बाह्यरुपावर भाळून किंवा आज ह्या तरूणीच्या मागे तर लगेच उद्या त्या तरूणीच्या मागे अशा भ्रमरवृत्तीचे तरूण तिच्या आयुष्यातून दूर गेले ह्यात खरेतर सुझीने दैवाचे आभार मानले पाहिजेत.
अडतीस वर्षांच्या आयुष्यात एक चेलो (वाद्य असते का?) वाजविण्यापलीकडे व्यक्तिमत्त्व विकास करण्याचा किंवा शारीरीक विकास रोखण्याचा तिने प्रयत्न केल्याचे दिसत नाही. ही तिचीच चुक. तरी पण, स्थूल मुलींनाही (स्थूल) तरूण मिळतातच. तिने एवढे निराश का व्हावे समजत नाही. कदाचित कॅरोलीनला वाटते तशी सुझीची अपरिपक्वता असेल. त्यासाठी स्थानबदलाचा निर्णय मनाला तितकासा पटत नाही.
"हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण.....
हे वाक्य एक स्त्री दुसर्या स्त्रीस उद्देशून म्हणते आहे, तेही स्वतःच्या लहान बहिणीला, हे पाहता सुझीचा निर्णय, कॅरोलिनापासून दूर राहण्याचा, योग्यच म्हणावा लागेल.
कथा, क्रमशः असल्याने पुढील भागात कांही प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटते आहे.
बाह्यरुपावर भाळून किंवा आज ह्या तरूणीच्या मागे तर लगेच उद्या त्या तरूणीच्या मागे अशा भ्रमरवृत्तीचे तरूण तिच्या आयुष्यातून दूर गेले ह्यात खरेतर सुझीने दैवाचे आभार मानले पाहिजेत.
झालेल्या गोष्टीबद्दल उगाच एक समाधान वाटून घेण्यासाठी ही सबब छान आहे. पण वास्तविक तरूणांचे 'वफादार' आणि 'बेवफा' असे दोनच प्रकार असत नाहीत. अनेकजणं संधी न मिळाल्यामुळे वफादार रहात असं वाटत नाही का? आणि कॅरोलिना मुद्दामच घरी आलेल्या तरूणांना फूस असेल असं सुझीला वाटण्याची शक्यता आहेच की. आपल्याकडेसुद्धा मुलगा बघायच्या वेळी मुलीपेक्षा सुंदर बहिणीला फार पुढे-पुढे करू नकोस असा दम मिळतो.
झालेल्या गोष्टीबद्दल उगाच एक समाधान वाटून घेण्यासाठी ही सबब छान आहे.
चला! तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही निव्वळ सबब आहे असे मानले. पण त्या तरूणांमधल्या एकाशी लग्न केले असते आणि नंतर तो कॅरोलिना किंवा इतर कोणी सुंदर मुलीकडे वळला असता तर पश्चाततापच झाला असता नं? त्यापेक्षा अशा तरूणांपासून आपण वाचलो ही समाधानाची बाब नाही का? स्त्री-पुरुष संबंधात (लग्नसंबंधात) प्रेम हे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. तेच नसेल तर वरील प्रकार घडतो. म्हणजे जे पुरूष कॅरोलिना किंवा इतर कोणाच्या फुस लावण्याने सुझीपासून दूर गेले त्यांच्या मनांत प्रेम नव्हते फक्त शारीरीक आकर्षण होते. असे उमेदवार लग्ना आधीच बाद ठरले आणि सुझी संभाव्य धोक्यापासून वाचली म्हणून तिने देवाचे आभार मानले पाहिजेत.
अनेकजणं संधी न मिळाल्यामुळे वफादार रहात असं वाटत नाही का?
नाही. तसं वाटत नाही. प्रेम नांवाची अशी एक ताकद असते ती पुरूषांना आणि स्त्रियांना गैरवर्तनापासून रोखते. हं, मुळात प्रेमच नसेल, फक्त शारीरीक आकर्षण असेल तर एका शरीराला उपभोगून झाल्यावर पुरूष दुसर्या शरीराचा शोध सुरु करेल.
प्रेम असेल तर पुरूष पत्नी पासून, कितीही प्रलोभने असली तरी, दूर जात नाही. कित्येक मुल न होऊ शकणार्या स्त्रियांशी त्यांचे नवरे प्रामाणिक असतात. कित्येक आजारी पत्नीची सेवा करणारे पती असतात. तिथे प्रेम भावना वास करीत असते.
या तरूणांना फूस असेल असं सुझीला वाटण्याची शक्यता आहेच की.
त्यासाठी वयाची तारूण्याची २०-२२ वर्षे खर्ची पडत नाहीत. वर्ष दोनवर्षात अंदाज येतो. संपूर्ण तारूण्य संपून गेलं आणि प्रजनन शक्ती संपायला २ वर्षे राहिली असताना असा साक्षात्कार होणे हे मुळात सुझीच्या मूर्खपणाचे लक्षण मानावे लागेल. प्रत्येक तरूणाला कॅरोलिन फूस का लावेल? हं, एखादा आवडला आणि बहिणीकडून हिसकाऊन घेतला आणि लग्न करून मोकळी झाली असे होऊ शकते. पण तिच्या आयुष्यात येणारा प्रत्येक तरूण कॅरोलिना हिसकावते हे पटत नाही.
