हिंदू धर्माची अजून एक व्याख्या अशी की "आपण या धर्माचे आहोत हे सार्वजनिकरित्या सांगितले तर त्या व्यक्तिवर जातीयवादी असा आरोप होतो तो धर्म म्हणजे हिंदूधर्म" किंवा "आपल्या धर्माचे सार्वजनिकरित्या नाव घेणे ज्या धर्माच्या व्यक्तींना अपराधीपणाचे वाटते तो धर्म म्हणजे हिंदूधर्म" किंवा "आपण या धर्माचे आहोत असे अभिमानाने सांगणे म्हणजे एक पाप आहे असा धर्म म्हणजे हिंदूधर्म".
हिंदू धर्मात हिंसा बिल्कुल चालते..!
..नाठाळाची माथी हाणू काठी !
देश्द्रोही तितुके कुत्ते..मारुनी घालावे परते.
प्रत्यक्ष देवच आधी मारतो आणि मग भक्ताला म्हणतो मी आधीच मारून टा़कले आहे , तू फक्त निमित्त मात्र हो !
..निमित्त्मात्रेन भव सव्यसाची |
हिंसा चालत नाही ती हिंदू धर्मांतर्गत जैन पंथात !पण तो ही एक अतिरेकच होय !
पण पूर्वी एका काथ्याकूटात जगात फक्त एक हिंदू धर्म आहे असं वाचल्याच आठवतं.. बाकी सगळे पंथ आहेत .. जसे नास्तिक हिंदू असु शकतात तसेच मुस्लिम हिंदू, ख्रिश्चन हिंदू असही म्हणता येत असं ठरलं होतं..
आणि सगळेच हिंदू म्हटल्यावर व्याख्या वगैरे कशाला करायची..
माणूस म्हणजे हिंदू .. (प्राणी, पक्षी, झाडं त्यात येतात की नाही माहित नाही :-) )
हाच हिंदूना मोठा शाप आहे ! सार्या जगाला जे सहज समजते / उमगते तेच हिंदूना पुन्हा पुन्हा सांगायला लागते.. तेच तेच पुनः पुन्हा !म्ह्णून व्याख्या सांगावी लागते. वयं सुपुत्रं अमृतस्य नूनं हे सतत सांगावे लागते.
कर्म केलेचि करावे | ध्यान धरलेचि धरावे|
विवरलेचि विवरावे | पुनः पुन्हा ||
http://www.defence.pk/forums/seniors-cafe/266483-when-germany-christian-india-hindu.html
When Germany is Christian, is India Hindu?
By Maria Wirth
May 11, 2013
(Denying One’s Own Roots)
Though I live in India since long, there are still some points that I find hard to understand - for example why many educated Indians become agitated when India is considered as a Hindu country. The majority of Indians are Hindus. India is special because of its ancient Hindu tradition. Westerners are drawn to India because of it. Why then is there this resistance by many Indians to acknowledge the Hindu roots of their country?
अतिशय रोचक.पण बर्याच भारतीयांना आपली पाळेमुळे स्वीकारण्याची लाज वाटते. हिंदू असण्याची लाज का बाळगावी याला भले कोणी हजारो कारणे देऊ पाहीलही, पण शेवटी तो मूर्तिभञ्जनाचा हव्यास आहे. अन शेवटी त्यांना आपली चूक कधी ना कधी उमगेलच.
हिंदू धर्म- विचारवंतांना ज्या धर्मातल्या वैविध्याची अडगळ वाटते, पण समृद्धी नाकारता येत नाही. तर्ककुतर्कमार्तंडांना ज्याची सर्वसंमत व्याख्या ठरवणे अवघड जाते पण अस्तित्व नाकारता येत नाही. धर्मरक्षणासाठी, धर्मसंवर्धनासाठी टिचभरही प्रयत्न न करता फक्त बुद्धीभेद करून धन्य होणारे करोडो कपाळकरंटे पिढ्यानपिढ्या ज्या धर्माला झोडून काढत त्याच्याच वळचणीला सुखेनैव जगत आले तरीही त्याचा प्रभाव आजवर टिकून कसा राहिला याचे आश्चर्य वाटायला लावणारा एक धर्म. असो.
तुमचे म्हणणे पटले ...हा एक प्रकारचा न्यूनगंडच आहे. पराकोटीच्या सहिष्णुतेमुळे कदाचित हा आला असावा काय ?
