माचीवरचा बुधा वाचले आहे?
नसेल तर मिळेल तेथून घ्या व वाचा.
* पुस्तके वाचने म्हणजे मी काय वाचले हे सांगण्यापेक्षा, मला काय भावले हे त्यात असणे महत्त्वाचे आहे. ते आधी लिहला.
चांगला उद्देश आणि माहिती, धन्यवाद!
पुस्तकविश्व इथेही भेट द्या, इथलेच (आणि इतरही बरेचसे) पुस्तकवेडे या संग्रहणीय संस्थळावर पुस्तकचर्चा करतात. (पूर्वी मिपावर त्याचा दुवा असायचा, आता दिसत नाही.)
तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये बहुतांश पुस्तके अनुभव / घटना / चरित्रे / आत्मचरित्रे आहेत म्हणून मी वाचलेली व आत्ता लगेच आठवणार्या त्या प्रकारच्या पुस्तकांची यादी देतोय.
अ डबल लाईफ - अॅलेक पदमसी.
अॅलेक पदमसी या अॅड गुरूचे आत्मचरित्र, MRF, लिरील पासून ते KS पर्यंत अनेक जाहिराती कशा तयार झाल्या यांची गोष्ट आणि अॅलेक पदमसी यांनी शेखर कपूरच्या गांधी चित्रपटामध्ये महमद अली जिनांची भूमीका केली त्याचा उल्लेख वाचनीय.
बुलेट फॉर बुलेट - जे एफ रिबेरो.
ज्युलिनो एफ रिबेरो या एका पोलीस अधिकार्याचे आत्मचरित्र. ऑपरेशन ब्लू स्टार ते रूमानियातील राजदूत व नंतर निवृत्ती या संपूर्ण प्रवासातील थरारक घटनांचे चित्रण. शीख अतीरेक्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून यांच्यावर दोनदा प्राणघातक हल्ला केला आहे.
मेड इन जपान - अकिओ मोरीता.
"सोनी" ची कहाणी.
आयकोका - ली आयकोका.
फोर्ड, क्रायसलर या कंपन्या गाळातून वर काढून स्थिरस्थावर करूनही दोन्ही कंपन्यातून हकालपट्टी झालेला एक लिजंड..
लूजींग माय व्हर्जिनीटी - रिचर्ड ब्रॅन्सन.
व्हर्जिन मोबाईल च्या मालकाचे आत्मचरित्र - पुस्तक मोठे आहे - अवश्य वाचा.
जॅक - स्ट्रेट फ्रॉम द गट्
जॅक वेल्श - जीई कंट्रीवाईडच्या एका हाय प्रोफाईल सीईओचे आत्मचरित्र. जीई कंपनीवर आणि पर्यायाने संपूर्ण मार्केटवर सत्ता गाजवणार्या जॅक वेल्शचे आत्मचरित्र.
या पुस्तकामध्ये "गो होम मिस्टर वेल्श" नावाचा चॅप्टर आवर्जून वाचा. मार्केटलीडर जीई चा आपला प्रतिस्पर्धी हनीवेल ला टेकओव्हर करण्याचा प्रस्ताव युरोपीयन कमीशनर्स नी कसा उधळून लावला, जॅक वेल्श ने कशा बालीश चुका केल्या ते सगळे दिले आहे. (कल्पना करा दोन्ही अमेरीकन कंपन्या आणि त्यांच्या मर्जर / टेक ओव्हर ला युरोपीयन कमीशनर्स नकार देत आहेत.)
स्टीव्ह जॉब्स - by walter isaacson
तुमच्या जवळ खूप पेशन्स असतील तर जरूर सुरूवात करा. मोठे पुस्तक आहे.
मॉंक व्हू सोल्ड हिस फेरारी - रॉबीन शर्मा
हे पुस्तक मला झेपलेले नाही. तुम्ही वाचलेत तर जरूर परिक्षण लिहा.
कोल्ड स्टील.
आर्सेलर मित्तल मर्जर दरम्यान काय काय अचाट गोष्टी घडल्या त्यावर हे पुस्तक आहे.
बिझीनेस लीजंड्स, बिझीनेस महाराजे - गीता पिरामल.
भारतीय उद्योजकांची अप्रतीम व्यक्तीचित्रे - मराठी अनुवाद अशोक जैनांनी केला असल्याने अप्रतीम झाला आहे.
माझंही एक स्वप्न होतं - वर्गीस कुरीयन.
अमूलची जन्मगाथा.