आपल्याकडेसुद्धा मुलगा बघायच्या वेळी मुलीपेक्षा सुंदर बहिणीला फार पुढे-पुढे करू नकोस असा दम मिळतो.
धाकटी बहिण सुंदर असेल तर मोठ्या बहिणीच्या लग्न ठरवण्याच्या प्रसंगी तसे म्हंटले जाऊ शकते. एकदाच. पण जर बघायला आलेल्या नवर्यास धाकटी बहीण आणि तिला तो तरूण आवडला असेल तर तिचे लग्न लावून दिले की प्रत्येक वेळी मोठ्या बहिणीच्या लग्नात ही समस्या उद्भवू शकत नाही. (कारण तेंव्हा ती विवाहीत असणार). इथे विस-बावीस वर्षे सातत्याने हे घडत आहे. त्यामुळे ह्या दोन समस्या वेगवेगळ्या आहेत. कॅरोलीना मोठी असून तिचे लग्न का झाले नाही हेही कळत नाही.
प्रेम नांवाची अशी एक ताकद असते ती पुरूषांना आणि स्त्रियांना गैरवर्तनापासून रोखते.
प्रेम असेल तर पुरूष पत्नी पासून, कितीही प्रलोभने असली तरी, दूर जात नाही. कित्येक मुल न होऊ शकणार्या स्त्रियांशी त्यांचे नवरे प्रामाणिक असतात. कित्येक आजारी पत्नीची सेवा करणारे पती असतात. तिथे प्रेम भावना वास करीत असते.
सहमत. पण त्यासाठी अवधी जावा लागतो. प्रेम सहवासातून तयार होते. त्यामुळे सुरवातीला त्यांच्या मध्ये बांधून ठेवणारं काहीतरी असावं लागत. प्रत्येकवेळी वाग्चातुर्य, विनोदबुद्धी चालेलच असं नाही. प्लेटॉनिक रिलेशनशिप असेल तर ते चालेल. पण त्याव्यक्तीबरोबर संसाराची स्वप्न बघायची असतील तर ते काहीप्रमाणात शारिरीकसुद्धा असायलाच हवं. तो अवकाश मिळायच्या आतच जर संबंध दुरावले तर तिथपर्यंत ते जाउ शकणार नाहीत. असं होउ शकणारे सगळेच तरूण चंचल असतात असं वाटत नाही.
इथे विस-बावीस वर्षे सातत्याने हे घडत आहे. त्यामुळे ह्या दोन समस्या वेगवेगळ्या आहेत. कॅरोलीना मोठी असून तिचे लग्न का झाले नाही हेही कळत नाही.
वाचतोय.
अवांतरः शब्दांच्या शेवटच्या अक्षरांवरील अनुस्वारांच्या चुका बऱ्याच खटकल्या. सगळ, संपल वगैरे ठिकाणी आवश्यक असतानाही दिसत नाहीत. एके ठिकाणी जिथे 'स्वतःचं'च्या ऐवजी 'स्वतःच' लिहिले आहे. हे गोंधळवणारे आहे.
शीर्षक वाचून माझ्या मनात 'काय?' असा प्रश्न आला. :P
सर्वांना धन्यवाद.
खरतरं आपल्या येथेही अश्या गोष्टी घडतात नाही असं नाही. पण आपल्या येथे लग्न करुन देणे ही पालकांची जबाबदारी असते, तरीही ..तुझ्या पेक्षा माझ बरं आहे..किंवा मला शोधताना असा का नाही शोधला ..अश्या बारीक कुरबुरी असतात्च. काही ठिकाणी अगदी हमरी तुमरीवर आलेली प्रकरण पाहिली आहेतं. एकुण वर्चस्व गाजवने हा भाग अधिक असतो..अन पाश्च्यात्त देशात, जेथे आपला जोडीदार आपण निवडायचा असतो, तेथे थोडाफार प्रभाव टाकता येतो.
अर्थात आपल्याकडे मोठ्या बहिणीच्या नवर्याबरोबर लग्न केल्याची उदाहरणे काही नवी नाहीत. अरुण सरनाईक हे अगदी माहीतीच अन प्रसिद्ध उदाहरण!
प्रतिक्रिया
वाचतेय..
पुढचा भाग लवकर येउ देत...
+१
विषय वेगळा दिसतोय. वाचतेय.
हम्म... इन्ट्रेस्टिन्ग.
वाचते आहे..
रोचक!! ताईपणाच्या भानगडीत
उत्तम सुरवात
कांहीशी पटते... कांहीशी नाही.
-१
दोन वेगळ्या समस्या...
हम्म...
छान वाटते आहे कथा!
प्रभावी....
छान लिहिलय अपरणातै.
वाचतोय !
+१
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
वाचतोय!!
वाचतेय!
हं..
पुढचा भाग वाचण्यासाठी उत्सुक.
वाचतोय
उत्सुक
वाचतोय.
कथा छानच अशी वाटते. दूसरा भाग
जास्त उत्कंठा ताणू नका!
वेगळ्या पार्श्वभूमीवरची वेगळी कथा.
पुढचा भाग केव्हा?
सर्वांना धन्यवाद.
सुंदर कथा आहे. अनुवादही छान