Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पण प्रत्येक स्पर्धेत आपले मुल पहिलेच आले पाहिजे अशी मानसिकता अनेक पालकांची असते, आणि या अर्धवट वयात ती मुलांच्या मनावर विपरीत परीणाम करते.
हीच घाणेरडी वृत्ती मग ट्रॅफीक मध्ये सुद्धा दिसते. मध्ये मध्ये गाड्या घालणे, सारखे पाठीमागून हॉर्न वाजवणे वगैरे प्रकार करतात. माझ्या एका सहकार्याला क्षमता नसताना सुद्धा याच साठी प्रमोशन हवे आहे. अशा वेळी अशा लोकांच्या तोंडावर त्यांचा पाणउतारा करायची कला जमायला हवी.

सारखे पाठीमागून हॉर्न वाजवणे वगैरे प्रकार करतात. माझ्या एका सहकार्याला क्षमता नसताना सुद्धा याच साठी प्रमोशन हवे आहे.>> म्हन्जे काय हो?? =))

मुळात शालेय शिक्षणात पहिला नंबर मिळवला की आकाशाला हात कसे काय लागतात? मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी नापास झालो तेंव्हा कांदे-बटाटे विकणारा अडत्या व्हावे असे मनात पक्के केले होते आणि तसे बेधडकपणॅ घरी सांगून टाकले. आश्चर्य म्हणजे तीर्थरुपांनी हा विचार झिडकारला नाही. ते इतकेच म्हणाले की आणखीन एक वर्ष प्रयत्न कर. पुन्हा फेल झालास तर भांडवल कसं उभं करायचं याचा विचार करता येईल. पण नंतर मी पास होत गेलो आणि तो विचार बाजूला पडला. माझी खात्री आहे की जरी अडत्या झालोअसतो तरी आत्ता मिळवतो तितके कदाचित जास्तसुद्धा पैसे मिळवले असते.

जे मांडलेत ते अत्यंत वाईट आणि चिंतन करण्यासारखे आहे, पण आजकालचे सत्य अहे…छान लेख….

माझे म्हणणे इतकेच आहे कि पुढे मुलांना शर्यतीत उतरायचेच आहे म्हणून त्यांना बालवाडीपासून वेठीस धरून किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी डोक्यावर बसून पहिला नंबर मिळालाच पाहिजे किंवा ९ ५% गण मिळालेच पाहिजेत हे करणे कितपत योग्य आहे? आठवी पर्यंत त्याला बालपणाचा आनंद लुटू द्या कि. प्रत्येक वर्षी शाळा आणी क्लास यात मुलांचे बालपण पूर्ण हरवलेले आहे. मुळात अर्थ शास्त्राचा नियम आहे कि law of diminishing returns = उतरत्या प्रतिलाभाचा नियम | या प्रमाणे आपल्याला ऐंशी टक्के गुण मिळवण्यासाठी जितके श्रम करायला लागतात तितकेच अधिक श्रम पुढचे दहा टक्के(नव्वद टक्के) मिळवण्यास लागतात. आणी तितकेच श्रम आपल्याला पुढचे पाच टक्के( पंचाण्णव) मिळवण्यास लागतात. मग मुलास आपण विषय समजला आहे एवढे जरूर पहा. आणी पुढची घोकंपट्टी टाळून जितके गुण मिळतील त्यावर आनंद माना. उगाच स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी शर्यतीत उर फुटेपर्यंत पळण्यास लावून काय मिळवतो आहे याचा विचार करा. बाकी ईश्वरेच्छा बलीयसी

बालवाडीपासून वेठीस धरून किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी डोक्यावर बसून पहिला नंबर मिळालाच पाहिजे किंवा ९ ५% गण मिळालेच पाहिजेत हे करणे कितपत योग्य आहे?
बालसंगोपनाच्या पार्श्वभूमीवर वरील विचारधारा अत्यंत चुकिची आहे. लहानपणापासून मुलांना 'विचार करायला' शिकवा तुमचे विचार त्यांच्यावर थोपू नका. आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक गोष्टीचे, घटनेचे, परिस्थितीचे विश्लेषण करून त्यातून चांगले काय, वाईट काय हे ओळखून चांगल्याचा स्विकार आणि वाईटाचा त्याग ही सवय लागणे हे महत्त्वाचे, आयुष्यभर पुरणारे. शैक्षणिक क्षमतेनुसार आणि वैचारीक परिपक्वतेतून यशाचे अनेक मार्ग पुढे-पुढे खुले होत जातात. योग्य त्या मार्गाची निवड केली तर अमर्याद यशाची माळ गळ्यात पडू शकते. उच्च शिक्षण घेऊनही कांही जणांच्या पदरी मर्यादित यशच येते.

