कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही,
पण असे करता येईल का, एखाद्या वाघाचा किवा अजून कुत्रे ज्या प्राण्यांना घाबरता त्यांचा आवाज टेप करून ठेवायचा
व त्या कुत्रीला घाबरावायचे.
http://www.misalpav.com/node/22166
याच्याशी बरेच दोस्त बाडीस आहेत,
थेट अनुभव नसल्याने उत्तर नाही.
मी लहानपणी सेम रामबाण उपाय दिलेला पण घरच्यांनी तो न ऐकता काही तरी भलतंच केलं...
त्या बेसवर कुत्रीला हटवण्याचे असल्यास फुकट सल्ला देऊ शकतो...
जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक तब्येतीचा असतो, भला मोठा दिसत असला तरीही. जरा इकडे तिकडे झाले की त्यांची तब्येत बिघडते. डॉबरमन एकदम ब्येष्ट. केस वगैरेही खूप नाही गळणार, किंवा रॉटवायलर. त्यांची जरा काळजी घ्यावी लागते.
लॅबू तर एकदम ब्येष्ट!
इथे पहा आणि ठरवा की कोणती ब्रीड घरी आणावयाची आहे, मग डिटेलमध्ये लिहिता येईल.
कुत्रे पाळण्यावर पुस्तके मिळतात. अगदी सर्व जातीच्या कुत्र्यांची समग्र माहिती त्यात असते.
माझा आवडता डॉबरमन आहे. आखुड केसांचा असतो. कुत्र्यांना गोड आणि तेलकट खायला घालून नका. त्याने केस गळतात (कुत्र्याचे). कुत्रे आपले घरचे जेवण (आपण जेवतो तेच) जेवतात. जास्त मसालेदार आणि तेलकट जेवण असू नये. आणि पेडिग्रीची सवय लावली तर इतर कशाला तोंड लावत नाहीत. ते महाग पडतं.
आता ती कोण अनोळखी कुत्री, तुमच्या घरी चांगल्यातला (देखणा) कुत्रा आला की लवकरच सुन म्हणून बंगल्यात राहायलाच येईल. तेवढं सांभाळायचं.
कुत्र्यांना एकटं मोकळं सोडायचं नाही. रोज फिरायला न्यावं लागतं. तेंव्हा साखळी बांधूनच न्यावे. नाहीतर ते रस्त्यात इथे-तिथे घाणीत तोंड घालतात. दुसर्या कुत्र्यांपासून तुमच्या कुत्र्यास स्पर्श होऊ नये म्हणून सांभाळायचं. संसर्गजन्य रोग असतात. त्याची बाधा होऊ शकते.
कुत्रा न पाळता केवळ श्वानप्रेमापोटी एवढी माहिती मला आहे.
कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते त्यामुळे कुत्र्याला जागेतून हलवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे त्यांच्या बसण्याच्या जागेशी डांबराच्या गोळीचा थोडासा चुरा टाका. गोव्याला माझ्या घराच्या खिडकीखाली कुत्रीने पिल्ले दिली होती दिवसभर आणि रात्रभर कुई कुई आवाजाने उच्छाद झाल्याने वरील उपाय केला दुसर्या दिवशी कुत्रीने एक एक करून सारी पिल्ले दुसरीकडे पडक्या घरा मध्ये हलविली.
त्या कुत्रीचच एखाद पिल्लु दत्तक घ्या की ...
अवांतर सल्ला - मला वाटते भिक घालणे परवडेल पण (शक्यतो) कुत्रा पाळू नका. आणि अगदीच पाळायचेच असेल तर बाकी काही करण्याआधी शेजार्यांची परवानगी घ्या.. "की आमचे कुत्र भुँकलेले चालेल का?" म्हणून.
लेखाचा एकंदरीत टोन हा कुत्र्यांबद्दलच्या हेटाळणीचा वाटला म्हणून लिहावेसे वाटत नव्हते. तरीही, यशोधरा आणि पेठकर काकांचे प्रतिसाद वाचून लिहावेसे वाटले.
१. ज्याचा मेंटेनन्स आणि केसांची लांबी कमीत कमी आहे (म्हणजे उवा इ. श्वापदे त्या जंगलात फिरावयास धजणार नाहीत ) अशी श्वानप्रजात कोणती ? या प्रजातीच्या श्वानशिशूच्या किमती काय असतात ?
