Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अति लाड करणारे पालक. शिकलेले अडाणी म्हटले पाहिजे यांना.

खरं आहे डॉक्टर! असाच अनुभव मला माझ्या डेंटल प्रॅक्टीसमध्ये येतो. दोन अडीच वर्षाची सर्व दात कीडलेली मुलं घेउन लोक येतात आणि हा/ही रोज चॉकलेट खातेच, ब्रश करतच नाही वगैरे सांगतात!, तेव्हा मीही त्यांना हेच विचारत असते ही मुलं स्वतः तर हे विकत आणु नाही शकत्,ब्रश करु शकत नाहीत्,आता एव्हढी स्थिती होइपर्यन्त तुम्ही काय करत होतात? आणि हा माझा रोजचा चिड आणणारा अनुभव आहे!!

डॉक्टर साहेब, तुम्हाला असे वाटणे सहाजिकच आहे. पण जरा पालकांच्या दॄष्टीकोनातुन बघितले तर तुम्हाला असे दिसेल की पालकही कात्रीत सापडलेले असतात. - मुलांनी ऐकले नाही तर त्यांना न ओरडता न रागावता समजावुन सांगायचे (ते सुध्दा ३० सेकंदापेक्षा जास्त नाही) (आत्ताच वाचले - बघतो प्रयोग करुन) - मारायचे तर मुळीच नाही - बाहेरच्या लोकांसमोर त्यांचा पाणउतारा करायचा नाही - पाहुणे चॉकलेट किंवा तत्सम खाउ घेउन आले तर त्या वेळी देउ नका असे सांगणे वाईट दिसते म्हणुन तसे म्हणायचे नाही - अजी अजोबा तर काहि ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. (सून काही बोलली की आई पदर डोळ्यांना लावते) अशा वेळी बाहेरच्यांचा अधार घेतला म्हणजे पालक प्रयत्नच करत नसतात असे नाही. उलट अशावेळी डॉक्टर काकांनी, शाळेत शिक्षकांनी सपोर्ट केला तर मुले जास्त लवकर ऐकतील असे वाटते म्हणुन पालक तक्रारी सांगतात. मोठ्या माणसांचे मात्र काहि बोलु नका :- माझे बाबा (वय ७५) तंबाखु खातात.मला समजायला लागल्या पासुन अनेक वेळा अनेक तर्‍हेने सांगुन रागावुन भांडुन झाले आहे. डॉक्टरांनी सुध्दा बर्‍याच वेळा तंबाखु सोडायचा सल्ला दिला. सध्या त्यांना मीच दर महिन्याला तंबाखु आणुन देतो. कारण त्यांना आता कमी दिसते व ऐकु येते. त्या मुळे त्यांना रस्त्यावर एकटे सोडायची आम्हालाच भिती वाटते. त्यांना तुम्ही पण एकदा सांगुन बघा प्लीज......

अप्रिय गोष्टी सांगायला लागू नयेत म्हणून वाईट पणा डॉक्टरच्या गळ्यात टाकतो आहोत. तुमचीच जबाबदारी आहे. बा द वे मिसळीवर काही महाभाग "आपली दारु रसिकता" धाग्याधाग्यातून प्रकट करीत असतात.

मिसळीवर काही महाभाग "आपली दारु रसिकता" धाग्याधाग्यातून प्रकट करीत असतात.
-> अरे कंबख्त... तूने पी ही नही! बा द वे, मिसळीवर काही महाभाग -नव्हे, किरकोळ प्राणी- अकारण असंबद्ध पिंका टाकत असतात.

पैजारबुवांशी सहस्रवेळा सहमत. .. पालकाना सगळीकडून व्हिलनपद बाय डिफोल्ट.. नव्या काळात मोठ्या शहरात दोघे करियर करणारे असतील तर शाळेतल्या शिक्षिकेपासून पेपरात दिलखुलास सदरे लिहिणारे डोक्टर्स आणि पुरवण्यांतल्या आहारलेखकांपासून मागच्या पिढीतल्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मुक्तकंठाने त्यांचे ताडन करतात. आईबापांची बाजू अगदी गोट्या खेळण्याइतकी सोपी आणि सरळ नसते..इतकेच. बाकी लेखातल्या मुद्द्यात तथ्य आहेच.

पेपरात दिलखुलास सदरे लिहिणारे डोक्टर्स आणि पुरवण्यांतल्या आहारलेखकांपासून मागच्या पिढीतल्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मुक्तकंठाने त्यांचे ताडन करतात.
कोणे एके काळी, इन द गुड ओल्ड डेज, पालकांना इतकी पोरं असायची की पोरांचे लाड करणं वगैरे परवडतच नसे. बहुतेक घरात गरीबी ठासून भरलेली. त्यामुळे मनात इच्छा असूनही अनेक गोष्टी मुलांना घेऊन देता येत नसत. सहा पोरं तुटपुंज्या पगारात वाढवायची तर 'हे मिळणार नाही' असं उत्तर आणि अधिक हट्ट केला तर फटके असं सोप्पं प्रकरण असायचं. एकंदरीतच मुलांना योग्य पद्धतीने वाढवणं याचं मार्केट नव्हतं. आता पालकांना थोडं परवडायला लागलं आहे. आपल्या मुलासाठी काय केलं तर त्यांचं भलं होईल यासाठी अधिक विचार होतो, आणि भलं करण्यासाठी पैसे आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडे पुरेसं लक्ष पुरवता येत नाही हे गिल्ट फीलिंग आहे. त्यामुळे पालक हे सॉफ्ट टारगेट झालेले आहेत.

