Welcome to misalpav.com
लेखक: नरेंद्र गोळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हो! मलाही असच वाटतय. प्रतिक्रिया देण्याची माझी योग्यता नाही. मात्र तुमच भाषा प्रभुत्व मानण्याजोगं. मी आजपर्यंत "सर्वेऽपी सुखीना सन्तु:।" अस म्हणत होते, तुम्ही "सर्वे "म्हंटलय म्हणुन विचारते आहे, तुमच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही.

आपण बहुसंख्य भारतीय आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून असतो. भारतीत्वाच्या कोणत्या व्यवच्छेदक लक्षणांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भाव आहे? हे कदाचित आपल्यालाच नीटसे माहीत नसते. हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीविकासात “जगात वागावे कसे?” ह्या प्रश्नाचे सर्वात समर्पक उत्तर शोधण्याचे प्रयास निरंतर चालूच राहिले. त्यांदरम्यान मिळालेल्या उत्तरांचे सार आपल्या संस्कृत ग्रंथांत सूत्रबद्ध करून ठेवलेले आढळून येते, जे मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचले आहे. आज मात्र ज्ञानाची ही मौखिक परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते. ही परंपरा नेमकी काय आहे, ही सूत्रे काय आहेत, ह्यांच्या अवलंबाने सर्वप्राण्यांचे निरंतर हित कसे साधले जाऊ शकेल, ह्या प्रश्नांची मला आढळून आलेली उत्तरे संगतवार लिहून काढण्याचा हा प्रयास आहे. हे सर्व वाचून त्यावर अभिप्राय नोंदवणार्‍या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद! पैसाताई, ही जीवनपद्धती पुरातन नाही. आपली आजचीच जीवनपद्धती कशी विकसित झाली ह्याचा हा पुरातन इतिहास आहे, असे म्हणता येईल हवे तर. पेठकर साहेब, एवढा का हो अनाकलनीय आहे हा लेख? माझ्यासारख्या सामान्याने, सामान्यांकरता, मिसळपावाच्या चव्हाट्यावर लिहिलेला आपल्या आकलनाचा हा लेखाजोखा आहे. इथले सर्वच उपस्थित ह्यावर प्रतिक्रिया देण्यास, भाष्य करण्यास समर्थ आहेत. तुम्ही तर नक्कीच आहात. तेव्हा मनात येईल ते अवश्य बोला. अपर्णा-अक्षय, स्वनिंदेने अभिव्यक्त होणे योग्य नाही. तसेच तपशीलाच्या उपहासाने, लेखनविषयावर भाष्य करणेही योग्य नाही. मी आजपर्यंत "सर्वेऽपी सुखीना सन्तु:।" अस म्हणत होते, तुम्ही "सर्वे "म्हंटलय म्हणुन विचारते आहे, तुमच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही.>>>> कुणाच्याही ज्ञानाबद्दल शंका आल्यास अजिबात लपवू नये. त्यात काहीही वावगे नाही. “संन्तु” च्या ऐवजी “सन्तु” असायला हवे ही शुद्धलेखनातील चूक दुरूस्त करायलाच हवी. सर्वेऽपि = सर्वच सन्तु = राहावेत भवन्तु = व्हावेत इत्यादी अनेक पाठभेद (पठणातील) मीही ऐकलेले आहेत. तरीही मला हे कबूल करायलाच हवे की संस्कृत ही माझी मातृभाषा नाही. संस्कृत भाषेचे औपचारिक शिक्षणही माझे फारसे झालेले नाही. मात्र, आपल्या संस्कृतीतील विकासाचे सार संस्कृतातच मौखिक परंपरेने साठवले असल्याने, ते जाणून घेण्याच्या उद्देशाने संस्कृत शिकण्याचा प्रयत्न मी करत राहिलेलो आहे. त्यातून, मला माहीत नसलेले जर तुम्हाला नक्की माहीत असेल तर, त्याचे आधारेही आपली धारणा सुधारण्यास माझी ना नाही.

नीट कळण्यासाठी अजून एकदा वाचावा लागेल.
माझ्या ह्या वाक्याचा अर्थ तुमचे लेखन अनाकलनिय आहे असा अजिबात नाही. जेंव्हा आपण एखादे महत्त्वाचे लेखन वाचत असतो तेंव्हा आपली मनःस्थिती ते समजुन घेण्याच्या अवस्थेत असेलच असे नाही. डॉ. नरेन्द्र दाभोलकरांबद्दलच्या विचारांनी (मिपावर, गुगलवर, फेसबुकावर, दूरचित्रवाणी संचावरील बातम्यांधून) मन व्यापून राहिले असल्याने लेखन वाचण्यातील एकाग्रता जुळून येत नाहीए म्हणून पुन्हा एकदा निवांत क्षणी लेखातील विचारांशी मनाची जुळवणी करून लेखातील मुद्दे समजून घेतले पाहिजेत, असे मला वाटले म्हणून ते वाक्य.
पण प्रतिक्रिया द्यायची माझी योग्यता नाही.
आज ३२ वर्षे आखातात राहिल्याने मराठी वाचन (पुस्तकेच मिळत नसल्याने) बरेच मागे पडले आहे. कांही वैचारीक चर्चेसही (ह्या विषयावर) वाव मिळेल असे वातावरण आणि मित्र परिवार नाही ह्याने आपण 'शहाणपणा' ह्या अत्यंत आवश्यक पैलूवर मागासलेले राहात आहोत असे कधी कधी वाटते. संस्कृत भाषेशी संबंध शाळेनंतर सुटलाच आहे. (तेंव्हाही उत्तीर्ण होण्याइतके अंक मिळविण्याइतपतच संबंध होता), आणि 'नरेद्र गोळे ह्यांचा लेख' हे दडपण ह्यासर्वाचा परिपाक म्हणून वाटले आपली योग्यता नाही.