२ वर्षे पूरी झाली की लगेच शाळेत घालतात ? त्याबद्दल …। डॉक्टर सुबोध खरे यांचाय्शी मी सहमत आहे एका मुलाची आई म्हणून … माझा अनुभव …। उंदरांची शर्यत मला पण नाही आवडली . मी स्वतः नोकरी करते. मला व नवरोबाला वेळा सभालने खूप कठीण अहे. अशक्य नाही पण सोपे हि नाही . पर्यायाने आमचे पिल्लू पाळणाघरात जायला लगले. २ वर्षे छान गेलि. तो त्याच्या यशोदा मते कडे रमला. पण नंतर खरी गंमत चालू जाहली . त्याला खेळणी आणि वातावरण आणि आमचा सहवास कंटाळवाणा झाला. सोबत त्यच्या वयाची मुले chinese आणि भारतीय दोन्हीही नव्हती . खूप रडायचा , हट्ट करयचा, नननी कडे नको मानायचा. मी नोकरी सोडून पूर्ण वेळ त्याला दिला पण पिल्लू काही केल्या खुश नव्हते. परदेशात राहण्याचे द्ष्परीनाम असे मत दोन्ही घरच्या पालकांचे झाले. पर्यायाने आम्ही सर्वांनी मिळून एकच निष्कर्ष काढला कि त्याला त्याच्या बुद्धिमते प्रमाणे आणि वयाप्रमाणे वातावरण फक्त playschool मधेच मिळेल आणि मग साहेबांची रवानगी playschool मध्ये केली । आणि आता तो खूप खुश आहे. त्याला पाळणाघरात पण जायला आवडते म्हणून ते हि चालू आहे. माणसांची, घराची आवड आणि मित्र-मैत्रीणी हि आहेत. त्यामुळे त्याचा मानसिक आणि सर्वांगीण विकास चागला होत अहे. जे काही शिक्षिका सागते ते सर्व १००% खरे आणि त्यचे पूर्णपणे अनुकरण केले जाते.पाळणाघरात शाळेत झालेल्या गमतीजमती सागीतल्या जातात. पालकाच फक्त मुलांना संस्कार देतात असे नाही . समजूतदारपणा, शिस्त , कलेची आवड हे सर्व शाळेतूनच अनि पाळणाघरतून पन मिळते आणि आता ते बाळकडू लवकर मुलांना लागते असा माझा आणि मज्या सारख्या बर्याच मैत्रिणींचा पण आहे. त्यामुळे मुलांना ५ वर्षे जाहल्यावर शाळेत पाठवा असे मत असणारी मी ,आता मानते कि मुलांचा काल पाहून ठरावा … कधी कधी आपले आदर्श मत लादू नका … असे मानेन. बाकी सर्वांचे अनुभव आलेच आहेत वरील प्रतिसदा मधे. आतिवास, पिलीयन रायडर, पैसा, रेवती यांचे आणि इतर अनेक प्रतिसाद विचारांत पाडणारे आहेत. खूप महत्वाचा सामाजिक जाणिवेतूंच हा धागा आला आहे हे मात्र नक्कि. सारेगमप लिटल चँप सारख्या प्रोगामध्ये मुलांना सहभागी करवाऱ्या पालकाची मला फार कीव येते. मुलांचे बालपण हिरावून घेवून पालक स्वतः च्या इच्छा मुलांवर लाद्तात हे पाहून फार वाईट वाटते . "उगाच स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी शर्यतीत उर फुटेपर्यंत पळण्यास लावून काय मिळवतो आहे याचा विचार करा."मुलांना बालपणाचा आनंद लुटू द्या!!!!

मला वाटतं मुख्य अडचण स्पर्धा निर्माण करण्यबद्दल अहे, शिक्षणात अडचणीचं काहीच नाही. मुलांना सहज समजेल, आवडेल अश्या पद्धतेनी गोष्टी शिकवल्या तर कठीण जाणार नाहीत. ग्रास्पिन्ग सगळ्याच मुलांचे चांगलं असतं, फक्त ते ठराविक विषयात ठराविक पद्धतीनी वापरण्याची जबरदस्ती झाली आणि त्यात स्पर्धा आणली तर त्या शिक्षणाचा आनंद न मिळवता ताण घेतला जातो. शिवाय हल्ली घरात एकेकटे मूल असल्यानी त्याला माणसांमध्ये रहायला नाईलाजानीच प्लेस्कूलमध्ये लवकर पाठवावे लागते. तिथली स्पर्धा त्याच्या डोक्यात घट्ट बसणार नाही याची मत्र घरातून काळ्जी घ्यायला हवी.

जगातले यच्चावत लोक मान्य करतिल कि तिन तास म्हणजे सगळं आयुष्य न्हवे. जि गोश्ट तिन तासात जमणार नाही ति चवथ्या तासाला आरामतही जमु शकते. तसही प्रत्यक्ष काम करायची वेळ येते तेव्हां ९१% पडलेला ९०.५०% पेक्षा फार महान पर्फॉर्मन्स देतोच असे नाही किंबहुना ६६% वाला प्रत्यक्ष कामाच्या तेवढ्याच अनुभवानंतर ९०% असलेल्याला जड जाउ शकतो हे ही उघड वास्तव आहे. थोडक्यात परिक्षेचे ते तिन तास आयुष्यभर तुम्हि कोण आहात हे ठरायला नक्किच पुरेसे नसतात, यावर दुमत नसावे. तरिही आयुष्यात तुम्हि कोण बनायच नाही याची सक्ति मात्र ते व्यवस्थित करुन जातात. अन म्हणूनच सुरुवात होते अनावश्यक स्पर्धेला. पण... यातुन मार्ग काय ? कारण शिक्षणाचा आनंद, मुलांना सहज समजेल, आवडेल अश्या पद्धतेनी गोष्टी शिकवणे वगैरे सगळं ठिक आहे हो... पण हा आदर्शवाद कम्युनिजम इतकाच पोकळ नाहि काय ? हे सगळे सत्यात येणार कसे ?