पण दुसर्याचे कौतुक करताना आपल्याकडे कमीपणा घ्यायलाच ह्वा का? mutual co-existance असू शकते ना?
की शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून आलेली पराभूत मानसिकता आणि अगतिकता आहे ?
आणि मग अशा पराभूत मानसिकतेने ग्रस्त समाजाला एखादा शिवप्रभू अथवा महात्मा फार काळासाठी जिवंत ठेऊ शकत नाही. त्याच्या मागे त्यांचेच अनुयायी वाट लावतात. औषधाची मात्रा उतरली की पुन्हा रोग बळावतो.हीच खरी शोकांतिका आहे!
बलदंड हिंदू समाज / सशक्त हिंदू समाज हाच यावरील कायमस्वरुपी उपाय आहे.
@हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी.>>>निद्रिस्त ज्वालामुखी'च्या ऐवजी,प्रत्येक हिंदूच्या मुखी निद्रिस्त ज्वाला! असे म्हणा..ते जास्त अन्वर्थक होइल. :)
हिंदू शब्दाची व्याख्या
आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
अहो, दु:ख होते ना हिंसा केल्यावर ! साधा डास मारल्यावर देखील मला वाईट वाटते .
आणि मोदिंना तर गाडीखाली कुत्रे आल्यावर देखील वाईट्ट वाटते ! विचारा की मेडियावाल्यांना.
हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व हिंदू धर्म म्हणजे गुलामांचा / पराजितांचा धर्म आहे. थोडे हिंदू शब्दाबद्दलचे मत पाहू. हिंदू शब्द जर सिंधू शब्दाचा अपभ्रंश असेल तर सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे व्यक्ती पंजाबी अथवा सिंधी असे म्हटले जातात, त्यांना हिंदू हे नाव का प्राप्त झालेले नाही? पर्शियन लोकांना सिंधू उच्चारण्यात अडचण येत होती हे प्रमेय आधारहीन व हास्यास्पद आहे. उदा. पर्शियन जे शिया मुस्लिम आहेत ते शिया, सुन्नी व शरियत हे शब्द कसे उच्चारतात? पंजाबी भाषेत बरेच पर्शियन शब्द आहेत ते ज्यांची सुरुवात 'स' किंवा 'श' पासून होते. उदा. सरदार, शहीद, शेर इ. पंजाब हा शब्द सुद्धा पर्शियन शब्द पांच आणि आबा (पाच पाणी) पासून तयार झाला आहे.
याच बाबीचा पुनरुच्चार मुद्रारक्षक यांनी धर्मग्रंथोन्का पुनर्रपाठ या ग्रंथात याप्रकारे केला, "इतिहासकारोंने कहा की चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया. यह विचित्र तर्क था. ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं. विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं. मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया. हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था. उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा. फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं. हिंदू शब्द का अर्थ है गुलाम, काला, लूटेरे, चोर. ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं. पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो. भारत में यह हो गया."
"फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं. हिंदू शब्द का अर्थ है गुलाम, काला, लूटेरे, चोर."
इथे हे चेकवले. तर हे सत्य निघाले. हिंदु शब्द फारसी मध्ये هندو लिहीतात हे गुगल वरुन समजले. हाच शब्द टाइप करुन पाहिला असता खालील उत्तर मिळाले.
# English Farsi
1 Hindu or Hindoo , a black slave , a mole , a mother's mark , Indian , black هندو
खर काय? हिंदु अशा नावाचा कुठलाच धर्म मुस्लीम आक्रमणापुर्वी कधीच नव्हता काय ?
http://www.farsidic.com/en/lang/FaFa
۱- اهل هند.
۲- سیاه از هر چیز.
۳- بنده، غلام.
۴- نگهبان.
۵- مجازاً به معنای: خال، زلف، کفر، کافر، دزد.
1- भारतातील
2. संपूर्ण काळा.
3- दास, नोकर.
4. रक्षक
5- याचा अर्थ म्हणजे तीळ, केस, निंदा, अविश्वास, अविश्वासू, चोर.
मी हिंदू आहे! असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार व्हायला नको का?
१. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण?
२. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय?
३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे?
४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही?
५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय?
६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे?
७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती?
८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता?
९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते?
१०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय?
११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत?
१२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय?
बघा विचार करून!
धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही.....
हिंदू धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
हिंदू हा शब्द इस्लामची देण.....
लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.
इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण.......
पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते.