वर म्हटल्याप्रमाणे डॉबरमन.
आमच्याकडे आहे गोल्डन रिट्रीवर. अत्यंत केसाळ! परंतु, केस हीच त्याची शान आणि ऐट!
२. किती वय असताना कुत्र्याचे पिल्लू घरी आणावे ?
जेवढे लवकर आणाल तेवढे उत्तम. ५-६ आठवड्याचे आणा.
३. त्याची राहण्याची झोपण्याची व्यवस्था कुठे अन कशी असावी ?
स्वतंत्र गादी मिळते. अर्थात आमचा "टफी" लहानपणी आमच्याच बरोबर झोपत असे!
४. त्याच्या शी शू ची व्यवस्था कशी करावी ?
लहान मुलांप्रमाणेच. सवय लागेपर्यंत घरभर. एकदा सवय लागली की नेमलेल्या जागी.
५. कोणत्या वयात काय खाणे द्यावे ?
घरी आणल्यापासून लगेच.
६. अंघोळ घालण्याची फ्रीक्वेन्सी किती असावी ?
ब्रीडवर अवलंबून आहे. आम्ही दोन आठवड्यातून एकदा देतो. एरवी सतत केस विंचरत ठेवतो.
७. त्याला पशुवैद्याकडे केव्हा न्यावे ?
लहानपणी वरचेवर - लसीकरणासाठी वगैरे. नंतर २-३ महिन्यातून एकदा पुरे.
८. (त्याच्या अन आपल्या ) आरोग्याची कोणती काळजी घ्यावी म्हणजे त्याच्यामुळे घराचे आरोग्य दूषित होणार नाही ?
वेळच्यावेळी औषधपाणी केले तर काही प्रॉब्लेम येत नाही.
९. घरामध्ये येऊ द्यावे की नाही ?
!
त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर न आणणेच अधिक श्रेयस्कर!
१०. कुत्रा पाळण्याचा मंथली खर्च अंदाजे किती असतो ?
हौसेला मोल नाही ;)
या खेरीज हे लक्षात ठेवावे की, आपल्या हिंडण्या-फिरण्यावर बरीच बंधने येतात. स्वतःची चारचाकी असेल तर, प्रवासाचा प्रश्न मिटतो. तरीही, पेट्-फ्रेंडली हॉटेल्-रेस्टॉरण्ट्स शोधताना फार यातायात होते.
ते सोडले तर, पाळीव कुत्रा ही एक अत्यंत आनंददायक गोष्ट आहे.
१ आपला सर्वात जास्त राग ज्या आय डी वर असेल त्याचे नाव कुत्र्याला देणे.
२ आमचा टिंब टिंब शिवमहिम्न स्तोत्र देखील म्हणतो हां ! होय की नाही रे टिंब टिंब ? असे लाडीक वाक्य पाठ करून ठेवणे !
३.दत्तभक्त होणे.
४.वर्षातून एकदा रायगडाला सश्वान भेट देणे.
५.आपले कुत्रे ( छे.. हा काय शब्द ? आपला पेट ...हं हा शब्द चालेल ) आमच्याकडे सोपवा व निर्धास्तपणे पंधरा दिवस चीन, युरोप अमेरिका यांच्या दौर्यावर निघा. अशा प्रकारची छोटी जाहिरात शोधायला शिका !
६. तुमचे कुत्रे रात्रभर भुंकून डोके उठवते त्यापेक्षा बेंकेत आणखी एखादा सेफ लॉकर का घेत नाही ? अशा विचारणेस
लॉकरचे भाडे कोण तुम्ही भरणार का ? असा प्रश्न ठासून विचारायची प्रॉक्टीस करा.
लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.
शंभर वेळा सहमत.
कुत्रं कधी घरच्यांनी पाळू दिलं नाही. मुंबईच्या तोकड्या जागेत अधीक भर कुठली?
