पडली आहे . तशीच जातव्यवस्था ही मागे पडत चालली आहे. राजकारण्यांनी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित संपलीही असती. ज्यावेळी अशा कुप्रथा निर्माण झाल्या त्या त्या वेळी त्याला विरोध करणारे ही याच मातीत निर्माण झाले , प्रत्येक वेळी त्यांन मर्यादित यश ही मिळाले.
घरात ढेकूण झाले म्हणून कोणी घर जाळत नाही.
आनंद आहे.
आनंद आहेच. तुम्हाला ही आहे , उद्दामपणाने छिद्रान्वेषीपणा न कराल तर !
आमचे चिंतन हे चिंतन नाही अनुभव आहे.माझ्या वडीलांच्या पायाचे आम्ही दफन केले आहे. दहन नाही.जेंव्हा उर्वरित देहाचा मृत्यू झाला त्यावेळी दहन करण्यात आहे.
मी स्वत: नमाज पढलेला नसला तरी त्यावेळी मशिदीत हजर राहिलेला आहे
मी स्वत: मास ला हजर राहिलेला आहे.
मला कधी कोणी बाटलेला म्हटलेले नाही. वा जीवन जगायला नकोसे केलेले नाही. आपण फतव्यांची सांगितलेली उदाहरणे त्यावेळच्या तथाकथित हिंदू धर्मप्रमुखांची असतील. मुळात हिंदु धर्माला काही code आहे म्हणून जातीव्यवस्था, बहिष्कार असे आहे का ? नक्कीच नाही. बाकी समाज गप्प्प बसायचा म्हणून काही जणांचे फावले एवढेच. रूढी वेगळ्या धर्माचे कोड ऑफ कंडक्ट वेगळे. धर्म असा काही देहाबरोबर येत नसतोच हो ! आपण ज्याला स्वेछ्चेने वा बळजबरीने उरावर घ्यावे अशी संहिता म्हणजे धर्म !
नुकतेच मी व मिपावरील काही जण एक सहल करून आलो . एका दिवसात तीन तरी महादेवाची मंदिरे पाहिली त्यातील एकाचे लिगाची दिशा इतरांपेक्षा उलटी होती. व तिथेही भाविकांची गर्दी होती. ही जागा सासवड जवळ आहे.
अमेरिका धूर्त सर्व युद्ध दुसऱ्या chya भूमीत लढली हरले तरी नुकसान क्षत्रूच .
त्यामुळे जे खरे धर्म आहेत त्या वर चर्चा न करता जो धर्मच नाही आशा हिंदू धर्मा वर चर्चा करण्याचा साफ हेतू आहे ..
धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे विकसित जगात तर्कशुद्ध विचारसरणीचा उदय आणि प्रसार आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय
भारतातच नव्हे तर जगात इतरत्र देखील धर्म ही संकल्पना न मानणार्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते याचे प्रमुख कारण नीतिसूत्रे आणि पाप-पुण्य यात ताळमेळ नसणे
मांसाहार जर एका माणसासाठी पाप ठरत असेल तर दुसर्यान माणसासाठी ते पाप नाही. दारू पिणे पाश्चात्य जगात अतिशय कॉमन असताना आपल्याकडे अपेयपान/अभक्ष्यभक्षण इत्यादि धर्मनियम लावण्यात येतात.
सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य दृष्ट्या जे अयोग्य ते निषेधार्ह ठरवणे यात काहीच गैर नाही, पण जेव्हा गुरुचरित्रा सारख्या ग्रंथात कपडे धुवून ,पिळून वाळत घालणे हेही पाप असे सांगितले जात असेल, तर अशा भाकड आणि भ्रामक धर्मनियमांचे पालन करणे हे खुळेपणाचे आणि हास्यास्पद ठरते . तीच गत परान्न-भोजन आणि तत्सम कालबाह्य नियमांची...
धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत .सतीप्रथा ,विधवा केशवपन यासारख्या कुप्रथा धर्माने कधीच बंद केल्या नाहीत , सामाजिक चळवळी /कायद्याच्या रेट्यानेच अशा कर्मठ प्रथा बंद कराव्या लागल्या , हे सत्य आहे.
सती जाणारी स्त्री आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करते , विधवा स्त्रीने आपले केस कापले नाहीत तर त्या केसांचा फाशीचा दोर होवून मृत नवर्यासच्या गळ्याला अडकून पडतो अशा अनेक भ्रामक कपोलकल्पित रूढी/शास्त्र / समजुती गेल्या 70-80 वर्षापूर्वी प्रचलित होत्या .अशा गोष्टींना आज आपण अंधश्रद्धा म्हणतो, मग सध्या अस्तीत्वात असलेले भ्रामक धर्मनियम भविष्यकाळात अंधश्रद्धा ठरू शकतात .
अर्थात सर्वच श्रद्धा या अंधश्रद्धा नसतात हे मान्य. पण म्हणून धर्म आणि शास्त्राचा /नियमांचा बडेजाव न करता कालानुरूप धर्माने प्रवाही व्हायला हवे,आणि समाजधुरीणानी याबाबतीत पावले उचलावीत ,अशी अपेक्षा!
धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत
या सल्ल्याची गरज असलेल्यांच्या रांगेत हिंदू धर्म/ पंथ/ जीवनपद्धती/ विचारप्रवाह/ ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते शेवटच्या स्थानावर आहे.
हे केवळ माझे मत नाही, वस्तुस्थिती आहे.
या सल्ल्याची गरज असलेल्यांच्या रांगेत हिंदू धर्म/ पंथ/ जीवनपद्धती/ विचारप्रवाह/ ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते शेवटच्या स्थानावर आहे.
म्हणजे, जे कोणी रांगेत पुढे आहेत ते नामशेष व्ह्यायच्या मार्गावर आहेत. असा व्यत्यास घ्यावा काय? ;)
अवांतर - धाग्याला २४ तास उलटून गेले तरी आता कुठे पाव-शतक होतेय!! फारच स्लो बॉ! ;)
नास्तिक असणं (अर्थात ते परमात्मा वगैरे न मानणं) धर्माने मान्य असणारा हिंदु हा एकमेव धर्म असावा.
तेव्हा वरील लेखातील मुद्दे अर्धेच आहेत. अजून हिंदुपणाची प्याप्ती बरीच मोठी आहे
प्रतिक्रिया
GOD IS ONE and not GOD ARE
म्हणजे
ओ के
सबका मालीक एक.
हिंदू
करेक्ट
अभिमान??
शिळी जिलबी
++१
.
हम्म...
(No subject)
ही स्मायली
अरे बापरे
हिन्दु धर्माचे ड्यान
टन्कन चूक
(बहुदा हिन्दु धर्माचे ड्यान
धर्माचे बुद्ध्याची जाहले सावज,त्यांसी आंम्ही काय मारावे??
@हे मी आपल्या स्मायली
सगुणोपासना (मूर्तीपूजा) हे
सगुणोपासना ..
हिंदु धर्म म्हणजे काय???
हे आवडलं!
असा प्रश्न विचारला कुणी,
धन्स. नक्किच वाचेन.
परंतु इज द लिंक इज लेजिट्मेट
परंतु इज द लिंक इज लेजिट्मेट ?एरवी माझ्या संग्रहात असलेलं पुस्तक वाचते. घराबाहेर/गावाबाहेर असले की मात्र या दुव्यावरुन उतरवून घेतलेलं पुस्तक वाचते. गरज पडेल तसं. अजून तरी काही शंकास्पद फरक दिसला नाहीये - पण आता जरा एकदा नीट पाहायला हवं :-)छान आहे पुस्तक
ह्म्म्म्म....
अर्रे धमालपंत....
मला जे समजले ते...
.
माझ्या साठी .....माझा साथी..
.
माझ्या साठी माझा साथी हिंदु
छिद्रान्वेषी....
