Welcome to misalpav.com
लेखक: आदूबाळ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एडिंबराच्या ग्रामदेवता तुझी प्रार्थना ऐकू देत. लिखाण मस्त, मी फिक्शन वाचत नाही, त्यामुळे हे पुस्तक वाचणार नाही, तुलाच नंतर विचारीन की नक्की खून का आत्महत्या ;) सेक्स शीन च्या बाबतीत ब्रिटीश लेखक कंजूसपणा नेहमी करतात हा माझा अनुभव आहे , त्यामुळे मी शाळेत असताना अमेरिकन लेखकाची पुस्तके वाचायचो...;)

इतक्या चांगल्या पुस्तकपरीक्षण-ओळखीच्या धाग्यावर इन-मिन-तीनच प्रतिसाद आहेत! शक्यतो सबळ कारण असल्याशिवाय जुने धागे वर काढू नयेत. पण हा धागा फारच आवडल्याने प्रतिसाद देत आहे. 'राँबर्ट गालब्रेथ' च्या नवीन पुस्तकाच्या प्रतीक्षेत...! :-)

आता द सिल्कवर्म आणि करियर ऑफ एव्हिलबद्दलही लिहा. तिन्ही वाचावीत असा विचार आहे. तिन्ही कादंबर्‍यांचे एकंदरीत कथाविषय वाचून बाईंची शैली थोडीशी स्यू ग्रॅफ्टन यांच्यासारखी वाटली का?

Cuckoo Calling तरी बरं होतं पण The Silkworm मला अजिबात आवडलं नाही. कृत्रिमरीत्या रंगवलेले प्रसंग, अजिबात न पटणारी रहस्याची उकल आणि ओढून-ताणून आणलेले twists यांनी डोकं फिरवलं. राॅबिनची व्यक्तिरेखा मात्र झक्क रंगवलेलीे आहे. व्यक्तिरेखा रहस्यावर हावी होऊ लागल्या की वाट लागलीच. ही कसरत आर्थर काॅनन डाॅईल आणि आगाथा ख्रिस्ती यांना मस्त जमली. राॅलिंग बाई मात्र चाचपडत आहेत असंच वाटतंय.

धन्यवाद! सिल्कवर्म मलाही फारसं आवडलं नाही. पण ते काही खरं नाही. अगाथा ख्रिस्तीची काही पुस्तकंही अशीच डोक्यात जातात. होम्सचा सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रकार कधीकधी पोरकट वाटतो. पण गोळाबेरीज बघायची झाली तर गाल्ब्रेथ मालिकेवर मी तरी खूष आहे. करियर ऑफ एव्हिल सध्या परवडत नाहीये. :प प्रकाशनपूर्व सवलत पण देत नाहीत लेकाचे. @बहुगुणी: स्यू ग्रॅफ्टन हे नाव आधी कधीच ऐकलं नव्हतं. सुचवल्याबद्दल धन्यवाद.

गूगल स्टोअरवर ₹२९७ वर आहे - प्रकाशनपूर्व सवलत. कालच तुमचा लेख वाचल्यावर मी चेक केलंय.

हॅरी पाॅटर सर्व भाग अधाशासारखे वाचलेत. रोलिंगबाईंना दैवी देणगीच आहे. असो तुम्ही छान माहिती दिलीत. पण पुस्तकावर ते राबट गालबोट लिहिलंय ते कोण?

मला वाट्तं रोलिंग्बाई विविध प्रकार हताळून पहात आहेत.कॅजुअल व्हेकसन्सी ही सामाजिक कादंबरीसुद्धा मला आवडली. बाईंची मुख्य शक्ती ही पात्र अन प्रसंग वर्णन करण्याची आहे असे वाटते.