एकंदरीतच मुलांना योग्य पद्धतीने वाढवणं याचं मार्केट नव्हतं.
म्हणजे आत्ताचे पालक "योग्य पद्धतीने" वाढवत आहेत तर. मग ठीक आहे. :-)

मार्केट झालं नव्हतं हा मुख्य मुद्दा होता. योग्य काय याबद्दल विचार करण्याची प्रवृत्ती आत्ताच्या पालकांमध्ये वाढलेली आहे. एका बाजूला विभक्त कुटुंबव्यवस्थेच्या फायद्यांबरोबरच वडीलधारी, अनुभवी, प्रेमळ माणसं घरी नसण्याचे तोटे स्वीकारायचे. दुसऱ्या बाजूला जुनी व्यवस्था मोडताना, संगोपनाविषयीचे जुने विचार बदलून जातानाही पहायचे. आपल्याला आपल्या आईवडिलांनी वाढवलं त्यातलं चांगलं तर घ्यायचंच - तेही सगळं जमेलच असं नाही - आणि शिवाय त्यांना माहित नसलेल्या आधुनिक, कॉस्मोपॉलिटन, टेकसॅव्ही जगात जगायला लायक करायचं. हे सगळं दोघांच्या नोकऱ्या सांभाळून कसं साधायचं याची चिंता असते. त्याचबरोबर ती चिंता सोडवण्यासाठी पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी आहे. याचा फायदा मार्केट बनवणारे घेत आहेत, इतकंच.

मी येथे केवळ डॉक्टरच नव्हे तर दोन मुलांचा पालक सुद्धा आहे. बक्षीस आणि शिक्षा हे दोन्ही मुद्दे वापरणे अतिशय आवश्यक आहेत . मुलांना चोकलेट देऊ नये अशा मताचा मी मुळीच नाही. उलट मी स्वतः ते विकत आणतो आनंदाने खातो आणि मुलांना पण देतो. पण सुरुवातीपासून काही नियम बनविले होते. १) चोकलेट खाण्याच्या अगोदर हात स्वच्छ धुतले पाहिजेत २)चोकलेट खाल्ल्यावर चूळ भरलीच पाहिजे ३) रात्री झोपताना दात घास्लेच पाहिजेत आणि हे नियम काटेकोर पाने पाळले गेले पाहिजेत अन्यथा पुढच्या वेळेस कोणी चोकलेट दिले तरीही मिळणार नाही हे लहानपणा पासून मुलांना कळले तर पुढे त्रास होत नाही मुले पाहुण्यांसमोर नखरे करीत असतील तर पाहुण्यांसमोर त्यांना रागाव्ण्यास मी कमी करत नसे त्यामुळे पोहुने आले तर ती तुमचा गैरफायदा घेण्यास धजावत नाहीत. सुदैवाने माझ्या आई वडिलांनी आमच्या लहानपणा पासून एक तत्व पाळले होते कि जर आई ओरडत असेल तर बापाने मुलाला पाठीशी घालायचे नाही (किंवा उलट) यामुळे मुलांना आई वडिलांची किंमत राहते. हेच तत्व आम्ही आमच्या घरी पाळतो त्यामुळे बाप रागावला कि आई पाठीशी घालणार नाही हे कळल्यामुळे मुले तुम्हाला गृहीत धरत नाहीत. सुदैवाने आमचे आई आणि वडील आम्ही मुलांना ओरडत असताना मध्ये नाक खुपसत नाहीत. आमची चूक असेल तेंव्हा आम्हाला नंतर समजावून सांगतात. त्यामुळे मुलांसमोर आपला पाणउतारा झाला हि स्थिती आमच्या आयुष्यात कधीच आली नाही. मुलांना सुधारणे किंवा घडवणे हि संपूर्णपणे आई वडिलांची जबाबदारी आहे असे मी मानतो . बाहेरच्या माणसावर हि जबाबदारी ढकलणे हे बरोबर नाही. यासाठी काही वेळा तुम्हाला कठोर व्हावे लागते. मुले जर चोकॉलेत खून झोपली तरी मी त्यांना उठवून दात घासायला लावीत असे. जाऊदे झोपली आहेत म्हणून सैल सोडले कि झालेच. मोठ्या माणसाना सुधारणे हि जबाबदारी तुमची नाही आणि जर तुम्ही तुमच्या २१ वर्षे झालेल्या मुलाला सुधारू शकणार नाही तर पंचाहत्तर वर्षाच्या आई किंवा वडिलांना सुधारणे शक्य नाही. तरीही त्यांना शक्य तेंव्हा तंबाखू खाण्यापासून परावृत्त करणे याचा प्रयत्न करणे आपणास शक्य आहे. त्यांची इतर कामे तत्परतेने करणे आणि तंबाखू आणण्यस चालढकल करणे त्यांनी मागितल्यावर त्यांना त्यावर एक बौद्धिक देणे यातून आपला विरोध आपण प्रकट करू शकता. याने त्यांचे तंबाखू खाणे संपणार नाही पण थोडे कमी झाले तरी आपले कर्तव्य केल्याचे समाधान आपणास मिळू शकते. हा अनाहूत आणि दीड शहाणपणाचा सल्ला देणया इतकी माझी लायकी नाही या बद्दल मी आपली अगोदरच क्षमा मागतो पण मानस शास्त्रीय दृष्ट्या विश्लेषण करून काय करता येईल हा वैद्यकीय सल्ल्याचा भाग म्हणून आपणास सुचवीत आहे क्षमा असावी.

बेंबीला आवळं? नगरकडे कौतुक कवळं टेरीला आवळं अशी म्हण ऐकलीये बॉ ! लेखा चांगला आहे. फाजील लाड करु नयेत.

