लेखन म्हणून चांगले आहे पण वास्तवापासून थोडे फटकून आहे.
आज कामवाल्या बाईंची तैनात; त्यांच्या, न सांगता मारलेल्या, दांड्या; खायची प्यायची बडदास्त आणि त्याच्या पुढे करावी लागणारी आर्जवं पाहता 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.
पेठकर काका,
वास्तवापासून थोडे फटकून आहे.
आणि
'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.
मान्य. तुमचा अनुभव आणि त्या अनुभवातून तुम्हाला लागलेला कथेचा अर्थ मान्य - अशा व्यापक अर्थाने मान्यता, सहमती.
पण त्याचबरोबर वास्तव एकजिनसी कधीच नसते - त्यामुळे जे सरासरी (सर्वसाधारण) वास्तव असते त्याच्या अल्याड-पल्याड अनेक गोष्टी असतात इतकंच नमूद् करू इच्छिते.
तरीच म्हणत होतो कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय अगोदर!
पुन्हा वाचल्यावर तितकेच अस्वस्थ वाटले. अशाही बायका असतात आणि मुजोर कामवाल्याही असतात. मुजोरीचा अनुभव घेतलेला आहे.
सुंदर तरी कसं म्हणावं..
गुलजारचं घरोंदा मधलं गाणं आठवलं शहराचं वर्णन वाचून -
दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुआ..
इन सूनी अंधेरी आंखो मे आसू के जगह आता है धुआ..
जिने की बजाह तो कोई नही.. मरने का बहाना ढुंढता है.. ढुंढता है.. !!
या प्रकारच्या पार्श्वभूमीवरच्या कथा, फिल्म्स पाहिल्याने असेल, विषय ओळखीचा जरी वाटला तरि प्रसंगांची गुंफण मनाला अस्वस्थ करते .. तेच लिखाणाचे यश!
अवांतर : "ती असे करते .. तिला असे वाटते.. " अशा वाक्यरचनेपेक्षा, "तीने असे केले... तिला असे वाटले" .. अशी वाक्यरचना कदाचीत जास्त सुट्सुटीत वाटली असती .. अर्थात हे माझे मत!
-पहाटवारा
छान लिहिलयस अतिवास.
जरी कामवाल्या बायका पेठकरकाका म्हणतात तश्या मुजोर असल्या तरी घरातुन मार खाउन आलेल्या, बायका मी स्वतः पाहिल्यात.
एकूण परिस्थीती अशीच आहे. पण कुणी दाखवत कुणी नाही दाखवत.
बाईचं आयुष्य कठीण असतं आणि कमी अधिक प्रमाणात गरीब असो की श्रीमंत काही बाबतीत सारखंच हेही चांगल्या प्रकारे व्यक्त झालंय. पण मला एवढ्या वर्षात घरकामासाठी लाचार झालेली बाई आजपर्यंत दिसली नाही. कामं असतातच. उलट गेली २ वर्षे माझा असा अनुभव आहे की जास्त पैसे द्यायला तयार झाले तरी मला घरकामाला कोणी मिळत नाहीये. त्यांना कमी पैसे मिळाले तरी फॅक्टरीत काम करणं जास्त आवडतं. पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी इतक्या दबल्या गेलेल्या बायका असतीलही. पण मी जिथे रहाते तिथे तरी म्हणजे मध्यम दर्जाच्या शहरांमधे मोलकरीण हा वर्ग इतका दबला गेलेला अजिबात नाही.
पैसा ताई, मुंबई मध्ये मी लहानपणा पासून कितीतरी बायकाना असे जीवन जगताना पहिले आहे, पाहते आहे. तुम्हा काही लोकांना हे वास्तववादी वाटणार नाही पण हे तितकेच खरे आहे, आजच्या काळात हि अशी परिस्थिती आहे कि दोन वेळच्या अन्नासाठी आतडी रगडे पर्यंत काम करावे लागते तेव्हा कुठे जाऊन घरात चुल पेटते. आतीवास ताई, मला तुमचे लेखन मनापासुन आवडले आहे आणि पटले सुध्दा आहेत. कारण प्रतेक्य नाण्याची दुसरी बाजू असते आणि ती दुसरी बाजु मी खूप जवळून पाहिलेली आहे.
मुंबईसारख्या ठिकाणी अशा दबलेल्या बायका असतील हे मी आधीच लिहिले आहे. तिथे विषमताही पराकोटीची असते. आणि बांधकाम कामगार वगैरे क्षेत्रात तर नक्कीच असतील. पण मोलकरणी आणि त्याही आमच्यासारख्या मध्यम दर्जाच्या शहरांमधे इतक्या दबल्या गेलेल्या नक्कीच नाहीत!
