Welcome to misalpav.com
लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

माझे ह्या विषयावर अगदी थोडेफार वाचन आहे. आणि त्यामुळे मी तुमच्याशी वाद घालत बसणार नाही. पण मला एक प्रश्न सतत पडतो आहे की नरबळी सारख्या प्रथांना मोडित काढण्या साठी कुणी कायदा करत असेल तर त्याला इतका विरोध का व्हावा? त्यातली काही कलमे अजुनही दुरुस्त करता येतील. पण त्यावर "सुचना" न होता.. आक्खा कायदाच अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी ?? तुम्हाला काही पटलं नसेल तर जरुर मांडा.. त्यावर विचार करुन सर्वमान्य असा मार्ग निघु शकेल. पण एक्-दोन कलमे मान्य नाहीत म्हणुन सगळाच कायदा कसा मोडीत काढायचा? आणि अंनिस म्हणजे देव-धर्म न मानणारी संस्था, म्हणुन त्यांनी ज्याचा पाठपुरावा केला तो कायदा पण तसाच देव विरोधी असेल, त्यांचे कार्यकर्ते अतिशहाणे असतील असंच का वाटत असेल बर्‍याच लोकांना? त्यांचा हेतु का नाही कुणी समजुन घेत? ह्यात त्यांचा काय अर्थिक फायदा असेल? समाजासाठी जर कुणी काही करु पहात असेल तर त्यातल्या चुकाच दाखवण्या पेक्षा त्यातील चांगल्या बाबींना पाठिंबा देणे आणि न पटणार्‍या गोष्टीं साठी सुधारणा सुचवणे हे जास्त योग्य वाटते.

नरबळी सारख्या प्रथांना मोडित काढण्या साठी कुणी कायदा करत असेल
नरबळी हा खून च असल्यामुळे त्याच्या साठी वेगळा कायदा असायची गरज नाही. नरबळी साठी शिक्षा देण्यास सध्याचा कायदा सक्षम आहे

वाचतोय. विंचु साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचार न घेता हे उपचार करावेत किंवा योग्य असतात असे तुम्ही कुठेही म्हटलेले नाही पण तुमचा एकंदर विरोध बघता तुमचा विचार तसाच असावा असे वाटते. तसे असल्यास असे का हे जाणुन घ्यायला आवडेल. नसल्यास प्रश्नच नाही. तुमचा विरोध थोडाथोडा कळतो आहे. माझ्यामते तो कायदेशीर बंधनाला असुन वैद्यकीय उपचारपद्धतीच्या श्रेष्ठत्वाला आव्हान देणारा नाही. कृपया थोडे सविस्स्तर सांगा.

जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे. माझ्या मते तर आयुर्वेद आणि होमिओपाथी ला पण खरे तर ह्यात घातले पाहीजे जर रोगी बरा व्हावा अशी सरकार ची इत्छा असेल तर. ती पण मोठी ढोन्ग आहेत असे माझे मत आहे. पण कोणाकडुन उपचार करुन घ्यायचा हे ज्या त्या व्यक्तीने ठरवावे, सरकार ने मधे पडु नये.

जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे.
अत्यंत मान्य. फक्त थोडा बदल / अ‍ॅडिशन करतो.. नेमकं कोणाकडे गेल्यास काय फायदा / आउटपुट मिळेल याचं ज्ञान सर्वांना मिळण्यासाठी /पोचण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील जे कायद्याच्या कक्षेत नाही. हा सरळसरळ शिक्षणाचा भाग आहे.
माझ्या मते तर आयुर्वेद आणि होमिओपाथी ला पण खरे तर ह्यात घातले पाहीजे जर रोगी बरा व्हावा अशी सरकार ची इत्छा असेल तर. ती पण मोठी ढोन्ग आहेत असे माझे मत आहे.
होमिओपथीविषयी सरळसोट सहमत. आयुर्वेदाविषयी, औषधांच्या आधुनिक मार्गाने सिद्धता होईपर्यंत सहमत. यात अनेक अन्य चिकित्साही घालणं अत्यंत आवश्यक आहे.

धन्यवाद गवि साहेब
हा सरळसरळ शिक्षणाचा भाग आहे.
माझे तेच म्हणणे आहे. सरकार ने असले कायदे करण्यापेक्षा काहीतरी खरे उपाय करावेत. गावो गावी वैद्यकीय सुविधा पोचवाव्यात, लोक आपोआपच मंत्र तंत्र करणे बंद करतील.

प्रस्तावीत कायद्यमधील कलम क्र. ९ खालील प्रमाणे. --------------------------------------------------- ९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे. ------------------------------------------------- यात कुठेही घरगुती उपचार करु नये कीवा करता येणार नाहीत असे लीहीलेले नाही आहे. हा मसुदा http://www.antisuperstition.org/ इथे वाचता येईल.

