Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाह गवि काय आठवण काढलीत, खवय्या, खाद्य समीक्षक असावं तर तुमच्यासारखं :) शाकाहारी जेवणाच्या अशा काही सुंदर जागा आहेत या की इकडे गेल्यावर नेहमी जिभल्या चाटत खाणारे चिकन, मासे पण खाल्ले जाणार नाहीत माझ्याकडुन.

सहा महिन्यापुर्वी कामासाठी पुण्याला आलो होतो,जोडीदाराने उदरभरणासाठी बाद्शाहीत जाण्याचा आग्रह धरला,म्हणुन गेलो,मग कळले की थाळी अनलिमिटेड आहे,जेवण उत्क्रुष्ठ होते,गवी यान्नी सान्गितल्याप्रमाणे,गल्ल्याजवळ गर्दि सुद्धा होति,पण लवकरच नाव पुकारले गेले,ताक आमटी उत्क्रुष्ठ तसेच पोळ्यासुद्धा गरमागरम्,आत्मारामजी,धन्स आठ्वणी जाग्या केल्या बद्दल.

यात मज्जा मज्जा smiley असे वाटण्यासारखे काय आहे,जरा मलातरी कळुदेकी मी काय मोठा विनोद केला आहे म्हणजे मला सुद्धा मज्जा मज्जा करता येईल.

५-६ वर्षांपुर्वी तिथले वाढपी खाकी चड्ड्या घालायचे. आता प्रमोशन झालंय, पँट घालतात. पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा इतर खानावळीतील सवई प्रमाणे 'राईस' मागीतला.. त्या चड्डीवाल्या माणसाने इथे राईस मिळत नाही असं सांगीतलं, अन निघुन गेला. थोड्या वेळाने त्याने मला 'भात' वाढला.. :D अजुनही पाटी-पेन्सिल वापरायची पद्द्त आहे. हात धुवायच्या बेसिनच्या नळातुन सदाशीव पेठेला शोभेल अशी बचत करणारी बारिक धार येते. बाकी जेवण १ लंबर.. लै बेस..

अगदी अगदी... नळाची बारीक धार हे अत्यंत खास आणि अचूक निरीक्षण. सदाशिव पेठ वगैरे वादात पडायचं नाहीये पण बादशाहीतल्या बेसिनच्या नळाची ही सूक्ष्म धार हाही तिथल्या वैशिष्ट्याचा अव्वल नमुना आहे.

>>सदाशिव पेठ वगैरे वादात पडायचं नाहीय>>>. स्वारी हां गवी भाऊ.. आमचं तोंड म्हणजे बघा x x x.. -- अजुन एक न आवडलेली गोष्ट- एका (आकाराने) मोठ्या मित्राला घेउन गेलो होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने सीट बदलुन घेतली, म्हणाला अडचण होतीय..

एका (आकाराने) मोठ्या मित्राला घेउन गेलो होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने सीट बदलुन घेतली, म्हणाला अडचण होतीय..
हा किस्सा खास गविंना सांगण्यामागील प्रयोजन काय?

आवडेश ! या खुमास्दार लेखाबद्दल श्री. अतृप्त आत्मा यांना त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी बादशाही मध्ये एका थाळीचे जाहीर आमंत्रण ! सोबत येणार्याने आप-आपले कूपन घ्यावे .

@या खुमास्दार लेखाबद्दल श्री. अतृप्त आत्मा यांना त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी बादशाही मध्ये एका थाळीचे जाहीर आमंत्रण ! >>> आमंत्रण स्विकारण्यात आले आहे! :) @सोबत येणार्याने आप-आपले कूपन घ्यावे. >>> =)) खादाड कंपूच्या सणमाणणीय सदश्यांण्णो...आपापले ८० रुपये घेऊन या रे! =)) चला... एक कट्टा बादशाहीला ! नावनोंदणी करा. कट्टा दिनांक-श्रावण संपून उतार्‍याचा एक दिवस गेल्यानंतरचा..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif - ७ सप्टेंबर...! (आणी शनिवार असल्यामुळे सगळ्यांना जमेलसे वाटते.) अभ्यागत--- १) विटेकर काका आणी मी...! ;) २) ....

