भयंकर प्रकार आहे. कोणत्याही प्राण्याचा असा छळ फक्त माणूसच करू शकतो. ही कसली मानवी संस्कृती? असल्या एकापेक्षा एक क्रूर प्रथा राजस्थानात असल्याचं ऐकायला मिळतं याच्यामागे काय मेख आहे? मग ते सती असो, की जोहार असो की स्त्री भ्रूणहत्या असो. माणसावर अत्याचार करणारे प्राण्यांना असे छळतात यात काय नवल!
कोकणातले लोक सापांबरोबर रहायला शिकलेले असतात. बहुतेक लोकांच्या परसात एखादा मोठा नाग वावरत असतो. त्याला ते जागेचा राखणदार मानतात. आधेली तर कुत्र्या मांजरांसारखी जिकडे तिकडे दिसतात. इकडे नागपंचमीला जिवंत नागाची नव्हे तर पाटावर चंदनाचा नाग काढून त्याची पूजा करतात, शेतातले उंदीर खाणारे साप हे माणसाचे खरे मित्र आहेत हे सगळ्यांना समजेल तो सुदिन.
अरे किती हाल त्या बिचार्या नागाचे :(
मला वाटत होतं कि आजकाल हे गारुड्यांचे खेळ बंद झाले असतील...
मागे एकदा थायलंड का कुठल्या देशात अजगराची कातडी सोलतानाचे फोटो बघितले होते... भयानक आहे हे सगळं.
या प्राण्यांच्या पंचम्या कधी सरतील कोण जाणे.
अर्धवटराव
अजगराला खिळ्याने ठोकून भिंतीला ठेवतात आणि पायातला मोजा काढवा तशी त्याची कातडी सोलतात. जर मेलेला अजगर वापरला तर कातडीचा तजेलदारपणा नाहीसा होतो.
याची खूप करोडो $ ची बाजारपेठ आहे.
नागाचे तोंड फाकवून त्यात दूध कोंबणारे लोक बघितलेत . जमेल तेव्हा थांबवलंय पण .
पण . हे . तोंड शिवलेला पहिल्यांदाच पहिला .
ज्याने कुणी हे केलं . त्याचं तोंड शिवलं पाहिजे असं . ओल्या वेताचे फटके भर चौकात द्यायला हवेत . तेही चेहऱ्यावर . . भो साले . .
जेडी, क्या बात!
वेळोवेळी हे तुझ्याकडून (आणि मेधावीकडून) ऐकलं, पण लिखित स्वरूपात, फोटोंसहित - अंगावर आलं. :(
--
अवांतरः
विषयाच्या गांभीर्यामुळे कोपरखळ्या लक्षात येणार नाहीत असं वाटून घेऊ नकोस. विशेषतः सन सिटीची. ;)
अरे सन सिटीच्या जागी खरच २-३ मोठी वारुळे होती, तो रस्ता आमराईतून बायपास ला जायचा, खूप सही जागा होती ती. एक विहीर पण होती, २-३ बाभळीची झाडे आणि -चार दोन वड होते.
@खरच २-३ मोठी वारुळे होती, तो रस्ता आमराईतून बायपास ला जायचा, खूप सही जागा होती ती. एक विहीर पण होती, २-३ बाभळीची झाडे आणि -चार दोन वड होते. >>> येस...येस..येस..! हमन्ये भी १२ साल पहिल्ये वो वारूळ देखा है। तेंव्हा चरवड चौकातून मागे,नदी कडेनी जातांना दिसायची वारुळे..! आंम्ही तिकडे(हाय वे च्या नदीपुलाखाली आणी बाजुला) दर्भ काढायला जायचो! तेंव्हा मला सिनियर असलेले एक आमचे गुरुजी मला सांगायचे,की ऊंच वाढलेल्या दर्भाच्या गंजीत शिरण्यापूर्वी आधी काठीनी लांबून दर्भ हलवावे. दर्भ-मुळं अत्यंत थंड असल्याने सर्प तिथे विसाव्याला येतात...!
@जॅक डनियल्स>>> येक विचारायचं र्हायलं... आमच्या सिंव्हगड कॉलेज रस्त्यावर,महादेव नगर बस स्टॉप जवळचा एक चहा टपरीवाला,(मूळचा गारुडी) आता कात्रज सर्पोद्याना तर्फे सर्पमित्र झालेला आहे. तुंम्ही त्याला ओळखता का हो? :)
त्यानी मला एकदा नागाचं पिल्लू पकडलेलं दाखवलं होतं..छोट्टस्सं...तजेलदार! पण तरीपण मला भ्या वाटलं!