बाबांना एकदा अगदी २ दिवसांचं कोंबडीच पिल्लू मिळालं. ते ते घरी घेऊन आले. मुंबईत राहून कोंबडी कधी पाळीन अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. चांगली ५-६ महिने होती. रोज सकाळी पहिल्या मजल्यावरच्या बाल्क्नीतून उडी मारून उंडरायला जायची. दुपारी परत जीने चढून घरात हजर. फार लळा लावला होता. एकदा वरच्या शेजार्याशी कडाक्याचं भांडण झालं माझं. त्या दिवशी आमची कोंबडी जी फिरायला गेली ती परत आलीच नाही. :(
तिच्या जाण्याचं दु:ख ईतकं होतं की बहिणीने ६-७ महीने (शिजवलेल्या) कोंबडीला तोंडही लावलं नाही.
मलाही फार वाईट वाटलं होतं, पण बहिणी ईतका त्याग माझ्याने काही झाला नाही.
ह्म्म्म... रोचक चर्चा ! ;)
बाकी मी खाली देतो तसा कुत्रा मिळाला तर नक्की पहा ! घराच्या आवारतलं काय अख्ख्या १ किलोमीटर परिघात कोणी येण्याची हिम्मत करणार नाहीत ! नातेवाईक सुद्धा लांबच राहतील ! ;)
जाता जाता :--- माझ्या आवडत्या भू भू वर काही तरी लिहावे असे बर्याच वेळा वाटले आहे, पण ते मी टाळले आहे.इतका मस्त कुत्रा नंतर माझ्या पाहण्यात कधीच आला नाही. :(
कुत्रा हा अतिशय निरुपयोगी,लोचट आणि बिनडोक प्राणी आहे. कुत्रा पाळल्याने फायदा तर काही होतच नाही उलट शेजारी, मित्रमंडळी दुरावतात. रात्री बेरात्री भुंकुन तो डोके उठवतो. उगाच लोचटासारखा पायात तडमडत रहातो. त्याचे खाणे पिणे आणि मेंटेनंन्स हे वेगळेच. त्या शिवाय आपल्या हिंडण्या फिरण्यावरही बंधने येतात.इतरही अनेक कारणे आहेत.
त्या पेक्षा मांजर जरा बरी असते. पण ती देखील निरुपयोगी.
कुठले जनावर पाळायचे असेल तर एखादी गाय किंवा शेळी पाळा. कुत्र्या एवढ्या कष्टात आणि खर्चात तुम्हाला ती दुध तरी मिळेल. किंवा कोंबड्या पाळा.
मासे पाळण्याचा देखील विचार करुन बघा. तो पण पर्याय बरा आहे. ते बिचारे तर तुम्ही ठेवाल त्या कोपर्यात गुमान रहातात. जरा मोठा टँक घेतलात किंवा घराच्या मागे छोटेसे तळे किंवा हौद बांधलात तर खायचे मासे सुध्दा घरच्या घरी मिळु शकतात. एकदम ताजे ताजे.
वरचे काहीच पटले नाही तर एखादा घोडा किंवा हत्ती पाळा. ऑफिसला जाण्यासाठीचा पेट्रोलचा खर्च तर नक्कीच वाचेल.
पण कुत्रा अजिबात पा़ळु नका.
मुळात पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात....ते घरात पाळायची तर दुरची गोष्ट! एक तर ते (कुत्रा/मांजर) घरभर फिरतात, त्यांचे केस गळतात, जेवताना नको ईतके जवळ येतात, पायात घुटमळतात.....म्हणुन ते आपले पहायला दुरुनच बरे वाटतात. एवढे करुन वर त्यांनी नखं दाखवलीच तर काय घ्या? वर त्रिवेनिचा सला ब्येस्ट. कमी खर्चिक, दुसर्यांना कमी त्रासदायक! कुत्रेच काय कुण्या माणसांचीहि तुमच्या घराकडे पाहण्याची हिम्मत होणार नाहि :D
तेही खरंच म्हणा. मिपावर तरी किमान नवरे किंवा एकुणातच पुरुष हे अतिशय सेफ पात्र आहे. कोणीही काहीही बोला, टेन्शन इल्ले. पण बाकी काही बोलोगे तो बोलेंगे के बोलता है.