मला समजलेल्या माहितीनुसार हे कलम मुळातच केवळ एखाद्या व्यक्तीला/पिडिताला इछ्चा असुनही वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे व त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे. या कृतिसाठी आहे. व अन्य कोणतिही उपचार पध्दति स्विकारणे अथवा नाकारणे याबाबत निर्णय घेण्याचे संपुर्ण स्वातंत्र्य पिडिताला/संबधितांना बहाल करत आहे. बरेचदा अन्य गोश्टी प्रभावे इछ्चा असुनही पिडिताला/संबधितांना वैद्यकिय मदतीऐवजी इतर उपचार पध्दती लागु करुन त्या जिवावर बेतल्याच्या अनेको घटना घडत असल्याने हे सामाविश्ट केले आहे. शेवटी वैद्यकिय मदत हा उपाय (सक्सेस रेशो तुलना करुन बघितल्यास) सर्वोत्तम आहे व तो इच्छा असताना नाकारणे अतिशय अन्यायकारक आहे इतकेच हे कलम सुचवते..... अर्थात ही झाली पुस्तकी संयमित व्याख्या. वास्तवात मला कोब्रा चावलाय अन तरिही वैद्यकिय मदत नको, अमुक तमुक घेइल बघुन असे छातिठोकपणे म्हणनारी व्यक्ती(वा नातेवाइक) काय तयारिचे असतिल याची कल्पना नसल्याने... हे कलम सर्वसामान्यांना चिंतेमधे पाडणार आहे हे सकृतदर्शनी नक्कि आहे.

कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करण्यापासून रोखणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. न वाचता न समजता लिहू नका ही नम्र विनंती!

तुमचा मुद्दा समजला. सर्प/विंचू दंश आणि त्यावरच्या पारंपारिक उपायांची परिणामकारकता यावर डॉक्टर मिपासदस्य सुबोध खरे, इस्पिक एक्का, बाबा पाटील आदि लोक अधिकारवाणीने लिहू शकतात. मिपाचे गारूडी जॅक डॅलियल्स सुद्धा. पण
अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे.
हे म्हणजे थोरल्या भावाचा घटस्फोट झाला म्हणून धाकट्याला लग्नच न करण्याचा सल्ला देण्यासारखं आहे. कायद्यांना विरोध का? कायदे केल्याच्या दुसर्‍या दिवसापासून लोक बटण बंद केल्यासारखे ती गोष्ट करायचे थांबतील आणि कायद्याच्या कक्षेत येतील अशी अपेक्षाच चूक आहे. कायद्याचे सामाजिक परिणाम दिसून यायला, त्यातून समाजमनात बदल व्हायला अनेक वर्षं, कधी दशकं जावी लागतात. सतीबंदी कायदा, हुंडाप्रतिबंधक कायदा ही अगदी सहज आठवणारी उदाहरणं. कायदा करणे ही सामाजिक बदलाची सुरुवात असते. समाजकल्याण करणारं सरकार काही अनिष्ट प्रथांना लगाम घालत आहे ही भूमिका यातून स्पष्ट होते. त्यातून हा तर वटहुकूम (ordinance) आहे ना? विधीमंडळापुढे सहा महिन्यांत वटहु़कूम चर्चेसाठी ठेवला नाही तर तो घटनाबाह्य ठरतो. वर पिलियन रायडर यांनी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक कलम / पोटकलम चर्चेसाठी घेता येतं आणि अयोग्य वाटलं तर नापास करता येतं. त्यासाठी सगळ्या कायद्यालाच आडकाठी करण्याची गरज नाही. शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचा शिखंडी करून कोणी त्याआडून बाण चालवत आहे का - हा खरा प्रश्न आहे.

शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचा शिखंडी करून कोणी त्याआडून बाण चालवत आहे का - हा खरा प्रश्न आहे.
हं.. आता कसं बोललात... लोकांना वाटतय कि दाभोलकर पक्षपाति होते, खोटारडे होते, सरसकट सगळा देवधर्म गुंडाळुन ठेवणारे होते म्हणुन त्याम्ची हत्या झाली... हे सोयिस्कर्पणे नाकारताएत का की कुणाची तरि आर्थिक गणितं चुकत होती म्हणुन "सराईत गुंडा" कडुन त्यांचा "काटा काढला"... हाच गांधी हत्या आणि दाभोलकर ह्यांचा खुन ह्यातला फरक आहे...

म्हणजे जास्त रेव्हेन्यु असणार्‍या बाबा, बुवांची चौकशी व्हायला हवी या संदर्भात.. सनातन वगैरे पैशाच्याबाबतीत खूपच मागासलेले असावेत.. पण त्या कॅटॅगरीतले बाबा बुवा मंत्रीमंडळ आपल्या पायशी बाळगुन असतात.. मग कशी होणार त्यांची चौकशी??

म्हणजे जास्त रेव्हेन्यु असणार्‍या बाबा, बुवांची चौकशी व्हायला हवी या संदर्भात.. सनातन वगैरे पैशाच्याबाबतीत खूपच मागासलेले असावेत.. पण त्या कॅटॅगरीतले बाबा बुवा मंत्रीमंडळ आपल्या पायशी बाळगुन असतात.. मग कशी होणार त्यांची चौकशी??

