Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त लिहिलेय.
नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणीखोडी काढली किंवा त्याला कोपच्यात घेतले तर त्याच्या सारखा दुसरा मोहक लढवय्या नाही. मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,सळसळणारी नागीण पहायचे भाग्य नशिबात असायला लागते.
क्या बात! भा हा री ही :)

जरा जागा चुकली, तो परिच्छेदानंतरचा फणा मिटलेला फोटो मला म्हणायचे होते. आधी वरतीच टाकला होता, तो नाग वळवळत अडोषाच्या जागी जाऊन बसला.;)

__/\__ जेड्या, पुढचा भाग एका आठवड्याच्या आत टाकला नाहीस, तर तिथे येऊन मारीन.

नाग अगदी जवळुन पाहिलेला आहे... तसेच अन्य साप सुद्धा जवळुन पाहिले आहेत... नशिबाने त्यांनी मला दंश केला नाही. कात टाकताना सापड्याला पाहिले आहे. कात हातात घेउन त्याचे निरिक्षण सुद्धा केले आहे. केवड्याच्या बनात शिरलो आहे आणि एक वेगळ्याच अनुभवाचा आनंद देखील घेतला आहे... काळाच्या ओघात यातल्या बर्‍याच गोष्टी नष्ट झाल्या... आता राहिल्यात त्या "फक्त" आठवणी. बाकी लेखन वाचतो आहे... लगे रहो.

लेख अप्रतिम आणि पिल्लांच्या विषाची माहिती थरकांप उडवणारी, लेख वाचून 'नागा' वलोय.

लेख छान आहे ! काही शंका आहेत.. १. नागाची१० आकडी नागाची लांबी जास्तीत जास्त किती असते ? २. फणा काढलेला नसेल तर नाग कसा ओळखायचा ? ३. ट्रेक मध्ये अशा कोणत्या जागा आहेत जिथे सापांसंबंधी काळजी घेतली पाहिजे ? ४. ऊब ! साप नाग ऊब असेल तिथे आकर्षित होतात का ? ( म्हणजे आम्ही गडावर कडाक्याच्या थंडीत स्लीपींग बॅग मधे झोपलो आहे , आणि कानाशी " भावा , थंडी फुस्स करतीये ..थोडा सरक" असा आवाज यायचा)..

( म्हणजे आम्ही गडावर कडाक्याच्या थंडीत स्लीपींग बॅग मधे झोपलो आहे , आणि कानाशी " भावा , थंडी फुस्स करतीये ..थोडा सरक" असा आवाज यायचा).
" झकासच... कल्पना मस्त आहे राव!!!!

धन्यवाद् ! १)ती लांबी कमी जास्त असू शकते, पण माझा असा अनुभव आहे की जंगलामध्ये चांगल्या फेशन चे नाग मिळतात. काही फण्यावर फेशन नसते, त्या नागला काही सर्पमित्र काळा नाग समजतात.(black cobra ही पूर्ण पणे वेगळी जात आहे.) २)या प्रश्नांचे उत्तर मला देता येणार नाही, कारण जे उत्तर देईन त्यावरून अपघात होऊ शकतात. जास्त करून तरी नाग माणूस दिसला तर फणा काढून फुत्कारतो आणि स्वतः चे अस्तिव दाखवून देतो. ३)सगळ्याच जागा आहेत, की तिकडे साप-नाग असू शकतात. पण प्रामुख्याने खाणे खाऊन झाल्या वर ती जागा नीट साफ करून ठेवली पाहिजे, कारण सांडलेले खाणे खायला उंदीर आणि त्यांच्यामागे साप येतात. ४)भाग ४ मध्ये लिहिल्याप्रमाणे, साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे तो शरीराचे तापमान राखण्यासाठी शेकोटीपाशी किंवा उबेच्या ठिकाणी येतो,म्हणून ट्रेक मध्ये तंबू च्या बाजूला स्नेक त्रेंच (सापाचा अडकाव खड्डा )खोदतात. गुहेमध्ये झोपत असला तर,उंदीर असतील तर साप यायची शक्यता असते, त्यामुळे झोपायच्या आधी सगळे तपासून घ्यावे आणि जर वाटलेच तर आळीपाळीने पाहारा द्यावा.

माहिती आवडली. काही शंका. नाग (इतर विषारी साप नाही) चावल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी करायचे उपाय (ते बांधून ठेवणे,ब्लेडने कापणे वगैरे) उपयोगी पडतात का (कारण तो फारच विषारी असतो म्हणून)? की आपलं डॉ. नेण्यापूर्वीच "हे राम!"? असं पण ऐकून आहे की डॉ. नेल्यानंतर पण नक्की कोणता सर्प चावला यावरून ते औषध देतात. म्हणजे ज्याला सर्पज्ञान नाही तो संपला असं होतं का?