लेखाचा मुळ उद्देश आणि त्यातून द्यायचा संदेश चांगला आहे. त्याची आजकाल गरजही वाढली आहे. खुप जणांना समजत नाही आपलं काय चुकतंय, सांगितलं तरी आपल्या चुकीचा स्विकार करणं त्यांना जड जातं, अशक्य असतं ते त्यांच्या बाबतीत. आणि जेंव्हा आजार बळावतो तेंव्हा आश्चर्य व्यक्त करतात. नशिबाला दोष देतात. ही वृत्ती बहुतेक सर्वामध्ये थोड्याफार प्रमाणात असते. कांही जणं १०० टक्के हट्टी असतात तर कांही जणं १०-२० टक्के. हे कमी टक्केवारीवाले त्यांना सांगितल्यावर प्रामाणिक प्रयत्न तरी करतात कांही जणं यशस्वीही होतात. १०० टक्केवाले बदलत नाहीत, स्वतःच्या कोषातून बाहेर पडत नाहीत आणि भोगत राहतात. घरचे, जवळचे, मित्र-मैत्रीणी वगैरे सांगत असतात पण परिणाम शून्य. अशा वेळी ते डॉक्टरांना, एक अधिकारी व्यक्ती म्हणून, त्याला समजविण्याची गळ घालतात. त्यांनी समजविण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले असतात पण ते सर्व व्यर्थ गेल्याने ह्यांच्या मनांत एकप्रकारची हतबलता आलेली असते. आणि अगदी शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरांची मदत अपेक्षित असतात. हे मोठ्यांच्या बाबतीत झाले. मुलांच्या बाबतीत आपण म्हणता ते बरोबरच आहे. मुलांचे अवाजवी लाड होताना दिसतात. इतकंच नाही तर चुकीच्या गोष्टींचं कौतुक होतानाही पाहिलं आहे. इथे आखातात तर असेही पाहिलेले आहे की अचानक आलेली सुबत्ता हाताळता येत नाही आणि स्वत:च्या बालपणीच्या अतॄप्त इच्छा पुर्‍या करण्याचे एक साधन म्हणून मुलांकडे पाहिलं जातं. ह्याला मी 'सुबत्तेचे बळी' असे मी म्हणतो. मुलांना जे पाहिजे ते, जे मागितले ते आणि जे जे मागितले नाही तेही देण्याची हौस दिसून येते. अशाने मुले हट्टी होतात. पुढे पुढे आई-वडिलांनाही जुमानत नाहीत. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही मिळाली की आकांड तांडव. मग आई-वडिलांची अशक्त सहनशक्ती आणि आपापसातील मतभेद ह्यातून 'जाऊदे नं! देऊन टाका त्याला/तिला काय पाहिजे ते पण घरात शांतता असू दे.' अशी सोपी तडजोड करून, मुलं ऐकतच नाहीत अशी दांभिक तक्रार करून मिळणार्‍या सहानुभूतीने स्वतःच्या मनाला सुखावताना हे पालक(?) दिसतात. आपण मुलांचं काय आणि किती नुकसान करीत आहोत हे लक्षात घेतलं जात नाही. जरी ते लक्षात आलं तरी 'कचरा जाजमाखाली सरकविण्याची' वृत्ती दिसून येते.
डॉक्टर भेटले कि वरिष्ठ नागरिकांना आपला कुठला तरी आजार आठवतो
बिच्चारे वरिष्ठ! मित्र सहानुभूती दर्शवितात किंवा चेष्टा करतात, घरचे रोजच्या तक्रारींना कंटाळलेले असतात. ते त्यांच्या डोळ्यात आणि वागण्यात दिसून येतं. नवरा, आपल्या बायकोच्या शारीरिक तक्रारी गांभिर्याने घेत नाही, बायको अजून मुलांमधून बाहेर पडायला तयार नसते. तिला वेळच नसतो नवर्‍याच्या तक्रारी ऐकायला. मुलं त्यांच्या व्यापात. आणि डॉक्टर आणि वकिलापासून कांही लपवून ठेवू नये अशा संस्कारात वाढलेल्या आणि आपला आजार हाताबाहेर जाण्याआधी त्यावर कांही उपाय योजावा असे वाटत असणारे वरिष्ठ 'आजार आणि व्याधी' ह्या विषयातील अधिकारी म्हणून डॉक्टरकडे धाव घेत असतात. अर्थात, सार्वजनिक ठिकाणी, लग्न कार्यात, पार्ट्यांमधून, 'कन्सलटेशन फी' टाळून दिसला डॉक्टर की आपले रडगाणे गा हे अत्यंत चुकीचे आणि शिष्टाचारास सोडून आहे. हे सर्वांनी टाळलेच पाहिजे.
बायकोशी/ नवर्याशी भांडण होऊ नये किंवा अप्रिय गोष्टी सांगायला लागू नयेत म्हणून वाईट पणा डॉक्टरच्या गळ्यात टाकतो आहोत. हे म्हणजे पाहूण्याच्या हातून साप मारण्याची कावेबाज वृत्ती आहे असे त्यांना वाटते काय?
असं नसतं डॉक्टरसाहेब. घरचे कानीकपाळी ओरडून थकलेले असतात पण 'तुम्हाला काय कळतंय? किंवा मला काय त्रास आहे हे माझं मलाच ठाऊक. तुम्हाला नाही कळणार.' असे म्हणून वाटाण्यच्या अक्षता अगदी सहज लावलेल्या असतात. डॉक्टरच्या बाबतीत तसे म्हणता येत नाही. त्याला ज्ञान आणि अधिकार असल्याने डॉक्टरकडे असा रुग्ण कौन्सिलिंगसाठी सोपविला जातो.
स्वतःला वाईटपणा नको म्हणून आपल्या नातेवाईकचे नुकसान होऊ द्यायची हि कोणती वृत्ती
आपल्या जिवलगाचे नुकसान व्हावे असे कोणालाच वाटत नाही. खुप वेळा अज्ञान तर कधी समस्येचे गांभिर्य लक्षात न घेतल्याने असे वागले जाते.

'व्यावसायिक आपत्ती' आहे, बाकी काय? इतर अनेक व्यावसायिकांनाही असे 'फुकट सल्ले' मागण्याचे अनेक अनुभव येत असतात. पोलिस, वकील, कर सल्लागार, शिक्षक मंडळी, पत्रकार, प्रसारमाध्यमांतले लोक, सरकारी कर्मचारी ... यादी न संपणारी आहे. फरक इतकाच की वरच्या सगळ्यांची 'गरज' नेहमीच असते अशातला भाग नाही - डॉक्टर मात्र नेहमीच 'हवे' असतात! तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना टाळता - हे वाक्य वाचून मात्र वाईट वाटलं - तुमची भूमिका समजते आहे त्यामुळे आरोप नाही तुमच्यावर. मी तुमच्या जागी असते तर कदाचित हेच केलं असतं - तरीही :-)