तुम्हाला खरे च असे वाटते आहे का की अनिस किंवा दाभोलकरांमुळे कोणाची आर्थिक गणिते बिघडत असतील. दाभोलकर गेली ३० वर्ष तरी ह्या वर काम करत आहेत. पण समाजात बाबा, बापू, माता, मावशी, अम्मा , मम्मी वाढल्याच आहेत. समाजाला बाबा, बुवा, गंडेदोरे हवे आहेत. अनिस ची तेव्हडी ताकद नाही की ते कोणाची आर्थिक गणिते बिघडवू शकतील.

२ शक्यता १. ह्या मागे राजकारण आहे. ह्या खुनाचे निमित्त करून सरकार हिंदु संघटनांना backfoot वर ढकलत आहे. अश्या घटना अजुन घडतील कारण ह्या सरकार ला जनतेला दाखवायला तोंड राहीले नाहिये. अश्या निमित्तानी समाजवादी मते आपल्याकडे वळवुन घेत आहे सरकार. २. दाभोलकरांच्या जमिन वगैरे असू शकतात, काही आर्थिक व्यवहार असू शकतात. जमिनीवरून कीती खून होतात तुम्हाला माहीतीच आहे.

>>> १. ह्या मागे राजकारण आहे. ह्या खुनाचे निमित्त करून सरकार हिंदु संघटनांना backfoot वर ढकलत आहे. अश्या घटना अजुन घडतील कारण ह्या सरकार ला जनतेला दाखवायला तोंड राहीले नाहिये. अश्या निमित्तानी समाजवादी मते आपल्याकडे वळवुन घेत आहे सरकार. + १. मालेगावला सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इ. ९ जणांना आरोपी ठरवून ऑक्टोबर २००८ पासून कोणताही पुरावा नसताना जामीन न देता अटकेत ठेवले आहे. सुरवातीला महाराष्ट्र सीआयडी, नंतर करकरेंच्या नेतृत्वाखालील एटीएस, नंतर एक एसआयटी, नंतर सीबीआय, नंतर अजून एक एसआयटी आणि आता एनआयए अशा अनेक चौकशी संस्थांकडून चौकशी करूनसुद्धा त्यांच्याविरूद्ध पुरावा मिळालेला दिसत नाही. त्यामुळेच आजतगायत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. २००९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप व हिंदू संघटनांना बॅकफूटवर नेण्यासाठी व निवडणुकीत त्यांच्याविरूद्ध "हिंदू अतिरेकी", "हिंदू दहशतवादी" असा प्रचार करण्यासाठीच या सर्वांना लटकाविण्यात आलेले होते असे दिसत आहे. कै. दाभोळकरांच्या खुनामागचा हेतू लक्षात येत नाही. ते १९९६ पासून या विधेयकाच्या मागे आहेत. त्यामुळे या विधेयकामुळे त्यांचा खून झाला असावा असे वाटत नाही कारण हे विधेयक कधीही मंजूर होणार नाही हे स्वतः दाभोळकरांना व विधेयकविरोधकांनाही माहित होते. दाभोळकरांमुळे कोणत्याही भोंदू बाबांची दुकाने बंद झाल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना गेल्या १०-१२ वर्षात अनेक नवीन भोंदू बाबा-महाराज उदयास आले आहेत व त्यांची दुकाने व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे एखादा बाबा-महाराज या मागे असावा असे वाटत नाही. दाभोळकरांचे कोणाशीही व्यक्तिगत शत्रुत्व नव्हते. त्यांचे अनेकांशी वैचारिक मतभेद होते. त्यामुळे व्यक्तिगत सुडाचा हा प्रकार नसावा. मग नक्की काय कारण असावे? २०१४ मध्ये निवडणुक आहे हे लक्षात घेतले तर या खुनाचे निमित्त करून भाजप, हिंदू संघटना इ. ना पुन्हा एकदा बॅकफूटवर ढकलण्यासाठी यामागे राजकारण सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. >>>> २. दाभोलकरांच्या जमिन वगैरे असू शकतात, काही आर्थिक व्यवहार असू शकतात. जमिनीवरून कीती खून होतात तुम्हाला माहीतीच आहे. दाभोळकरांचे असे काही व्यवहार होते का याची अजिबात कल्पना नाही. एकंदरीत खुनामागचा नक्की काय हेतू होता हे गूढच आहे. पण या खुनामुळे तापलेल्या वातावरणात आपली निधर्मी राजकीय पोळी भाजून घेण्याचे अत्यंत घृणास्पद प्रयत्न सुरु आहेत.

मालेगाव स्फोटातले आरोपी हे "अभिनव भारत" या सावरकरांनी चालू केलेल्या आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळात विसर्जीत केल्यावर नव्याने चालू केलेया संघटनेतले होते. दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्य सरकारने "अभिनव भारत" ह्या संघटने वर बंदी आणावी म्हणून केंद्राकडे शिफारस केली. तर त्यांच्याकडून (मालेगावचा अरोप सोडल्यास) कुठलेही देशविघातक कृत्य झाल्याचे दिसलेले नसल्याने केंद्रातील गृहमंत्रालयाने ती मागणी फेटाळून लावली आहे. सध्याची "अभिनव भारत" योग्य कार्य करते का नाही हे माहीत नाही, आणि हा येथे प्रश्न नाही. प्रश्न इतकाच आहे की कुठलेही ठोस पुरावे नसताना, राज्य सरकार कडून दोनचार संघटनांना या निमित्ताने बंदी घालून वेळ मारून नेण्यातला प्रकार वाटला. अर्थात त्याबद्दल कोणीच काही बोललेले दिसले नाही. बातमी देखील लो की प्रोफाईल पद्धतीने आल्यामुळे सहज दिसत नाही. (म.टा. मधे तर दिसलीच नाही!)