माझे म्हणणे एवढेच आहे कि आठवी पर्यंत तुम्ही काय शिकता पेक्षा तुम्ही काय संस्कार मिळवता हे जास्त महत्त्वाचे आहे. यानंतर मुलांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जाण येऊ लागते. या वेळेनंतर मुलाला काय आवडते आणि काय करायला आवडेल आणि त्याप्रमाणे शिक्षण काय देता येईल याचा विचार करावा. तोवर त्याला किती गुण मिळतात ते महत्त्वाचे नाही. आजही आपल्यापैकी बरेच जण हे मान्य करतील कि दहावीला किती गुण मिळाले याचा पुढच्या आयुष्यावर फारसा फरक पडलेला नाही. त्यानंतर मात्र मुलाला मेहनत करणे का आवश्यक आहे हे समजून सांगणे आवश्यक आहे. परीक्षेचे तीन तास तुम्हाला पुरेसे आहेत कि नाहीत हे आपण स्वतः ठरवणे आवश्यक आहे. तसे पहिले तर नोकरीसाठी देण्यात येणारी मुलाखत किंवा कैम्पस इंटरव्ह्यू इथेही हीच कसोटी वापरली जाते. मग त्यासाठी मी त्यात उतरणार नाही हे म्हणणे जरा कठीण आहे. आयुष्यात स्पर्धा हि अटळ आहे. खरं तर आपण जन्माला आलो त्यात दहा कोटी शुक्राणू पैकी एक शर्यत जिंकलेला शुक्राणू म्हणजे आपण आहोत हे लक्षात ठेवायचे. पण म्हणून आयुष्य नेहमी स्पर्धाच आहे असे वागलो तर आयुष्य जगायचे केंव्हा?हि स्पर्धा उंदीर स्पर्धा होऊ नये यासाठी हा प्रपंच

माझे म्हणणे एवढेच आहे कि मुळात वाळली स्पर्धात्मकता का निर्माण होते याचे मुलभुत आकलन व्यवस्थित झाले तर, बच्चे कंपनिला कसे वागवले जावे याकडे बघण्याचा पालकांचा/समाजाच्या द्रुश्टिकोन बदलेल. एका बाजुला तुम्हिच म्हणताय स्पर्धा हवी पण लहान मुलांना त्यात ढकलु नये आता हे प्रत्यक्षात कसे घडणार ? स्पर्धात्मकता लहानपणापासुनच रुजवली नाही तर मोठेपणी ती बहरणारच याची काय खात्रि ? शेवटी विषाणुंची मुले व मुलांचीच माणसे बनत असतात गर्भात असतानाच बाळाला अक्कल द्यायचे (पुर्वापार) फंडे असताना केजित ट्युशन म्हणजे फरच सौम्य प्रकरण वाटत नाही काय ;) माझ्या चुलत्याचे उदा. देतो. त्याला पुण्यातिल अशा एका शाळेत शिकवले आहे जेथे ८वी पर्यंत उतारा दिला गेला नाही वा परिक्षेचे गुण पालकांना दाखवले गेले नाहित तर ते गोपनिय ठेउन केवळ मुलांचे विषयातिल कच्चे दुवे हेरुन त्यात सुधारणा करायचे महत्वपुर्ण प्रयत्न केले, हसत खेळतच अभ्यास घेतला गेला. सदरिल मुलाचे आइ वडिल हे टॉप रॅकिंगमधिल द्विपदवीधर आहेत. पण मुलाचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही. वडिलांना मुलगा उच्चशिक्षित सोडा दहावि पास होइल काय याची सध्या चिंता आहे. पुन्हा सवय नसताना अचानक जिवघेण्या स्पर्धेला हा कसा सामोरा जाणार याचे कुतुहल मला वैयक्तिक पातळिवरही आहे. (सगळेच असे असतिल असे माझे म्हणने नाही).

मि ज्याला प्रतिसाद लिहला आहे त्यातच शुक्राणुचा स्पष्ट उल्लेख आहे. मला फक्त मुळ मुद्दा सोडुन गफ्फा हाणायला किती घोघावतात हे बघायच होतं... :)

वाटलच होत नक्कि एखादा मासा गळाला लागणार...* विषाणु घ्या जिवाणु घ्या शुक्राणु घ्या... * एक्सेप्ट यु.

बॅटमॅन, अहो काय झालं. सिवाजी यांनी आधी प्रतिसादात 'विषाणू' लिहिले तो बूंद. आणि नंतरचे स्पष्टीकरणाचे प्रतिसाद म्हणजे हौद. -- तुम्ही आपले हसताय.