टाटांच्या इतिहासाबद्द वाचायचे असल्यास - रोमान्स ऑफ टाटा स्टील, रूसी मोदी - द मॅन व्हू ऑल्सो मेड स्टील. टाटा- अ स्टोरी असे काहीतरी एक अप्रतीम पुस्तक आहे - पुस्तक पाहून सवडीने नाव कन्फर्म करेन.
९० मिनीट्स अॅट एंटबे.
ऑपरेशन थंडरबोल्ट ही अशक्य धाडसी कारवाई करणार्या इस्राईलच्या जवानांची, त्यांच्या कडव्या देशप्रेमाची आणि प्रतिकुल परिस्थितीलाही नमवणारी कहाणी.
पुस्तकाच्या शेवटी UN च्या सभेमध्ये केलेले त्यांच्या प्रतिनिधीने केलेले भाषण वाचताना डोळ्यासमोर उभे राहते.
जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज - पंडीत शिवकुमार शर्मा.-
शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र.
हे नक्क्की वाचाच. संगीतक्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे आहेत.
गाए चला जा - शिरीष कणेकर.
लेखकाच्या नावावर जावू नका ;-), काही चरित्रे चांगली जमली आहेत. (राजेश खन्नाची प्रस्तावना असलेले पुस्तक हेच ना..?)
कार्यरत, प्रश्न आणि प्रश्न, धागे उभे आडवे ही अनिल अवचटांची रिपोर्ताज स्टाईलची पुस्तके.
कार्यरत मधील पान नंबर १९४ आणि १९५ चुकवू नका. ("आम्हा घरी धन - भाग १" मध्ये ते सापडेल तुम्हाला)
गुण गाईन आवडी, मैत्र, गणगोत, आपुलकी - पुलं
पुलंनी चितारलेली त्यांच्या सुहृदांची व्यक्तीचित्रे.
तीळ आणि तांदूळ - गदिमा
गदिमांनी लिहिलेली त्यांच्या सुहृदांची व्यक्तीचित्रे.
आहे मनोहर तरी, सोयरे सकळ - सुनिताबाई.
फोटोबायोग्राफीज आवडत असल्या तर..
चित्रमय स्वगत - पुलं.
बाळासाहेब
महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे.
पहावा विठ्ठल - उद्धव ठाकरे.
वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे
कविता वाचायच्या असल्यास.
समग्र बोरकर - खंड १ व २
जिप्सी, बोलगाणी - मंगेश पाडगांवकर
आज आत्ता मिळत असतील तर लगेचच - "दुनीया तुला विसरेल" हे भाऊसाहेब पाटणकरांच्यावरती असलेले पुस्तक घ्या.
आणि वरचे काहीच मिळाले नाही तर रोज "दासबोध" - एक पुस्तक म्हणून वाचत चला.. :-)
माझं वाचन एवढं दांडगं नाही. पण यातली काही पुस्तकं वाचायच्या यादीत आहेत. माँक हू सोल्ड फेरारी मलाही आवडलं नाही. परिणामकारक तर मूळीच नाही असं आपलं मला वाटतं.
मी इडली आणि ऑर्कीड, उद्योजक मी होणारच ही विठ्ठल कामतांची पुस्तकं वाचली पण इतकी नाही आवडली; थोडी विस्कळीत वाटली. इरावती कर्वेंच युगांत वाचून धक्का बसला. थोडसं नकारात्मक वाटलं तरीपण कटू सत्य फार रोखठोक पणे मांडलं आहे असं वाटलं.
अल्केमिस्टची गोष्ट मात्र कधीही वाचावी अशी आहे, असं वाटतं. खांडेकरांचं अमृतवेल मात्र खूप आवडलं छोटेखानीच आहे पण बरचं काही सांगून जातं असं वाटतं.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
वॉर्ड नंबर ५ के ई एम - रवी बापट. असेच डॉक्टर बापटांच्या अनुभवांचे पुस्तक आहे.
हृदस्थ वाचले असेलच - तसेच डॉ. अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे पुस्तक आहे. मी शोधतो आहे हे पुस्तक.
दशानना - प्लीज नोट! ;-)
तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर सध्या वाचायचे आहे ते सांगा शक्य झाले तर..