आपल्या प्रतिसादाला आक्शेप नाही पण
"अभिनव भारत" या सावरकरांनी चालू केलेल्या आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळात विसर्जीत केल्यावर नव्याने चालू केलेया
यात सावरकरांचा सन्दर्भ खटकला. सध्याच्या "अभिनव भारत" चे नाव तेच आहे या पलिकडे, आपणच म्हणल्याप्रमाणे सावरकरांनी सुरु आणि विसर्जित केलेल्या "अभिनव भारत"शी फार संबंध नसावा. आणि फार जोडुही नये असे वाटते.

आपण पुर्नस्पष्टीकरण केलेत त्याबद्दल आभारी आहे! :) माझा लिहीण्याचा तोच मुद्दा होता. बर्‍याचदा माध्यमे (विशेष करून इंग्रजी) सावरकरांचा हळूच (नरोवा कुंजरोवा) संबंध जोडातात. त्यात परत सद्याच्या प्रमुख हिमानी सावरकर, म्हणून अजूनच गैरसमज... त्यामुळे येथे हे वाचकांच्या (माहीत नसल्यास) लक्षात यावे म्हणून तसे लिहीले होते.

सावरकारानी बंद केलेली अभिनव भारत संघटना हिमानी सावरकरान्नी सुरु केली आहे. हिमानी सावरकर या स्वातंत्रवीर सावरकरांच्या ( भावाच्या) सूनबाई आहेत. त्या नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत. ( ही ऐकीव माहिती आहे, कन्फर्म करावी, ही नम्र विनंती.)

दाभोलकरांचे कार्य केवळ वैचारीक पातळीवर (पुस्तकलेखन, भाषणे) नसून अंनिसच्या माध्यमातून बाबाबुवा आणि तत्सम उपद्रवी लोकांना आव्हान देउन त्यांचा पर्दाफाश करणे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन पिडीत लोकांना सोडवणे या पातळीवर होते. ही आव्हान प्रक्रीया फार खडतर असते. बहुतेक वेळा धमक्या,शारीरिक हल्ला यांच्याशी सामना करावा लागतो. पोलिस अथवा शासकीय अधिकारी हे देखिल कायदेशीर बाजू पक्की असल्याशिवाय मदत करु शकत नाहीत. आव्हान प्रक्रीया ही किती विचारपूर्वक आणि पद्धतशीर आखणी केलेली असते याची माहीती त्यांच्या पुस्तकातून मिळते. इतकीवर्ष इतके तपशीलवार नियोजन करून कार्य केल्यावर बर्‍याच ठिकाणी त्यांना प्रचलित कायद्यांच्या मर्यादा लक्षात आल्या. त्यातूनच नवीन कायद्याची गरज लक्षात आली, त्यावर पूर्णपणे विधिमंडळावर अवलंबून न रहाता स्वत: सहकार्‍यांसह झटून मूळ मसुदा तयार केला. तेव्हा १० ओळी वाचून त्या कायद्याला अनावश्यक, उपद्रवी ठरवणे हे खचितच अयोग्य ठरेल. कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी त्याची समीक्षा जरूर व्हावी पण यामुळे पूजा करणार्‍याला तुरुंगवास होईल अशा नाहक भितीने संपूर्ण कायद्याला विरोध करण्याने काहीच साध्य होणार नाही.

