त्याला इलाज नाही. कारण गाळीव लेखन करणे हा माझा हेतू नाही. त्या वेळी मनात आलेले विचार मांडले आहेत. भेटलेल्या काही तबलजींबद्दल माझा वैयक्तिक अनुभव अक्षरशः तसाच आहे. योगायोग म्हणा की दुर्दैव, ते मला देवल क्लबात भेटले होते. देवल क्लब ह्या संस्थेबद्दल, तिच्या कार्याबद्दल आदर आहेच. पण मला ती चाकोरी जमली नाही इतकेच. एकुणच, हिन्दुस्थानी संगीत हा विषय अतिसुलभीकरणाचा नाही. गांधर्व महाविद्यालयातील अभ्यासक्रम, परीक्षापद्धती आणि विशारद पदवीचे झालेले अवमुल्यन मला पटत नाही.
अपना अपना नजरिया..
मस्तच! लेख आवडला.
परीक्षांसाठी म्हणून लष्करी शिस्तीत चालणारं गाणं कुणाला आवडेल? समुद्रात मोकळ्या भटकणार्या तराफ्याला अचानक बेट दिसावं तद्वत एक एक राग, एक एक कलाकार भेटला तर मज्जा. "सहेला रे" च्या भेटीचा क्षण माझ्याही नीटच ध्यानात आहे. जौनपुरीही असाच आवडता.
मिठाचा खडा पडावा अशी मतंही आहेत, पण इतक्या छान लेखाखाली नको.
पुलेशु!
शा.संगीताची आवड ही एक अती उत्कट अशी व्याधी आहे. ही बाधा तुम्हाला कशी झाली त्याचा उलगडा चांगला केला आहेत.भिन्न षड्ज ही बायोग्राफी केवळ अप्रतिम आहेच आणि त्याचा छान वेध घेतला आहे.
एकुणात अप्रतिम लेख वजा आस्वाद !
ह्या ग्रुप वर यावे ही विनन्ती !
https://www.facebook.com/#!/groups/207685002639712/
मिपा वर नियमित लिहित राहाल ही अपेक्षा !
फार दर्जेदार लेख. शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड बर्याच लोकांना असते -मी ही त्यातलाच एक. पण त्याविषयी इतके भावपूर्ण लेखन करणे फार थोड्या रसिकांना जमते.
अभिनंदन !!!
फार सुंदर गाणे. तो सगळा अल्बमच फार सुंदर आहे. 'मी माझे मोहित, राहीले निवांत, एकरूप तत्त्व देखिले गे माये' जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा अगदी शांत, आश्वस्त वाटते.
अति-अवांतरः कोल्हापुरात आमच्या भागात पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि टँकर बोलावला की त्यातुन पाणी पाईपने घागरी-घागरी भरून आम्ही नेत असू. तेव्हा गंमती-गंमतीत 'पाणी रांजणात भरी.. सडा सारवण करी, जनी जाय पाणीयासी..' असे म्हणत असू.
अ प्र ति म!!
फार म्हणजे फारच सुंदर लिहलंय. वर रमेश आठवले म्हणतात त्याप्रमाणे शास्त्रिय संगीताची आवड प्रत्येकाला असते पण असं सुंदर लेखन तुमच्यासारख्या एखाद्याच जातीच्या रसिकाला जमू शकते.
हॅट्स ऑफ टू यू!
किशोरी ताई...एक गोष्ट तुम्ही सारेचजण विसरताय की माझ्यासारखीच तुम्हालाही अजुन ठाउक नाही आहे?
गीत गाया पत्थरोंने मध्ये किशोरीताईंच्या आवाजाच्या हलक्या उडत्या (अगदी शब्द अपूरे पडतात त्या तानांचे वर्णन करायला)अश्या पक्ष्याने माराव्यात अश्या स्वर्गीय सुंदर ताना ऐका राव. मी वेडी झाले त्यांवर. चित्रपट संगितात जर धुर्त राजकारणी माणस, फक्त माझाच आवाज ऐकला पाहिजे असा हट्ट धरुन बसली नसती तर असे अनेक सुरेख आवाज ऐकायला मिळाले असते.
ऐका कान देवुन...
काय ताना आहेत! अश्या वरच्यावर तोललेल्या पाखरान उडता उडता मारलेल्या लकेरीच जणु.