आधी मिपाकर -मोदक यांच्या 'ट्रेक करताना' या वर दिलेले प्रतिसाद वाचा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. http://www.misalpav.com/node/24804 http://www.misalpav.com/comment/488139#comment-488139 धन्यवाद!

प्रतिक्रिया वाचल्या. माहितीपूर्ण आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. धन्यवाद!

मस्त लेखमाला...... देहुरोडच्या दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर १ अस्स्ल दख्ख्नी नाग बघीतला होता..डोळ्यादेखत १ दुचाकी त्यावरून गेली.. त्यानंतर त्या नागाने त्या गाडीचा केलेला पाठलाग 'याची देही याची डोळा' बघीतला आणी थक्क झालो होतो, तो प्रसंग आठवला........

माहितीपुर्ण लेखमाला. प्रत्येक भाग आवर्जून वाचलाय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. प्रबळगडावरून खाली उतरताना मी न एका मित्राने एका झाडोर्यात फणा काढून बसलेला पाह्यला न जे धुम ठोकली ते खाली तळालाच पोहचलो होतो.

रॉयल प्रकार आहे. मी एकदाच बघितला. असा पसरुन उन्हात पडला होता अगदी रस्त्यावर. आम्ही स्कूटर घेऊन वाट बघतोय साहेब जाण्याची.. हा आम्हाला किंमत द्यायला तयार नाही (एवढ्या सुंदर मुलीकडे एवढं दुर्लक्ष! हुं...) . आवडला जामच. तो दिवड वगैरे आधीच एवढा घाबरतो की त्याच्या धावपळीनेच घाबरायला होतं.. हा एकदम भारदस्त चालीमधे (की सरपटीमधे?) गेला... लेखमाला मस्तच... वाचताना दहा वेळा आमच्या साप दडवण्यासाठी कुप्रसिद्ध कौलांकडे लक्ष जातं वर.. पण लवकर टाका पुढचे भाग. कधी चावला कुणी तर कळेल तरी कोण नक्की होता ते... ;)

उन्हातला चकचकीत नाग खूप सुंदर दिसतो. तुम्हाला दिसलेली नागीण असेल, म्हणून तुमच्या कडे दुर्लक्ष केले असेल..;)

जबरी श्टाइल मदी माहिती लिवलीया! @ म्हणजे आपण जसे अभियांत्रिकीच्या परीक्षेत १ पानाच्या जागी ५ पानी उत्तर लिहून परीक्षकाला गोंधळात टाकतो, तसला हा प्रकार >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif @ एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, >>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif @ त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !). >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif @दुध हे निसर्गात, (आंबे येतात तसे) नैसर्गिकरीत्या उबलब्ध नसते, त्यामुळे ते कुठल्या पण सरपटणाऱ्या प्राण्याचे खाद्य असूच शकत नाही. >>> http://www.mimarathi.net/smile/congrats.gif http://www.mimarathi.net/smile/congrats.gif http://www.mimarathi.net/smile/congrats.gif त्यो तिसरा फोटू बगून लै भ्या http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-366.gif वाटलं !

नागोबाला दुध हे मिथ्यक आहे. गारुडी नागपंचमी च्या अगोदर बरेच दिवस नागाला पाणी देत नाहीत त्यामुळे नागपंचमीला तहानलेला नाग पाण्याऐवजी दुध पितो.

पुभाप्र!! (चवीने चावणार त्याला विष चढणार) ;)

रोचक अनुभव व तेवढेच खुशखुशीत लिखाण मिपावरील ही संग्रही ठेवावी अशी लेखमाला होत आहे. मागे किंग कोब्रा चा उल्लेख आला होता जर्मनीत छोट्या पडद्यावर भारतीय वाहिन्या दिसत नाही मग तू नळीवर अवलंबून राहावे लागते , त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या दृश्य फिती पहिल्या जातात भारतीय सर्पांच्या वर अश्याच काही पाहिलेल्या येथे अडकवतो.