माझ्या निरिक्षणानुसार मुंबई-पुण्यातही कामवालीबाई मिळवणं आणि टिकवणं हे जास्तीचे पैसे मोजून, चहा-नाश्ता, जुन्या साड्या, ड्रेसेस देऊनही फार जीकरीचे झाले आहे. न सांगता दांड्या मारणे, स्वतःची चुक असूनही अजिबात एक शब्द ऐकून न घेणे हे सर्वसामान्य चित्र आहे. त्यावर कळस म्हणजे एखाद्या कामवालीशी तुमचे कांही कारणाने मतभेद झाले आणि तिला तुम्ही कामावरून काढून टाकले की ती तुमच्या घरी कोणी कामवाली कामासाठी येणार नाही ह्या साठी प्रयत्नशील राहते (यशस्वीही होते). अशा प्रसंगी नोकरी करणार्या बाईची ह्या कामवाली बाईमुळे फार फरपट होते. ह्या गोष्टी जवळून पाहिलेल्या (मुंबईत आणि पुण्यातही) आणि अनुभवलेल्या आहेत.
बाकी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. गरजू आणि कष्ट़करी बाई कामासाठी मिळाल्यास अनेक मुजोर कामवाल्यांच्या नोकर्या सुटतील. पण तसे होताना दिसत नाही. कारण ????
पैसा आणी पेठकर काका तुम्ही ज्या बाया पहाताय आणी वर्णता आहात त्या मुळच्या स्वभावनेच मुजोर असतील, पण दारु पिऊन नवर्याने मोडलेले मनगट घेउन मी गेलीय बाईबरोअबर दवाखान्याला. बिचारी अस्स्स सुजलेल मनगट घेउन आली होती. मी खायला दिल्यावर मला नको म्हणुन खाली मान घातलेली राजश्री मला अजुनही आठवते. दोन दिवस घरात मुलांना सुद्धा अन्न नव्हत.
मुसलमानाची ग्रॅज्युएट झालेली मुलगी नवर्याला आवडत नाही ऑफीसात काम केलेल म्हणुन दारात काम मागायला आली होती. भावाने हाकलुन दिलेली स्वाती चारदिवस आई यीएतो माझ्या घरात मुकाट पडुन होती. थरथरत अंग माझ मुंबईच्या आठवणींनी. त्यांच्या भानगडीत पडते म्हणुन नवर्याच्या जाम शिव्या खाल्ल्या.
बाईचं आयुष्य कठीण असतं आणि कमी अधिक प्रमाणात गरीब असो की श्रीमंत काही बाबतीत सारखंच हेही चांगल्या प्रकारे व्यक्त झालंय.
शिवाय मुंबईत अशा प्रकारे आयुष्य काढणार्या बायका असतील हेही लिहिलं आहे कारण मुंबईची अफाट लोकसंख्या आणि टोकाची विषमता, पण त्याचवेळी लहान शहरे आणि कोकणातली गावे पाहिलीत तर तिथे घरकाम करणार्या बायका स्वत;च्या हक्कांबद्दल जागरूक असतात. दर रविवारी आणि सणाला सुटी, वर्षसाडी, चहा खाणे हे सगळे सांभाळावे लागते तरी महिना १५००-२००० देऊन कायमची बाई मिळेल याची खात्री नाही. बांधकाम मजूर म्हणून गोव्यात आलेल्या हुबळीच्या कानडी बाया आजकाल मोलकरीण म्हणून कामे करणे पसंत करतात कारण त्याना तिथे बांधकाम कामगार म्हणून ८ तास काम करून २०० रु रोज मिळतात तर ५/६ घरची कामे करून १० ते १२ हजार आरामात मिळतात.
कोकणात तर आधीपासूनच माणूसबळ उपलब्ध नाही. शेतीच्या कामाला १५०-२०० रुपये रोज देऊनही माणसे मिळत नाहीत. शिक्षणामुळे सरकारी योजनांची माहिती सगळ्यांना आहे. गोव्यात तर एका दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला विविध योजनांद्वारे महिना रु. ६००० पर्यंत पैसे मिळतात. कोकणात थोडे कमी. त्यामुळे काम न करता जगता येते. जास्त पैसे हवे अस्तील तर कारखान्यात कंत्राटी कामावर जाणे त्यांना पसंत असते.