पु.ल च्या , माझ्या आणि तमाम लोकांच्या शत्रू-पक्षा बद्दल चांगल लिहिण जमणार नाही , एकच सांगतो मित्र-मैत्रिणी खात्रीशीर पाने दूरवतात हे नक्की !!! (एका जवळच्या मैत्रिणी कडे जाण सोडून दिल , तिच्या कडे एकदा खिरित कुत्र्याचा केस आला होता :( )
"कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला की त्याच्या जाण्यानंतर आठवण येताच डोळे ओले होतील. आपले लेकरू असावे तसे असते.म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत नाहीत. "
वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!!
लहानपणी हे सर्व करून जाहले आहे. Lifelong आठवणी पुरतत. फक्त तुमचे मन खंबीर पाहिजे. माझे मन एवढे खंबीर नाहीये आणि त्यामुळे आता हे धाडस नाही करवत. आता हे सगळे पाळिव प्राणी/पक्षी हे दुरुनच पहायला आवडतात.
सर्वसाधारणपणे कुत्र्यांचे आयुष्य १५ वर्षांपर्यंत असते असे ऐकले आहे. आमच्या घराण्यात अजून ८० च्यापुढे कोणी गेले नाही (सर्व आधीच गेले). तसेच घराण्यात कोणालाही नसणारी व्यसनं मी केली आहेत आणि कांही अजून चालू आहेत. त्यामुळे ८० ही माझी 'डेड लाईन' नाही. त्या आधीच मिपावर श्रद्धांजलीचा धागा कोणीतरी टाकेलच. (टाका बरका. नाहीतर 'प्रभाकर भूतकर' नांवाची नविन आयडी येईल.)
तुम्ही कसेही असा कुत्रा तुमच्यावर प्रेम करतोच करतो. त्यामुळे त्याला बिचार्याला नक्कीच दु:ख होईल. तो इमानदार असतो, त्याच्या जवळ छक्के-पंजे नसतात. माझ्या कुत्र्याने अगदीच जेवण वगैरे नाही सोडलं तरी कांही काळ 'ब्लॅक डॉग' आणि चखण्याला तोंड लावणार नाही ह्याची मला खात्री आहे. दु:खभराने माझ्या लॅपटॉप समोर कुंई-कुंई करेल. कोणी लॅपटॉप उघडून माझ्या पाककृती त्याला दाखवल्या तर कृतार्थ नजरेने तो त्या पाहील.
प्रतिक्रिया
कुत्रे पाळण्याचा अनुभव नाही,
...
धन्स. हे आधीही वाचले आहे.
जर्मन शेपर्ड अतिशय नाजूक
माझी माहीती.
आता ती कोण अनोळखी कुत्री,
हो, बाळंत्पण तर आधीच केले आहे
कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय
हा हा हा, खरा डॉक्टरी उपाय
@ खरा डॉक्टरी उपाय केलात एकदम
कुत्र्याची वासाची शक्ती अतिशय तीव्र असते !
+१
त्यासाठी लांडगे किंवा कुत्र्यांना घाबरवणार्या?
जबरा !
धन्यवाद खरेकाका.
त्या कुत्रीचच एखाद पिल्लु
माझे दोन पैसे ...
त्याला जर घरचाच एक सदस्य म्हणून वागणूक मिळणार नसेल तर
लेखाचा एकंदरीत टोन हा
फुकटचा सल्ला ... विषय भर्कटवून
कोणतेही कुत्रे आणा, लळा लागला
म्हणूनच प्राणी पाळावेसे वाटत
अगदी अगदी
लळा लागला की त्याच्या
ह्म्म्म... रोचक चर्चा !
आँ
कुत्रा अजिबात पा़ळु नका
सहमत...
एक वेळ श्रावण पाळा
आवडले. मुळात व्यावसायिक उपयोग
मांजळ पाळा
गावी असलेल्या घरात कुत्रं
अवांतर-
न पाळलेलाच बरा.
आपला पास.....
नवरा.
केस गळणे हा गुणविशेष नवरी
सेफ.
तेही खरंच म्हणा. मिपावर तरी
पु.ल च्या , माझ्या आणि तमाम
खिरीत कुत्र्याचा केस????????
नंतर जेवताना माझे काय हाल
अर्थातच..पण क्वचित का होईना,
ही घ्या
वल्ली व रेवतीशी पूर्णपणे सहमत!!!
कोण आधी?
@जे काय दु:ख व्हायचे ते
कशावरुन?
दु:खदायक गृहीतक.
अगं आईग्गंऽऽऽ......
Pagination