केवळ मला लहानपणा पासून ओळखता म्हणून मी कुठेही भेटलो कि आपले प्रश्न विचारून माझा सल्ला( फुकट मिळतो) म्हणून घेणे कितपत बरोबर आहे. शिवाय जाता जाता रस्त्यात सेकंड ओपिनियन विचारणे कितपत बरोबर आहे. माझा कर सल्लागार मला बर्याच वेळेला भेटतो म्हणून मी त्याला माझ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारून भंडावून सोडत नहि. शिवाय दुसर्या कर सल्ल्गाराला माझा सल्लागार बरोबर आहे का हे रस्त्यात थांबवून मी कधी विचारत नाही. हे कितीही मान्य केले कि वरिष्ठ नागरिक हे आपल्या ढासळत्या तब्येतीबद्दल सदा चिंतीत असतात तरी केंव्हा आणि कुठे कुणाला सल्ला विचारावा हे तारतम्य पाळणे आवश्यक आहे. उदा. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाचा कार्यक्रम पाहण्यास गेलो असताना मध्यंतरात आपले मूड असेल का एखाद्या वरिष्ठ नागरिकाला चक्कर का येते याचे विश्लेषण करण्याचा ? वडिलांचे मित्र म्हणून त्यांच्याशी नम्रपणे बोलावे लागते इतपत ठीक आहे. मग पुढच्या वेळेस अशा माणसाने पुराण चालू केले तर मला मोबाइल वर फोन घ्यावाच लागतो( आलेला नसेल तरीही). त्यातून मी सोनोग्राफी करतो तर कान नाक घसा तज्ञाने कानाला लावायचे मशीन घेण्यास सांगितले त्याची किंमत चोवीस हजार आहे त्यात त्याचे कमिशन किती असेल हा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचे? मुळात त्यांना कमी ऐकू येत होते हेच मला मुदलात माहित नाही आणि मी त्यांना त्याच्याकडे पाठविले नाही तर हा प्रश्न आपण नात्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी विचारू नये इतके तारतम्य असू नये काय? जाऊद्या आमचे रडगाणे कुठे ऐकता?

केवळ मला लहानपणा पासून ओळखता म्हणून मी कुठेही भेटलो कि आपले प्रश्न विचारून माझा सल्ला( फुकट मिळतो) म्हणून घेणे कितपत बरोबर आहे. शिवाय जाता जाता रस्त्यात सेकंड ओपिनियन विचारणे कितपत बरोबर आहे. काही पथ्ये डॉक्टरांनीसुद्धा पळावीत अशी सामान्यांची अपेक्षा असते. चार टाळकी एकत्र जमली की लगेचच आरोग्यविषयक सल्ले देणे आणि स्वतःच्या डॉक्टर असल्याची जाहिरात करणे, सामान्यांना कळणार नाही अशी वैद्यकीय परिभाषा वापरणे टाळावे ही किमान अपेक्षादेखील पूर्ण होत नाही.

आपल्या लहान मुलाचे फाजील लाड करून आपण त्याचे नुकसान करीत आहोत हे त्यांना कळत नाही का?
अनेकदा दुसरे टोक पाहायला मिळते. एखाद्या लहान मुलाला कौतुकाने चॉकलेट द्यावे तर त्याचे पालक तातडीने ते हातातुन काढुन घेतात आणि ते परत करतात. त्या मुलाच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर आपल्यालाच अपराधी वाटते. फाजील लाड नकोतच पण इतके कठोर वर्तनही नको.

अर्थात, सार्वजनिक ठिकाणी, लग्न कार्यात, पार्ट्यांमधून, 'कन्सलटेशन फी' टाळून दिसला डॉक्टर की आपले रडगाणे गा हे अत्यंत चुकीचे आणि शिष्टाचारास सोडून आहे. हे सर्वांनी टाळलेच पाहिजे.
या वाक्याशी सर्वसाधारणपणे सहमत. तरीही मला पूर्वीपासून प्रश्न पडलेला आहे की लोक असं का करतात? त्यातून मला काही अंदाजे उत्तरं सापडली, ती कितपत बरोबर वाटतात हे समजून घ्यायला आवडेल. १. समोरच्या माणसाशी गप्पाटप्पा करायच्या असतील तर बऱ्याच वेळा त्याच्या क्षेत्राविषयी बोलणं सोयीचं असतं. २. आध्यात्मिक गुरू, स्टॉक मार्केट ऍडव्हायजर आणि डॉक्टर यांच्याशी बोलताना नकळतच माणूस शिष्याच्या किंवा पेशंटच्या भूमिकेत जातो. डॉक्टर या शब्दालाच तसं वलय आहे. एका अर्थाने अशी चर्चा सुरू होणं हे डॉक्टर असण्याबद्दल मिळालेलं कॉंप्लिमेंटच असावं. ३. डॉक्टर हा व्यावसायिक असतो, त्यामुळे पेशंट मिळवण्यासाठी अशा चर्चांचा थोडाफार फायदा होत असावाच. जर अशा दहा लोकांपैकी एकाला जरी 'हे काहीतरी सीरियस असू शकतं. उद्या क्लिनिकमध्ये या म्हणजे व्यवस्थित तपासून सांगता येईल' असं म्हणता आलं, तर त्यांच्या प्रॅक्टिससाठी ते चांगलंच नाही का?