माझ्या आठवणी मध्ये सुद्धा हे गीत किशोरीताई यांनी गायलेले आहे असे होते. तसे मी प्रतिसादात लिहिले पण होते. पण प्रकाशित करण्या पूर्वी एकदा पडताळून पावावे म्हणून मी तू नळीवर शोध घेतला असता हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे एवढेच दिसले म्हणून मग प्रतिसादातील हा भाग वगळला. किशोरीताई यांचे गाणे हे दोन्ही मध्ये अधिक कसदार आहे असे सर्वानांच वाटेल . तसेच हे गाणे दुर्गा रागावर आधारित आहे ही गोष्ट त्यांच्या मांडणी वरून पटकन समजते.
https://www.youtube.com/watch?v=phprEOVP5tc
आपला टोला योग्य आहे पण या ठिकाणी नाही. मी ऐकले आहे त्या प्रमाणे किशोरीताईंनी सिने संगीत गायले म्हटल्यावर माईंनी त्यांना सांगितले की तुला काय गायचे ते तू ठरव पण मग या तंबोर्याला हात लावावयाचा नाही. एव्हढे पुरेसे झाले.
शरद
शरदराव म्हणतात ते खरे आहे. माईंनी ताकीद दिली की हे गाणार असशील तर मग तंबोरा खाली ठेव. पण किशोरीताईंची सुगम संगितातली बोटावर मोजण्याइतकी गाणी म्हणजे रत्ने आहेत रत्ने.
(तुम्हाला शरदराव म्हटलेले आवडेल का? सध्या टॅक्सीवाल्यांच्या अरेरावीने त्रस्त मुंबईकरांना आवडणार नाही :). आणि उर्वरित महाराष्ट्रात तर एकच शरदराव)
किशोरीताईंविषयी काही लिहिले आहे का मिपा वर असं बघायला गेले तर हा लेख सापडला.. आज सगळ्यांनाच ताईंची आठवण येत असेल म्हणून हा लेख वर काढावा म्हणून ही प्रतिक्रिया..
फारच छान लिहिलंय. गाणं ऐकणं, समजत जाणं या सार्याचा प्रवास छान मांडलाय.
(गांधर्व महाविद्यालयातल्या विशारद परीक्षा आणि तिथून झालेले विशारद हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे! :)
हा लेख एकदम सुरेख .
विशारद, डोक्टरेट वगरे वर एक किस्सा. चिंचवडचे पंडित पदमाकार कुलकर्णी ना कुणीतरी विचारले तुम्ही डोक्टरेट का नाही केली. ते त्यावर म्हणाले "मी सप्तसुरानी घायाळ झालेला एक पेशंट आहे मी कसा डोक्टर होणार ! " तात्पर्य संगीताचे शास्त्र शिकायला विशारद वगैरे ठीक . पण त्यातील कला साध्य करण्यासाठी प्रचंड श्रवण भक्ती आवश्यक. विशारदच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इतरांचे गाणे किती ऐकत असतील याची शंकाच आहे मला !
अमीर खाँसाहेब, भीमसेन जोशीबुवा आणि किशोरी आमोणकर ही त्रयी माझी अतिशय लाडकी, सोबत वसंतराव आणि कुमार ह्यांच्यासकट मल्लिकार्जुन मन्सूरण्णा ह्यांची नावेही घ्यायला हवीत. अमोल पालेकरांनी ही एक उत्तम डॉक्युमेंटरी बनवली हे तर खरेच. त्यातील ताईंची मते, विचार ऐकताना वाटते किती चिंतन, अभ्यास आणि साधना इथवर येण्याआधी केली असेल ह्यांनी.
धन्यवाद ह्या लेखाबद्दल.
प्रतिक्रिया
लेख छान.
त्याला इलाज नाही. कारण गाळीव
सुंदर !
+१
मस्तच! लेख आवडला.
अप्रतिम !
अप्रतिम लिहीलात
भिन्न षड्ज इथे पहा
सुंदर लेख.
लेख आवडला...
कानसेनाचे संगीत प्रवास वर्णन
जबरी हो दादासाहेब...
सुंदर लिहिलय. मनाला भिडलं...
मी पहिल्यांदा किशोरी
फार सुंदर गाणे. तो सगळा
अ प्र ति म!!
किशोरी ताई...एक गोष्ट तुम्ही
धन्यवाद aparna akshay
परी तू जागा चुकलिसी
शरदराव म्हणतात ते खरे आहे.
सुरेख लेख. धन्यवाद!
किशोरीताईंविषयी काही लिहिले
वा सुरेख!
गांधर्व महाविद्यालयातल्या
उद्या मी गेले की एक नक्की
लेख ... संगीत विशारद ई..
खुप सुंदर लेख. किशोरीताईंवर
अमीर खाँसाहेब, भीमसेन