मी हिंदू का? हे कसे समजावे?
भारत हा अनेक जातीजामातींचा, संमिश्र समाजाचा देश आहे. त्यात पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, हिंदू आहेत. या जतिव्यवस्थेचा पाया 'वंश ' नसून 'धर्म' आहे. पण हा वरवरचा उथळ विचार आहे. पारशी हा पारशी का, ख्रिश्चन हा ख्रिश्चन का, मुसलमान हा मुसलमान कसा, आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.
पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांबाबत हे सांगणे सोपे आहे. एखाद्या पारशाला विचार "तू स्वतःला पारशी का म्हणवतोस?" या प्रश्नाचे उत्तर पारशाला देणे अवघड वाटत नाही. मी पारशी आहे कारण मी झोरास्टरचा उपासक आहे". आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारा. त्यालाही उत्तराला विलंब होणार नाही. तो लगेच सांगेल "मी इस्लामचा उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे".
आता हाच प्रश्न हिंदूला विचारा. तो गोंधळून जाईल. काय उत्तर द्यावं ते त्याला समजणार नाही.
हिंदू जमात ज्या देवांची उपासना करते त्या देवांची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे" असं उत्तर त्याने दिलं तर ते तितकंसं खरं नाही. सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करीत नाहीत. काही लोक एकाच देव मानणारे, काही लोक अनेक देवांची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहेत असे मानणारे आहेत. जे एकेश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाचे उपासना करतात असेही नाही. कुणी विष्णू, कुणी राम, कुणी शिव, कुणी कृष्ण यांची उपासना करतात. काही हिंदू पुरुष देवतांना न मानणारे आहेत. ते स्त्रीदेवतांचे उपासक, देवी उपासक असतात आणि असे असूनही ते एकाच देवीचे उपासक असतात असेही नाही. कुणी कालीचे उपासक, कुणी पार्वतीचे पूजक, तर कुणी लक्ष्मीचे भक्त.
काही लोक अनेक देवांची उपासना करतात. विष्णू आणि शिव, राम आणि कृष्ण यांची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत. तेच लोक काली, पार्वती, लक्ष्मी यांचीही पूजा करतात. शिवरात्रीच्या दिवशी शिवोपासना म्हणून उपवास करणारा हिंदू एकादशीच्या दिवशी विष्णूची उपासना म्हणूनही उपवास करील. शंकरासाठी तो बेलाचे झाड लावील तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालेल. काही हिंदूंची उपासना हिंदू देवातांपुरतीच मर्यादित नसते. ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात. अनेच किंदू पिराची पूजा करतात, उरूस असेल तिथं जातात.काही ठिकाणी पीराचे पूजक वंशपरंपरेने ब्राह्मणाच आहेत. ते मुसलमानी वेश परिधान करतात. मुंबई जवळील मत माउली या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत.
ख्रिश्चन किंवा मुस्लिम दैवतांची पूजा ही प्रासंगिक असते. पण कधीकाळी साऱ्या धर्मनिष्ठाच हिंदूंनी कायम स्वरुपात बदललेल्या आहेत असे दिसून येते. असे अनेक तथाकथित हिंदू आहेत की, ज्यांच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्वांचा समावेश झाला आहे. पंचपीरीय प्रणाली हा एक हिंदू धर्मपंथ आहे. तो मानणारे हिंदू पाच मुसलमानी फाकीरांची पूजा करतात. दफ़ालि फकीर हा केवळ याच कामासाठी असतो. या पंथाचे हिंदू लोक या पंचपीरांना कोंबडे देतात. भारतात अनेक हिंदू मुसलमानी धर्माच्या पवित्र स्थानांचा तीर्थयात्रा करतात. पंजाबात सखी सरवार या नावाचं एक असं ठिकाण आहे.
मलकानांविषयी लिहिताना श्री ब्लंट यांनी लिहून ठेवलय की मथुरा, इटाह आणि मैनपुरी या आग्रा परिसरात अनेक हिंदूंनी, त्यातील विविध जातींनी, धर्मांतर केलं, आणि हे लोक मुसलमान झाले. त्यापैकी अनेक लोक राजपूत, जाट, आणि बनिया होते. आपण मुसलमान आहोत हे सांगत नाहीत. ते सामान्यतः आपली मुलाची जातच सांगतात. त्यांची नावं हिंदू नावंच आहेत. ते मंदिरात जातात, ते राम राम करतात, त्यांच्यात विवाह फक्त जातीतच होतात. हे एका बाजूला, पण कधीतरी ते मशिदीत जातात. सुंता करतात आणि प्रेतांचे दफन करतात. आपल्या मुसलमान मित्रांसोबत ते पंगतीला बसतात.