१. समोरच्या माणसाशी गप्पाटप्पा करायच्या असतील तर बऱ्याच वेळा त्याच्या क्षेत्राविषयी बोलणं सोयीचं असतं.
मान्य. पण वैद्यकिय विज्ञानाबद्दल बोलावं, ह्या क्षेत्राच्या व्याप्ती, प्रगती, समस्या, गैर व्यावसायिकता इ.इ.इ. जनरल बोलावं. आपल्या व्याधींबद्दल बोलणं टाळावं.
२. आध्यात्मिक गुरू, स्टॉक मार्केट ऍडव्हायजर आणि डॉक्टर यांच्याशी बोलताना नकळतच माणूस शिष्याच्या किंवा पेशंटच्या भूमिकेत जातो. डॉक्टर या शब्दालाच तसं वलय आहे. एका अर्थाने अशी चर्चा सुरू होणं हे डॉक्टर असण्याबद्दल मिळालेलं कॉंप्लिमेंटच असावं.
नव्याची नवलाई असताना ठिक आहे. त्या व्यक्तीलाही आवडेल. पण एखाद्या वरिष्ठ डॉक्टरला जो ह्या व्यवसायात अनेक वर्षे आहे त्याला 'डॉक्टर' की मिरविण्याची गरज भासत नाही. आणि अशा प्रसंगी अशा व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर, इतरांपरमाणेच, लग्न, पार्टी आदी सार्वजनिक कार्यक्रमाचा आनंद उपभोगायचा असेल तर त्यात व्यत्यय येतो.
३. डॉक्टर हा व्यावसायिक असतो, त्यामुळे पेशंट मिळवण्यासाठी अशा चर्चांचा थोडाफार फायदा होत असावाच. जर अशा दहा लोकांपैकी एकाला जरी 'हे काहीतरी सीरियस असू शकतं. उद्या क्लिनिकमध्ये या म्हणजे व्यवस्थित तपासून सांगता येईल' असं म्हणता आलं, तर त्यांच्या प्रॅक्टिससाठी ते चांगलंच नाही का?
नक्कीच चांगलं पण डॉक्टरसुद्धा माणूस आहे. आणि दिवसभराच्या पेशंटच्या रांगांनी, प्रत्येकाच्या शारीरिक तक्रारी ऐकून, तपासून, औषधयोजना करून तोही बिचारा शरीराने आणि मनाने थकून जातो. अशा वेळी तो ज्या समारंभासाठी आलेला असतो तो समारंभ त्याला उपभोगू द्यावा. दूसर्‍यादिवशी जा नं त्याच्या दवाखान्यात. तिथे कांही तो वैतागणार नाही. फारातफार, 'डॉक्टर मला तुमच्याशी बोलायचे आहे उद्या येतो तुमच्या दवाखान्यात.' एवढेच म्हणावे. आपण एकटेच असतो. आपली एकच तक्रार असते पण डॉक्टरसाठी आपण शंभरावे आणि तेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्य जगायच्या वेळेत असू शकतो. आणिबाणीची परिस्थिती असताना सर्व क्षम्य आहे. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा. तिथे डॉक्टरांनी कांकू करू नये. माझ्या ओळखितले एक डॉक्टर आहेत. रात्री अपरात्री कोणी रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक आला तरी त्या डॉक्टरची बायको, 'डॉक्टरसाहेब घरात नाहीएत, बाहेर गेले आहेत.' असे सांगून आलेल्या माणसाला पिटाळून लावायची. अशाने एक दोन रुग्ण दगावल्याचे कानावर आहे. ते अत्यंत वाईट.

दुर्दैवाने आणीबाणीची परिस्थिती कोण ठरवणार? जोवर तुम्ही रुग्ण पाहत नाही तोवर हे सांगणे कठीण आहे. आणि रुग्णांची रात्री सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाण्याची तयारी नसते. पहिले सरकारी रूग्णालया वर अविश्वासामुळे आणि खासगी रुग्णालयाच्या खर्चामुळे. गरोदर बायका डोहाळे लागले म्हणून बाहेर पाणीपुरी खातात आणि रात्री पोट दुखू लागले कि स्त्रीरोग तज्ञाला फोन करतात. (मला त्यांची खरच दया येते). हे नेहमीचे रडगाणे आहे. एके दिवशी रात्री माझ्या सौच्या एका रुग्णाने (वय ३०) रात्री दीड वाजता फोन केला तो मी उचलला. त्याचे म्हणणे होते कि सर मला झोप येत नाही मी काय करू? रात्री दीड वाजता त्याच्यावर चिडचिड करणे म्हणजे आपली झोपमोड करणे म्हणून मी त्याला फेनारगन हि गोळी केमिस्ट कडून आणून घेण्यास सांगितली. एक म्हणजे रात्री डॉक्टरला फोन केला तर आपल्याजवळ कागद आणि पेन असावे हे तारतम्य "एकाही" रुग्णात मी पाहिलेले नाही. त्यानंतर दोन वाजता त्याचा मला परत फोन आला कि डॉक्टर तुम्ही मला एलर्जी ची गोळी दिली आहे. यावर मी त्याला शांतपणे सांगितले कि ती एलर्जीचिच गोळी आहे पण तिचा साईड इफेक्ट झोप येणे हा आहे. यावर तो तिथे वाद घालू लागला. त्यावर मी त्याला शांतपणे सांगितले कि इतक्या रात्री कोणता केमिस्ट तुला डॉक्टरच्या चिट्ठी शिवाय झोपेची गोळी देणार आहे? आणि मी फोन बंद केला. रात्री दोन वाजता अशा कारणासाठी आपल्याला उठवले तर आपल्यापैकी किती लोक डोके शांत ठेवू शकतील? माझा फोन अजूनही रात्री बंद नसतो परंतु जे डॉक्टर तो बंद ठेवतात त्यांचे पूर्ण चूक आहे असे मला वाटत नाही.

काही मोठी माणसेही जरा लाडातच येतात. रोग असो वा नसो आपल्याला कुणी गोंजारावे ही मानसिकता असते. लहानपणी आपले पुरेसे लाड झाले नाहीत असा समज मनात पक्का रुतून बसलेला असतो.

दुर्दैवाने आणीबाणीची परिस्थिती कोण ठरवणार?
खरं आहे. रुग्णाला आपली कुठलीही अवस्था आणिबाणीची वाटू शकते. पण, छाती, पाठ, डावा हात, जबडा दुखतो आहे आणि दरदरून घाम सुटला आहे तर ती सर्वसामान्य परिस्थिती नाही हे आता अनेकांना ठाऊक असते. अर्धांग लुळं पडत आहे हे जाणवणं ही सुद्धा सर्वसामान्य परिस्थिती नसावी. रात्री २ वाजता घरात घुसलेला साप कोणालातरी चावतो आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो. वरील कांही लक्षणे एखाद्या साध्या कारणासाठीही असू शकतील. डॉक्टरांना ते समजेलच. पण रुग्णांना ती घातक वाटली तर त्यात त्यांचे कांही चुकले आहे असे मला वाटत नाही. बाकी, आपण दिलेली उदाहरणे रुग्णाच्या मूर्खपणाचे प्रदर्शन आणि डॉक्टरसाठी अत्यंत तापादायक आहेत ह्याच्याशी सहमत आहेच. अशा रुग्णांमुळेच चांगल्या वागणार्‍या आणि खरोखरच्या आणिबाणीच्या परिस्थितीतच दूरध्वनी करणार्‍या निष्पाप रुग्णांवर अन्याय होतो असे मला वाटते.