स्वनिंदेने अभिव्यक्त होणे योग्य नाही. तसेच तपशीलाच्या उपहासाने, लेखनविषयावर भाष्य करणेही योग्य नाही. स्वनिंदा नाही तर खतरनाक सत्य आहे. तुम्ही सुरेख लिहिल आहे त्यात उपाहास करण्याजोगे काहीही नाही आहे. तपशिलाचा उपाहास नाही, माझ्या घरी मला "या कुंन्देन्दु.....मध्ये सरल सरळ या कुंदेदु अस म्हंटल जायच, त्यातच जो "जाद्ध्या" हा शब्द आहे तो सरळ सरळ "जाड्या" असा म्हंटला जायचा. मी एकटीच हे शोधुन काढुन जास्तीत जास्त शुद्ध म्हणायचा प्रयत्न केला. अर्थात निदान त्यांनी संध्याकळचा परवचा शिकवला हे ही थोरच. मी वर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासुन होता. लायकी नसतान उगा तोंड उघडु नये माणसान हे कळत मला. तुम्ही अतिशय अप्रतिम लिहिलं आहे तुमच्या चुका येथे जास्तीत जास्त बॅटमॅन काढु शकेल मी नाही. मला वाटल विचाराव म्हणुन विचारल त्यात उपाहास नव्हता.

मूळ श्लोक या कुन्देन्दु- तुषारहार- धवला या शुभ्र- वस्त्रावृता या वीणावरदण्डमन्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युत- शंकर- प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥॥१॥॥ तो शेवटचा शब्द जाड्यापहा असाच आहे. नि:शेष +जाड्य+अपहा= समूळपणे जाड्य (जडत्व,मांद्य,अज्ञान,इ.) नाहीशी करणारी असा अर्थ आहे. उच्चार "जाड्ड्या" असा पाहिजे. "जाड्या रड्या" मधला "ड्या" चा उच्चार मराठीतच आढळतो त्यामुळे आपण श्लोकातही तसा उच्चार करू पाहतो पण संस्कृतमध्ये तसा उच्चार नाही. जोडाक्षर म्हटले की आघात ठरलेलाच आहे.

मराठीतल्या तत्सम शब्दांमध्ये असे द्वित्त होते आणि तद्भव वा देशी शब्दांत ते होत नाही हे खरे. पण संस्कृतात ते झाले तर चालते; झालेच पाहिजे असे नाही. (असे असावे.) हिंदीतल्या तत्सम शब्दांत आणि उत्तर भारतातल्या संस्कृत उच्चारांत असे द्वित्त पुष्कळवेळा होत नाही. शक्य, कल्याण, विद्या, मिथ्या यांसारखे शब्द हलकेच उच्चारले जातात. संस्कृतातदेखील सर्व जोडाक्षरांच्या बाबतीत असे घडत नाही. धष्ट, पुष्ट, विकल्प, विसर्ग, गुप्त यांतली जोडाक्षरे आघाताविना उच्चारली जातात. फक्त जोडाक्षरातले अन्त्य अक्षर 'य' असेल तर आधीच्या अक्षराचे द्वित्त होऊ शकते. अर्थात उत्तर भारताचे उदाहरण संस्कृत उच्चारांच्या बाबतीत देणे तितकेसे समर्पक नाही कारण त्यांच्याकडे 'अ'कारान्त शब्दांचा / उपान्त्य 'अ' स्वराचा पूर्ण उच्चार करण्याची पद्धत नाही. उदा. युध् (युद्ध), विकल्प् (विकल्प), गुप्त्(गुप्त), कल्प्ना (कल्पना), मंग्ला (मंगला) इ. चूभूदेघे.

तुमचा मुद्दा बरोबर आहे. एका लहानशा वाक्याबद्दल असहमती नोंदवतो फक्त.
हिंदीतल्या तत्सम शब्दांत आणि उत्तर भारतातल्या संस्कृत उच्चारांत असे द्वित्त पुष्कळवेळा होत नाही. शक्य, कल्याण, विद्या, मिथ्या यांसारखे शब्द हलकेच उच्चारले जातात.
द्वित्त इथेही होतेच-शक्य या शब्दात यकारान्त जोडाक्षर शेवटी आल्याने पूर्ण उच्चार होत नै इतकेच. नपेक्षा मराठी निराघात उच्चारांसारखे उत्तरभारतीय उच्चार कधीच ऐकलेले नाहीत.