ही मोदींची अजून एक अभिनव, उपयुक्त व महत्वाकांक्षी योजना. या योजनेचे नांव "कल्पसार".
http://www.kalpasar.gujarat.gov.in/mainpage.htm येथे विस्त्रुत माहीती मिळेल.
गुजरातमधल्या ५ मोठ्या नद्या अरबी समुद्राला मिळण्याआधी सुमारे १०-१२ किमी अंतरावर अडवून व तिथे नद्यांवर बांध घालून मोठ्या प्रमाणात गोडे पाणी अडवायचे ही योजना आहे. समुद्राला मिळण्याआधी नदीमुख खूपच विस्तारते व समुद्राला मिळण्याआधीच बांध घालून पाणी अडविल्यावामुळे पाणी समुद्रात जाऊन वाया जाणार नाही व अडविलेले पाणी शेती, उद्योगधंदे इ. साठी वापरता येईल. ही योजना प्रत्यक्षात आली तर भारतातील अशा प्रकारचा तो पहिला प्रकल्प ठरेल.
यापूर्वी २ वर्षांपूर्वी मोदींनी गुजरातमध्ये नर्मदा धरणाच्या कालव्यांवर आवरण घालून त्यावर सौरपॅनेल्स बसवून रोज ९०,००० किलोवॅट (चूभूदेघे)इतकी वीजनिर्मिती करून दाखविली होती.
अशा अभिनव योजना प्रत्यक्षात आणणारे ते देशातील कदाचित पहिले नेते असतील. दुर्दैवाने माध्यमांनी अशा योजनांना पुरेशी प्रसिद्धी दिलेली नाही.
कदाचीत मुळ विषयास अवांतर ठरेल पण नद्या जोडणे अथवा तत्सम प्रकल्प करत असताना त्याचे दिर्घकालीन परीणाम पण लक्षात घेणे महत्वाचे असते. मोदींचा म्हणून गुजरात मधील प्रकल्प म्हणूनच हे लिहीत नसून ते एक निमित्त आहे.
एकंदरीतच अथवा कुठल्याही मोठ्या प्रकल्पाच्या संदर्भात, "कधीकधी" पर्यावरणवाद्यांच्या अतिरेकी आग्रहामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते अथवा कमी लेखले जाते, तर "कधीकधी" त्यात व्यापारी संबंध गुंतलेले असल्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते अथवा वाढवून चढवून सांगितले जाते. पण तसे होऊ नये इतके नक्की वाटते... संतुलीत अभ्यास करणे हे कदाचीत तात्काळ वर्तमानाची गरज कदाचीत नसेलही पण भविष्यात त्यामुळे होणारे परीणाम, विशेष करून भारतासारख्या लोकसंख्येत अधिकच होऊ शकतात असे वाटते. त्यातून अधिक योग्य इंजिनिअरींगचे उत्तर मिळू शकेल असे वाटते.
हे आत्ता एकदम वाटायचे कारण म्हणजे सकाळीसकाळीच मिसिसिपी नदी बद्दल ऐकत होतो. लुइजिआना आणि एकूणच दक्षिणेकडील प्रांतात तीचे पात्र शेतीची जागा वाढवण्यासाठी कधीकाळी बदलले गेले आणि त्याचे परीणाम नंतरच्या काळात झाले. हरीकेन कट्रीनाच्या वेळेस ते अधिकच झाले. आता पर्यावरण बदलामुळे समुद्रपातळी वाढत असून लुइजिआना प्रांताची किनारपट्टी ही समुद्रपातळीच्या खाली जात असल्याने त्याला जेथे मिसिसिपी नदी मिळते तेथे (त्रिभूज प्रदेशात) त्याचे अधिकच परीणाम दिसू लागले आहेत.
१. खेलोत्सव ... म्हणे प्रत्येक सरकारी नोकराने एक तास कोणता तरी खेळ खेळलाच पाहिजे.... सर्कारी दवाखान्यात बाई डिलिवरीला गेली तर डॉक्टर सांगणार ... थांब, एक तास खेळून येतो.
२. वाचनोत्सव.... फतवा >> प्रत्येक सर्कारी नोकराने एक तास जवळच्या वाचनालयात जाऊन एक तास काहीतरी वाचावे,
या योजना सध्या सुरु आहेत का?
आचार्य अत्र्यांचे साष्टांग नमस्कार नाटक आठवले.
आण्णा, धरण बांधायचे असेल तर नदी साधारणपणे उगमानंतर काही काळ डोंगराळ भागात असते, तिथे बांधायचे असते.. तिथे डोंगर तीन बाजुला असतात. एका बाजूला भिंत बांधायची असते.
नदी समुद्राला मिळायच्या वेळेला सपाट पठारी भाग असतो... सगळ्या बाजूने सपाट मैदानच असेल, तर मोदी नेमका कसा काय बांध घालणार आहे बुवा? का त्या कुठल्या धौम्य का कोणत्या ऋशीपुत्रासारखा स्वतः आडवे पडणार आहेत नदीसमोर?
सपाट भागात वाहणार्या नदीवर बंधारे बांधतात. प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे सिंधू नदीवरील सक्कर बराज आणि गंगा नदीवरील फरक्का बराज.