अनेक पालकांना इतकी मिरची का झोंबावी !

लिखाण नेहमीप्रमाणेच आवडले. अशा लोकांना गप्प करण्यासाठी डॉक्टर इतर काही उपाय करू शकतात. "अहो, तो/ती तुमचं ऐकत नाही. माझं काय ऐकणार?" असं हसून म्हणा. कटकट खतम!

आपल्याला आपण स्वत: न छळणे याची जाणीव उपदेशाने येत नाही. त्या बाबतीत मी अगदी पुरता दैववादी आहे. तुम्ही मुले काय कोणालाचा कितीही सांगा, जो झोपेचे सोंग घेतो त्याला जागे करणे अवघड असते. चांगल्या संवयी असतील तर शंभर टक्के जीवन सुखकर होईलच असे नाही. पण मेलडी उत्पन्न करण्यासाठी " राग- रंजकता" नियमाला धरून रहाणे जसे राजमार्ग ठरते तसेच चांगल्या शारिरिक व मानसिक संवयी गरजेच्या आहेत. पण कळते पण वळत नाही असे आपले सर्वांचेच थोडेफार होते. स्खलनशीलता हे प्राणीमात्राचा र्‍हास व्हावा या साठी आवश्यक आहे व निसर्ग ती माणूसच काय सर्वच प्राणीजीवनात भरून राहील याची पुरेपूर काळजी घेतो.

लेख पटला आणि आवडला. पैंजार, गवि यांच्याशी सहमत. त्याचवेळी डॉ. खरेंशीसुद्धा सहमत. डॉक्टरांनी पैंजारबुवांना दिलेला प्रतिसाद आवडला.

लहान मुलांना चांगल्या सवयी लावणे डॉक्टरांवर सोपवु नये हे खरं.. पण मोठ्यांच्या सवयी (अति खाणे, तंबाखू, सिगारेट, दारु) इ वर बोलणे बर्‍याच वेळा उपदेश केल्यासारखे वाटते, इगो आड येतो तेव्हा सोनाराने कान टोचणे कधीकधी जास्त उपयुक्त असते असे वाटते.. अर्थात तेही घरच्यांच्या अथक प्रयत्नानंतरच..

लेख आवडला आणि पटला. लाडानं येडं अन गुळानं बोबडं झालेली असंख्य उदाहरणं पाहिली आहेत.कधी कधी लहानपणी आमचे आजिबात लाड होत नाहीत म्हणून आई बाबांचा खूप राग यायचा. पण आज मात्र कळून चुकतंय की केवढे मोठे उपकार केले आई बाबांनी आमच्यावर.

+१००% सहमत, आइ बाबा चोकलेट घेउन देत नाहित.किंवा कपड्यांच्या बाबतित कातेकोर असतत, म्हणुन खुप राग यायचा.आता प्रश्न पड्तो कि मि मझ्या मुलिला दात किडन्यापसुन किंवा वजन वधन्यपसुन किंवा कपडे अंग झाकण्यासाथि असतात हे पटवुन देउ शकेल?

डॉक्टर साहेबांचा आणखी एक सुंदर लेख ! मुलांना चांगल्या सवयी लावणे ही पालकांचीच जबाबदारी आहे. सांगून ऐकत नाहीत हे खरच आहे ,मग करुन दाखवणे हाच उपाय आहे . उदा. अति टि व्हि पहात असतील तर आपण पाहणे बंद करणे. आई - वडिलांना फार काही सांगू नये , त्याने अकारण वाद होतो , फरक पड्त नाही, कुणीही सांगितले तरीही ! आणि they have played their inning आता काय सांगणार ? डो़क्टर साहेबांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

लेखन आवडले... :) जाता जाता :--- आता तर ऑनलाईन डॉक्टर बाबू सापडले आहेत... २ -४ प्रश्न मी सुद्धा विचारुनच घ्यावे म्हणतो. ;) डॉक्टर हल्ली माझ्या पोटाचा घेर मस्त वाढुन त्याला एकदम तानपुर्‍याचा आकार आला आहे... चालणे शून्य ! दिवसभर मॉनिटरकडे बघुनच काम करतो तसेच माउसवरचा हात क्वचितच उचलला जातो आणि अधुन-मधुन जमल्यास मिपा मिपा खेळतो.दुचाकी चालवतो पण अतिशय सुंदर आणि स्वच्छ रस्त्यांमुळे अंगाचा खुळखुळा झाला आहे का ? असा विचार हल्ली बर्‍याच वेळा येतो. काही उपाय ? ;) अवांतर :--- एक अजुन प्रश्न विचारायचा होता... पण तो इथे उघडपणे विचारता येत नसल्याने तुर्तास थांबतो.

माझा पण एक्झाक्टली हाच प्रश्न आहे. व्य नि करतो .. उगा चारचौघात नको...!!! जोक्स अपार्ट .. पण लोक तुमच्या व्यवसायासंदर्भात अक्षरशः पीडतात.. ! गाडी कोणती घेऊ ? हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न .. वास्तविक मला माझ्याच ब्रांड विषयीच पूर्ण माहीती नस्ते , काय कप्पाळ सांगणार ? पूर्वी मी ईमानदारीत चौकशी / फोनाफोनी करुन माहीती मिळवून द्यायचो.. कधी कधी बरोबर शोरुम्ला ही जायचो.. मग लक्षात आले, कोणती गाडी घ्यायची हे आधीच ठरलेले असते ,माझे मत त्यांना कन्फर्मेशन साठी हवे असते .. !! एकदा हिम्मत करुन एकाला विचारले , अरे आपले तर ही गाडी नको असे ठरले होते ? उत्तर आले .. नाय रे , आमच्या हिला जरा तोच रंग हवा होता !!!! ह्ल्ली कुणी विचारले तर .. गोल गोल उत्तरे देतो, शक्य झाल्यास त्याच्याच मनातले उत्तर देतो. पर्फेक्ट विन विन !!!

