Welcome to misalpav.com
लेखक: देवांग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

१९८५-८६ च्या सुमारास एअर होस्टेस नावाची एक सिरियल असायची त्यात किटू गिडवानी नावाची एक सुंदर अभिनेत्री होती. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीच.

शेकडो वाहिन्यांच्या जंजाळात सुद्धा आजही दूरदर्शन चे ते दिवस तसेच मनात कोरले गेले आहेत. (तो दूरदर्शन चा लोगो … पंडित भिमसेन जोशी आणि इतरांच्या च्या आवाजातले "मिले सूर मेरा तुम्हारा" हे गीत… रामायण ची "मै समय हु" म्हणून होणारी सुरवात…देख भाई देख, अलिफ लैला यासारख्या मालिका …. तहकिकात आणि व्योमकेश बक्षी या सारख्या रहस्य कथा… किंवा "विको टरमरिक नही कॉस्मेटीक …." ही विकोची किंवा "ट्वाई…. इंग…" म्हणत सुरु झालेली निरमा ची जाहिरात…. किती आठवणी सांगाव्यात त्या काळच्या … हं… ! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ! जेष्ठ कवी प्रा. अरुण म्हात्रे यांच्या शब्दात सांगायचे तर … "ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी तिची सावली भेटायची ! फाटके होते खिसे अन नोट ही न्हवती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची ! ते दिवस आता कुठे ?… देवांग जी…तुम्ही माझ्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल तुमचे आभार !

धाग्याचा मूळ मजकूर हा ढकलपत्राप्रमाणे वाटला - फेसबुकावर याच नावाचे पान देखील आहे हा योगायोग आहे का ते माहीत नाही... रामायण ची "मै समय हु" म्हणून होणारी सुरवात अहो ते महाभारत हो! ९५ भाग बघितल्यावर महाभारताचे रामायण केलेत का काय? ;) रामायणातील रविन्द्र जैनच्या तारसप्तकातील ताना आणि तेच तेच बाण बघून मात्र केवळ त्या संदर्भात, गेले एकदाचे ते दिवस असे म्हणावेसे वाटले.... असो.