स्पर्धा हवी पण लहान मुलांना त्यात ढकलु नये हेच म्हणतो मी. मुल बारा तेरा वर्षाचे होईपर्यंत त्याला नुसते ज्ञान मिळवू द्या. त्याला विद्यार्थी असू द्या परीक्षार्थी बनवू नका. आठवी ते दहावी मानसिक तयारी करू द्या आणि त्यानंतर त्याला परीक्षार्थी बनू द्या. (खरे तर त्याने आयुष्यभर विद्यार्थीच असावे. पण ते सध्याच्या युगात भारतात तरी शक्य नाही). आज आय आय टी साठी आठवीपासून तयारी करून घेणारे क्लासेस गल्लोगल्ली आहेत. पण मी माझ्या मुलाला तेथे पाठविले नाही. आता तो बारावीत आहे काय करेल देव जाणे. पण पाच वर्षे(आठवी ते बारावी) घासघासून( फुकट घालवून) उच्च कॉलेजात जाण्यापेक्षा एक वर्ष परत परीक्षा दिली तरी चालेल( या वर्षी प्रवेश मिळाला नाही तरी) असे माझे मत आहे आणि मी ते आचरणात आणतो आहे. या अधिक एक वर्षात(जर परत परीक्षा द्यायला लागली तर) त्याला नक्की कळेल कि आपल्याला काय करायचे आहे).

आज इंजिनियरिंग मध्ये जे शिकवले जाते ते उद्योगाच्या उपयोगाचे नसून जे प्राध्यापकांना शिकवता येते ते शिक्षण असते.या कॉलेजांचा अभ्यासक्रम उद्योगाभिमुख करणे अतिशय गरजेचे आहे.
सह्मत

साधारण बुद्धिमत्ता असणा~या साठी कारखाना हे चांगले फिल्ड होते पण सरकारने कारखानदारी संपवली..अन कळफलक बडवे यांचे राज्य आले..त्या मुळे तरुणाना चकाचक ऑफिस मधे बसुन काम करणे आवडु लागले.. सेवा क्षेत्र मुलाना बरे वाटते.. ८-१० तास मशिन वर उभे रहा अन कमी पगार घ्या ..त्यातुन हंगामी कामगार..सारे कठिण आहे.. ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले... असो ..आता मुकाट्याने चायना चा माल वापरायचा...आपली बस चुकली ? असे वाटते. जगाचे माहित नाहि पण भारत भुमी शेषाच्या मस्तकावर तरली नसुन कलफलक बडवणा~या हातावर तरली आहे हे नक्कि...

हे एक तुमचं काय आहे की.. शॉपफ्लोअर वर उभं राहीलं तरच खरं काम.. बाकी थोबाडा समोर कॉम्प्युटर आला की ते सगळे कळबडवे.. ज्यांना ऐषोआराम प्रिय आहे.. नाही म्हणजे आपल्याला आपण जे करतो तेच भारी आहे असं वाटणं स्वाभाविक आहे..पण... असो.. काका २०१३ मध्ये आप्लं स्वागत आहे..

चीनने गेल्या ३० वर्षांतौद्योगिक क्षेत्रात ५० कोटी लोकांना रोजगार निर्माण करून दिला. या उद्योगांसाठी आवश्यक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्यामुळे हे शक्य झाले. आपल्याकडे खराब रस्ते, वीज टंचाई, महाग इंधन, बंदरं आणि गोडाउन्सची टंचाई आणि लायसन राज यामुळे औद्योगिक क्षेत्राला फुटणारे पंखच कापून टाकण्यात आले. आज देशात औद्योगिक उत्पादन करणं फायदेशीर नाही. जगाच्या गरजा पुरवणं राहिलं दूरचं पण आपल्याला लागणाऱ्या साध्या गोष्टी जसं की इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक-मोबाईल यांचे हार्डवेअर यासारख्याही गोष्टी आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो. दिल्ली-मुंबई १४०० किमीचा औद्योगिक पट्टा उभारण्यासाठी जपान पैसा व तांत्रिक मदत घेऊन दाराशी उभा असताना आपण जपानचा पांढरा झेंडा लालफितशाहीत गुंडाळून ठेवला.

अच्छा.. आता तुमचा प्रॉब्लेम कळला.. पण काका, जे जे लोक कॉम्प्युटर वर काम करतात ते सगळेच सरसकट अमेरीकेची भांडी घासत नाहीत हो.. आता तुमचं चालु द्या.. "इथुन पुढे" मी दुर्लक्ष करायचं ठरवलय!

जे जे लोक कॉम्प्युटर वर काम करतात ते सगळेच सरसकट अमेरीकेची भांडी घासत नाहीत हो
कॉम्प्युटरवर काम करणारी मंडळी कधिना कधी कॉम्प्युटर पुसत असतीलच. जगातले सगळे काँप्युटर्स अमेरिकेत डिझाईन केलेले असतात आणि बनवले जाउ शकतात. त्यामुळे भांडी घासतात ही उपमा थ्री मच असली तरीही अगदी चुकीची नाही. एक उदाहरण म्हणून काँप्युटर्सच्या शी पीयु लागणारे फक्त स्क्रूज भारतात बनत असतील. प्रोसेसर्स आणि मदरबोर्ड्स भारतात कुठेच बनत नाहीत. अगदी भेल मध्ये सुद्धा नाहीत.