परवाच मी अगदी मोबाईल सुद्धा चालत नाही अशा आमच्या गावाला ८ दिवस अडकले होते कारण सासूबाई आजारी. आणि घरातले काम करायला कोणी मिळत नाही. शेवट एका बाईने सांगितली ती रक्कम कबूल करून तिला कामावर ठेवले आणि मी तिथून बाहेर पडले.
दारु पिऊन नवर्याने मोडलेले मनगट घेउन मी गेलीय बाईबरोअबर दवाखान्याला.
मी नाकारत नाहीए. अशा केसेसही असतील पण तुरळक. सरसकट सर्व कामवाल्या बायका मार खाऊन हात मोडून घेणार्या नाहित. तसेच, त्यांचे नवरे हुशार असतात. दारूसाठी पैसा पाहिजे नं! बायकोची कमाई त्यांना माहित असते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी त्यांना मारून टाकायची नसते. एखाद दूसरा असतो मूर्ख.
तुम्ही ज्या बाया पहाताय आणी वर्णता आहात त्या मुळच्या स्वभावनेच मुजोर असतील.
मुजोर असण्याची त्यांना गरज नसते. नवरा आणि बायको दोघेही नोकरी करत असतात त्या घरची मिळकत त्यांना आपल्या राहणीमानावरून माहित असते, आपल्या वाचून ह्यांचे भयंकर अडणार हेही ठाऊक असते आणि घरकामासाठी मिळणार्या बायकांची वानवाही त्यांना ठाऊक असते ह्या सर्वातून त्या त्यांचे महत्व जाणून स्वतःची किंमत ठरवतात. कामवाल्या सहजासहजी मिळत नाहीत हे जाणून त्या अटी घालतात आणि 'स्वातंत्र्य' उपभोगतात. त्या मुजोर नसतात 'हुशार' असतात, संघटीत असतात. आपण (अक्कल नसलेले) गरजवंत असतो. अडला नारायण..... ह्या तत्वाने आपणच त्यांच्या अटी आणि नखरे मान्य करुन त्यांचे महत्व वाढवत असतो. आपल्यापुढे पर्यायच नसतो. असो.
मार खाणार्या, हतबल, काम मिळत नसलेल्या कामवाल्या ज्या कदाचित मिळालेल्या कामाच्या ठिकाणी मुजोरी किंवा आळस करीत असाव्यात त्यांचे काम मालकीणीच्या पसंतीस उतरत नसावे त्याने त्यांचे काम वरचे वर सुटत असावे. मी ज्याला वास्तव म्हंटले आहे ते बहुसंख्य कामवाल्या बायकांना लागू असणारे आहे. एखाद दूसरा अपवाद असू शकतो.
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
अनेक प्रतिसाद वाचून 'वास्तव म्हणजे नेमकं काय' असा एक प्रश्न (पुन्हा एकदा) डोक्यात घुमायला लागला आहे :-) - त्याबद्दल नंतर कधीतरी
दोन वर्षापूर्वी महिलादिना निमित्त लेख मिपावर लिहिला होता.
तेव्हा मी मोलकरणी चे उदाहरण दिले होते ,
महेश च्या प्राण जाये पार शान ना जाये ह्या सिनेमात दिव्या दत्ता ने मोलकरणी चे सुंदर काम केले होते , तिचा नवर्या सोबत चा प्रसंग अंगावर शहारा आणतो.
सध्या मागणी व पुरवठा ह्यांच्यात तफावत आल्याने काही मोलकरणी आपले उखळ पांढरे करून घेतात.
मात्र त्यांना मिळणारा पगार त्यांच्या कामाच्या कामाने तुटपुंजा असतो , व भारतात श्रमाला प्रतिष्ठा नाहीं त्यामुळे ह्यांच्या नशिबी अश्या नरकयातना येतात.
हॉटेल व्यवस्थापन चे शिक्षण घेतांना शिक्षा म्हणून दीडशे विद्यार्थ्यांची भांडी घासणे किंवा अशीच बरीच कामे केली आहेत
संपूर्ण दिवस शिक्षा भोगून झाली की घरी जायचे त्राण नसायचे ,
तेव्हा एकदा आमचे सर आम्हाला म्हणाले
एका दिवसात तुमची ही हालत , तर चार घरातील संपूर्ण कामे करणारी बाई अर्धपोटी एवढे काम रोज करते ,
मात्र त्यांना मिळणारा पगार त्यांच्या कामाच्या कामाने तुटपुंजा असतो , व भारतात श्रमाला प्रतिष्ठा नाहीं त्यामुळे ह्यांच्या नशिबी अश्या नरकयातना येतात.
