Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हं... मोहन जोशी विरुद्ध शिरोळे असा थेट सामना, आणि फोडणीला डी एस कुलकर्णी (बसपा किंवा मनसेकडून) असा माझा कयास आहे. सुरेसभाई आपली "पुणे विकास आघाडी"ची खेळी परत खेळतील असंही वाटतं. शरदराव पुण्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता शून्य आहे. माढा / बारामतीसारखे सेफ मतदारसंघ असताना "जिथून कारकीर्दीची सुरुवात केली तिथून शेवट करावा" असा भावनिक वेडपटपणा पवारांच्या स्वभावात नाही.

मोहन जोशी विरुद्ध शिरोळे असा थेट सामना
शिरोळे यंदा बाजी मारतील असा अंदाज

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पुढील निवडणूकीतील शक्यंतांवर भाष्य करणारा एक उत्तम धागा. माजी खासदार प्रदीप रावत (कार्यकाळ १९९९ - २००४) यांना उमेदवारी मिळण्याबाबत काही शक्यता?

दीपक मानकर - अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी नेता. पुण्यामधला कलमाडींखालोखालचा बलदंड नेता. कित्येक वर्षे नगरसेवक. पण एवढा प्रदीर्घ अनुभव असताना पक्षाने नगरसेवकपदापलिकडे संधी दिलेली नाही. सध्या उपमहापौर आहेत. पुण्यामधे कार्यकर्त्यांचे उत्तम नेटवर्क. बिल्डर व व्यावसायिकांशी उत्तम संबंध. कलमाडींचे स्थान पक्षातच अस्थिर झाल्यानंतर मानकरांच्या महत्त्वाकांक्षेला पंख फुटले. कलमाडींची जागा घेण्यास उत्सुक लोक तर यांच्या बद्दल काहिही लिहितात

मनसेचा एकहि उमेदवाराची चर्चा नाहिये ? अपक्ष , बंडखोर ..आणि पुरेसा विदा नाहिये .. क्लिंटन कॉलींग :)

दोन पक्ष एकमेकांशी लढण्याऐवजी एकाच पक्षातील दोन गट परस्परांशी तुंबळ लढतील असा अंदाज आहे. त्यामुळे पक्षातल्याच विरोधकाशी लढण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. कदमांना विचारा याबद्दल !

आणखी एक गैर समज अभय भागचंद छाजेड(स्वारगेट, आदिनाथनगर) आणि चंद्रकांत छाजेड(दापोडी, बोपोडी)

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5357302421195375424&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140206&Provider=-&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F%2C+%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87+%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%95

तिकडचा प्रतिसाद हिकडे आला असो पुन्हा निवडणूक आली आणि मागील निवडणूकीपूर्वी ८ महीने लिहीलेला लेख बराचसा खरा उतरलाय !