Welcome to misalpav.com
लेखक: नि-अ-पाटणकर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एकदम खुसखुशीत लेखनशैली. ४ आकड्यांपेक्षा प्रेमाचे ४ क्षण भेटले हे काय कमी आहे ;-).

काही वेळानंतर तिला माझी खूण समजली असावी कारण तिने चष्मा कडून ठेवला.
एवढं झाल्यावर कोणत्याही प्रासंगिक गोष्टीवर बोलणं सुरू करायला किती वेळ लागतो?

वरची बर्थ म्हणा. ;) - अनुभवी प्रवासी प्रेक्षक. :D >>एवढं झाल्यावर कोणत्याही प्रासंगिक गोष्टीवर बोलणं सुरू करायला किती वेळ लागतो? एकतर तरणीताठी पोरगी, त्यात गुजराती..त्यात आणि सोबत कुटुंब! किती अवघड असतंय ते राव. हां, सोबत फ्यामिली नसती तरची गोष्ट अगदीच निराळी होती म्हणा. आणि दोन्हीकडून शिग्नल जोरात चालू असतील तर कुणाच्या मनात काय नसताना ह्याच दोन चोरांच्या मनात किती टिपूर चांदणं पडलेलं असतं ते काय आणि वेगळ्यानं सांगायचं का? सारखी एकच भिती, 'कोण बघतंय का?...कुणाला कळतंय का?' अन ह्या अशा जांगडगुत्त्यातून बसल्याजागी काय गप्पा मारायला सुरु करणार? :)

एकतर -
माणसाचे वय कितीही झाले तरी परक्या बाईचा हात हातात घेण्याची संधी तो सोडत नाही
असे अवली काका, त्यामुळे पुतण्याला काळजीचं कारण नाही. आणि फ्यामिलीसमोर `एका गोधडीत' बसायची शक्यता नाही, त्यामुळे
तिची सामानाची आवारावर चालू होती. पर्स ठेवताना, air bag आवरताना तिची हळूच येणारी एक नजर मला अस्वस्थ करत होती. मी सर्व प्रकारे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो.
इतका कन्फर्म्ड सिग्नल असतांना, कोणत्याही कॉमन विषयावर संवादाला सहज सुरूवात करता आली असती. घटना घडून गेली आहे त्यावर चर्चा करून उपयोग नाही. पण इतक्या `मंद वेगामुळे' पुढे अशीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रतिसाद दिला इतकंच.

माणसाचे वय कितीही झाले तरी परक्या बाईचा हात हातात घेण्याची संधी तो सोडत नाही हा..हा.. काकांनीच आपल्या पुतण्याला "लाईन क्लियर" करून देण्यासाठी ( तिच्या आईचे लक्ष वळविण्यासाठी ) हा खटाटोप केला नसेल कशावरुन ?

मझा आला वाचायला. :) (असेच काही अयशस्वी रेल्वे प्रवासही आठवून गेले क्षणभरात. ;) ) बाकी, आपण मराठी पोरं साले असेच...नुसते घाबरत झुरणारे! आमच्या दिल्लीकर मित्रानं सांगितलेले एक-दोन उपाय सांगतो - जनरल खाणाखुणा करुन उठून दरवाजापाशी वारा खायला म्हणून जायचं...पार्टी समोरुन विंट्रेष्टेड असेल तर धा मिंटात म्हणे वार्‍याला येऊन उभी राहते. मग तिथे निवांत गप्पाटप्पा करायच्या..फोननंबरची देवाणघेवाण वगैरे सुखनैव होतं. लाईनला अगदीच तुमच्या मागं येणं शक्य नसेल तर असंच उठून जाता जाता हळूच आपला मोबाईल तिच्यापाशी गुपचूप सोडून जायचं. परत येऊन मोबाइल घेतला की त्यावर जादूनं तिचा लंबर आलेला असतो. ;) साला एक काम करा, पुढची ट्रीप दिल्लीवाल्या ट्रेननं कराच. ;)