निनाद, पुण्यात, आमच्या घरांत कामाला येणारी कामवाली बाई दिवसभरात १५ घरं करते. एका घरातून तिला ८०० ते १००० रुपये मिळतात. म्हणजेच तिची सरासरी मिळकत महिना १२०००/- च्या घरात आहे. ह्या शिवाय तिच्यासाठी, तसेच तिच्या मुलांसाठी, जुने कपडे , तिच्यासाठी रोज चहा-नाश्ता, तिच्या घरच्यांसाठी कधी जेवणातील एखादा ताजा पदार्थ (हल्ली घरकाम करणारी माणसे शिळंपाकं स्विकारत नाहीत), सणासुदीला गोड-धोड, दिवाळीचा बोनस इ.इ. तिला मिळत असते. त्यायोगे तिचा अर्ध्याहून अधिक घरखर्चही परस्पर भागविला जातो.
घरकाम हे अत्यंत अंगमेहनतीचे काम आहे ह्यात ह्यात शंका नाही. पण १०-१२ तास अंगमेहनत करण्याची त्यांना सवय असते. आपण सटीसहामासी कधीतरी हे काम करतो आणि आपले अंग दुखते. पूर्वीच्या बायका पहाटे उठल्यापासून रात्री नीजेपर्यंत हीच घरकामे स्वतः करीत असायच्या, तेही निवृत्तीशिवाय, त्यांचेही कौतुक वाटते.
आधुनिक महिलाही, पहाटे उठून मुलांचे/नवर्याचे खाण्याचे डबे बनवून ८ तास नोकरी करून (मुंबईत असणार्या, १-२ तास लोकलचा प्रवास करुन) घरी येऊन पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करतात आणि मुलांचा अभ्यास वगैरे घेत असतात. त्यांना गृहीत धरले जाते. कित्येक नवरे घरकामाला हातही लावत नाहीत. (आता परिस्थिती बदलते आहे असे वाटते.).
५ वर्षांपूर्वी, आखातातील नोकरीसाठी, पुण्यात एका स्वयंपाक्याला मी राहणे, जेवण-खाण, गणवेष आणि भारतात जाण्यायेण्याच्या खर्चाव्यतिरिक्त महिना १५०००/- (त्या काळच्या पगाराच्या दरानुसार) देऊ केले होते पण त्याने, 'साहेब, मला इथेच (पुण्यात) सकाळी ६ तास आणि संध्याकाळी ४ तास काम करून २००००/- रुपये मिळतात' असे सांगून नम्रतेने नोकरी नाकारली होती.
ही माणसं फार भरपूर कमावत आहेत असा माझा दावा नाही परंतु अत्यंत तुटपुंज्या कमाईत दिवस काढताहेत असेही नाही. गरजेनुसार कमवत आहेत आणि नविन काम स्विकारायचे की नाही हेही स्वतः ठरविण्याइतपत स्वतंत्र झाले आहेत. कांही तुटपुंजे अजूनही गरीबीत असतील, त्यांच्यातच कांही दोष असतो पण, जे कामकरी कामाच्या बाबतील स्वच्छ, टापटीप, वक्तशीर आहेत ते सतत मागणी मध्ये आहेत.
बर्याच जणांचे मत मोलकरणीचे चित्रण अवास्तव आहे असे दिसले.
पण मी म्हणते, कथा वास्तववादीच असावी असे आहे का ? किंवा सध्याच्या काळाशी संगत नसून काही काळापूर्वीची परिस्थिती दाखवत असेल तर काय बिघडले ?
स्नेहांकिता,
कथा लेखनाबद्दल वाद नाहीए. माझ्या पहिल्या प्रतिसादातही म्हंटले आहे की 'लेखन म्हणून कथा चांगली आहे.' पण त्यातील कांही तपशिलांवर भाष्य केले तर ते लेखकास्/लेखिकेस आपल्या लेखनावर पुन्हा विचार करण्यास आणि भविष्यातील लेखनात समतोल साधण्यास मदतीचे होते. चर्चेचा उद्देशच तो असतो. लेखकास/लेखिकेस हतोत्साहित करण्याचा नसतो.
सध्याच्या काळाशी संगत नसून काही काळापूर्वीची परिस्थिती दाखवत असेल तर काय बिघडले ?
कथा कुठल्या जुन्या काळाशी संबंधीत वाटत नाही.