>>>>>अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. आता दैनिकात याबद्दल खूप छापून आलं आहे. अंधश्रद्धा विरोधी कायदा असे शीर्षक जावून जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रवास पाहिला तर लक्षात येईल की या मसुद्याची आणि प्रारुपाची प्रचंड अशा विविध हरकती पूर्वीच आल्या आहेत. विविध सामाजिक चळवळींच्या घटकांनी सतत त्याबद्दल विरोध करुन करुन हे असावं ते नसावं असं म्हणून या विधेकातील काही मुद्यांना सतत विरोध केला काही मुद्दे बदलायला लावले आहेत. अगदी शेवटचा बदल मला वाटतं वारक-यांच्या विरोधामुळे केला गेल्याचे अनेकांना स्मरत असेल, त्यामुळे सामाजिक संघटनांना विश्वासात न घेता सदर वटहुकूम राज्यपालांकडे पाठविण्यात आला या मुद्यात तसे काही तथ्य नाही, असे वाटते. >>>> बाकी, कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. अतिशय उत्तम. दवाखान्यात जाऊन उपचार घेणे रुग्णासाठी केव्हाही चांगले. बाकी, मंत्र तंत्राने विष उतरवणार्‍यांना डायरेक्ट जेलात घातलं पाहिजे. किमान तीन महिने जामीन मिळु नये. जामीन मिळत नाही, तो पर्यंत अशा मंत्रतंत्र सिद्धी येणार्‍यांना जेलात इतके कष्टाचे कामं द्यावीत की राहीलेल्या आयुष्यात पुन्हा त्याला मंत्राची आठवण होऊ नये. आता अवांतर :मुटे साहेब, तुम्ही खेडंगाव चांगलं पाहिलं आहे मीही पाहिलं आहे, तसं ते अनेकांनी पाहिलंय. वर तुम्ही विंचवाचं उदाहरण दिलं आहे त्यात तुम्हीच म्हणता की विंचवाच्या दंश एक तासभर माणसाला मरणप्राय अशा वेदना देत असतो आणि तासाभरानंतर त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. मंत्र-तंत्रात काही दम नसतो मंत्र म्हणनारा म्हणत असतो त्यात बराच वेळ जातो आणि हळुहळु विंचवांचा दंशाची तीव्रता कमी होत जाते. ते काही मंत्र-तंत्राने होत नाही, हे आता मला तरी समजू लागले आहे. साप चावल्यानंतर कोंबडीचं ढुंगन साप चावलेल्या जागी लावलं की कोंबडी विष ओढून घेते. कोंबडी मेली की विष उतरतं असे काहीच्या काही समज आपल्या खेड्यात अजूनही गच्च भरुन आहेत. काही आधार नसतो या गोष्टींना. बिनविषारी साप चावल्यानंतर अशा कृती करणा-या तांत्रिक मांत्रिकाचं अशा कोणत्याही उपायानं नाव होतं. आणि आपण नसत्या गोष्टींचं समर्थन करतो. पिसाळलेला कुत्रा चावला तर कुत्रा चावला आहे त्या रुग्णाला हात बांधुन कुत्र्यासारखं रांगायला लावून कोणत्या मंत्र तंत्राची भाकरी खाऊ घालतात, याच्यासारखा फालतू विलाज कोणता नाही. सरळ दवाखान्यात जाऊन योग्य उपचार घेणे, तरच रुग्णाचा जीव वाचेल, नसता रेंबीजची लागण झालेल्या रुग्णाचे हाल काय लिहायचे... असो, समाजाचं प्रबोधन करणार्‍यांना समाजासाठी अजून किती काळ लढावं आणि मरावं लागेल माहिती नाही...! -दिलीप बिरुटे

बाकी, मंत्र तंत्राने विष उतरवणार्‍यांना डायरेक्ट जेलात घातलं पाहिजे. किमान तीन महिने जामीन मिळु नये. जामीन मिळत नाही, तो पर्यंत अशा मंत्रतंत्र सिद्धी येणार्‍यांना जेलात इतके कष्टाचे कामं द्यावीत की राहीलेल्या आयुष्यात पुन्हा त्याला मंत्राची आठवण होऊ नये.
का जेलात टाकले पाहीजे? ते काय कोणावर जबरदस्ती करत आहेत का? सरकारने असले फालतू कायदे करण्यापेक्षा गावोगावी वैद्यकीय सेवा कशा पोचतील ते बघायला पाहीजे. मंत्रतंत्र सिद्धी करणार्‍यांचा धंदा आपोआपच बसेल.

>>> का जेलात टाकलं पाहिजे. आता का जेलात टाकलं पाहिजे. मंत्र-तंत्र हा उपचाराचा इतका अघोरी प्रकार आहे की उपचार करुन घेणा-याची बुद्धी गहाण पडलेली असते, उपचाराची गरज असलेल्यास मलमुत्र खायला दिले तरी डोळे मिटून खातील तेव्हा कोणतेही शास्त्रीय उपचार करण्यापेक्षा ज्या उपचारांची अजिबात खात्रीच नाही, अशा उपचारांनी रुग्णाचा जीव जाणारच आहे, असे उपचार घेऊन काय उपयोग, तेव्हा, असे उपचार करणा-यांना आणि अशा उपचाराचं समर्थन करणा-यांनाही जेलात घातलं पाहिजे. कारण ज्या रुग्णाला उपचाराची गरज असते, तेव्हा काही लोक दवाखान्यात उपचारासाठी सुचवतात तर काही बुवाबाबांचा रस्ता दाखवतात. अशा वेळी बाबाबुवांचा रस्ता दाखविणा-यांनाही जेलात टाकलं पाहिजे, असं माझं मत आहे. >>> ते काय कोणावर जबरदस्ती करत आहेत का ? ते काय कोणावर जबरदस्ती करतील ? अशिशिक्षित समाज नव्हे तर सुशिक्षित म्हणवून घेणारे लोक जेव्हा आपली बुद्धी गहाण टाकुन आम्ही अमुक धमुक रोगांवर उपचार करतो असा दावा करणा-यांकडे लोक जातात तेव्हा समाजाची दिशाभूलच करत असतात, तेव्हा अशा उपचारांचा पर्याय उपलब्ध नसणे हीच आवश्यक गोष्ट आहे. . >>>सरकारने असले फालतू कायदे करण्यापेक्षा गावोगावी वैद्यकीय सेवा कशा पोचतील ते बघायला पाहीजे. फालतू कायदे असं वाचतांना मला एकूण समाजाच्या मानसिकतेचा अंदाज येतोच येतो. तेव्हा, सरकारने लवकरच या वटहुकुमाला अंतिम स्वरुप द्यावे, असे माझे मत आहे. बाकी, राहीला लंगडे समर्थन करतांना गावोगावी वैद्यकीय उपचाराची सुविधा दिली पाहिजे याची,तर माझ्याकडे आता काही विदा नाही, पण जवळ जवळ महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात आता प्राथमिक उपचाराची सोय आहे, किमान वीस-पंचवीस किलोमिटरच्या परिघात सरकारी दवाखाने उपलब्ध आहेत.आणि प्राथमिक उपचार सहज होऊ शकतील. -दिलीप बिरुटे