आपली राई गेली कधीच ...साले २००० साली आपल्याकडे क्यामेरे नव्हते, त्यात तरी तिला बंदिस्त करून ठेवली असती. ते जांभळाचे झाड अजून आठवते मला, त्याखाली मला रोझी ची गोष्ट सांगितली होती...;)
सन ऑर्बीट, सन सिटी, सन पॅराडाईज, सन सॅटेलाईट या क्रमाने त्या सनसनाटी भागातून "सरळ" बायपास कडे जाताना आजही एक विहीर दिसते. एक जुनाट पडके दिसावे असे घर आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही म्हणताय तशीच झाडेपण आहेत.
येथे "सरळ" या शब्दाला विशेष महत्त्व आहे.. कारण डांबरी रस्त्याने गेल्यास विहीर व झाडे दिसणार नाहीत.
आम्ही आपला कुंभाराने आणुन दिलेला मातीचा नागच पुजतो. ते जीवंत नागाच फॅड तुमच्या शहरातुन, सुखवस्तु पैशाची चरबी चढलेल्या लोकांच आहे.
काय भयंकर फोटो आहेत! ती दुध ओतणारी बाई तर...शब्द नाहीत माझ्याकडे.
'खरे गारुडी' नागपंचमीच्या अगोदर नागाला बिळातून अलगद बाहेर काढतात त्याला उंदीर खायला घालतात आणि त्यानंतर तो सुस्त झाल्यावर त्याचे पकडीने दात उपटून काढतात आणि तसाच त्याचा खेळ केला जातो. नागपंचमी नंतर ते त्या नागाला आपल्या मूळ बिळात सोडून देतात. एक दोन महिन्यात नागाचे दात परत येतात थंड रक्ताचा प्राणी असल्याने नागाला दोन महिने न खाता राहता येतं. त्यामुळे ते नाग त्यांना पुढच्या वर्षी परत पकडता येतात. एक खरा गारुडी नाग चावल्यामुळे ससून रुग्णालयात भरती झालेला मी पाहिला होता नागाचे दात काढत असताना त्याच्या हातातून नाग सुटला आणि त्याला चावला होता. तशा स्थितीत हि त्याने त्या नागाचे दात काढले. दुर्दैवाने त्याल फार उशीर झाला होता आणि ससून मध्ये उपचार सुरु केल्यावरही तो गारुडी दगावला.
बरोबर आहे तुमचे.
खूप वेळा गारुड्याकडे उपचार नसतो, मग बोटाला खाली साप चावला तर लगेचच जीव वाचवायला बोटच मुळापासून कापून टाकतात. पण काही झाला तरी सापाची-नागाची खूप काळजी घेतात.
खरयं, मुंबई सारख्या शहरात आजकाल हा प्रकार फार कमी झाला आहे. माझ्या लहानपणी नाक्या-नाक्यावर हे प्रकार मी पहायचो. सर्पमित्रांच्या प्रयत्नामुळे लोकांना काही प्रमाणात तरी आता समज आली आहे आणि या प्रकाराला काही प्रमाणात आळा बसला आहे, असे वाटते. पण अजूनही "साप डूख धरतो" असा एक गैरसमज असल्याने या प्राण्याचा बळी जातो. याला कारणीभूत तुम्ही म्हणता तसंच बर्याच कथा, इतकंच काय चित्रपटही (लहानपणी पाहिलेला भुजंग हा मराठी चित्रपट फुसटसा आठवतो) कारणीभूत असावेत, असे वाटते.
भयाण.. दात, विषग्रंथी काढलेलं माहिताय पण जे तोंड शिवलेलं पाहून काटा आला अंगावर..
आमच्याकडे गारूडी नाग घेऊन येऊच शकत नाहीत, गारूडी `आत' आणि नाग `दवाखान्यात' आख्खं मंडळ कार्यरत आहे यासाठी, लोकांचंही प्रचंड सहकार्य मिळतं.
हा ही लेख अवडलाच!
नाग किंवा सरपटणार्या जनावरांची मला भितीच वाटते..! लहानपणी आम्ही नागपंचलीला गारूडी यायला लागले,की त्यांच्या मागे//मागे हिंडायचो. ते नाग पहाण्यासाठीच...त्यात हे शिवलेलं तोंड'ही काही वेळा पाहिलय. पण दात काढून टाकतात,हे माहीत नव्हतं.आणी नंतर नागाचा असा वाइट अंत होतो,हे कळल्यावर तर खुपच वाइट वाटलं...! :(
:( :(
अवघड आहे :(
या निमित्ताने एक विचारायचं होतं, सांगली जिल्ह्यात बत्तीस शिराळा इथे लै प्रस्थ असतं नागपंचमीचं, तिथेही असे प्रकार लै चालत असतील. तूर्त कितपत कमी झालेत? निर्बंध आहेत असे ऐकून आहे पण बाकी माहिती नाही.