अभ्यागत--- १) विटेकर काका आणी मी...! २) धन्या अन वल्लिचे कुपन घेउन त्यांच्यासकट मि देखिल.... ;)

आम्हाला वेळ मंजूर आहे.. आता वल्लीशेट येत आहेत तर मस्त कट्टा करु या का ? "पर्वती सफर"याला जोडून घेता येईल का ? नै , जेवण अन लिमिटेड आहे . . जरा तयारीनेच जाऊ या की ! कस्से ? ( डोळा बारिक केल्याची स्मायली ...)

@आता वल्लीशेट येत आहेत तर मस्त कट्टा करु या का ? >>> तेच ना...! मी सिरियसली'च म्हणत होतो... पण कुणीच नावनोंदणी करैत नाहीत. :-/ सगळे जण दु...दु... आहेत. :-/ तिथे आमच्या मधुची गाडीपण जवळच आहे,सकाळी जमू..तिथे नाष्टा हाणू. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif नंतर उंडारू, http://www.sherv.net/cm/emo/happy/bliss-smiley-emoticon.gif आणी मग बादशाही...........! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

बादशाही मेस मधे अगदी कधीतरी दहा बारा वर्षांपूर्वी जेवलोहोतो. इकडे साउथ अफ्रीकेत येण्यापूर्वी पुन्हा एकदा बादशाहीत जेवायला गेलो. तिथले आजोबा ( कै तवकर ) हे कालवश झालेत मात्र बादशाही मेस ची शिस्त आणि अन्नाची चव अबाधीत आहेत. "क्वालीटी इज अल्टिमेट कस्टमर डिलाईट" हे वाक्य इथूनच घेतल्यासारखे वाटते. कस्टमर सॅटिस्फिकेशन च्या भलत्या कल्पनाना इथे थारा नाही. मात्र अन्नाची चव / क्वालीटी हे कित्येक वर्षात त्यानी राखलेली आहे. पोटभर आणि घरगुती अन्न जेवायच्या ज्या अपेक्षेने आपण बादशाहीत जातो त्या अपेक्षा तेथे नक्की पूर्ण होतात.

रामदरा, पुलं उद्यान आणि आता बादशाही थाळी....... भारतभेटीत पुण्यातील अतिआवश्यक गोष्टींची यादी वाढते आहे.

. बुवांचा धागा वाचून मी जेवायला गेलो. मला वरील पाटी वाचावयास मिळाली . अर्थात मी ही चोरूनच फोटो घेतला. आता बुवांना आत घातले तर पंचाईत.गणपती जवळ आलेत. त्यात चातुर्मासाच सीझन सुरू. अरे बापरे मी चोरूनच फोटो घेतलाय ! बुवा मला बी घेउनशान जातात काय?

ऑ.. ? हे नवीनच दिसतंय. पाट्यांचे फोटो काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई? अरेरे.. आणि अपमान करण्याबद्दल यांना काय आकर्षण आहे कोण जाणे. कित्येक पाट्यांवर अपमानाची भीती घालतात. बुवा. ते पहा बुवा.. कायदेशीर मनाई असेल तर पाट्या काढाव्या लागतील. तिथून नव्हे, इथून..

हे खरी पाटी नव्हे. खर्‍या पाटीवर फोटोशॉप वापरून बनवण्यात आलेली पाटी आहे. ज्यांचे हे रोजचे काम आहे त्यांना एका फटक्यात कळेल. नीट बघितल्यास फोटोशॉपींगच्या काही ठळक चुका लक्षात येतील. अनअनुभवी माणसाने केलेले अत्यंत खराब रिटचींग आहे.