साहेब मान्य आहे,पण त्यासाठी प्राथ्मिक आरोग्य केन्द्रात आधी डोकटर उपलब्ध असावे लागतात्,तसेच सर्पदन्श लस उप्लब्ध असावी लागते, तसेच वीस - पन्चवीस किलोमिटर ला जायला वाहन उपल्ब्ध असावे लागते ते काही सरकार पुरवत नाही की अनिस, एकिकडे आपल्या कडे विदा नाही असे म्हणायचे, तरिसुद्धा त्याना विरोध करताना या गोष्टीन्कडे मात्र काणाडोळा करणे योग्य नाही तसेच एका माणसाच्या बोलण्यावर समाजाच्या मानसिकतेचा अन्दाज बान्धणे म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठने असे वाटते.

मला वाटलंच होतं की प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स उपलब्ध आहेत काय, हा मुद्दा येईलच. ही गोष्ट मलाही मान्य आहे की नियमित डॉक्टर्स उपलब्ध असत नाही, असले तरी ते शहरात राहण्यासाठी गेलेले असतात. वगैरे. नर्सेस दवाखाना चालवितात, वाहने उपलब्ध नाहीत. औषधं नाहीत. पण, डॉक्टर्स नाहीतच असं काही नाही. आता गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्रे उभी राहीली आहेत. आणि रुग्णांना तिथे उत्तम उपचार मिळतात, असे उपचार मिळालेच पाहिजेत. प्रार्थमिक आरोग्य केंद्रात कोणी डॉक्टरांनीच असा विदा द्यावा. की विंच दंशाचे रुग्ण किती आले, सर्पदंशाचे किती आले, उपचार कितींना मिळाले, किती रुग्ण दगावले. मला वाटतं बाबाबुवांपेक्षा उपचारांच्या बाबतीत सरासरीने डॉक्टर्स पुढेच असतील. एका माणसाच्या बोलण्याच्या मानसिकतेवर म्हणजे शंभरात, हजारात असा एक म्हणु अशी माणसं असलेल्या विचारांचाही समाज आहे याचा अंदाज येतोच की, नसेल तसं तर माझं निरिक्षण चूक आहे, याचा विदा आपण द्यावा. -दिलीप बिरुटे

एका माणसाच्या बोलण्याच्या मानसिकतेवर म्हणजे शंभरात, हजारात असा एक म्हणु अशी माणसं असलेल्या विचारांचाही समाज आहे याचा अंदाज येतोच की, नसेल तसं तर माझं निरिक्षण चूक आहे, याचा विदा आपण द्यावा.
अहो प्राध्यापक साहेब - मी वयाच्या १५-१६ पूर्ण नास्तिक आहे, तसेच सर्व प्रकार च्या अंधश्रद्धांपासुन दुर आहे. पण सरकारचे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे पसंत नाहीये. मी डॉक्टर कडे जावे का मांत्रिका कडे हे ठरवण्याचा अधिकार मला पाहिजे. कोणावर सक्ती किंवा जबरदस्ती नसावी. सरकार जर ह्या गोष्टी ठरवू लागले तर फार धोकादायक आहे. दुसरे सरकार आले आणि त्यांचे मत वेगळे असेल तर, ते सर्वांनी आस्तिक असावे आणि रोज पूजा / नमाज करावेत असा वटहुकुम काढेल.

>>>> प्राध्यापक साहेब - मी वयाच्या १५-१६ पूर्ण नास्तिक आहे, तसेच सर्व प्रकार च्या अंधश्रद्धांपासुन दुर आहे. आत्ताशी कुठं बरं वाटलं....! धन्स. >>>>> सरकारचे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे पसंत नाहीये. सरकारनं आपल्याल्या शिक्षणाची दारं उघडून दिली. आपण सरकारलं म्हटलं का, आम्ही अशिक्षितच बरे होतो... कशासाठी तुम्ही आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहात ? पण, शिक्षणाचा फायदा असा झाला की चांगलं वाईट याची समज आली. हिशेब टीशेब करता आले, आधुनिक विचारांची ओळख झाली. शिक्षणाचा फायदाच झाला ना ? काही चांगलं होत असेल तर तुमच्या माझ्या सारख्याने समाजाच्या भल्या गोष्टींचं समर्थन केलं पाहिजे. मला वाटतं सध्याचा कायदा पाहता त्यात काही धोकादायक आहे असे वाटत नाही. आणि असेलच तर सध्याचा कायदा म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नाही की झाला तो निर्णय अंतिम आहे, त्यात बदल होतील. पण, एकदा कायदा तर येऊ द्या.. कायद्याचे ब-या वाईटाचे विचार होत राहतील. काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

तुमच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आदर राखून कळकळीची विनंती... कॄपया "धन्स" नको "धन्यवाद" लिहा.