प्रकाश बरा असतो तेव्हा त्याच्या त्या जुनाट मोपेडवरून तो शारदाला ’श्रीराम’ सोसायटीपर्यंत सोडतो.
म्हणजे कामवालीचा नवरा पेट्रोल वाहन बाळगणार्यातला आहे. ही सद्य परिस्थिती आहे. हा जुना काळ नाही. त्या काळात कामवालीच्या नवर्याकडे साधी 'सायकलही' नसायची.
राणीची कोणीतरी एक मैत्रीण ’घरकाम करणा-या बायांची’ म्हणजे मोलकरणींची संघटना चालवते हे शारदाला माहिती आहे. हेही वाक्य आधुनिक काळ दर्शविणारे आहे.
आज कामवाल्या बाईंची तैनात; त्यांच्या, न सांगता मारलेल्या, दांड्या; खायची प्यायची बडदास्त आणि त्याच्या पुढे करावी लागणारी आर्जवं पाहता 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.
लेखनातील भावनेशी सहमत असलो तरी त्यातील 'तपशिल' वास्तवापासून दूर आहे हे मला सांगायचे आहे. हे इतके स्पष्ट लिहूनही 'जाणवले' नसेल तर खरंच आश्चर्य वाटते आहे. भविष्यात 'लेखन करताना भावनेला महत्व देत लेखन करतानाही वास्तवाचे भान सुटू नये' हा विचार लेखकापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो लेखकास पटल्यास तो एक, भविष्यात होणारा फायदा आहे. असो.
हा फक्त लेखावरील चर्चेतील माझा मुद्दा आहे. तो योग्यच आहे असा माझा आग्रह नाही. पण ते एक प्रामाणिक लेखन आहे.
पटले नाही तर सोडून द्यायचे स्वातंत्र्य लेखकास/लेखिकेस असतेच.
छान लिहिले आहे.
प्रत्येकीच्या कथा निराळ्या, व्यथा निराळ्या . :-(
आमच्या इथल्या शान्तामावशीची पोरगी भांडे घासणार्या आईला ओळख पण दाखवत नाही. आइच्य्याच पैशाने मोबाइलवर बोलत कॉलेजला जाते. :-(
लेखन म्हणून चांगले आहे पण वास्तवापासून थोडे फटकून आहे.
आज कामवाल्या बाईंची तैनात; त्यांच्या, न सांगता मारलेल्या, दांड्या; खायची प्यायची बडदास्त आणि त्याच्या पुढे करावी लागणारी आर्जवं पाहता 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.
अगदी बरोबर . थोडे काय वास्तवाशी खूप जास्त फटकून आहे .
प्रतिक्रिया
फार छान लिहिलयं. पण जीव
आतिवास, हे वाचवलं नाही सलग!
कामवाली बाई.
पेठकर काका,वास्तवापासून थोडे
वास्तवापासून थोडे फटकून आहे.आणि'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.मान्य. तुमचा अनुभव आणि त्या अनुभवातून तुम्हाला लागलेला कथेचा अर्थ मान्य - अशा व्यापक अर्थाने मान्यता, सहमती. पण त्याचबरोबर वास्तव एकजिनसी कधीच नसते - त्यामुळे जे सरासरी (सर्वसाधारण) वास्तव असते त्याच्या अल्याड-पल्याड अनेक गोष्टी असतात इतकंच नमूद् करू इच्छिते.अशी एखादी मोलकरीण तुम्ही स्वत
हो.
तरीच म्हणत होतो कुठेतरी
अस्वस्थ..
खरयं .. अस्वस्थ !
आभार सूचनेबद्दल
छान लिहिलयस अतिवास.
काळजाला घरं पडली...
याआधी देखिल कुठेतरी वाचलय..
हो. ब्लॉगवर प्रकाशित केली आहे
चांगला प्रयत्न.
आजकाल्च्या कोनत्याहि बायका
अतिवासतै, लेखन आवडलं
छान लिहिलंय
अंतरंगाचा ठाव घेणारे लिखाण…
तसे नाही
माझ्या निरिक्षणानुसार मुंबई
पैसा आणी पेठकर काका तुम्ही
मान्य आहे
वास्तवातील कामवाली.
वास्तव
दोन वर्षापूर्वी महिलादिना
चित्र बदलले आहे.
बर्याच जणांचे मत मोलकरणीचे
मान्य पण.....
भविष्यातील लेखनात समतोल
जाणवले नाही?
छान लिहिले आहे.
लेखन म्हणून चांगले आहे पण