तिथे माझ्या माहितीप्रमाणे असे प्रकार जास्त चालत नाहीत. मला कधी तिकडे जायची संधी मिळाली नाही पण जे काय माहित आहे ते सांगतो,
आपल्या कडे जशी गणपती मंडळे असतात तशी तिकडे नाग मंडळे असतात, म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते, त्याचे अध्यक्ष असतात. नागपंचमीच्या ४-५ दिवस आधी ते वारुळातून नाग पकडून आणून माठात ठेवतात, आणि त्याची काळजी घेतात. दात इ. काढत नाही किंवा त्याचे हाल पण करत नाहीत. हे नाग हाताळणारे असतात त्यांना या सगळ्याची माहिती असते, लुंग्या-सुंग्या कोणी ही कामे करत नाही. नाग पंचमीला नागाची गावातून मिरवणूक काढतात, तिकडे सगळ्यात मोठा नाग, जास्त फणा काढणारा नाग यांच्या स्पर्धा भरतात.बायका दुरून पूजा करतात,दुध वैगैरे तोंडात कोंबत नाहीत. शेवटी नागपंचमी संपल्यावर त्यांना जंगलात सोडून देण्यात येते.
ही तुनळी बघा.
नाग मंडळे असतात आणि स्पर्धा भरतात हे माहिती आहे. पेप्रात लै वेळेस त्याबद्दल वाचलेय. काही हौशी मित्रांनी सापांबरोबर फटूपण काढलेले पाहिले आहेत.
पण सापांचे हाल केले जात नाहीत हे खरंच चांगले आहे खूप. धन्यवाद माहितीकरिता. वाचून बरे वाटले.
जेडी ची माहिती बर्यापैकी बरोबर आहे. नागांचे हाल होतच नाहीत यावर शंका आहे.
शिराळ्यात त्यावेळी तुफान गर्दी असते. जत्रेसारखा माहोल असतो. एक तर शिराळा म्हणजे सांगली जिल्ह्यातील कोकणाची सुरूवात + पाऊस त्यामुळे त्या छोट्याश्या गावावर बराच ताण पडतो.
मात्र २००२ ते २००६ च्या दरम्यान काही वर्षे नाग मिरवणूकीचे सोज्वळ स्वरूप नाहीसे होवून बारबाला वगैरे नाचवण्याचे फॅड आले होते - सद्यस्थिती माहिती नाही. एका जिल्हा कलेक्टरांनी फर्मान काढून बैलगाड्या शर्यतींप्रमाणे नागमंडळांवर नागाचे खेळ करण्यास बंदी घातली होती. त्याबद्दल हायकोर्टापर्यंत दंगा झाला होता.
अनेक गारूडी वाड्यांवरती जिवंत नाग घेवून येतात. पूजा, दक्षिणा वगैरे प्रकार होतात.
हवे तितके नाग गळ्यात घालून फोटो काढण्याची सुविधा असते. अत्यंत ओंगळवाणा प्रकार असतो तो.
शिराळ्याला माझ्या मावशीचं सासर. तिकडे नागपंचमीनिमित्त एकदा जायचा योग आला होता. बहुतेक २००२ किंवा २००३ साल असावं. आदल्यादिवशी पोहोचल्याबरोबर मागच्या वाड्यातल्या शर्याशी मैत्री झाली अन त्यांच्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून बोंबलत हिंडलो. साप-नागांचे काय हाल होत असतील वगैरे विचार डोक्यात काही आले नाहीत खरं.
आम्ही गेल्या गेल्या, स्वागतासाठी शर्यानं एक धामण आणली होती. मग ती रितसर गळ्यात घालून फोटोसेशन झालं. त्यात त्या धामणीनं अंमळ विळखा घालण्याचा प्रयत्न केल्यावर संत्यानं, "थांब हिला जरा वरची हवा दावतो" असं म्हणून शेपटाकडं पकडून हवेत गरगरवलं...मग ती धामण निवांत पडली. मणकेच ढिले झाल्यावर आणखी काय होईल?
ह्यांच्या मंडळाची नागिण होती. तिला मडक्यातून घरोघरी पूजेसाठी नेणं चालू होतं. पण पूजा म्हणजे, नागिण उंबर्याशी, अन पूजा करणार्या बायाबापड्या धा फूट आतमध्ये...सगळं लांबूनच. हेऽऽ असा फणा काढून फुत्कारत होती नागिण!