>>>> कॄपया "धन्स" नको "धन्यवाद" लिहा. आपल्या विचारांचा आणि विनंतीचाही आदर करतो, पण, मला काय लिहायचं ते मी लिहीन. धन्स. -दिलीप बिरुटे

सरकारनं आपल्याल्या शिक्षणाची दारं उघडून दिली. आपण सरकारलं म्हटलं का, आम्ही अशिक्षितच बरे होतो
प्राध्यापक साहेब - मी पण तेच म्हणतो आहे. सरकार ने शिक्षणाची दारे उघडुन दिली, पण सक्ती केली का शिक्षणाची? किंवा कोणी आई बापानी मुलाला शाळेतुन काढले तर त्याला जेल मधे टाकु असा कायदा केला का? शिक्षणाची सोय करुन दिली जेणे करुन ज्याला शिकायचे आहे तो शिकू शकेल. तसेच सरकार नी वैद्यकिय सेवा उपलब्ध करावी, लोकशिक्षण करावे. पण ज्याचे त्याला ठरवून द्यावे त्यानी काय करावे ते.

पण सरकारचे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करणे पसंत नाहीये. मी डॉक्टर कडे जावे का मांत्रिका कडे हे ठरवण्याचा अधिकार मला पाहिजे. कोणावर सक्ती किंवा जबरदस्ती नसावी. सरकार जर ह्या गोष्टी ठरवू लागले तर फार धोकादायक आहे.
याच न्यायाने उद्या तुम्ही असही म्हणाल की स्वतःला मुलगा हवाय की मुलगी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मुलीला गर्भातच मारलं तर त्यात चुकीचं काय?. किती लग्न करावी हा पण ज्याचा त्याचा प्रश्न मग होऊन जाउदे अ‍ॅट अ टाईम दहा बारा जणींशी/ जणांशी लग्न.... व्यक्तीस्वातंत्र्याचं मुल्य आम्हालाही उच्च वाटतंच हो... पण तुमचं व्यक्तीस्वातंत्र्य समाजाला हानीकारक असेल तर त्याला कायद्याचा वचक हवाच...

याच न्यायाने उद्या तुम्ही असही म्हणाल की स्वतःला मुलगा हवाय की मुलगी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
यात चूक काय आहे? मला मुलगा हवा कि मुलगी हे ठरवण्याचा हक्क मला असावा, सरकारला नको. आणि… ज्या समाजात स्त्रियांविरुद्धचे गुन्हे सर्वाधिक वेगाने वाढत आहेत, त्या समाजाला माद्या पुरविण्याची जबरदस्ती मुलींचे-बहिणींचे रक्षण करण्यास अक्षम असलेल्या पांढरपेश्या बाप-भावावर कशासाठी?

मला वाटते तुम्हाला पण मी काय म्हणतो आहे आणि गर्भात मुलीला मारुन टाकणे ह्यातला फरक समजतो आहे. जर १८ वर्ष वयाच्या पुढच्या मानसिक संतुलन ठीक असलेल्या माणसानी मला मांत्रिका कडुन च उपचार करुन घ्यावे असे ठरवले असेल तर सरकार कोण नाही म्हणणारे.

मी डॉक्टर कडे जावे का मांत्रिका कडे हे ठरवण्याचा अधिकार मला पाहिजे. कोणावर सक्ती किंवा जबरदस्ती नसावी.
सहमत. (अंनिसच्या संस्थळावरील मुद्यांच्या भाषेवरून) पण मला वाटते की जर मसुदा योग्य असला तर जे फसवत आहेत त्यांच्या विरोधात हा कायदा आहे. पक्षि: तुम्ही मांत्रिकाकडे जाऊ शकता नो प्रॉब्लेम, पण कायद्यानुसार मांत्रिक लबाडी करत आहे हे सिद्ध झाले तर त्याला त्याचे प्रोफेशन गुंडाळावे लागेल अथवा शिक्षा भोगावी लागेल. फक्त तुम्ही (लेट अस से) मांत्रिकाकडे जाण्याचा निर्णय घेत असताना त्याचा वाईट परीणाम हा एखाद्या असहाय्य (आजारी, मनोरूग्ण वगैरे) जीवावर होत असला तर त्याला तुम्ही जबाबदार ठरू शकता. हा मुद्दा एथिक्सचा आहे आणि त्यावर बरीच होऊ शकते.

