वरील सर्व गोष्टी मान्य. परंतु साप / विंचू चावल्यानंतरची जी पारंपारिक उपचारपद्धती दिली आहे ती निश्चितच चुकीची आहे. मिपावर या बाबतीत पूर्वी लेखन झाले आहे आणि सध्या जॅक डॅनीयल्सच्या सापावरच चालू असलेल्या लेखमालेतून योग्य माहिती मिळत असताना तुमच्या लेखातून दिल्या गेलेल्या माहितीबाबत अत्यंतीक विरोधाभास दिसल्याने त्या माहितीची (व पर्यायाने लेखाची व लेखकाची) विश्वासार्हता शंकास्पद वाटल्यास नवल नाही.
लेखामध्ये "नरो वा कुंजरो वा" / परस्परविरोधी प्रकारची अनेक वाक्ये आहेत. त्यामुळेही प्रतिसादांचा टोन बदलला असावा - हा माझा कयास आहे.
उदा.
२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही.मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही
"माझ्या गावातील २५ पेक्षा जास्त मंडळी फेसबुकवर आहे. हा लेख मी फेसबुकवर सुद्धा टाकत असल्याने मी देत असलेल्या माहितीबद्दल वाचकांनी विश्वास बाळगावा. "
पहिल्या लेखात गावकर्यांची साक्ष काढावी असे काही आढळले नाही. त्यामुळे या वाक्याचा उद्देश्य कळला नाही. पुढे काही उल्लेख येणार असल्यास माहीत नाही.
तसेच १२, १४, १५, १६ यांचाही उद्देश्य (अंधश्रद्धा निर्मूलन किंवा जादूटोणा विरोधी कायद्याच्या संदर्भात) समजला नाही.
+१
लेख फेसबुकवर असणे आणि २५ मंडळींनी साक्ष देणे या गोष्टींचा विंचू / सर्पदंशावरच्या पारंपारिक उपचारांच्या परिणामकारकतेशी काय संबंध असावा हे काही समजलं नाही.
मुटे जीं ना हा कायदा नकोसा का वाटतो हे माहीत नाही, पण माझ्या साठी असे कायदे व्यक्ती स्वातंत्र्या वर घाले आहेत. अश्या निमित्ताने सरकार तुमच्या आयुश्यात शिरते आहे.
आज तुम्हाला जे पटते आहे ते करते आहे ( बर्याच लोकांना पटत नसुन ). उद्या सरकार तुम्हाला न पटणारे कायदे पण आणेल. हा धोका आहे.
मुटेजीं नी दारू चे उदाहरण चांगले दिले आहे.
सरकार किंवा सामजिक संस्थांनी दारु चे दुष्परिणाम सांगावेत वेळ प्रसंगी जास्तीचे कर लावावेत पण दारु बंदी करणे चुकच आहे. ह्या कायद्याचे पण तसे च आहे.
कायद्याचं नक्की प्रयोजन काय आहे (याची सामाजिक बाजू) गवि, इज दॅट यू? या प्रतिसादात नमूद केली आहे. वैद्ययकीय बाजू, तज्ज्ञांनी पहिल्या लेखावर सुयोग्यपणे मांडली आहे.
वारकरी संप्रदायचा `अंधश्रद्धा' या शब्दाला आक्षेप होता म्हणून कायद्याचं नांव 'जादूटोणा, अनिष्ट अघोरी प्रथाविरोधी कायदा' असं असेल.
तुम्ही प्रगतीशिल शेतकरी आणि संवेदनाशिल व्यक्ती आहात, तस्मात, गैरसमज करून घेऊन, इतक्या विधायक प्रयत्नाच्या विरोधात वातावरण निर्मिती करू नये ही विनंती
२) मी व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरकारची कमीतकमी ढवळाढवळ असावी, असे मानतो.
हे वाक्य फार आवडले .
समजा एखाद्या साप चावलाय अन तोच म्हणत असेल की मला मांत्रिकाकडे घेवुन चला डॉक्टर कडे नको तर ती त्याची मर्जी ! त्याला अडवण्याचे कारण नाही .
पण तो जर बेशुध्द पडला असेल तर त्याच्या जीवाविषयी निर्णय घ्यायची जबाबदारी आजुबाजुच्यांचीच आहे आणि अशावेळी त्याला डॉक्टरकडेच नेले पाहिजे .
प्रतिक्रिया
वरील सर्व गोष्टी मान्य. परंतु
२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही.मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही"माझ्या गावातील २५ पेक्षा
+१
.
सरांशी बाडीस!
मुटे जीं ना हा कायदा नकोसा का
गंगाधरजी, या कायद्याबाबत तुमचे कमालीचे गैरसमज झालेत
धन्यवाद
केवल ७ प्रतिसाद?
+१
बहोत नाइंसाफ़ी है ये?