"काँप्युटर्सच्या शी पीयु लागणारे फक्त स्क्रूज भारतात बनत असतील. प्रोसेसर्स आणि मदरबोर्ड्स भारतात कुठेच बनत नाही" अतिशय चुकिची माहीती अतिशय आत्मविश्वासाने दिली आहे म्हणून म्हटलं.

भारतामध्ये software हीं विकत घेण्याची गोष्ट आहे हे काही अजून लोकाना पटलेले नाही त्यामुळे कळ बडव्याना परदेशी बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत आहे.. तरी सुधा ह्या भारतात सुधा आत्ता स्वताचे software उत्पादन करून भारतातच वापर करण्यास सुरवात झाली आहे Flipkart हे सर्वात चांगले उदाहरण आहे

ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले.. सर हे जरा एक्सप्लेन करा ना आणि सरकारने कारखानदारी संपवली हे नाही पटले

दुर्लक्ष हाच उत्तम उपाय !!!!!!!.. नक्किच नाहितरी आता देशात औद्योगिक उत्पादन करणं फायदेशीर नाही....त्या मुळे आपले म्हणने खरे ठरते.. असो..घासा अमेरिकेची भांडी..अन मिळवा रोजगार

घासा अमेरिकेची भांडी..अन मिळवा रोजगार नाईलाजाने थोडीफार सहमत. तुमचे म्हणणे थोडे पटते कारण आम्हीही आमच्या घरची भांडी गुंडाळूनच हामेरिकेत आलोय. त्यावेळी त्रास झालाच होता. पण देशात आपली भांडी खरकटी होण्याइतपतही सोय नव्हती त्यावेळी.

ओ.बी.सी समाजातिल कुंभार..सुतार..चांभार आदी बलुते दार मुलांच्या जिन्स मधे कला असते त्याना कुशल कामगार आमच्या पिढिने बनवले.. प्रत्येक समाजातील मुलांमध्ये आपापल्या वंशपरंपरागत व्यवसायाची कुशलता असते. पूर्वी चातुर्वर्ण्याची वा बलुतेदारीची संकल्पना होती. त्या मध्ये मुले लहानपणापासूनच त्या त्या घरीच चालणार्‍या व्यवसायात पाहून पाहून तरबेज होत असत. मुलांच्या व त्यांच्या पालका॑च्या समोर त्याने भवितव्यात काय व्हायचे हा प्रश्न आ वासून पडत नसे. कारण त्याचे व्यवसायिक भवितव्य ठरलेले असे. आज मुलांचे (व पालकांचेही) भवितव्य अनिश्चित असते. एक तर मूल १२ वी होईपर्यंत त्याने काय करावे हे ठरवता येत नसते. १२ वीत किंवा तत्सम प्रवेश परीक्षेत जर तो कमी पडला तर तो कदाचित आयुष्यातील रॅट रेस मध्ये कायमचा मागे पडतो. शिक्षणातच त्याचे तारुण्य जाते. म्हणून कधी कधी पूर्वीची समाज व्यवस्था त्यातील जन्माधिष्ठित व्यवसायाची सक्तीचा व उच्च नीचतेचा भाग किंवा अस्पृश्यतेचा अतिरेक टाळल्यास खरोखरीच उत्तम होती असे वाटते.

म्हणणे पटले नाही. या न्यायाने माझी दोन्ही मुले उत्तम डॉक्टर झाली असती ( बायको डॉक्टर च्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्रात १२ वि होती) पण माझी दोन्ही मुले इतर व्यवसायाकडे स्वतःच्या मर्जीने गेली. मुर्तीकाराचा मुलगा उत्तम मूर्तिकार होत नाही किंवा सुताराचा मुलगा उत्तम सुतार होत नाहि.कला अनुवांशिक असते याला कोणताही शास्त्राधार नाही. पूर्वी आठ दहा मुले असत त्यातील एखादा चांगला सुतार किंवा मूर्तिकार इ होत असे बाकी सगळे पाट्या टाकत असत. आता एक किंवा दोन मुलात हे अशक्य आहे . आणि बहुतांश बलुतेदारांची आर्थिक परिस्थिती मुळीच चांगली नव्हती. (काही विशिष्ट व्यवसाय सोडून उदा सोनार) त्यामुळे भवितव्यात काय आहे त्याची चिंता नसे ऐवजी आपले आयुष्य आहे त्या चाकोरीतच राहून जाणार( किंवा फुकट जाणार) आहे हि खंत होती. जुने ते सर्व सोने असते( किंवा चकाकते ते सर्व सोने असते) हे मान्य नाही

मी माझ्या घरातलेच उदाहरण देतो,अगोदरच्या पिढीचा आणी पुढच्या पिढीच्या व्यवसायाचा काहीही संबध नाही .पुर्वज वतनदार्,आजोबा गाव कारभारी,वडील पापभिरु शाळामास्तर्,अस्मादिकांची वैद्यकी,आणी कन्यारत्न एक नंबरच मवाली(मोठ्ठ पोलिस अधिकारी होण्याच स्वप्न पाहतय्)मागच्या पिढीच्या व्यवसायाचा पुढच्या पिढीशी काडीमात्र संबध नाही.त्यामुळे एकच गोष्ट जाणवते की तुम्ही काय होणार हे फक्त तुम्हीच ठरवु शकत.फक्त योग्य प्रयत्न आवश्यक....

