हं!
माझ्या नात्यातले जेंव्हा हळुहळु जायला लागले, तेंव्हा खरच विचार पडला; काय होतं त्या माणसाच? इतकी सवय असते आपल्याला त्यांची, विशेषतः ज्येष्ठ! जे आपल्या लहाणपणापासुन तेथे स्थीर असतात, ते गेल्यावर हा प्रश्न अधिकच सतावु लागला. मग कधीतरी वाटतं, येव्हढे सगळे जाताहेत म्हणजे; हे जाणं काही फारस त्रासदायक नसावं जाणार्यासाठी. एका प्रकारे मी माझ्या "जाण्याची" मानसिक तयारीच करते म्हणा हवंतर.
तरीही जाणार्याचा विरह हा असतोच.
फार छान लिहीलयं वेणु.
लेख वाचून ही कविता आठवली. पेष्ट करतोय. कवी आहे चार्ल्स लँब. विषय अंमळ वेगळा आहे, पण आवडेल असे वाटते.
http://www.poetryfoundation.org/poem/173784
I have had playmates, I have had companions,
In my days of childhood, in my joyful school-days,
All, all are gone, the old familiar faces.
I have been laughing, I have been carousing,
Drinking late, sitting late, with my bosom cronies,
All, all are gone, the old familiar faces.
I loved a love once, fairest among women;
Closed are her doors on me, I must not see her —
All, all are gone, the old familiar faces.
I have a friend, a kinder friend has no man;
Like an ingrate, I left my friend abruptly;
Left him, to muse on the old familiar faces.
Ghost-like, I paced round the haunts of my childhood.
Earth seemed a desart I was bound to traverse,
Seeking to find the old familiar faces.
Friend of my bosom, thou more than a brother,
Why wert not thou born in my father's dwelling?
So might we talk of the old familiar faces —
How some they have died, and some they have left me,
And some are taken from me; all are departed;
All, all are gone, the old familiar faces.
आता येत्या काही वर्षांत माझ्या खूप जवळच्यांचे मृत्यू मला पहायचे आहेत. हे आतपर्यंत पोहोचलं;
कसली अगतिक भावना आहे!
वरची बॅटमॅन यांनी दिलेली कविताही हलवून गेली.
थोडीशी संबंधित, मरणाला सामोरं कसं जावं, याविषयी 'सिद्धार्थ'-कार हरमान हेस यांनी लिहिलेली Steps [Stuffen] ही कविता काही महिन्यांपूर्वी वाचून त्याचा भावानुवाद करावासा वाटला होता, तो इथे उद्धृत करतो आहे:
************
कोमेजणं हे भविष्य जसं प्रत्येक फुलाचं असावं
आयुष्याच्या हरक्षणी, तारुण्याने वार्धक्याला सामोरं जावं
प्रत्येक शहाणपणाची, गुणाची आपली एक वेळ असते
हळूहळू कालौघात नष्ट होण्याची खेळी असते
आयुष्याने बोलावलं की मनाने तयारी ठेवावी ही
नव्या भरारीची, आणि निरोपाचीही
धीराने, दु:ख न करता सामोरं जावं
नव्या, वेगळ्या बंधनांना स्वीकारावं
नव्या सुरूवातीत असते एक दडलेली किमया
जगण्याची ऊर्मी देणारी, माथ्यावर नवी छाया
एका खोलीतून दुसरीत, मग तिसरीत आनंदात जावं
पण कुठल्याही वास्तूला आपलं घर न म्हणावं
जगरहाटीची नसते इच्छा ठेवण्याची आपल्याला बंधनात
पायरी-पायरीने वर चढावं, विस्फारत्या अवकाशात
क्वचितच रहिवासी व्हावं एका विवक्षित जागेचं
नाहीतर रेंगाळतो आपण, सोयीचं आयुष्य होतं सवयीचं
जो असतो तयार चटकन् उठून प्रवासास निघायला
पांगळं करणार्या सवयींतून तोच मुक्त करतो स्वतःला
वेळ येईल तेंव्हा नव्या वर्तुळांत पाठवेल मृत्यूही
तोवर थांबू नये आपल्या आयुष्याचं बोलावणंही
मुक्त हो, हे हृदया माझ्या, शमू दे वेदनेला प्रत्यही
*************
हरमान हेस यांच्या आवाजातली मूळ कविता इथे ऐकायला मिळेल (यूट्यूब वरही ती उपलब्ध आहे.)