(1) अंताजीची बखर आणि (2) बखर अंतकाळाची - नंदा खरे
The case of rotten mangoes - Mohommad Hanif
Six suspects - Vikas Swarup
(आत्ता टंकाळा आला आहे म्हणून इतकंच, बाकीचं नंतर)
गोनीदांची सर्वच पुस्तके खूप छान आहेत. तरी त्यातही सर्वश्रेष्ठ म्हणायचीच तर पडघवली, जैत रे जैत, माचीवरचा बुधा, दुर्गभ्रमणगाथा, कादंबरीमय शिवकाल, त्या तिथे रूखातळी...जौ द्याना, यादी लैच मोठी आहे.
मी वाचलेल्या पहिल्या तीन कादंबर्या गोनीदांच्या होत्या: मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो आणि तुका आकाशाएव्हढा. यातील पहिल्या दोन संग्रही आहेत.
जर गोनिदांनी "विष्णूदास नामा" अशा काहीशा नावाने कादंबरी लिहिली असती तर ती मी वाचलेली चौथी कादंबरी ठरली असती. :)
अशी ही धरतीची माया - के. शिवराम कारंथ. अनु. रं. शा. लोकापूर
मरळि मण्णिगे ह्या मूळ कन्नड कादंबरीचा सुरेख अनुवाद.
वंशवृक्ष - भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी
तपळी शिवशंकर पिल्लै - दोन शेर धान (केरळमधील कुट्टनाड ह्या ठिकाणच्या समुद्रसपाटीच्याही खाली असणार्या जमैनीत भातशेती करणार्या मजुरांवर आधारीत कादंबरी)
सध्या हे पुस्तक मी वाचतो आहे. कथानायकाच्या वडीलांच्या आणि अमेरिकास्थित नातेवाईकांच्या हत्येचा आंतरराष्ट्रीय कट आणि त्या कटाची पालेमुळे शोधून काढण्यासाठी कथानायक आणि त्याच्या मैत्रिणीने केलेला प्रयत्न- अशी ही कथा आहे. कथेची पक्की मांडणी, ओघवती आणि वर्णनात्मक भाषा ह्यामुळे पुस्तक सुरवातीपासूनच मनाची पकड घेतं.
आहा.. एक नितांत सुंदर कादंबरी.
अनेक जुने राजकिय घडामोडी व घटना यांचा सुंदर असा वापर या कादंबरीमध्ये केला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जो वेग आहे तो खरच अफाट आहे कादंबरीला.
अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी दोन-तीन नेहेमीच्या दुकानांत पाहिलं तर औट ऑफ प्रिंट आहे असं त्यांनी सांगितलं. टेपा लावत होते की काय कळायला मार्ग नाही, कारण पूर्वीही एक-दोनदा असा अनुभव आला आहे (स्वतःजवळ प्रती शिल्लक नाहीत आणि दुसर्याला धंदा मिळू नये म्हणून असं बिनधास्त ठोकून देतात).
वाचलेच पाहिजे असे,
"डोह" लेखक श्रीनिवास कुलकर्णी, प्रकाशक मौज.
मिपावरील प्रत्येकाने वाचावेच असे पुस्तक, मिळवून वाचा अशी शिफारस करतो मी.
त्याच सोबत नेहमीचीच... तोत्तोचान, माचीवरचा बुधा, पवनाकाठचा धोंडी ही तर प्रत्येक मराठी माणसाने वाचावीत अशी पुस्तके आहेत.
जर जाहिरात करतो आहे असे वाटत असेल तर हा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल, चिंचवड येथे लिंक रोडवर, डोके उद्यान येथे "पुस्तकजत्रा" पुस्तक प्रदर्शन चालू आहे माझे, वरील पुस्तके जवळपास सर्व पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन देखील आहेत, व्यनि केल्यावर त्याची मी लिंक देईन.
दशानन
तुम्ही तुमच्या "पुस्तकजत्रा" बद्दल सांगितले. यात वावगे काहीच नाही.
aparna akshay ,
गोनीदांच्या पवनाकाठचा धोंडीबद्दल लिहिले आहे. माचीवरला बुधा, शितूचाही उल्लेख केलेला आहे.
पुस्तकांची नावे देताना फक्त लेखकाचे नाव न देता पुस्तकाबाबत थोडकी माहिती द्यावी.
असे धागे कुठल्या ना कुठल्या मराठी संस्थळावर थोड्या थोड्या दिवसांनी येतच राहातात, नेमकं होतं काय ही अशी पसरलेली नावं घेऊन दुकानात जाता येत नाही ना...