आमच्याकडंही असंच, आजोबा गावच्या देवळात पुजारी होते,बाबा शिक्षक, मी अभियंता, आणि सध्याच्या लक्षणावरुन पोरगं गेलाबाजार नगरसेवक होईल अशी चिन्हं आहेत, बँकानी निवडणुका लढवणे हा धंदा आहे असं मान्य करुन कर्ज द्यायला सुरु केलं तर खासदार वैग्रे होईल, अशी आशा आहे.

डॉक्टर साहेब, आपली मुले डॉक्टर झाली नाहीत,हा प्रचलित शिक्षणपद्धतीचा दोष आहे.तसेच आपण स्वतः त्यांना आपले उत्तराधिकारी किंवा आपली गादी चालविणारे वारस म्हणून जाणिवपूर्वक किती वैद्यकीय ज्ञान दिले ? पूर्वी घरीच व्यवसाय असल्यामुळे लहानपणापासून मुलास व्ययसायाचे बाळकडू मिळत असे. त्यामुळे आज आइन विशीत मुले व पालकांसमोर पुढे काय करायचे हा प्रश्न पडतो, तो त्या वेळी पडत नसे. तसेच समाजालाही एक काम करणारा हात लवकर मिळाल्याने त्याचाही विकास होत असे. आज समाजाला पंचविशीपर्यंत युवकाला बिन कामाचे(म्हणजे अर्थशास्त्रिय/अर्थार्जन करुन देणारे काम या अर्थाने) पोसावे लागते.म्हणून मी बलुतेदारी चांगली असे म्हणालो.

साहेब , माझ्या मुलीला विज्ञान आवडत नाही तिचा भाषांकडे कल आहे म्हणून तिने आत्तापर्यंत स्पैनिश च्या सहा परिक्षा दिल्या आहेत आणी कॉमर्स ला जाऊन कंपनी सेक्रेटरीची पहिली परीक्षा पास झाली आहे. तिंच काळ नसताना तिला डॉक्टर करण्याचा काय फायदा? तसेच मुलगा बारावीत आहे आणि त्याला जीवशास्त्र अजिबात आवडत नाही आणि गणित आवडते असे असल्यावर त्याला मारून मुटकून वैद्यबुवा बनवण्यात काय हशील? आयुष्यभर रुग्ण त्याला आणि तो रुग्णांना आणि आईबापाना दुषणे देत राहणार. पंचविशीपर्यंत न कमावता तर जुन्या जमान्यातील वैद्य सुद्धा शिकत असत मग त्यांना लोहार किंवा सुतारापेक्षा जास्त मान का मिळत असे? कारण आपल्या कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची किंमत असते. नुसते अंगमेहनतीचे काम करणार्याला किती पैसे मिळणार? एक न धड भाराभर चिंध्या अशी आपल्या देशाची लोकसंख्या अगोदरच आहे.त्यात सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकांची भर घालायची कि अधिक चिंध्या वाढवायच्या? उत्तर प्रदेशात किंवा बिहार मध्ये जाऊन पहा काम करणारे हात भरपूर आहेत पण त्यांना द्यायला काम कुठे आहे? उगाच का ते मुंबईत येतात?

वैद्य, सोनार वा लोहार सुतार पिढीजात कामे करतील हे एक वेळ मान्य पण मेलेल्या ढोरांची विल्हेवाट लावणारे, झाडझूड करणारे, कचरा उचलणारे, ह्यांचे काय? काही कारणाने कुणी एकाने हा व्यवसाय निवडला म्हणून त्यांनी काय पिढ्यान पिढ्या तेच करायचे काय? असल्या व्यवसायाचे बाळकडू कशाला प्यायचे? उत्तराधिकारी वगैरे काय प्रकार आहे? हल्ली कुठल्या विषयाचे ज्ञान हे मूठभर लोकांपुरते मर्यादित नसते, विशेषतः रोजच्या जीवनात लागणारे ज्ञान. तेव्हा माझ्या पश्चात ते संपेल, माझ्या उत्तराधिकार्‍याला ते सोपवणे माझे कर्तव्य आहे वगैरे लागू नाही. इच्छा आणि कुवत असल्यास त्या क्षेत्रात शिक्षक, प्राध्यापक, प्रशिक्षक व्हायची मुभा आहे.