गाडी कोणती घेऊ ? हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न .. असाच अनुभव माझाही..कोणता मोबाईल घ्यावा हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.. आयटीमध्ये मोबाईलवर काम करत असल्याने (App development) कोणाला हे सांगणेही नको असे वाटते. लगेच लोकं आपला मोबाईल काढून त्याचा प्रोब्लेम सांगत बसतात जणूकाही मी मोबाईल रिपेरींगचाच कोर्स केला आहे. (पण बर्‍याच वेळेला लोकांचे सॉफ्ट्वेअरच्या संदर्भातले प्रोब्लेम्स मी सोडवलेही आहेत). तीच गोष्ट PC\laptop\wifi router setting च्या बाबतीतही..रात्री कधीही बोलावणे येते कधी कधी (म्हणजे फक्त हे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठीच बोलावणे असते..). डॉक्टर तुम्हीच सांगा काय करावे आता..!!

सर्वात महागडा फोन घ्या म्हणून सांगायचे वर "सस्ती चीज और अच्छी चीज मी फरक होता है" म्हणायचे. नाहीतरी मोबाईल एका विशिष्ट पातळीच्या वर हा आवश्यक नसून ष्टाईल चा भाग आहे तर खर्च करू द्या कि. त्यातून अशा चा डीलर ओळखीचा असेल तर कमिशन सुद्धा काढा. हीच गोष्ट मोटार गाडीला पण लागू आहे. दोन्ही बाबतीत १) (NECESSITY) आवश्यकता यात मारुती इंडिका येतात , २) UTILITY( उपयुक्तता ) होंडा सिटी किंवा टोयोटा करोला आणी ३)LUXURY ( भोगविलास/ ऐश आराम) होंडा अकोर्ड, मर्सिडिस किंवा अजून वर या पातळ्य़ा आहेत. समोरच्याच्या लायकीप्रमाणे त्याला उत्तर द्यायचे. जितका शहाणपणा जास्त तितकी महागाची वस्तू सुचवायची. हा का ना का.

१) (NECESSITY) आवश्यकता यात मारुती इंडिका येतात , २) UTILITY( उपयुक्तता ) होंडा सिटी किंवा टोयोटा करोला आणी ३)LUXURY ( भोगविलास/ ऐश आराम) होंडा अकोर्ड, मर्सिडिस किंवा अजून वर या पातळ्य़ा आहेत.
सुबोध खरे साहेब, वरील विधानाशी असहमत आहे. गाडी घेताना त्याचा वापर कशासाठी, किती वेळा, कुठल्या रस्त्यावर, किती काळाकरीता तसेच आसन क्षमता, आरामदायी आसनव्यवस्था, सस्पेन्शन, इंजिन कपॅसिटी आणि ऐपत ह्या सर्व बाबींचा विचार करून वाहन प्रकार ठरवला जातो. उदा. मला शहरात वापरायला गाडी कमी लागते. पण मला बाहेरगावी भटकण्याची प्रचंड हौस आहे. माझ्या कुटुंबात ९ माणसे आहेत. त्यात एक लहान मुल असल्याकारणाने निव्वळ गरज ८ आसन व्यवस्थेची. माझी उंची, पोटाचा आकार, गुडघ्यांची व्याधी इ.इ. कारणाने टवेरा, क्वालीस , स्कॉर्पिओ ह्या सारख्याच गाड्या 'शॉर्ट्लिस्ट' झाल्या. पैकी टवेराचे सस्पेन्शन मला पटले नाही, क्वालीसचे स्टिअरींग माझ्यासाठी अडचणीचे ठरले. एक्सलेटरवरून ब्रेकवर पाय नेताना स्टिअरींगला अडकतो. शेवटी स्कॉर्पिओ सर्व बाबतीत उजवी ठरली. दूरच्या प्रवासासाठी आसन व्यवस्था आरामशीर आहे. सस्पेन्शन उत्तम आहे, ड्रायव्हरसकट ८ जणांना आरामात प्रवास करता येतो. (फक्त डिकी जरा लहान उरते. कॅरिअर लावल्यास ती समस्या दूर होऊ शकेल). ड्रायव्हरला थकवा जाणवत नाही. इंजिन ताकद भरपूर आहे. महाराष्ट्रात भरपूर भटकता येते. हा भोगविलास किंवा ऐशाराम नसून माझी 'गरज' आहे. मारुती, इंडिका, होंडा सिटी किंवा टोयोटा करोला ह्या गाड्या वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी 'त्रासदायक' आहेत. तर 'प्राडो' सारख्या मोठ्या गाड्या माझ्यासाठी 'अनावश्यक' आहेत. त्यामुळे आवश्यकता, उपयुक्तता आणि ऐशोआराम वगैरे लेबले व्यक्तिसापेक्ष आहेत. त्याचे सार्वत्रीकरण करता येणार नाही.

साहेब आपले म्हणणे मान्य आहे कि या गोष्टी व्यक्तीसापेक्ष अहेत.जसे मला वाटते कि अमुक या मुलाला हि मुलगी लग्नाला योग्य आहे. तसे त्याला वाटेल असे नाही. हा निर्णय ज्याचा त्याने करायचा असतो हीच गोष्ट या रस्त्यावर सल्ला मागणाऱ्या लोकांना कळली पाहिजे. पण जाता जाता फुकट सल्ला मागणे याला उपाय हाच ?