मोदका (तू एक्सेल मास्टर म्हणून म्हटलं) ह्याची एखादी एक्सेल बनवून गुगल डॉक्स वर टाकता येईल का.. पुस्तकाच नाव, लेखकाच नाव, प्रकाशकाच नाव, वर्गीकरण (ऐतिहासिक, कादंबरी, आत्मचरित्र, कवितासंग्रह, अनुवाद वगैरे)
जर शंभर एक लोक जमले तर एकदमच मेगा ऑर्डर देऊन टाकु मग ;)
मुंबईत घडलेल्या आणि घडणार्या बर्याचश्या गोष्टींचि माहिती लेखकाने अनुभवुन जशीच्या तशी पुस्तकात सादर केली आहे! बरेचसे धक्कादायक सत्य दोल्यासमोर येते आणि विचार करायला लावते!
सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही गिरीश कर्नाडांची आत्मकथा वाचत आहे.मूळ कन्नडमध्ये असलेल्या पुस्तकाचा उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला हा अनुवाद. नवीनच पुस्तक आहे आणि बर्याच जणांना वाचायचे असेल, तर डिटेल्स देत नाही, पण अत्यंत प्रामाणिकरीत्या लिहिलेले पुस्तक आहे, इतके म्हणते. हे पुस्तक वाचणे हा एक सुरेख अनुभव ठरतो आहे.
दोन महिन्यांपुर्वी या पुस्तकातला काही भाग लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये वाचला होता. त्यात गिरीश कर्नाड यांनी त्याच्या महाविद्यालयीन जीवनातल्या दिवसांवर लिहले होते.
प्रतिक्रिया
माचीवरचा बुधा वाचले आहे?
पुस्तकविश्व
तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये
एकंदर धागा आणि बरेच प्रतिसाद आवडले
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस) ... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.वॉर्ड नंबर ५ के ई एम - रवी बापट. असेच डॉक्टर बापटांच्या अनुभवांचे पुस्तक आहे. हृदस्थ वाचले असेलच - तसेच डॉ. अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे पुस्तक आहे. मी शोधतो आहे हे पुस्तक. दशानना - प्लीज नोट! ;-) तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर सध्या वाचायचे आहे ते सांगा शक्य झाले तर..ही सगळी पुस्तके आता माझ्याकडे
नरेंद्र जाधव - मी आणि माझा
(1) अंताजीची बखर आणि (2) बखर
.
माझा नाही हो शब्द असाच
टंकाळा
संभव असंभव
निरंजन घाटेंच्या इतर
मस्त धागा.
गोनिदांबद्दल नाही लिहीलं कोणी
गोनीदांची सर्वच पुस्तके खूप
वाघरु?
हो.
ह्म्म.. गोनिदांची सगळीच
गोनिदांची सगळीच पुस्तके,
गोनिदांची सगळीच पुस्तके, त्यातली भाषा, विषय भुरळ पाडणारे, लोभस असेच आहे+१ याप्रमाणेच, "स्मरणे गोनिदांची", "स्मरणगाथा" आणि "आशक मस्त फकीर" ही गोनिदांविषयी असलेली पुस्तकेही अप्रतीम आहेत. आम्हा घरी धन प्रमाणेच आवडलेल्या पुस्तकांचा एखादा धागा काढा. :-)मी वाचलेल्या पहिल्या तीन
'मृण्मयी ' राहिली !
एक आवडीचं राहिलं.
'मृण्मयी ' राहिली !
गो नि दांचे मला सर्वात
गोनिदांचं 'कृष्णवेध' आणि 'दास डोंगरी राहतो' .........
अशी ही धरतीची माया - के.
श्री.ना. पेंडसे - तुंबाडचे
लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये
आहा.. एक नितांत सुंदर कादंबरी
अप्रतिम
अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी
हे वसन्त वसन्त लिमये म्हणजे
हो तेच ते. त्यांची मुळशी जवळ
माझ्याकडे आहे स्टॉकला.
बुक गंगा
लॉक ग्रिफिन मला बुकगंगा वर
वाचलेच पाहिजे असे,
सुरेख आहे हे पुस्तक.
काय विषय आहे या पुस्तकाचा?
जरुर.
जर जाहिरात करतो आहे असे वाटत
ऑ??? वाट चुकलात की काय?
.
लिस्ट..
कल्पना चांगली आहे.
आपण मेगा ऑर्डर वर मेगा
मॅक्सिमम सिटि - सुकेतु मेहता
सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही
दोन महिन्यांपुर्वी या
Pagination