बलुतेदारीमुळे गावे स्वयंपूर्ण असत. त्या त्या गावची सर्व तांत्रीक कामे तेथेच केली जात. महात्मा गांधींचाही बलुतेदारी व चातुर्वर्ण्यावर विश्वास होता. त्यांच्या स्वप्नातील स्वयंपुर्ण गाव ह्याच व्यवस्थेद्वारे चालणारे होते.आता तुम्ही म्हणाल की प्रचलीत काळात ( म्हणजे अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाने परिपूर्ण) हे सर्व कालबाह्य झाले. मान्य आहे.परंतू आपण जर दोन्ही काळातील समाजव्यवस्थांची तुलना केली , तर जुने ते सोने असेच म्हणावे लागेल.त्या काळातील पापभिरुता, भाबडेपणा आज तंत्रज्ञान युक्त काळात लोपली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार, अनाचार बोकाळलेले आहेत. ह्यास प्रगती म्हणायची काय असा प्रश्न पडतो. पर्यावरणाचा र्‍हास, भ्रष्टाचार ही आजच्या तंत्रज्ञानाची देणगीच आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज रोज सकाळी दूरदर्शन पाहतो, त्यात सर्व ह्याच बातम्या दिसतात. आपल्या व माझ्या सुदैवाने, आपण पंडितजी, शास्त्रीजी या सारख्यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवु शकलो. आज कोणते आदर्श आपल्या तरुण पिढीपुढे आहेत हे मी सांगण्याची गरज नसावी.

हीच बलुतेदारी जेंव्हा दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती पडत असे तेंव्हा कोसळत असे आणि गावेच्या गावे जगायला(!!!) म्हणून बाहेर पडत असत. गावे स्वयंपूर्ण होती हे फार् तर अर्धसत्य आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत हा कणा मोडून पडत असे.जिम कॉर्बेट ची पुस्तके किंवा व्यंकटेश माडगुळकरांचे बनगरवाडी वाचून पहा. जुन्या जमान्यातील गावांची कशी वाताहत होत असे ते छान वर्णन करून लिहिले आहे. मलेरिया, कॉलरा किंवा प्लेगच्या रोगाने गावेच काय शहरे उद्ध्वस्त झालेला इतिहास फार जुना नाही. जुने ते सगळेच सोने असते असे नाही

डॉक्टर साहेबांचा लेख आणि त्या वरील सगळे प्रतिसाद हे मुलांवर अवास्तव बौध्दीक ताण देवु नये या विषयावरचे आहेत. पण सध्या मला आणि माझ्य पत्नीला एक प्रश्र्ण सतावतो आहे म्हणुन थोडे विषयांतर. मुलांवर अभ्यासाची जबरदस्ती करु नये हे आम्हा दोघांनाही पटते. पण जर मुलांनी व्यायाम करायला सुध्दा नकार दिला तर काय करायचे? सुरवातीला आम्हाला वाटले की असे टिव्ही मुळे होत असेल म्हणुन आम्ही घरातील केबल कनेक्षन काढुन टाकले. कॉम्प्युटर मोबाइल ला पासवर्ड टाकले, पण त्या मुळे परीस्थीतीत काहिच सुधारणा झाली नाही. सकाळी कंटाळा येतो म्हणुन संध्याकाळी तरी त्यांनी थोडी हलचाल करावी असे प्रयत्न केले. त्यांच्या बरोबरीने व्यायाम करुन पाहिले,धावायला जाउन पाहिले पण परिणाम शुन्य. मुलांनी कोणी मोठे धावपटू वगेरे बनावे अशी आमची इच्छा नाही पण रोज थोडा व्यायाम करायला पाहिजे या मताचे आम्ही दोघेही आहोत. या व्यायाम न करण्याचा परिणाम मुलांच्या शरीरावर दिसायला लागला आहे. वर्गात पहिल्या बाकावर बसायचीही किंवा वाढणार्‍या आकाराची अजिबात लाज वाटत नाही. आमच्या फॅमेली डॉक्टरांच्या तर्फे सुध्दा उपदेश करुन झाला आहे. ग्राउंडला घातले, शिबिरांना घातले तरी तिकडुन पळुन येणे किंवा शिक्षकांनाच वात आणणे असे प्रकार झाले.शेवटचा उपाय म्हणुन झोडपुन सुध्दा काढले आहे. (सहन शक्तीच्या सर्व मर्यादा संपल्यावर) पण असल्या जबरदस्तीने केलेल्या व्यायामाचा काहीही फायदा होत नाही हे आम्हाला माहीत आहे. रात्री उशीरा पर्यंत जागे रहाणे आणि सकाळी उशीरा उठणे हा आवडता दिनक्रम झाला आहे. शाळेत जायचे नाही असे म्हटले की त्यांच्या सारखे खुष तेच असतात. सहलीला जाताना आनंदाने उठणारी मुले सकाळी लवकर व्यायामासाठी उठवले कि प्रचंड मोठ्या आवाजात किंचाळत रडायला लागतात, पण व्यायाम करत नाहीत. आमच्या कडुन सगळे उपाय करुन झाले पण फरक पडत नाही जर कोणाकडे काही दुसरा उपाय असला तर कृपया सुचवा कारण काय करावे या विवंचनेत सध्या आम्ही दोघेही आहोत.