गुजरात मध्ये अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत. मटिया कुणबी ही त्यातलीच एक जमात. आपल्या घराच्या महत्वाच्या धार्मिक प्रसंगी हे कुणबी लोक ब्राह्मनालाच बोलावतात पण ते इमामशाह आणि त्यांचे वंशज यांचे अनुयायी आहेत. ते दफन करतात. आणखी एका जमातीत विवाहप्रसंगी हिंदू भटजी आणि मुस्लिम मौलालवी या दोघांनाही आमंत्रित करतात. मोमन नावाच्या जमातीत सुंता आहे. गुजराती कुराण वाचण्याचा परिपाठ आहे. दफन आहे. मात्र एवढ्या तीन गोष्टींव्यतिरिक्त बाकी सर्व बाबतीत मोमन लोक हिंदू रीतिरिवाज पाळतात.
"मी हिंदू आहे कारण मी हिंदू धर्मशास्त्राचे पालन करतो " असे तो म्हणत असला तरी ती वस्तुस्थिती नाही. कारण हिंदुत्वाचा कुठलाच एक संप्रदाय नाही. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांची तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आढळतो. मुख्य आणि महत्वाच्या धर्म श्राद्धांबाबत हिंदूंमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काही म्हणतात की हिंदूंचे सर्व पवित्र ग्रंथ स्वीकार्य आहेत; काही लोक तंत्र मानत नाहीत. काही लोक वेदांचेच महत्व मानतात. काहीजण कर्म सिद्धांतावरच विश्वास ठेवणारे आहेत.
अनेक संप्रदायांची आणि तत्वांची संमिश्र असलेली सरमिसळ म्हणजे हिंदुत्व होय. या हिंदुत्वाच्या प्रवेशद्वारात एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे; शिव आणि विष्णू यांचे पूजक; पार्वती आणि लक्ष्मी यांचे उपासक; आदिमाता किंवा ग्रामदेवता यांचे उपासक; रक्तविधीने आपल्या देवतेची कृपा संपादन करून घेणारे लोक; पूर्ण अहिंसावादी, सध्या जीवजंतूंना मारणे तर राहोच पण हिंसेचे शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक; ज्यांच्या धर्म्विधीत केवळ प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत असे लोक; धर्माच्या नावाखाली मद्द्यसेवनाने उपचार अवलंबिणारे लोक; आणि अशा प्रचलित मतांविरुद्ध असलेला पण संख्येने खूप मोठा असलेला समाज, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व न मानणारा समाज ज्यांचे धार्मिक नेते अब्राह्मण आहेत असा समाज.....हे हिंदू समाजाचे चित्र आहे.
"मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रीतीरिवाज पाळतात तेच मी पाळतो" असे एखादा हिंदू म्हणेल तर ते खरे नाही. कारण सर्व हिंदू सारे रीतीरीवास सर्वत्र पाळतात असे नाही.
उत्तरेत निकटच्या नातेवाईकांत विवाह होत नाहीत. पण दक्षिणेत चुलत-मामे भाऊ-बहिण यांची लागणे होतात. याहूनही अधिक निकटच्या नात्यातील लग्नांना मान्यता मिळते. नियम म्हणून स्त्रीची शुद्धता, पावित्र्य यांना खूप महत्व दिले जाते. पण अनेकवेळा ही शुद्धता विवाहापूर्वीच नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना "भाविणी" करण्यात समाज धन्य मानतो. या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वावरण्याची मुभा आहे तर काही भागात त्यांना बंदी आहे.काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरतात तर काही ठिकाणी पुरुषांप्रमाणेही वेष परिधान करतात.