माहितीने ठासून भरलेली तरीही रटाळ न होणारी एक अप्रतिम लेखमाला. लगे रहो. नागासारख्या चपळतेने पुढचे भाङ टाका आता :)

आधी पासून ही लेखमाला वाचतोय पण आज प्रतिसादाची संधी मिळाली :) जॅक डी, फार क्वचित इतके रटाळ विषय इतक्या छान समजावणारे लोक भेटतात. ही माहिती खरंच उपयुक्त आहे :) २. फणा काढलेला नसेल तर नाग कसा ओळखायचा ? >>> कपिलमुनी, कधी अशी वेळ आलीच तर आधी दोन-चार वेळा जमिनीवर दुरूनच आवाज करा नाग असेल तर फणा काढतोच. मग पळायचं :) नाग (इतर विषारी साप नाही) चावल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी करायचे उपाय (ते बांधून ठेवणे,ब्लेडने कापणे वगैरे) उपयोगी पडतात का >>>> सुधीर, हे फक्त नागाच्याच बाबतीत प्रथमोपचार म्हणून वापरता येतात त्यातही बांधायचे प्रेशरपॉइंट माहित असणं जास्त गरजेचं, ( पण हे केवळ प्रथमोपचार, शक्य तितक्या लवकर दवाखाना गाठणे हे अनिवार्य ) माझ्यामते घोणस फुरसे इत्यादीवर बांधण्याचा उपाय करूच नये.. ( अतिसामान्य सर्पमित्र ) चाफा

सापाचे विष हे तुमच्या मासात सोडले जाते तिथून ते रस वाहिन्या द्वारे(lymphatics) हळूहळू शरीराकडे सरकू लागते. हा शरीराकडे जाणारा प्रवाह अधिक मंद करण्यासाठी त्या जागेच्या एक फुट वर एक आवळ पट्टी बांधावी. लांब कापड ( बायकांची ओढणी सारखे) घेऊन ते इतकेच घट्ट बांधावे कि आपलि करंगळी त्यातून जेमतेम फिरवता यावी. कारण त्या भागाचा रक्त पुरवठा बंद होता कामा नये. (अति घट्ट आवळ पट्टीने फायदा होण्याऐवजी नुकसान होते). ब्लेडने चिरा देऊ नयेत त्याने कोणताही फायदा होत नाही. (उलट घोणस किंवा फुरसे यांच्या दन्शानंतर त्यातून जास्त रक्तस्त्राव होतो). विष तोंडाने शोषून सुद्धा काहीही फायदा होत नाही( सिनेमासाठी ठीक आहे ). दंश झालेला भाग खाली लटकत ठेवावा म्हणजे गुरूत्वाकर्षणाने विषाचा प्रवाह अजून हळू होतो. आणि लवकरात लवकर जवळच्या शासकीय रुग्णालयाकडे धाव घ्यावी. मग तो साप विषारी असो कि बिनविषारी. (विषाची परीक्षा घेऊ नये). फुरसे आणि घोणस यांचे विष हे रक्त वाहिन्या आणि रक्ताचे विघटन करते त्यामुळे रक्त पातळ होऊन रक्ताचे फोड येतात आणि रक्त स्त्राव होतो. अति आणि अंतर्गत (मेंदूत व इतर अवयवात) रक्तस्त्रावाने माणूस दगावतो याला प्रतिविष हाच उपाय आहे आणि ते जितक्या लवकर दिले जाते तितका तुमच्या शरीराचे नुकसान कमी होईल.रुग्ण वाचला तरी अंतर्गत रक्त्स्त्रवचे परिणाम पुढचे काही महिने दिसत राहतात. सहा इंचाचे फुरसे सुद्धा जीवघेणा दंश करू शकते. म्हणूनच म्हणतात साप म्हणू नये धाकला. नाग आणि मण्यार यांचे विष आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम करतात त्यामुळे मेंदूकडून येणारे आणि मेंदूकडे जाणारे संदेशवहन बंद होते त्यामुळे ती भाग बधिर होतो. शेवटी मेंदूकडून श्वसनाच्या स्नायुंना होणारे संदेश वाहन बंद होते आणि माणूस श्वास न घेत आल्याने मृत्यू मुखी पडतो. जर श्वसन थांबले तर रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवून जगवता येते. पण एकदा रुग्ण वाचला तर त्याच्यावर दूरगामी परिणाम होत नाहीत. एक विनंती ट्रेक वर जाणार्यांना साप एकदा चावला तर त्याच्या मागे जाऊ नका तो परत परत चावू शकतो आणि जितक्या वेळा चावेल तितके जास्त विष तुमच्या शरीरात शिरेल . उगाच इगो दुखावल्याने काही करू नये.

मस्त माहिती दिली आहे..या इगोमुळेच आणि पोरीच्या पुढे हिरोगिरी करण्यामुळे किती दिस्कोवरीप्रेरित सर्पमित्रांना साप चावला आहे..

कापणे हा प्रकार खूप खूप वर्षापूर्वी शाळेच्या पुस्तकात वाचला होता. आता नव्याने प्रथोमोपचाराची माहिती मिळते आहे(या आणि ट्रेकिंगच्या धाग्यात). उद्याच्या नागपंचमीच्या मुहुर्तावर पुढील लेखाची वाट बघतो.