धन्यवाद. पण,
अमुक या मुलाला हि मुलगी लग्नाला योग्य आहे. तसे त्याला वाटेल असे नाही.
हे उदाहरण ह्या संदर्भात चुकीचे आहे. एखादी कार घेणे आणि लग्न करणे ह्या दोन भिन्न गरजा आहेत. लग्नात व्यवहारा व्यतिरिक्त भावनेलाही महत्त्व आहे. कार प्रमाणे पत्नी किंवा पती सहज बदलता येत नाही. तिथली निवड ही मर्यादीत काळापुरती नसून जन्मभरासाठी असते. तिथे 'आवश्यकता, उपयुक्तता आणि ऐशोआराम' हे निकष नसतात (नसावेत). तिथे दिसणं, शिक्षण, संस्कार, चारित्र्य, नोकरी, प्रेमभावना वगैरे वगैरे सर्वस्वी भिन्न निकष नजरेत असतात. त्यामुळे एकदा मुलगा/मुलगी एखाद्याला/एखादिला लग्नासाठी योग्य आहे असे आपल्याला वाटले तरी वरील एखाद्या निकषानुसार त्याला/तिला, तो/ती अयोग्य वाटू शकेल. कारच्या बाबतीत जी मॉडेल्स आपण आवश्यकता, उपयुक्तता आणि ऐशोआराम ह्या वर्गवारीत टाकली आहेत ती चुकीची आहे एवढेच म्हणणे. म्हणजे जे मॉडेल एखाद्याला ऐशोआरामाचे साधन असेल तेच मॉडेल एखाद्याचे खरोखरचे 'गरजेचे' असू शकते. आपला मुद्दा मान्य आहेच. 'दिसला डॉक्टर की आपले रडगाणे गा हे अत्यंत चुकीचे आणि शिष्टाचारास सोडून आहे. हे सर्वांनी टाळलेच पाहिजे.' हा मुद्दा माझ्या पहिल्या प्रतिसादात येऊन गेला आहेच.

डॉक्टर साहेब, अतिशय समर्पक आणि समयोचित लेख आहे. धन्यवाद. लहान मुलांना लावलेल्या चांगल्या सवयी ती मोठी झाल्यावर, मिळवती झाल्यावर, लग्न झाल्यावर का सुटतात, हे कळत नाही. मी स्वतः वडिलांचे बघून रोज व्यायाम, आसने, पायी चालणे, इ. इ. करायचो, ते आजतागायत चालू आहे. माझे बघून मुले लहानपणी आसने, व्यायाम, रात्री दात घासणे वगैरे सर्व करत. आता मिळवती झाल्यावर सर्व सुटले, पोटही सुटले, त्यामुळे त्यांना आमची काळजी वाटण्याऐवजी आम्हालाच त्यांची काळजी वाटते. अश्या वेळी त्यांना कोणी आणि कसे समजवायचे, कळून देखिल वळत नाही, याला काय करायचे, असे वाटत रहाते.

सर्,माझी सुवातीच्या ५-६ वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये अशीच भयानक चिडचिड होत असे,लोकांना कळत असेते की आपल्याल्या या गोष्टींपासुन त्रास होत आहे.पन त्यात बदल करायची त्यांची अजिबात तयारी नसते.लोकांचे एक असते की मी अजिबात पथ्य पाणी पाळणार नाही डॉक्टर तुम्हाला काय करायचे ते करा. यातुन मी कधीकधी वैतागुन पेशंटवर पथ्याची सक्ती करायला सुरुवात केली तर पेशंट तुटायला लागले परत वरती तो अमुक अमुक डॉक्टर फार खडुस आहे अशी प्रसिध्दी मिळु लागली, त्यानंतर मात्र डोक्यावर बर्फाचा गोळा आणी जिभेवर साखर. आणी न रागावता शालजोडीतले हाणत पथ्य सांगायची.याला दुसरा उपाय नाही...

डॉक्टर साहेब, एके काळी(१५ वर्षापूर्वी) मी लोकांना वजन कमी करण्यासाठी कळकळीने सल्ला देत असे.पण बर्याच वेळा मला असा अनुभव आला कि सगळे आहार व्यायाम वगैरेचा संपूर्ण सल्ला ( तो सुद्धा फुकट) देऊन झाला कि लोक शेवटी विचारत कि पण डॉक्टर याच्यावर काही गोळी नाही का? म्हणजे तुमचा अर्धा तास घसाफोडीची किंमत काय?. मी तेंव्हापासून एक तर फुकट कोणताही सल्ला देणे बंद केले आणि वजनदार मंडळी जाता जाता (कट्ट्या वर विचारतात तसे)विचारतात कि वजन कमी कसे करायचे. तेंव्हा त्यांना मी सांगतो कि आतापासून पंधरा दिवस तुम्ही काय खाता त्याची एक डायरी( नोंदणी पुस्तक) करा एक पेढा खाल्ला तरी त्यात नोंद लिहायची. असा पंधरा दिवसाचा आहार लिहून आणा म्हणजे तुमच्या साधारण आणि नैमित्तिक आहाराची मला कल्पना येईल आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सविस्तर सल्ला देईन. गेल्या पंधरा वर्षात एकही माणूस हि डायरी घेऊन आलेला नाही. रुग्णाला सल्ला देताना कर्मण्ये वाधिकारस्ते हा मंत्र लक्षात ठेवायचा. पथ्य तो करतो कि नाही हा त्याचा प्रश्न आहे सल्ला देणे हे आपले काम आहे. मात्र मी सल्ला देताना परखडपणे देतो.(लष्करातील माणसे रोख ठोक आणि तिरसट असतात या कीर्तीचा मी पूर्ण उपयोग करून घेतो) वर हेही सांगतो कि या सल्ल्याचा मला पाच पैश्याचा फायदा नाही पण हे तुमच्याच फायद्याचे आहे माझा मूळ मुद्दा हा होता कि रस्त्यात किंवा प्रदर्शनात किंवा लग्नात डॉक्टर ला गाठून त्याच्याकडे व्यावसायिक सल्ला मागणे अत्यंत गैर आहे. मग ते जवळचे असोत कि लांबचे.

मुळ मुद्दा राहुद्या आता ! मी साधारण तीन आठवड्यापासुन रोज जे काही खाते त्याची एक डायरी बनवलीये - व्हर्चुअल अर्थातच. देउ का पाठवुन? ;)

बायकांना असले प्रश्न विचारीत नैत !
खरे काकांवर आता पाशवी शक्तींचा हमला होणार तर =))