इतक्या वर्षात कोकणात आणि सह्याद्रीच्या बहुतांश भागात फिरलोय ,आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली …सगळीकडे आरोग्यकेंद्रे आहेत , दुर्गम वाड्यात ऑन व्हील आरोग्यकेंद्रे आहेत. जिथे सरकारला पोचत येणं शक्य नव्हत अशा ठिकाणीही प्रवरा ट्रष्ट, कृष्णा मेडिकल फौंडेशन, वारणा ट्रष्ट इ. संस्था आरोग्यविषयक सेवा निशुल्क पुरवतात.प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध असतेच भोंदू उपचारांमुळे भारतात दर वर्षी १.५ लाखांपेक्षा जास्त लोक दगावतात.

तसे असेल तर उत्तमच्,परन्तु मी कोकणातला असल्याने,बहुतेक वस्ती ही दुर्गम भागात आहे म्हणजेच दरीत्,जीथे रस्त्यापर्यन्त पोचण्या साठी एक तर पुर्ण डोन्गर चढावा लागतो,(कधी एक उतरुन नदी ओलान्डुन) तेव्हा आप्ल्या व्हेन पर्यन्र्त पोचणे देखिल कठीन असते,आणि आपण वर्णन केलेला बहुतेक भाग हा पश्चिम महराष्ट्रात येतो तो काही इतका दुर्गम नाही,त्यामुळे दवाखान्यात उशीरा पोचल्याने सुद्धा रोगी दगावण्याचा धोका जास्त असतो.

सरकार जी घाई करतंय (आणि आधी इतका उशीर 'लावल्यावर' आता घाई) त्याबद्दलचा आक्षेप मी समजू शकते. यातून लोकशाही प्रक्रियेवर आघात होतो हे मान्य. बाकी आक्षेप समजण्याइतकी माझी मती नाही :-)

शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचा शिखंडी करून कोणी त्याआडून बाण चालवत आहे का - हा खरा प्रश्न आहे. शेतकर्‍यांचा, वारकर्‍यांचाच नव्हे तर प्रत्येकाचा शिखंडी करून नेते (कोणत्याही पक्षाचे नव्हे तर सर्व नेते) त्याआडून बाण चालवत आहेत हा कायदा जर असा वटहुकूम काढूनच करायचा होता तर आधी करायला हवा होता. कोण रोखत होतं. आणि येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हा कायदा संमत झाला नाही तर- झाला तर निवडणुकीसाठी उत्तम भांडवल... नाही झाला तर बघा विरोधकांनी नाही होऊ दिला कायदा. एक नवं भांडवल... कालच एका च्यानेलवर श्याम मानव ह्या कायद्याचा मसुदा / कलमे वाचून दाखवीत होते. ह्या आधी ती कलमे आम्हा साऱ्या जनतेला त्यांनी किंवा त्या च्यानेलने का वाचून, समजावून सांगितली नाहीत. ह्याचे उत्तर त्यांनी आधी द्यायला पहिजे. वारकऱ्यांचा ह्या कायद्याला विरोध होता तर मग ह्या कायद्याच्या, कलमांच्या प्रती काढून त्या संपूर्ण समाजामध्ये, किमान जे वारकरी होते त्यातील अनेक समजूतदार आणि अनुभवी व्यक्तींना का वाटल्या नाहीत. ह्यात आपल्या वारकरी समाजाच काही नुकसान नाही हे का नाही सांगितलं अनिस वाल्यांनी. कोणी रोखले होते त्यांना. का हा कायदा प्रत्येकाने त्यांच्या संस्थळावर जाऊनच पाहायला हवा होता

रोम्युलस व्हिटेकर, निलीमकुमार खैरे यांच्यारख्या सर्पतज्ञांनी तुम्ही वर नमूद केलेल्या सो कॉल्ड पारंपारिक उपचारपद्धती बोगस असल्याचे सिद्ध केले आहे. आणि ज्या प्रकारे भगत्या सर्पदंश झालेल्यांना मंदिरात नेउन देवाचा जप करायला लावून वेडेवाकडे चाळे करून, कधी कधी नागमणी (?) लावून विष उतरविण्याचा प्रयत्न करतो ते बघता या गोष्टी जादू-टोणा कायद्या अंतर्गत नक्कीच याव्यात. -भगत्याला चेम्बवलेला मालोजी

मुटे सरांचे आरोप खरोखरच हास्यास्पद आहेत.
साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे.
मी वयाची पहिली पंचवीस वर्षे एका टीपिकल खेडयात काढली आहेत. साप किंवा विंचू चावल्यानंतर डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाचा "पारंपारिक" उपाय केल्याने लोकांनी जीव गमावलेला पाहीला आहे.
काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.
हे जंगली पानांचे उपाय तपासता येतील का?

मी वयाची पहिली पंचवीस वर्षे एका टीपिकल खेडयात काढली आहेत. साप किंवा विंचू चावल्यानंतर डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाचा "पारंपारिक" उपाय केल्याने लोकांनी जीव गमावलेला पाहीला आहे.
सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात? सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात?

सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात? सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात?
सगळं असतं. पण गावातील अशिक्षीत जनतेला डॉक्टरांच्या उपचारापेक्षा मांत्रिकाचा उतारा जास्त पॉवरफुल वाटतो.

हे जंगली पानांचे उपाय तपासता येतील का?
आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी तपासली आहे का? ती कशी चालते तुम्हाला आणि अनिस वाल्यांना?