ज्वलंत प्रश्न. लोकांची मते वाचण्यास उत्सुक. लहानपणापसुनच (१.५-२ वर्ष) मुलांना मैदानावर, मोकळ्या जागी खेळायला नियमीतपणे नेले पाहीजे. घरातील लोकांनी टीव्ही, कॉम्युटर, मोबाईल सतत वापरले तर मुलांना त्याची सवय लागणारच आणि मग ती सोडवणे कठीण होऊन बसते. आपणच बाळ जेवत नाही मग टीव्हीवर कार्टून लावुन द्या, सीडी लावुन द्या, रडायला लागले की कॉम्युटरवर, प्लेस्टेशन्वर गेम खेळायला द्या असे करतो. याने आपले मुलाला शांत करण्याचे कष्टही वाचतात आणि मुल पण शहाण्यासारखे गपगुमान राहते. परत जेव्हा किरकिर चालु होते तेव्हा आपण आधीपैकीच यशस्वी झालेला उपाय परत अमलात आणतो.. चक्र चालु राहाते आणि मुलांना मशिनची सवय लागते. आपणच आधी लहान मुलांचे रडणे, किरकिर पचवणे शिकले पाहीजे.

व्यायामाची आवड लागल्याशिवाय तो मारुन मुटकून होणार नाहीच, तस्मात त्यांना व्यायामाची आवड कशी लागेल ते पहा. लहान वयात ह्याबाबतीत पिअर प्रेशर काम करते हे मी अनुभवाने सांगू शकतो. म्हणजे तुझ्याबरोबरीची मुलं व्यायाम करतायेत तुला थोडी तरी ताकद यायलाच हवी, हे बिंबवायचा प्रयत्न व्हायला हवा. आमचे काका, पैज मारुन जास्तीत जास्त 'पुल अप्स' काढणार्‍या पोराला तिथल्या तेथे दहाची नोट देत असत. गणपतित व्यायाम स्पर्धा असत, व्यायामशाळेची गोडी कधी लागली ते कळलच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाच, अति-व्यायामाची घाई करु नका, फार लवकर बैठका वगैरे मारायला घेतल्याने उंची खुंटते असं म्हणतात (ख.खो दे. जा.) स्नायू पूर्ण वाढले की मग बळकट करायचे, तोपर्यंत थोडाफार व्यायाम झाला तरी पुरे! लहान वयातील मुलांना डबल बार, नुसते लोंबकाळणे वगैरे असेल जवळ पास तर बेस्ट! शुभेच्छा!

पैजार साहेब मुले अडनिड्या वयाची( मुली तेरा चौदा आणि मुलगे पंधरा ते सोळा) झाली कि त्यांना शिंगे फुटतात आणि आई बाप सांगतात त्यात काही तथ्य नाही असे वाटू लागते. अशा वेळेस जोर जबरदस्ती करून काहीच फायदा होत नाही. पण त्यांना त्यांच्या कला कलाने सांगत राहिले पाहिजे. सुरुवातीला काय पकाऊ लेक्चर देत आहे असा अविर्भाव चेहऱ्यावर असतो. त्याकडे दुर्लक्ष करीत आपण छोट्या छोट्या सूचन करीत राहावे. सुरुवातीला पालथ्या घड्यावर पाणी असे वाटते पण ते हळू हळू आत झिरपत असते आणि याचा परिणाम एक दोन वर्षांनी दिसू लागतो. माझी मुलगी नववी पर्यंत सायकल चालवत असे. मग एकदम तिने ते बंद केले सुरुवातीला मी ती सायकल दोन वेळा तेलपाणी केले नंतर सायकल आमच्या मोलकरणीला देऊन टाकली. व्यायामाचे फायदे तिला दोन वर्षे पर्यंत हळूहळू सांगत होतो कि व्यायामाने त्वचेचा रक्त पुरवठा वाढतो आणि त्वचा जास्त तजेलदार दिसते, केसांचा पोत सुधारतो आणि त्याला चमक येते. पालथ्या घड्यातून पाणी हळूहळू झिरपत होते. आता ती रिक्षाला पाय लावत नाही सगळीकडे चालत जाते. मध्ये सहा महिने जिम मध्ये सुद्धा जात होती. हाच प्रयोग आता मुलावर( वय १६ वर्षे) चालू आहे. तो रिक्षा शिवाय जात नाही व्यायाम म्हणजे फक्त सठी सहामासी फुटबॉल खेळणे. त्याला हेच सांगणे चालू आहे कि चेहरा सुधारला नाही तर मुली बघणार नाहीत. मधून मधून फुटबॉल पटू काय व्यायाम करतात हे वृत्तपत्रात लिहिलेले दाखवतो. यावर त्याचे उत्तर हेच असते कि मुलींशी घेणे देणे नाही पण कुणाच्या वाढदिवसासाठी जसा तयार होऊन जातो त्यावरून ते खरे नाही हे कळते.काही काळानंतर परिणाम दिसू लागेल अशी अपेक्षा आहे. या वयातील मुलांना थोडक्यात सांगणे आवश्यक असते. हे तीस सेकंदापेक्षा जास्त असेल तर मुले ऐकत नाहीत. पाल्हाळ लावले तर मुले सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करतात. हे सांगणे आता आमच्या पत्नीला पटू लागले आहे. तिची हीच तक्रार आहे कि मुले माझे ऐकत नाहीत.फक्त तुझेच ऐकतात. तिला समजावून सांगितल्यावर लक्षात येते आहे पण मुळ स्वभाव सहज बदलत नाही. थोडा काळ जायला लागेल. सध्या तरी परिस्थिती अशी आहे.