न्हाय बा. हिंदुधर्मातही आमचे पुस्तकच खरे असे कितीतरी ठिकाणी आहे. आमचा देव न पूजला तर नर्कात जाणार वगैरे भीतीही आहे. जर कोणताही देव कुणीही पूजला तर कुणाचेही पोट नसेल दुखत तर शंकराचार्यांना मंडनमिश्राला बुद्धाला सोड आणि विष्णूला भज असे का बरे सांगावे लागले?आमचीच पुस्तके श्रेष्ठ असे हिंदू धर्मांतर्ग्ंत सांगत असतील तर ते निष्चितच चुकीचे आहे. कदाचित आपल्याच पंथाचे मार्केटिंग करण्याच्या नादात असे झालेही आहे पण त्यावरून सारा धर्मच वाईट आहे असे म्हणणे अतोशयोक्तीचे आहे असे मला वाटते. बौद्धपंथ उदयाला आला आणि त्यामुळे वैदिक धर्माला ग्लानि आली. लोक अतिरेकी अहिंसा मानू लागले. असा कोणताही अतिरेक समाजाच्या हिताचा नसतो आणि म्हणून आचार्यांना खंडन- मंडन करावे लागले. यातही वाद - विवाद करुन हरविले आहे. तलवारीचा धाक दाखवून नव्हे ! याच धर्माने सांगितले आहे - सर्व देवं नमस्करां केशवं प्रतिगच्छती. २.मग नास्तिक व्यक्ती आणि पंथ यांच्यासाठी पाखंडी असा अनादरपूर्वक उल्लेख का बरे केला जातो?कारण अस्तिक लोकांना " अंधश्रध्दाळू" असा उल्लेख होतो म्हणून ! आपण हे ही लक्षात घ्यावे की. याच देशात नास्तिक चार्वाकाचा उल्लेख देखील दार्शनिक असाच होतो. ३.पण प्रसाद नाही खाल्ला तर साधुवाण्याची नाव बुडाली तशी तुझीही बुडेल अशी भीती घालणं, हाही दुराग्रहच नाही का?लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी काही गोष्टी प्रतिके म्हणून वापरावी लागतात. लोकांच्या सहज पचनी पडेल अशीच उदाहरणे द्यावी लागतात. आलंबन घ्यावे लागते. मुलाला समजावे म्हणून आई बोबडे बोलते ते चुकीचे का ? आणि अतिरेक होतो हे मान्य आहेच . आपण तेच धरुन बसणार का ? ४.बाकी धर्मातही असे नाही. शेजारी ख्रिश्चन असेल तरच प्रेम करा असे येशूने / ख्रिस्ताने/ पैगंबराने सांगितलेले नाही.अभ्यास वाढवावा. शेजारयावर प्रेम करायला संगितले पण " माझ्याच मार्गाने गेलात तरच मोक्ष मिळेल अन्यथा तुम्ही पापी किंवा काफिर आहात" असे स्प्ष्ट सांगितले आहे. आणि प्रेम कशासाठी करा ? त्यांच्याशी गोड बोलून त्यांना आपल्या धर्मात घ्या - आजूबाजूला होणारे मतांतर उघड्या डोळ्यानी बघितले तर सेवाकार्यांच्या बुरख्याआड काय चालते ते सहज समजून येईल. ५.हो का? शिवलिंगांची दिशा एकच असते. मेलेले मढेही विशिष्ट दिशेतच असावे. रात्री झोपताना अमक्या दिशेकडे तोंड करुन झोपू नये. वास्तुशास्त्र वगैरे वाचा. तुमच्या या अज्ञानाचे निरसन होईल.शिवलिंग उत्तरेकडे आहे म्ह्णून उत्तरेकडेच प्रार्थना करावी असे कोणत्या धर्ममार्तंडाने तुम्हाला सांगितले ? प्रेताची दिशा अशी असावी असा संकेत आहे , काहीतरी संकेत असायला हवा म्हणून , आचरणाच्या सोयीसाठी. फोन उचलल्यावर आपण "हालो" असे म्हणतो ते कोणत्या धर्मात सांगितले आहे म्हणून ? समाजाच्या हितासाठी आणि सोयीसाठी काही संकेत ठरवावे लागतात. वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि हा या धाग्याचा विषय नाही. आजच्या काळात अपार्टमेंट मधे राहताना वास्तुशास्त्र पाळ्णे अशक्य आहे. मग महानगरामध्ये राहणारे लोक अहिंदू झाले का ? ६.