एका घरात पूजेसाठी मडक्यातून तिला बाहेर काढलं अन हाताळणार्या पोराच्या हातून तिचं शेपूट सुटलं....सळसळत गेली ती खोलीतल्या अडगळीत! सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. तेव्हा मला कळालं की हे नाग-नागिण वारुळातून शोधून काढून डायरेक्ट पूजेसाठी आणले जातात. दात वगैरे न काढता. पुढे बर्याच प्रयत्नांनी त्या नागिणीला परत पकडलं खरं, पण सापडली नसती तर काय लफडं झालं असतं ह्याचा विचार करुनच माझी टरकली.
नंतर, जत्रेत हिंडताना जागोजागी फोटोचे स्टॉल्स, अन तिथं गळ्यात साप घालून फोटो काढून घेण्याची झुंबड. संध्याकाळच्या सुमाराला त्या फोटोस्टॉलच्या आसपास कैक धामणी पडल्या होत्या...सायकल रिपेअरवाल्याच्या दुकानासमोर फाटक्या ट्युबा पडलेल्या असतात तशा.
त्यावर्षी डिस्कव्हरीवाले आले होते शिराळ्याची स्टोरी कव्हर करायला. आणि ते वर्ष म्हणे जिवंत नाग वापरण्याचं शेवटचं वर्ष होतं, त्यानंतर बंदी येणार होती. पुढचं खरंखोटं ठाऊक नाही खरं.
हवे तितके नाग गळ्यात घालून फोटो काढण्याची सुविधा असते. अत्यंत ओंगळवाणा प्रकार असतो तो.
साप जातात जिवानिशी हे खरं आहे. पण त्यात नक्की ओंगळवाणं काय आहे ते नाय कळ्ळं. तसं असतं तर इतके लोक कसेकाय गेले असते फोटो काढून घ्यायला? (मुद्दा साप्/नाग गळ्यात घालून फोटो काढावे की नाही, त्याने त्या प्राण्यांना काय अपाय होतो हा नसून ओंगळवाणेपण काय असावे हा आहे.)
मी पाहिलेला प्रकार असा होता..
फोटोग्राफर एका पोत्यातून छोट्या छोट्या प्लॅस्टीक पिशव्यांची पुडकी काढत होता. (मटणाला वापरतात तशा काळ्या कॅरीबॅग) त्या पोत्यात अशा कित्येक कॅरीबॅग खच्चून भरलेल्या. धामण, मण्यार, नाग वगैरे प्राणी हवे तितके. नागाला फणा काढतो म्हणून आणि मण्यारीला पट्टे पट्टे असल्याने विशेष भाव. लग्नात हार घातल्याच्या थाटात फोटोग्राफर एकेका गळ्यात चार पाच वेटोळी अडकवायचा. भेदरलेले पब्लीक आणखी भेदरायचे. "हां ऽ ऽ हालू नका, डोळे झाकलेत, हसा वो जरा" अशी सूचनांची सरबत्ती करून एकदाचा फोटो निघायचा. रोल वाला फोटो.
नंतर त्याच लहान कॅरीबॅगमध्ये सापांची वेटोळी करून घट्ट गाठ मारायची आणि त्या पुडक्याला पोत्यात "फेकायचे". पुढचे गिर्हाईक आले की पुन्हा त्या सापांचे हाल सुरू..
एखादा साप गळ्यात घालून काढलेला फोटो वेगळा आणि हे असले प्रकार वेगळे - म्हणून तो प्रकार मला ओंगळवाणा वाटला.
(गळ्यात एखादी सोन्याची चेन घालणे आणि गळ्यात सोन्याचे साखळदंड घालणे यातला फरक - तोच!) ;-)
माझ्या माहिती प्रमाणे मण्यार असणे शक्य नाही. धामण असायची जास्त शक्यता आहे. लोकांना साप ओळखता येत नाही त्यामुळे ही लोक खूप गैरफायदा घेतात. मण्यार ला सर्प मित्र पण खूप घाबरून असतात आणि त्याच्याशी खेळ करायला जास्त करून जात नाहीत. तिचा काहीच अंदाज देता नाही आणि विष नागापेक्षा जास्त जहाल असते. जे काही सर्प मित्रांचे मृत्यू होतात ते जास्त करून मण्यार चावल्यानंतर होतात.
ह्योच का मण्यार..?
कॉमन क्रेट..?
आम्हाला कात्रज ते सिंहगड च्या ट्रेक दरम्यान कात्रज बोगद्यावरच आरामात पहुडलेला दिसला होता, तो हाच फटू..
