वेडावून टाकणार्या गंधाच्या पांढर्या शुभ्र नाजूक लांब देठाच्या फुलांची ही उंचच उंच झाडे दिवाळीच्या आधीपासून तीन-चार महिने बहरत राहतात, हल्ली फारशी दिसत नाहीत :-(
फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ झाडं आहेत. फिजिक्स डिपार्टमेंटच्या समोर एक भलं मोठं झाड होतं याचं, ते काही वर्षांपूर्वी वादळात पडलं. अजून आठवण येते तिथून कधी जावं लागलं तर.. :(
पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा, आणि अनेक गवतातील फुले.. यातील तेरड्याला आरतीच्या तबकाला लावून तबक सुंदर सजवता येते. त्यामुळे गणपतीच्या सणाची आठवण आहे याची.
कोंकणीतील 'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां' ज्याला मराठीत बहुधा 'हळदीकुंकवाची फुले' म्हणतात, तीपण पावसात फुलतात..
पाऊस बहुतेक संपताना केवडा फुलतो..त्या झाडीत जाऊन केवडा आणणे हे कष्टकर्मच आहे..
कळलावी म्हणजे नागलखडी किंवा नागकांडी. यालाच नागकिटा, नागकडा, नागखडी/डा असेही म्हणतात. ही वनस्पती विषारी असते (विशेषतः तिचे मूळ) म्हणून आणि तिची फुले (पानेही) पिवळीजर्द-थोडी लाल छटा असलेली- असतात म्हणून तिच्या नावात नाग असतो. इंग्लिशमध्ये ग्लोरी लिली, ग्लोरिओसा सुपर्बा.
कळलावी हे नाव तुरळक प्रमाणातच प्रचारात होते. पण साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पदभ्रमण-दुर्गभ्रमणासाठी तरुणांचे गट जंगलात फिरू लागले आणि या वनस्पतीतल्या अल्कलॉइड्सचा बाळंतपणाच्या कळा येण्यासाठी कुठल्यातरी आदिवासीपाड्याच्या रिमोट जंगलकोपर्यात कधीकाळी केला जात असलेला उपयोग आणि त्यामुळे तिथे वापरले गेलेले कळलावी हे नाव त्यातल्या बाळंतपणाच्या संदर्भामुळे थोडे आकर्षक आणि सनसनाटी वाटून तेच भटकंतीच्या मराठी संदर्भपुस्तकांमधून दिसू लागले आणि बघता बघता लोकप्रिय झाले. वनस्पतितज्ज्ञ हे देशी नावांबद्दल फारसे आग्रही नसतात कारण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे प्रचलित असतात. त्यामुले स्टँडर्ड म्हणून इंग्लिश नॉमेन्क्लेचर वापरणे योग्यच आहे. पण नागकांडी-नागखडी सारखी सुंदर नावे प्रचारात असताना कळलावी सारखे नाव रूढ व्हावे ह्याचे एक मराठीभाषाप्रेमी म्हणून दु:ख होते.
वाघनखी नावाचीही एक वनस्पती असते.
त्याचा हलका सुगंध छान वाटतो.. पांढर्याशुभ्र निशिगंधाचा एक गुच्छ खोलीत असेल तर लगेच लक्षात येत नाही त्याच्या काहीशा साध्याशा विशेष आकर्षक नसलेल्या रुपामुळे.. पण तो दरवळ हलकेच जाणवत राहतो.
कोणी जालावरून प्रतिमा टाकल्यास आधीच धन्यवाद.देऊन ठेवतो...
उन्हाळ्यात रात्री फुलाणारा मोगरा....
उन्हाळ्यात जास्त पण इतरही वेळेस बहरणारा चाफा...
पावसाळ्यात फुलणारी जाई, जुई, नेवाळी, चमेली...
नवरात्राच्या वेळी बहर येणारी शेवंती...
बकुळ कधी बहरतो माहित नाही...
ईतरही कित्ती कित्ती फुले आहेत ज्यांना सुगंधी म्हणता येणार नाही पण त्यांचा स्वत:चा एक वेगळा गंध असतो, श्रावणात सोळा प्रकारच्या फुलांमध्ये ही हमखास असतात ( पण सुगंधी नसल्यामुळे नावे दिली नाहीत ).
मोगरा वर्गातली किंवा मोगर्याशी साधर्म्य असलेली अनेक फुले. मोगरा, बटमोगरा, हजारीमोगरा, जाई, जुई, चमेली, सायली, नेवाळी, मोतिया, कुंती-कामिनी, कुंद, कुसर, मदनबाण, मल्लिगे वगैरे. चाफ्याचे सर्व प्रकार. अगदी खुरचाफ्यालाही मंद वास असतो. सोनचाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा, नागचाफा, भुईचाफा (ह्याचा कंद जमिनीत असतो आणि लिलीसारखे दांड्यातून फूल येते.) सोनटक्का, कृष्णकमळ, अनंत/तगर, सुरंगी (फक्त चैत्रात फुलते). कैलासपतीच्या फुलालाही मंद वास असतो पण फळे मात्र दुर्गंधदायक. शेवंती-गोंड्यालाही आपापला गंध असतो. बाकी केवडा, बकुळ, तुळस, सब्जा, दवणा, पाचू, माली ह्यांचा वरती उल्लेख झालाच आहे
उन्हाळ्याच्या सुरुवातीस करवंदांच्या जाळीवर फुललेली फुलं पण थेट मोगरा , जाई जुई यांच्याशी स्पर्धा करतात .