आदी हुश्शार झाला ब्वा. आता पीएम या पाटीचे:) मालमत्ता ला एक काना एक्स्ट्रा झालाय. पेंटर लोकांची अलैंमेंट शक्यतो अशी नसते. असा फॉण्ट पेंटर वापरत नाहीत. ब्याक्ग्राउण्डाला कलर असा फासत नाहीत. अक्षरांचे पर्स्स्पेक्तिव्ह गंडले आहे. सबब हे फोटोशॉप चे कलाकारी काम बादशाहीला शोभत नाही. धन्यवाद:)

लेका, धागा बुवाचा आहे ! तिथे पंच महत्वाचा ! तो काय चुकला आहे का तो बोल ! हे रसग्रहण काय चाल्ल्या आहे !

पंच असले की पंच नामा होणारच. बुवाना खाण्यातले कळते आमाला फोटोशॉप मधले कळते. तरीबी आता तुमी म्हन्ताव म्हनुन, गुरजी लिव्हा हो तुम्ही. कीपीटप :-D

लेख उत्तम आहे पण बादशाहीचे जेवण तेवढे भावले नाही. पुण्यात प्रथम १९८३ साली गेलो. काका स प ला होते त्यामुळे वडिलांच्या चकरा तेथे होत. वडिलांच्या तोंडून बादशाहीचे नाव ऐकले होते म्हणून एकदा गेलो. पुणेरी भाषेत सडेतोड (मुंबईच्या भाषेत उर्मट) वागणे होते. जेवण "भरपूर" होते पण चव एवढी आवडली नाही. साधारण कोणत्याही खानावळीत असावी तशीच होती. आम्ही खाण्यात जेमतेमच असल्यामुळे भरपूर हा दर्जाच्या निकष नाही. कदाचित मूळ पुण्याचा नसल्याने एखाद्या गोष्टीचा जसा जाज्वल्य अभिमान असतो तसा नव्हता किंवा जास्त अपेक्षेने गेलो म्हणूनही असेल.कदाचित मुंबईच्या गुजराती/ मारवाडी थाळी देणार्यांचे अगत्य तेथे नव्हते म्हणूनही असेल. वर्णन यथातथ्य आहे यात वाद नाही आणि तेथील लोकांचे वागणे परत डोळ्यासमोर उभे राहिले.

बुवा.. लेख नेहमीप्रमाणे भारी!!! फुलस्केप कागदावरती सूचनांचा भडीमार असणारी; हस्ताक्षरात लिहिलेली, प्लॅस्टीक पेपर स्टेपल केलेली पाटी आता नाहिये का..? "सुजाण आणि सुसंकृत नागरिक जेवताना मोबाईल वर बोलत नाहीत" "कृपया आपल्या आवडीची भाजी आहे का याची चौकशी करून टोकन घ्यावे" (बादशाही पेक्षा "जनसेवा" ची थाळी आवडणारा) मोदक

बुवा लेख फर्मासच! एक काम का नाही करत, पुण्यातल्या खाण्याच्या ठिकाणांबद्दल एक लेखमलिकाच सुरू करा ना. तुमची लिहण्याची शैली एकदम खुसखूशीत आहे. त्या मेल्या धन्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, त्याला सवयच आहे कुचकट बोलायची. ;)

बादशाहीला जाण्याचा योग कधी आलाच नाही. म्हणजे, तशी फार हौसही कधी वाटली नाही, अन 'उपाशी मरेन पण फालतु कारणासाठी अपमान करुन घेणार नाही!' असा बाणा ही जास्त महत्वाची कारणं असावीत. बादशाहीपेक्षा आमची उपस्थिती (कधीमधी) पुना बोर्डिंगला असायची. बरं, दोस्तांच्या आग्रहाला बळी पडून जावं म्हणावं, तर आमच्यासारख्या तामसी माणसाचं मित्रमंडळ आणि काय वेगळं असणार? बादशाहीसदृश ठिकाणी जेवण्यापेक्षा आम्ही पडीक असायचो ते 'आवारे खानावळीत' :) आवारेमध्ये मेस लावणार्‍या काही होपलेस केसेसपैकी आम्हीही एक. सकाळी मटण, रात्री चिकन असा दणकून बेत....रोजचा! शेवटी डॉक्टरनं शिव्या घातल्यावर आवारेच्या वार्‍या थांबल्या. तर ते असोच. बादशाहीचं बहुत कौतुक ऐकलं आहे, पुढेही ऐकत राहूच. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या ठिकाणचं आकर्षण असं कधी वाटलंच नाही.