आता आणखी एक मुद्दा. एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जातीव्यवस्था मानतो..... तर हेही खरे नाही. एक खरे की, कोणत्याही हिंदू माणसाला आपल्या शेजाऱ्याचे रीतिरिवाज कोणते याच्याशी कर्तव्य नाही. पण आपण त्याच्याबरोबर बसून खावे का नाही, त्याच्या हातून पाणी प्यावे की नाही याचा तो अवश्य विचार करेल. याचाच अर्थ असा की, जातीव्यवस्था हे हिंदुत्वाचे आवश्यक अंग आहे. आणि अर्थातच जो माणूस कोणत्याही मान्य हिंदू जातीचा नाही तो हिंदू नसतो. हे खरे असले तरी हिंदुत्वाबाबत जातीव्यवस्था पाळणे एवघेच पुरेशे नसते. मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी-व्यवहारात नसली तरी बेटी व्यवहारात जात पाहिली जातेच. पण एवढ्याने त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. आवश्यकता दोन गोष्टींची असते. हिंदू हा हिंदूच असला पाहिजे आणि तो जातिव्यवस्था मानत असला पाहिजे. यातूनच पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो........हिंदू कोणाला म्हाणावे?
प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत याचे उत्तर देता यायला पाहिजे. ते पारशाला देता येते, मुसलमानाला देता येते, ते ख्रिश्चनाला देता येते. पण .......हिंदू माणसाला देता येत नाही.
यामागची कारणे कोणती, हा धार्मिक गोंधळ नेमका काय आहे याची जाणीवपूर्वक उत्तरे शोधण्याची वेळ आलेली आहे.
............................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................
मुळात धर्म म्हणजे काय ?
धर्म कसे निर्माण झाले ?
जंगलात राहणाऱ्या जंगली मानव प्राणी धर्मात कसा अडकला?
विविध प्रकारचे धर्म निर्माण होण्याचं कारण काय?
धर्माची तुम्ही जी thobhal व्याख्या दिली आहे ती खरी का मानवी तुम्ही सांगता म्हणून की काही प्राचीन पुरावे आहेत .
पहिले ह्या सर्वाची उत्तर शोधून काढावी नंतर विशिष्ट धर्मावर चर्चा करावी .
जे लवचिक धोरण ठेवून वेळेनुसार बदलतात ते चांगले की परस्थिती मध्ये अमुलाग्र बदल होवून सुधा खूप जुन्या जंगली नियमाचे पालन करतात ते श्रेष्ठ हे पहिले ठरवावं .
आता तर माणूस aivdha प्रगत झाला आहे की धर्म हा फक्त मनःशांती मिळावी म्हणूनच पाळावा .मग ती शांती प्रत्येकाला वेगवेगळी मिळू शकते .
हाच धर्म हा धर्मच नाही असल्या binkamachi आणि निघणारा निष्कर्ष कधीच सर्वमान्य होणार नाही अशी vazonti चर्चा म्हणजे वेळेचा दुरुपयोग आहे
धर्म म्हणजे काय? आणि त्याची आवश्यकता काय? याविषयी स्वामी विवेकानंदांनी अतिशय व्यावहारिक स्पष्टीकरण शंभर वर्षांपूर्वीच केले आहे. आणि ते आजही अगदी तंतोतंत लागू पडते.
… केवळ उपयुक्तावादाचा आदर्श वाळगून पूर्णपणे निकोप, नीतिमान आणि चांगले झालेले कितीतरी थोर पुरूष ह्या आपल्या जगात होऊन गेले आहेत. परंतु जग हलवून सोडणा-या, जगात जणू एका प्रचंड आकर्षणशक्तीचा प्रादुर्भाव करणा-या, शेकडो हजारो लोकांवर प्रभाव पाडून त्यांना कार्यास प्रवृत्त करणा-या, आपल्या जीवनाने इतरांमधे आध्यात्मिकतेचा वन्ही चेतवून देणा-या व्यक्तींची पार्श्वभूमी मात्र आध्यात्मिकच असल्याचे आपल्याला नेहमी आढळून येईल. त्यांच्या ठायीच्या प्रचंड प्रेरणा धर्मातूनच निर्माण झालेल्या असतात. जिच्यावर मानवाचा जन्मसिध्द अधिकार आहे आणि जी मानवाच्या ठायी स्वरूपतःच वसत असते त्या अनंत शक्तीचा साक्षात्कार करून घेण्यासाठी जर मानवाला कुणी सर्वात जास्त प्रेरणा देत असेल तर तो धर्मच होय. चारित्र्य बनविण्यासाठी, जे काही चांगले आहे आणि थोर आहे ते घडविण्यासाठी, लोकांच्या जीवनात आणि स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा देणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे धर्म होय, आणि म्हणून त्या दृष्टीने त्याचे अध्ययन व्हावयासच हवे. धर्माचे अध्ययन-अनुशीलन आता पूर्वीपेक्षा विशाल दृष्टिकोनातून झाले पाहिजे. धर्मासंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्माविषयीच्या सा-या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा….