एकदा बालगंधर्वला आपला सूड मण्यारीचे पिल्लू तुडवत होता. सोबत बुवा पण होते!
मला शिराळ्याला मण्यार पाहिल्याचे नक्की आठवत आहे - नागासारखेच हाल करत असावेत :-(
मण्यारीचे विष नागापेक्षा जास्त प्रभावी असल्यामुळे थोड्याशाच विषाने मृत्यू येऊ शकतो. त्यातून माण्यारीचे विष हे मुख्यत मज्जासंस्थेवर परिणाम करते त्यामुळे माणसाला चावल्यावर फारशा वेदना होत नाहीत उलट तो भाग बधिर होतो त्यामुळे कित्येकदा मण्यार चावली आहे हे त्या माणसाला कळत नाही( काहीतरी किडा चावला आहे असे वाटून त्याकडे दुर्लक्ष होते) आणि थोड्या वेळाने माणूस बेशुद्ध होतो त्यानंतरहि नक्की कारण न कळल्याने उपचारास उशीर होऊन माणूस दगावतो. त्यामुळेच भारतात मण्यार आणि घोणस यांच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यू नागाच्या विषबाधे मुळे होणार्या मृत्युच्या कितीतरी पट जास्त आहेत. खरं तर नाग बर्याच वेळेस सावधानतेचा इशारा देण्यासाठी चावतो त्यामुळे नागाच्या दंश नंतर मृत्यूचे प्रमाण ६ टक्के ते २ टक्के ( वेगवेगळ्या अभ्यासकांची सांख्यिकी) इतकेच असते
प्रसिद्ध सर्पतज्ञ रोम्युलस व्हाइटेकर यांच्या अभ्यासाप्रमाणे नाग दंशानंतर उपचार मिळून माणूस वाचण्याची शक्यता ९५ टक्के इतकी असते तर मण्यारीच्या बाबतीत ती केवळ २० ते ३० टक्के असते.
मण्यारीला कोकणात कांडार/ कान्डोर म्हणतात. लहानपणी आजोळी ( नागाव-अलिबाग येथे ) ऐकलेल्या अनेक (भीतीदायक) अख्यायिका मध्ये सूर्य कांडार (यात दुसर्या दिवशीचा सूर्य उगवायच्या आत माणूस मरतो) आणि चंद्र कांडार (यात चंद्र उगवेपर्यंत माणूस मरतो) असे ऐकले होते.
(कांडार म्हणजे मण्यार हे मला डॉक्टर हिम्मत राव बावस्कर यांच्या कडून कळले.)
प्रतिक्रिया
पाहवत नाहीये या फोटोजकडे.
तोच उद्देश होता माझा !
:(
अतिशय क्रूरपणा आहे!
अरेरे :(
अजगराला खिळ्याने ठोकून
!!
भीषण आहे.
भयानक आहे हि सगळी माहिती.
इतरवेळी दगडात देव शोधणारे
+१
खर्या तळमळीने लिहीलेला सुंदर
मी असेच आवाहन ऐकुन
नागाचे तोंड फाकवून त्यात दूध
जेडी, क्या बात!
अरे सन सिटीच्या जागी खरच २-३
@खरच २-३ मोठी वारुळे होती, तो
@जॅक डनियल्स>>> येक विचारायचं
सर्पमित्र चहावाला !
जेड्स, आपल्या (!) आमराईला
आपली राई गेली कधीच ...साले
रोझीची गोष्ट
सन ऑर्बीट, सन सिटी, सन
RIP!
*****
(No subject)
क्रूरपणा.
आम्ही आपला कुंभाराने आणुन
( 'खरे गारुडी' - आपल्या नागला पोटच्या पोराप्रमाणे जपतो,
बरोबर आहे तुमचे.
इतरवेळी दगडात देव शोधणारे आम्ही या नागाच्या वेळी फक्त माती खातो.
या वरती पुढच्या लेखात लिहिणार
निर्दयीपणाचा कळस!!!
रडूच आलं
ड्यांजर
हा ही लेख अवडलाच!
अवघड आहे
तिथे माझ्या माहितीप्रमाणे असे
नाग मंडळे असतात आणि स्पर्धा
जेडी ची माहिती बर्यापैकी
+१
मी पाहिलेला प्रकार असा होता..
ओह..
माझ्या माहिती प्रमाणे मण्यार
ह्योच का मण्यार..?
हाच तो मण्यार ! मग असेल खरच
फोटो लैच भारी आहे! च्यायला
तुडवत होता?
पायाची आणि पिल्लाची थोडक्यात
मण्यारीचे विष नागापेक्षा
Pagination