कंच्या गाढवाने सांगितले? हिंदुंच्या लिंगायत वगैरे काही जातीतच पुरण्याची प्रथा आहे. त्यांचे स्मशान वेगळे असते. इतर जातीतल्या लोकाना दहनच करावे लागते. सरसकट मी माझ्या मर्जीनुसार हे किंवा ते करीन असा चॉईस माणसाला नसतो.दह्न अथवा द्फन याशिवाय मृतदेहाची विल्हेवाट लाव्ण्याची आणखी एखादी सोपी पद्धत असेल तर आपण जरुर सुचवावी. तुम्ही तुमच्या म्रूत्युपत्रात तुमच्या देहाची कशी विल्वेवाट लावावी हे जरुर सुचवावे. स्वीकारार्ह असेल तर आपण " दार्शनिक" व्हाल. ७.इतर धर्मातही असे नाही.अभ्यास वाढवावा , चर्च्मध्ये मास साठी विशिष्ट दिवसांची हजेरी असेल तरच चर्च तुमच्या कुटुंबातील धार्मिक कार्यक्रमाना परवानगी देते. माझ्या एका मित्राला हजेरी पूर्ण करण्यासाठी दर रविवारी जावे लागे आणि मग एका वर्षाने त्याला चर्चने लग्नाला परवानगी दिली. ८.काही विशिष्ट लोकाना जन्मजात बाहेरच ठेवण्याची प्रथा होती. मग पुन्हा वेगळे फतवे कोण कसे काढेल? आणि फतवे निघत नाहीत, असे म्हणताय तर ज्ञानोबा/ तुकोबा / सत्यमेव जयते मधील खाप पंचायती हे सगळे फतव्यांचे ब्ळी नव्हते की काय?हजारो वर्षांच्या परंपरेत काही कुप्रथा शिरल्या आहेत, ज्याला वास्तविक धर्मांचा काडीचाही आधार नाही. पण कालानुरुप बदल घडत आहेत. उदा. सति प्रथा पूर्ण बंद पडली आहे . तशीच जातव्यवस्था ही मागे पडत चालली आहे. राजकारण्यांनी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित संपलीही असती. ज्यावेळी अशा कुप्रथा निर्माण झाल्या त्या त्या वेळी त्याला विरोध करणारे ही याच मातीत निर्माण झाले , प्रत्येक वेळी त्यांन मर्यादित यश ही मिळाले. घरात ढेकूण झाले म्हणून कोणी घर जाळत नाही.आनंद आहे.आनंद आहेच. तुम्हाला ही आहे , उद्दामपणाने छिद्रान्वेषीपणा न कराल तर !आम्चे चिंतन...
अरारा ...
नुकतेच ....
तीन नाही, पाच आणि ती पण
धर्मचिकित्सा करायची आसेल तर सर्वच धर्माची करा हिंदू चीच का
धर्म आणि ईश्वर
कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत
धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेतया सल्ल्याची गरज असलेल्यांच्या रांगेत हिंदू धर्म/ पंथ/ जीवनपद्धती/ विचारप्रवाह/ ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते शेवटच्या स्थानावर आहे. हे केवळ माझे मत नाही, वस्तुस्थिती आहे.व्यत्यास
मालक, एकच रस्सा शिजवून शिजवून
नास्तिक
प्रचन्ड सहमत
लगे रहो
इथे प्रत्येकजण आपल्याला हवी
हिंदु धर्म म्हणजे काय???
असहमत
Pagination