…. एक धर्म खरा ठरला तर सर्व धर्म खरे ठरतात आणि एक खोटा ठरला तर सगळे खोटे ठरतात हे जाणून निरनिराळ्या प्रकारच्या धर्मांमधे आपसात मैत्रीची भावना बळावणे आवश्यक आहे…..
….. धर्म आणि आधुनिक विज्ञान यामधे मिलाफ घडून यावयास हवा…..
(स्वामी विवेकानंद ग्रंथावली 3, पृष्ठ 77-78)
आपली स्वता:ची विचारसरणीच कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातील फक्त एका परिच्छेदाचा संदर्भ (जो आपण समजता की आपल्या विचारसरणीशी मिळताजुळता आहे तो ) देऊन इतरांची दिशाभूल करू नये ही आपणास विनंती. आपल्या सारख्यांच्या माहिती साठी.
Life of Swami Vivekananda by Eastern and Western Disciples, Chapter : In Madras and Hydrabad, Page 268
In that same meeting, when a Westernised Hindu spoke in a belittling manner of the "meaningless teachings" of the Vedic Seers, the Swami fell upon him with a thunderbolt vehemence, crying out, "How dare you criticise your venerable forefathers in such a fashion! A little learning has muddled your brain. Have you tested the science of the Rishis Have you even as much as read the Vedas? There is the challenge thrown by the Rishis! If you dare oppose them, take it up."
त्यात विशेष असे काहीच नाही! तुम्ही काय सिद्ध करू पाहत आहात? तुम्हाला काय सुचवायचे आहे? वेद वाचायला? वेदांची, ऋषींची समीक्षा करायला तुमचा विरोध आहे काय?
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, जैन ही धर्माची केवळ बाह्यांगे आहेत. या प्रत्येक विचारसरणीच्या मूळाशी जाऊन अभ्यास केल्यास असे दिसून येते की, हे सर्व एकाच सत्याचे अनुसरण करीत आहेत.
धर्म – जे धारण केले जाते तो धर्म ! प्रत्येक व्यक्तीचा धर्म वेगळा आहे आणि त्यात इतर कुणीही ढवळाढवळ करता कामा नये. आमचा धर्म, तुमचा धर्म, श्रेष्ठ धर्म, कनिष्ट धर्म, सनातन धर्म, पुरोगामी धर्म अशी गोष्टच वास्तविक अस्तित्वात नाही.
प्रत्येकाने स्वतःचा धर्म ओळखून त्याचे प्रामाणिकपणे आचारण केले तरी या मानवजातीचा उध्दार होईल. इंजिनिअरचा धर्म तांत्रिक शाखेत अधिकाधिक प्रगती साधणे, डॉक्टरचा धर्म आपल्याकडे येणा-या प्रत्येक रोग्याचे रोगनिवारण, एक भारतीय म्हणून आपला धर्म या राष्ट्राच्या हितार्थ प्रयत्न करणे, एक माणूस म्हणून आपला धर्म आपल्या हिताबरोबरच इतरांचेही हित साधणे.
आज आपण आपलाच धर्म विसरलो आहोत. त्यामुळेच इतरांचा धर्म चुकीचा, कनिष्ट, आणि आपलाच धर्म श्रेष्ठ अशी ओरड केली जाते. आणि याचा फायदा सत्तापिपासू, संपत्तीलोलूप स्वार्थी माणसे घेतात. स्वार्थपरायणता म्हणजे अधर्म आणि जिथे निःस्वार्थ भाव तिथेच धर्म.
आपल्या देशात देशभक्तांची काही कमी नाही. पण त्यांच्यासमोर कुठलाही आदर्श नाही. इतिहासातील आदर्श समारे ठेऊन वाटचाल करावी तर त्या आदर्शांचीही चिरफाड करून त्यांची लक्तरे वेशीवर टांगली जातात. तथापि कोणताही आदर्श परीपूर्ण असूच शकत नाही. म्हणून आपला आदर्श श्रेष्ठ आणि इतरांचा आदर्श निकृष्ट, खोटा हे आपण ठरवू नये. आपण आपल्या आदर्शांवर ठाम असावे, इतरांना भलेही त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करू द्या.