एका खोलीतून दुसरीत, मग तिसरीत आनंदात जावं
पण कुठल्याही वास्तूला आपलं घर न म्हणावं>>> अनेक जन्म मिळतात आपल्याला बहुधा.. एका खोलीतून दुसर्या खोलीत जाताना किती सहजतेने जातो आपण... आधीच्या खोलीत आपले ठसे असण्याचा अट्टहासही नसतो मुळी.. पण आपण आजन्म मात्र ठसा मागे उरावा म्हणून धडपडत राहतो... जगण्यातली ही सहजता जमावे खरंच.... आपल्या असलेल्या देहाला वास्तू मानून बसतो...
वय वाढतं तसं माणसं दुरावण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा समजत जातात. असलेला माणूस आता 'नसतो' तेव्हा नक्की काय नाहीसं होतं? कुठेतरी आपल्यातल्या आपलं काहीतरी नाहीसं झालेलं असतं. पण तरी निर्माण हॊणाऱ्या पोकळीचीही आहे का नाही इतकी सवय होऊन जाते. आयुष्य पुढे सरकत राहातं.
तुमचं लेखन फार राजस असतं. पत्रं हा तुमचा आवडता फाॅर्म दिसतो.. 'पत्रकथा'नंतर बऱ्याच काळाने लिहिलंत. आणि मी त्याहून उशीरा वाचलं :-)
प्रतिक्रिया
जे प्रिय आहेत, त्यांना 'हरएक' क्षण आनंदाचाच द्यायचा हे ठरवते
अप्रतिम
अतिशय सुंदर लिहिलयं. फार
हं!
सुरेख!
लेख वाचून ही कविता आठवली.
छान कविता !
धन्यवाद, दोस्तहो
खूप चांगला लिहीलाय लेख!
छान लेख
अप्रतिम लेख!
आता येत्या काही वर्षांत माझ्या खूप जवळच्यांचे मृत्यू मला पहायचे आहेत.हे आतपर्यंत पोहोचलं; कसली अगतिक भावना आहे! वरची बॅटमॅन यांनी दिलेली कविताही हलवून गेली. थोडीशी संबंधित, मरणाला सामोरं कसं जावं, याविषयी 'सिद्धार्थ'-कार हरमान हेस यांनी लिहिलेली Steps [Stuffen] ही कविता काही महिन्यांपूर्वी वाचून त्याचा भावानुवाद करावासा वाटला होता, तो इथे उद्धृत करतो आहे: ************ कोमेजणं हे भविष्य जसं प्रत्येक फुलाचं असावं आयुष्याच्या हरक्षणी, तारुण्याने वार्धक्याला सामोरं जावं प्रत्येक शहाणपणाची, गुणाची आपली एक वेळ असते हळूहळू कालौघात नष्ट होण्याची खेळी असते आयुष्याने बोलावलं की मनाने तयारी ठेवावी ही नव्या भरारीची, आणि निरोपाचीही धीराने, दु:ख न करता सामोरं जावं नव्या, वेगळ्या बंधनांना स्वीकारावं नव्या सुरूवातीत असते एक दडलेली किमया जगण्याची ऊर्मी देणारी, माथ्यावर नवी छाया एका खोलीतून दुसरीत, मग तिसरीत आनंदात जावं पण कुठल्याही वास्तूला आपलं घर न म्हणावं जगरहाटीची नसते इच्छा ठेवण्याची आपल्याला बंधनात पायरी-पायरीने वर चढावं, विस्फारत्या अवकाशात क्वचितच रहिवासी व्हावं एका विवक्षित जागेचं नाहीतर रेंगाळतो आपण, सोयीचं आयुष्य होतं सवयीचं जो असतो तयार चटकन् उठून प्रवासास निघायला पांगळं करणार्या सवयींतून तोच मुक्त करतो स्वतःला वेळ येईल तेंव्हा नव्या वर्तुळांत पाठवेल मृत्यूही तोवर थांबू नये आपल्या आयुष्याचं बोलावणंही मुक्त हो, हे हृदया माझ्या, शमू दे वेदनेला प्रत्यही ************* हरमान हेस यांच्या आवाजातली मूळ कविता इथे ऐकायला मिळेल (यूट्यूब वरही ती उपलब्ध आहे.)वाह बहुगुणीजी... उत्कृष्ट भावकविता....
वय वाढतं तसं माणसं
हम्म !