घेवड्याच्या वेलीवरच्या फुलाना पण एक वेगळाच सुगंध असतो .
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे वृक्ष पण फुल्लानी बहरतात
नाव माहित नाही , पण त्यांच्या सुगंध वेडावणारा असतो .
दाढीच्या ब्रश सारखी मौ मौ फुलं येतात. पिवळा आणि गुलाबी असे दोन रंग असतात .
गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष. पिवळसर हिरवट असणारा तो शिरीष. दोघं जवळपास सारखेच दिसतात. पण फुलांच्या स्ट्रक्चरमधे थोडा फरक असतो आणि वासपण किंचित वेगळा असतो.
शिरीषकुसुमम् म्हणजे कालिदासाची नायिकांसाठीची फेवरिट उपमा... :)
मी लहानपणी या दोन्ही फुलांना दाढीचा ब्रश म्हणूनच ओळखायचे.. :)
दवण्याचा गंध मला फार आवडतो... किंचीत गुढता भारली असावी असाच काहीसा वाटतो तो गंध. पाचुचा गंध काही केल्या आता आठवत नाहीये... बाकी सोनटक्क्याची नाजुक फुल आणि तसाच त्याचा नाजुक सुगंध.
सुरंगीच्या गजर्याचा गंध तर अफलातुन असतो... :)
पाचूचे तुरे असतात. पानांसकट डोक्यात घालतात.
http://www.maayboli.com/node/22479 इथे जागूने त्याबद्दल लिहिले आहे. फोटो आहेतच!
मला आवडतात मे महिन्यात थोडेच दिवस येणारी बकुळीची (ओवळीची) फुले आणि सुरंगी. मोगर्यासारखीच थोड्या दिवसांत सगळ्या वर्षाचं फुलून घेणारी!
मस्त चाललाय धागा पुढे !
या सगळ्यात बकुळीच्या फुलांची आठवण कशी नाही झाली कोणाला. फुले ताजी असतानाचा दरवळ सुकल्यावरही अनेक आठवडे कायम राहतो... माझा आवडता सुगंध !
काल पानशेत परिसरात भटकंती करत असताना टिपलेले हे पावसाळी फुलांचे फोटो! पावसा इतकेच फ्रेश! :)
=======================================================
=======================================================
=======================================================
========================================================
प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही?
संपूर्ण झाड औषधी गुणधर्म असलेले ...
फूल, पान, साल , एवढेच नाही तर त्याचे सान्नीध्यही औषधी
जरा आणि मरणास दूर ठेवणारा असे म्हटले जाते.
आणि फुलांचा गन्ध आणि अंगणातील गोल सडा तर ... वा........
किणकिनाट
प्रतिक्रिया
दसर्याचा आणि दिवाळीतला झेंडू
जुई
उन्हाळ्यात मधुमालतीलापण खूप
पावसाळ्यात फुलणारा सोनटक्का.
पावसाळा आणि सोन्यासारखी
अजून कोणी व्हॅलेंटाईन डेच्या
आकाशमोगरा/ गगन जाई/ बुचाची फुले
फर्ग्युसन कॉलेजला याची भरमसाठ
पुणे युनिव्हर्सिटीत पण
पावसात फुलणारा सोनचाफा, तेरडा
केवडा नाव वाचून एकदम केवडा अन
'वागचापको' किंवा 'वागाची नाकटां'
काय पण नाव तरी तेच्यायला
असावी..हे नाव ऐकल्यासारखं
हे फूल म्हणतोय मी!!
नागकांडी
च्या मारी..तुम्ही नक्की काय
+१११११११११११
अहाहा!
मला
निशिगंध..
मोगरा
श्रावणात कितीतरी (२४?)
आघाड्याची पानं, दुर्वा पत्री
जास्वंद
आणखी काही
उन्हाळ्याच्या सुरुवातीस
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला
गुलमोहर?
गुलमोहराची फुलं तर खायची
त्यातही ती "राजा" पाकळी, काय
गुलमोहराची फुलं का त्याच्या
मी लाल पाकळ्या आणि 'कोंबडा'
गुलाबी असणारा तो पर्जन्यवृक्ष
+
त्या फुलाना शिरीष असे नाव आहे
अहाहा..
हे घ्या
दवण्याचा गंध मला फार आवडतो...
पाचू?
हे फूलाचं नाव आहे? फोटु मिळंल
पाचू
पावसाळी रानफुले
फोटो अप्रतिमच..सगळे सुगंध
मस्त चाललाय धागा पुढे !
काल पानशेत परिसरात भटकंती करत
उत्तम धागा
वाहव्वा! फुले आनंदाच्या लगडी!
प्राजक्त / पारिजातक चा अजून उल्लेख नाही?
+१
Pagination