धर्म, इश्वर, संस्कृती यांवर तर्कटे लढवून आपला अमूल्य वेळ वाया दवडवण्यापेक्षा काहीतरी कार्य करण्याची वेळ आली आहे. जुनी थडगी उकरून काय साध्य होणार ? आपल्यासमोर वर्तमान भारत आणि त्यातील समस्या उभ्या आहेत. प्रचंड कार्य उभे आहे. त्यासाठी आपला वेळ आणि शक्ती कारणी लावण्याची नितांत आवश्यकता आहे.
“शंभर विचारांपेक्षा एक आचार श्रेष्ठ !”
प्रत्येकाने सर्वस्वाचा त्याग करून प्राणांची आहूती द्यावी, अशी अपेक्षा मुळीच नाही. परंतु प्रत्येकाने आपला धर्म जाणून तो जरी प्रामाणिकपणे निभावला तरी खूप काही होण्यासारखे आहे. धावण्याच्या शर्यतीत प्रत्येक धावपटू वेगवेगळ्या ट्रॅकवर उभा असतो, पण प्रत्येकाला समान अंतर आणि समान लक्ष्य गाठायचे असते. असे असताना प्रत्येक जण इतरांचे गुण अवगुण काढून एकमेकांचे पाय ओढू लागला, इतरांच्या मार्गात अडथळा निर्माण करू लागला तर ती शर्यत निरर्थक ठरेल आणि कुणीही लक्ष्य गाठू शकणार नाही. म्हणूनच इतरांच्या मार्गांवर, श्रध्दांवर, मतांवर चिखलफेक करण्यापेक्षा इतरांना त्यांच्या वाटेने जाऊ द्या. आपण आपले मार्गक्रमण करीत रहावे. पण एखाद्याला काहीच करावयाचे नसेल तर …… तर मग ही कुरघोडी चालूच राहणार.
अंतर्गत वादविवादांनीच या देशाचे वाटोळे झाले आहे. चर्चिलच्या “या गाढवांना (भारतीयांना) स्वातंत्र्य देऊ नका. त्यांची ती लायकी नाही. ते देश चालवू शकत नाहीत.” या उद्गारांची प्रचिती येऊ लागली आहे. तरूणपिढीने आपली ऊर्जा विरोध, वाद यांच्यावर खर्च न करता त्याचा उपयोग राष्ट्रहितार्थ विधायक कामासाठी करावा, अन्यथा आणखीही दुरावस्था अटळ आहे.
आपल्यासमोर भरपूर कार्य पडले आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता वैयक्तिक स्तरावर हे कार्य करीत राहिले पाहिजे. आज भारताला स्वामी विवेकानंदांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहा, म्हणजे वादविवाद उरणार नाहीत. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. मानवधर्म हाच श्रेष्ठ धर्म आहे. ईश्वराच्या साक्षात्कारासाठीच धर्मांची उत्पत्ती झाली आहे आणि राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा, शिवभावे जीवसेवा. या सेवेतूनच ईश्वरसाक्षात्काराप्रत पोहोचणे शक्य आहे. अन्यथा कीड्यामुंग्याप्रमाणे आपापसात निरर्थक भांडून, लढून मरून जा. असल्या मरण्यांतून काहीही साध्य होत नसते. कसे मरावे हे ज्याचे त्याने ठरवावे.
ह्या सृष्टी मध्ये सर्वच प्राणी संघर्ष करत आसतात जगण्यासाठी त्यात ऐकपेशीय पासून मानव सारखं प्रगत प्राणी सुधा संघर्ष करत आसतात .
पोटपानी आणि निवारा हे दोन प्रश्न सुटले की वर्चस्वाची लडाई चालू होते ती aikte पने लढली जात नाही ती सामूहिक रित्या लढावी लागते त्यासाठी समूह आसने गरजेचं आणि आताच्या पॅरिस धर्म म्हणजेच विशिष्ट समूह मतभेद श्रेष्ठ कनिष्ठ हा जो प्रकार आहे ते म्हणजे वर्चस्व स्थापन करण्यासाठी चाललेली धडपड बस आणि काही नाही .
प्रत्येक समूह (धर्म) आशि भीती वाटते की आपला समूह हरला तर आपले अस्तित्व च संपेल .
आणि तीच भीती विविध समूहात ( धर्मात) युद्ध घडवून आणते किंवा दंगली घडवून आणते किंवा द्वेष निर्माण करते ..
त्या मुळे शहाण्या सारखं वागा आणि धर्म घरातच ठेवा हयात च हित आहे
व्ही. डी. सी.,
तुमचा इथला संदेश वाचला. 'मी हिंदू आहे' असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करायची मलातरी गरज वाटंत नाही. पण कुतूहल शमावं म्हणून उत्तरं देत आहे.
१. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण?
उत्तर : परमेश्वर. धर्मं तु साक्षात् भगवत्प्रणितम् अशी भागवतात उक्ती आहे.
२. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय?
उत्तर : हो. कारण जो धारणा करतो तो धर्म. निव्वळ जन्म घेऊन कोणी हिंदू होत नसतो. त्यासाठी साधना करावी लागते.
३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे?
उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.
४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही?
उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.
५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय?
उत्तर : हो.
६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे?
उत्तर : मूर्ख लोकांनी तिरस्काराने भारतातल्या सनातनधर्मीयांना हिंदू असं संबोधून त्यांच्या कत्तली केल्या. तसंच वित्तहानी देखील केली. त्यामुळे अशा आक्रमकांच्या विरुद्ध एकजूट करणं सोपं जावं म्हणून सनातन धर्मीयांनी हिंदू हीच प्रचलित संज्ञा वापरणं चालू ठेवलं. उदा. : शिवाजीमहाराजांनी हिंदुपदपातशाहीचा पुरस्कार केला.
७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती?
उत्तर : वेद ऐकायची कोणालाही कसलीही बंदी कधीही नव्हती. खरंतर वेदघोष सर्वत्र पसरायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता?
उत्तर : माहित नाही. बहुधा पैसे वा इतर सवलतींच्या लोभाने या जाती स्वत:स अहिंदू म्हणवून घेत असाव्यात.
९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते?
उत्तर : बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत.
१०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय?
उत्तर : हो.
११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत?
उत्तर : माहित नाही. पण हिंदू धर्मीयांत कोणीही कोणत्याही देवाची पूजा करू शकतो.
१२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय?
उत्तर : हो. कारण की हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. त्यामुळे शक्य तिथे सनातनधर्मीयांनी स्वत:स हिंदू म्हणून घोषित करावं या मताचा मी आहे.
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
हिंदू धर्माची अजून एक
.
अहो पण
सहमत. हिंदू धर्मीयांवर असा
साप दूध पीत नाहीत..
सापाला..
हिंसा
पण पूर्वी एका काथ्याकूटात
बरोबर आहे
असं मी एका मुसलमान बाईकडून
आत्म विस्मृती ..
धर्म एकच असेल तर बदलता कसा
अहो हे असे
सार्या जगाला जे सहज समजते
हे घ्या....
http://www.defence.pk/forums/seniors-cafe/266483-when-germany-christian-india-hindu.htmlWhen Germany is Christian, is India Hindu? By Maria Wirth May 11, 2013 (Denying One’s Own Roots) Though I live in India since long, there are still some points that I find hard to understand - for example why many educated Indians become agitated when India is considered as a Hindu country. The majority of Indians are Hindus. India is special because of its ancient Hindu tradition. Westerners are drawn to India because of it. Why then is there this resistance by many Indians to acknowledge the Hindu roots of their country?अतिशय रोचक.पण बर्याच
.
हम्म
खरे आहे !
बलदंड हिंदू समाज / सशक्त हिंदू समाज
या विषयावर पांडुरंगशास्त्री
.
.
@हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त
हिंसेने दु:खी होतो तो हिंदू
हिंदू शब्दाची व्याख्याआसिंधु
हिंसेने दु:खी होतो तो हिंदू
आप्लि प्रतिक्रिया
अरेरे
हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व
फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं
http://www.farsidic.com/en
मी हिंदू आहे! असे
धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच
मी हिंदू का? हे कसे समजावे?
काही लोक अनेक देवांची उपासना
गुजरात मध्ये अशा प्रकारच्या
"मी हिंदू आहे कारण इतर अनेक
विशिष्ट धर्म समोर ठेवून धर्म म्हणजे काय हे स्पष्ट होत नाही
धर्म म्हणजे काय? आणि त्याची
व्ही. डी. सी. साहेब,
अहो मामाजी
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन,
प्रत्येकाने सर्वस्वाचा त्
आताच्या परिस्थिीत धर्म म्हणजे वर्चस्वाची लदाई आहे
व्ही. डी. सी. यांच्या प्रश्नांना उत्तरं
मोघमपणे दिलेली उत्तरे,
मोघम असोत वा ....
विवेकवादी,
हायला
Pagination