कल्पसर योजनेमध्ये मध्ये असा बंधारा ख्म्बात च्या आखातात बांधण्याचे प्रयोजन आहे.त्या मुळे बंधार्याच्या मागे नर्मदा व इतर नद्यांचे गोडे पाणी आधीच्या खार्या पाण्याच्या ऐवजी साठवले जाइल आणि गोड्या पाण्याचे मोठे सर( सरोवर) निर्माण होईल. बंधार्यावरून वाहने जाऊ येऊ शकतील आणि सौराष्ट्राच्या किनार्यावरून दक्षिण गुजरात मध्ये पोचण्यासाठी सद्ध्या जो द्राविडी प्राणायाम करावा लागतो तो टळेल .इंधन व वेळ यांची बचत होईल. शिवाय सौर उर्जा,पवन उर्जा आणि tidal उर्जा निर्माण करता येतील .अशा बहुउद्देशीय योजना Netherland व दक्षिण कोरिया या देशात सध्या राबवल्या जात आहेत.
यापूर्वी २ वर्षांपूर्वी मोदींनी गुजरातमध्ये नर्मदा धरणाच्या कालव्यांवर आवरण घालून त्यावर सौरपॅनेल्स बसवून रोज ९०,००० किलोवॅट (चूभूदेघे)इतकी वीजनिर्मिती करून दाखविली होती.
आता काय अवस्था आहे या प्रोजेक्टची समजू शकेल का?
गुजरात मध्ये या अधिकृत अहवालाप्रमाणे ८७२ मेगॅवॅट (८७२००० किलोवॅट) इतक्या क्षमतेची सौरउर्जा करण्याचे प्रकल्प आहेत. त्यातील अस्तित्वात आलेले प्रकल्प हे ८५२.३१ मेगॅवॅट इतके आहेत.
https://www.facebook.com/photo.php?fbid=351543128259373&set=a.186519208095100.48722.185547141525640&type=1&ref=nf
गुजरात मध्ये आपण लिहिले आहे ते काम प्रयोगात्मक स्तरावर करण्यात आले होते . त्याचा फोटो वरील दुव्यात पहाता येईल. या पद्धतीने वीज निर्मितीसाठी कालवे झाकण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे कालव्यातील पाण्याचे बाष्पिभवन कमी होते. गुजरातच्या काही भागात तलावात किंवा इतर ठिकाणी उघड्यावर साठवलेल्या पाण्यातून वर्षाला साडेतीन मीटर्स पर्यंत बाष्पिभवन होऊ शकते असे हवामान खात्याच्या मोजणीत मिळालेल्या आकड्यांवरून सांगता येईल . पाण्यावर कवर असल्यास हे प्रमाण खूप कमी होते
मोदी फॅक्टर भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे ते खालील संकेतस्थळावर वाचा. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदाता सर्वेक्षणाचे हे निकाल आहेत.
http://www.ibtl.in/blog/2119/a-storm-narendra-modi-is-coming-%E2%80%93-ibtl-opinion-poll-2013
मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणले तर भाजपला तब्बल ४४ जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. मोदी भाजपला १८४ जागांपर्यंत नेऊ शकतात. अर्थात मोदींचा चेहरा पुढे आला तर काँग्रेस मुस्लिमांच्या मनात मोदींविषयी भीति निर्माण करून स्वतःला ८ जागांचा फायदा मिळवू शकते.
काल एक विरोधाभास लक्षात आला. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर निखिल वागळे प्रतिक्रिया देताना सांगत होते की, "जादूटोणा विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून विधिमंडळात प्रलंबित आहे. या विधेयकाबाबतीत सर्व राजकीय पक्षांनी बुरखे पांघरले होते."
काही आठवड्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या भाषणात "काँग्रेसने सेक्युलॅरिझमचा बुरखा पांघरला आहे" असे म्हटले होते. त्यावेळी संध्याकाळी झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदी कसे जातीयवादी आहेत, त्यांनी मुस्लिमांशी संबंधित बुरखा हाच शब्द का वापरला, चेहर्यावर चादर पांघरली आहे किंवा घुंघट घेतला आहे किंवा आवरणाखाली चेहरा झाकला आहे असे का म्हणाले नाहीत, मुस्लिमांशी संबंधित असलेला "बुरखा" हा शब्द मुद्दाम वापरून त्यांनी आपला मुस्लिमविरोध प्रकट केला आहे इ. बेछूट आरोप करून मोदींना झोडपण्यात मग्न होते.
आणि त्याच वागळ्यांनी काल "बुरखा" हाच शब्द वापरला!
प्रतिक्रिया
खॅ खॅ खॅ!!!
धडधडीत अपमान..
अमर्त्य सेन यांच्या विधानावर
धन्यवाद
ही मोदींची अजून एक अभिनव,
अवांतर
मोदी नवनव्या योजनाच राबवत असतात.
आण्णा, धरण बांधायचे असेल तर
बंधारा अथवा बराज
बंधारे म्हणजे सी एम ची खुर्ची
सवय
यापूर्वी २ वर्षांपूर्वी
उत्तर
सौर उर्जा
मोदी फॅक्टर भाजपसाठी किती
मोदींवर पत्रकार तवलीन सिंग
.
(No subject)
माणुस आहे
काल एक विरोधाभास लक्षात आला.
त्या
Pagination