आणि धन्याने केलेले रसग्रहण सुद्धा भारी आहे! का कोण जाणे आज सकाळीच धन्याने केलेले एक रसग्रहण आठवले होते! =))

'नाम में क्या लिखा है' म्हणतात पण बाद शाही या नामामधे 'शाही' म्हणजे रॉयल असे विशेषण आहे ते पुर्णपणे 'बाद' म्हणजे खारिज़ आहे असे सुचवून त्यातील पितळी तांब्या-भांडी व ठोकळेबाज बाकडी व खुर्च्या 'टोकनधारी इसमांना 'चला आटपा लवकर' असे नकळत सुचवत, चोरटेपणाने फोटो काढायची बाजीगरी करणाऱ्या अतृप्तांना कायदेशीर धमकावणी इमाने इतबारे पार पाडत आहेत.

@चोरटेपणाने फोटो काढायची बाजीगरी करणाऱ्या अतृप्तांना कायदेशीर धमकावणी इमाने इतबारे पार पाडत आहेत.>>> =)) अत्यंत खोचक... आपलं ते हे... रोचक प्रतिसाद! =))

बादशाहीचे वर्णन, फोटॉ आणि गवि तसेच इतरांचे प्रतिसाद पाहून एकदम नॉस्टेल्जिक वाटलो. एक काळ असा होता की आम्ही सदाशिव पेठेत रुमवर राहाणारे मित्र चार ठिकाणी चार जण जाऊन बघत असू कुठे काय आहे ते आणि मग बरेचदा बादशाही मध्येच जाणं होत असे. मी जायचो तेव्हा गविंनी लिहिलय तसं आजोबा असायचे गल्ल्यावर.. (माझ्याशी मात्र एक दोनदा चक्क गप्पा झाल्याचं आठवतय, मी मुंबईचा म्हटल्यावर!) वामनराव पांढरा शर्ट, पाढरा लेंगा असे उभे असायचे दारात, हातात पाटी-पेन्सिल. नेहमीचं असल्याने लांबून फक्त हाताच्या बोटाने सांगायचं दोन्,तीन्,चार काय ते.. निवांत पेपर वाचत किंवा कधी नुसती धावपळ बघत बसायचं. नंबर आला की वामनराव ओरडून सांगणार, कधी मूड मध्ये असले की जवळ येऊन आत घेऊन जाणार.. भात, तूप, आमटी ह्या गोष्टींबरोबर आवडणारी गोष्ट म्हणजे तिथलं ताक! गेल्यावर्षी अगदी आवर्जून गेलो बादशाहीत, एक फरक म्हणजे आता टेबलावर चकल्या वगैरेंची पाकीटं विकायला आली होती. काळी टोपी घालणारे अबोल आजोबा फोटोत गेले होते आणि वामनरावसुद्धा :( नकळतच नमस्कार केला त्यांना तसाच.. कुठे कुणाचे त्रुणानुबंध असतात! माणसांना जोडण्याच अजब तंत्र बादशाही मधल्या जेवणात, साधेपणात आणि आपलेपणात तेव्हा होतंच होतं.. आत्ताही असेलच! अवांतर : सात्विक थाळी कधी मधी जायचो पण 'व्हॅल्यू फॉर मनी' म्हणजे बादशाहीचं. पेरुगेटचं पूना बोर्डिंग हाऊस फक्त रविवारी स्काळी. म्हणजे कार्यक्रम ठरलेला.. सकाळी चाराला उठावं.. टिळक रोडवर अंबिका कडे अमृततुल्य चहा मारावा.. पलिकडच्या गल्लित प्राजक्ताचं एक झाडं होतं, त्याचा सडा ओंजळीत घेत वास भरून घ्यावा आणि बाईक वरुन थेट सिंहगडाचा पायथा.. वरती चढताना छान सूर्योदय बघावा, लिंबू सरबत घेऊन रमत गमत साडे सातापर्यंत खाली.. येताना वाडेश्वर.. थालिपीठ खाऊन थोडी कॉफी. रुम वर जाऊन आंघोळ, पेपर वाचन आणि मग बाराच्या आसपास पूना बोर्डींग हाऊस. तिथे पूर्वी एक आजोबा असायचे.. बादशाहीच्या आजोबांच्या मानाने तरूण आणि स्वभावाने विरुद्ध.. कायम बोलत असायचे.. असो तर मसाले भाग, श्रिखंड आणि अळूची भाजी.. पोट भरलं तरी जिभ तृप्त होत नसे.. खाली येऊन गल्लीत पान खावं आणि तीन-चार तास रुम वर झोकून द्यावं.. संध्याकाळी उद्य विहारच्या समोर टपरी वर चहा.. सुखाचा रविवार असायचा तो असा! ह्या लेखाच्या निमित्ताने सगळं आठवलं!

छान हो बुवा! लेख आवडला. प्रतिक्रिया वाचल्या नाहीत, नंतर सवडीन नक्की वाचणार. तिथे कधी जेवले नाहीये पण तुम्ही म्हणताय तसच काहीसं ऐकून आहे.

बादशाही बद्दल अमाप कौतुक ऐकुन आहे. गेल्या १६ -१७ वर्षात एकदाही तिकडे खाणे झाले नाही. नाही म्हणता एकदा गेलो होतो. त्यादिवशीच्या जेवणात भेंडीची पातळ भाजी होती. ते ऐकुन जे निघालो ते थेट पून गेस्ट हाउस ला जाउनच थांबलो. सुग्रास जेवण हो तिथले पण. आता एवढे कौतुक बघुन एकदा जाइनच म्हणतो.

बाकी ही ठिकाणे पारंपारिक असल्याने नॉस्टेल्जिक म्हणूनच जास्त प्रसिद्ध झालीत असे मला वाटते. जसे अप्पाची खिचडी (खडूस अप्पा अगदी सकाळी ९ वाजता गेलं तरी संपली आहे असेच म्हणतो त्यामुळे खायचा योग आला नाही कधी. श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच खाल्ली, जितकी तारीफ ऐकली होती त्यामानाने फुसकीच निघाली), महानाझचे समोसे (हे आता ताबूत स्ट्रीटला स्थलांतरीत झालेय. अगदी मूळची चव नसली तरी अजूनही बर्‍यापैकी आब राखून आहेत.) वाडीया कॉलेजमागची अण्णाची टपरी ( ही अजूनही लै भारीच होती. गरमागरम वाफाळते सांबार, वडा, चटणी तर जबरदस्तच. अगदी हल्लीच रस्तारूंदीकरणात बंद पडली असे वाश्याकडून समजते.)

मगच्या वेळेस महानाझ बन्द झाले म्हणून हळहळलो होतो. पण समोसे अजुन मिळतात हे ऐकुन बरे वाटले. अता पुढच्या खेपेला सगळीकडे जाणे आलेच. कोलेजच्या दिवसात बादशाही आणि बाकी सगळ्या ठिकाणी वार लगल्यासारखे जाणे व्हायचे.

श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच खाल्ली, जितकी तारीफ ऐकली होती त्यामानाने फुसकीच निघाली)
खरंच फेल आहे, हल्ली घाटापलीकडे जास्त चांगल्या मिसळी देऊ लागलेत

मृत्युन्जय भेंडीची पातळ भाजी आवडत नाही तुम्हाला? असो आवड आपली आपली. :) मला मात्र भेंडीची चिंच, गुळ, ओले खोबरं घालुन केलेली पातळ भाजी खुप आवडते. बादशाहीत कशी असते ते माहीत नाही पण.